Sunday 30 July 2023

द्रव्याचे वर्गीकरण (Classification of Matter's)

   भौतिक                    रासायनिक
        👇                        👇
  1) स्थायू.            ‌      1) मूलद्रव्य
  2) द्रव.             ‌ ‌       2) संयुगे
  3) वायु.                    3) मिश्रण
  4) आयनायू plasma
  5) Bose Einstein
      Condensate BEC

1)  स्थायू.(Solid)

◆ यांना निश्चित आकार व आकारमान असते.

◆ स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही म्हणून असंपिड्य  असतात.

◆ स्थायू हे अधिक दृढ असतात.

◆ स्थायू मधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, म्हणजेच त्यांच्या दोन कणा मधील अंतर खूपच कमी असते.

◆ यांच्यामध्ये सर्वाधिक आकर्षण (Stong Intraction) असते.

◆ स्थायू हे लवचिक असतात (elastic).

◆ काही स्थायूंना बाह्यबल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात या गुणधर्माला अकार्यता (प्लास्टिसिटी) म्हणतात.

◆ म्हणजेच अकार्यता,स्थितिस्थापकता, दृढता, असंपीड्यता हे स्थायू चे प्रमुख गुणधर्म आहेत.

★ स्थायू चे प्रमुख दोन प्रकार

1) अस्फटिकी स्थायू ( amorphous solid ):-

◆ अनियमित आकाराचे कण मिळून हे स्थायू तयार होतात, यांनाच आभासी स्थायू म्हणतात.

उदा . काच रबर प्लास्टिक
    
2) स्फटिकी स्थायू ( crystalline solid ):-

◆ यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फटिकी कणे असतात, यामधील कणाची मांडणी ही नियमित असते.

उदा. मिठ, हिरा, ग्राफाईट इ.
============================

2) द्रव (Liquid):-

◆ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो.

◆ यात अंतररेणूय आकर्षित बल (Inter Molecular force of attraction) स्थायू पेक्षा कमी व वायू पेक्षा जास्त असते.

◆ यामध्ये दोन रेणू तील परस्परांत स्थायु पेक्षा जास्त व वायू पेक्षा कमी असते.

◆ द्रव्य कमी संपिड्य असतात
============================

3) वायु (Gases):-

◆वायूला निश्चित आकार व आकारमान  नसते.

◆ वायू मधील दोन रेणू मधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ परंतु दोन रेणू मधील आकर्षित बल सर्वात कमी असते.

◆ वायू सर्वात जास्त संपिड्य (Compressible) असतात.
============================

4). आयनायू (plasma )

◆ पदार्थांची ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते.

◆ ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते.

◆ निऑन बल्प यामध्ये निऑन वायू असतो.

◆ Fluorescent bulb - यामध्ये हेलियम वायू असतो.

◆ सूर्य आणि तारे हे याचा अवस्थेमुळे चमकतात.
============================

5) बोस आईन्स्टाईन कंडेनसेट ( BEC )

◆ 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ एस एन बोस यांनी या पाचव्या अवस्थेतीची संकल्पना मांडली.

◆ या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजेच BEC शोधून काढली.

◆ खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करुन की अवस्था प्राप्त होते.
============================

◆ बाॅइल्सचा नियम :- दाब आकारमान संबंध नियम
   
◆ तापमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या आकारमानाच्या व्यस्तानुपाती असतो
  
        p1V1 = p2V2
============================

Charles low. -  तापमान आकारमान संबंध नियम

◆ दाब स्थिर असताना दिलेल्या वायूच्या आकारमान हे नेहमी त्याच्या तापमानाच्या समानुपाती असते.

  V directly proportional to T
  
   V1 / T1 =  V2 / T2
============================

★ गे लुस्सेकस  चा नियम:- दाब -  तापमान संबंध

◆ आकारमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या तापमानाशी समानुपाती असतो.

  P directly proportional to T

p1/T1.= p2 / T2
▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂▂

No comments:

Post a Comment

Latest post

PRE- INDEPENDENCE ACTS

⭕️ चार्टर अ‍ॅक्ट 1773 - 🟢 बंगालचा गव्हर्नर-जनरल - 🟢 सर्वोच्च न्यायालयाची स्थापना - 🟢 कंपनीच्या अधिकाऱ्यांसाठी खाजगी व्यापार प्रतिबंधि...