Saturday 4 July 2020

ब्रिटीश राजवटीचे आर्थिक दुष्परिणाम

◾️1. १७ व्या शतकात मुगल काळात भारत जगात सर्वात जास्त औद्योगिक उत्पादन करणारा देश होता.

◾️2. १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात इंग्रज काळात भारतातील लोकांना कच्च्या मालांपासून पक्का माल तयार करण्याची बंदी करण्यात आली.

◾️3. ब्रिटिशांनी आपल्या सत्तेच्या जोरावर, प्रसंगी शास्त्राचा धाक दाखवून स्थानिक लोकांना उद्योग धंदे करू न देता, ब्रिटीश व्यापारास प्रोत्साहन दिले. त्यामुळे त्याकाळी जगातील सर्वात श्रीमंत देश असलेला भारत जगातील सर्वात दरिद्री देश इंग्रजांनी बनविला.

◾️4. स्थानिक व्यापारावर ब्रिटिशांनी प्रतिबंधात्मक कायदे केले. बंगालमधील जे कुशल विणकर आपल्या बोटांनी उत्तम प्रकारचे तलम रेशमी कापड तयार करीत त्यांची बोटे तोडून टाकण्यापर्यंत इंग्रजांची मजल गेली. कंपनीने भारतात येणाऱ्या ब्रिटीश मालावर अडीच टक्के आयात कर ठेवला. त्यामुळे भारतातील उद्योगधंदे बसले व ब्रिटीश माल कमालीचा स्वस्त झाला.

◾️5. इंग्लंडमधील औद्योगिक क्रांतीमुळे एक नवा श्रीमंत भांडवलदार वर्ग निर्माण झाला. हा वर्ग १८१३ साली कंपनीची व्यापारी मक्तेदारी मोडून टाकण्यात यशस्वी झाला. भारत सरकारला मुक्त व्यापार धोरण स्वीकारावे लागले. त्यामुळे ब्रिटीश माल भारतात मुक्तपणे येऊ लागला. १८१३ साली ब्रिटीश सुती कापडाची आयात १ लाख १० हजार पौंडाची होती, ती १८५६ साली ६ कोटी ३० लाखांची झाली.

◾️6. ब्रिटिशांनी भारताची मोठ्या प्रमाणावर आर्थिक पिळवणूक केली. या संपत्तीच्या लुटीचे विश्लेषण करण्यासाठी दादाभाई नौरोजींनी इस्ट इंडिया असोसिएशनच्या लंडन येथील बैठकीत २ मे १८६७ रोजी आपला Englands Debt to India हा निबंध सादर केला. त्या वेळी Drain of Wealth हा शब्दप्रयोग उपयोगात आणला.

◾️7. न्या. रानडे यांनीही असाच संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत मांडला. दादाभाई नौरोजी यांनी Poverty And Un-British Rule in India (1867), The Wants and means of India (1870), The Commerce of India (1871) या लेखांत ब्रिटीशांच्या संपत्तीच्या अपहरणाच्या सिद्धांताचे तपशीलवार विवेचन केले आहे. संपत्तीच्या अपहरणाचा सिद्धांत भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसने १८९६ साली कलकत्ता अधिवेशनात अधिकृतपाने स्वीकारला.

◾️8. ब्रिटिशांनी भारतीय औद्योगीकरणास बंदी घातली. परंतु भारताला फार काळ किंवा कायमपणे औद्योगिकरणापासून दूर ठेवणे इंग्रजांनाही शक्य नव्हते. त्यानुसार भारतात प्रथम नीळ, चहा, व कॉफी यांची औद्योगिक पातळीवर लागवड सुरु झाली.

◾️9. भारतात रेल्वेमार्गाची बांधणी झाल्यानंतर १९ व्या शतकाच्या मध्यास आधुनिक यंत्रसामग्री रेल्वे वाहतुकीद्वारे देशाच्या अंतर्भागात प्रस्थापित करणे शक्य झाले. त्यामुळे सुती कापडगिरण्या, ज्यूट, कोळसा इत्यादी उद्योग सुरु झाले. १९ व्या शतकाच्या अखेरीस भारताचे थोडे औद्योगीकरण आणि आधुनिकीकरण झाले.

◾️10. ब्रिटीश जमीन महसूल व्यवस्थेमुळे गावातील समाजातील आर्थिक, सामाजिक, सांस्कृतिक एकोपा नष्ट झाला. जमीनदार वर्ग सर्व गावचा मालक झाला. गावातील बलुतेदार, कारागीर व मजूर यांचे परंपरेने चालत आलेले आर्थिक व सामाजिक अधिकार नष्ट झाले.

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...