Wednesday 15 July 2020

जिओ पुढील वर्षी आणणार 5G नेटवर्क

📱 उद्योगपती मुकेश अंबानी यांनी 43 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना जिओ पुढच्या वर्षी '5G' नेटवर्क सुविधा लॉंच करणार असल्याची महत्वपूर्ण घोषणा केली आहे.

📣 *अंबानी म्हणाले..:*

▪️ पुढील वर्षी भारतामध्ये 5G नेटवर्क लॉंच केले जाणार असून यासाठी आवश्यक असलेले परवाने देण्यासही सुरुवात झाली आहे.

▪️ पंतप्रधानांच्या आत्मनिर्भर अभियानाअंतर्गत पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानाचा फक्त वापरच नाही तर जगाला हे तंत्रज्ञान निर्यात करण्याचे उद्दिष्ट्य आहे.

▪️ जिओचे तंत्रज्ञान पूर्णतः भारतीय असून हे शून्यातून उभे केलेले आहे. जिओवर आता शून्य कर्ज असून 'जिओ'त गुगलदेखील 33 हजार कोटींची गुंतवणूक करत आहे.

📡 दरम्यान, या सर्वसाधारण सभेच्यावेळी आकाश अंबानी यांनी 'JioTV+' चे लॉंचिंगही केले.

No comments:

Post a Comment

Latest post

वाचा :- इतिहास प्रसिद्ध वक्तव्ये

◾️” वसाहत स्वराज्याची मागणी म्हणजे चांदोबाची मागणी ” – भारतमंत्री मोर्ले ◾️‘सूक्ष्म अल्पसंख्यांक वर्ग’ असे कॉंग्रेसचे वर्णन – लॉर्ड डफरीन ◾️...