Saturday 8 August 2020

चालू घडामोडी प्रश्नोत्तरे

● जगातल्या महासागराच्या सर्वाधिक ज्ञात खोलीवर तळाशी पोहोचणारी पहिली महिला आणि व्यक्ती कोण?
: कॅथी सुलिव्हन (अमेरिका - 1984 साली)

● संयुक्त संशोधन, उत्पादनांच्या चाचणी व प्रमाणीकरणासाठी IFFCO या संस्थेसोबत कोणत्या संस्थेनी सामंजस्य करार केला?
: भारतीय कृषी संशोधन परिषद

● युवांना विविध व्यवसाय क्षेत्रात प्रशिक्षित करण्यासाठी औद्योगिक प्रशिक्षण संस्थांसोबत कोणती संस्था करार करीत आहे?
: राष्ट्रीय खते मर्यादित

● ‘पूनम अवलोकन’ या अभ्यासाद्वारे कोणत्या प्राण्याची संख्या मोजली गेली?
: सिंह

● भारतातल्या डिप सबमर्जन्स रेस्क्यू व्हेइकल (DSRV) कॉम्प्लेक्सचे उद्घाटन कोणत्या ठिकाणी झाले?
: विशाखापट्टणम (आंध्रप्रदेश)

● चेन्नई आणि बेंगळुरू या शहरांमध्ये सुरूवात झालेल्या CBICच्या प्रमुख कार्यक्रमाचे नाव काय?
: तुरंत कस्टम्स

● मर्सेर संस्थेच्या '2020 कॉस्ट ऑफ लिव्हिंग' अहवालानुसार भारतातले सर्वात महागडे शहर म्हणून कोणत्या शहराला ठरविण्यात आले?
: मुंबई

● “ग्लोबल इकॉनॉमिक प्रॉस्पेक्ट” या शीर्षकाचा अहवाल कोणत्या संघटनेनी प्रसिद्ध केला?
: जागतिक बँक

● यंदा 2020 सालची जागतिक रक्तदाता दिनाची संकल्पना काय होती?
: सुरक्षि‍त रक्त, जीव वाचवते

● भारतीय नौदलाच्या पूर्व कमांडचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली?
: बिस्वजीत दासगुप्ता (वाईस अ‍ॅडमिरल)

● ‘जगनन्ना चेडोडू’ योजना कोणत्या राज्यात लागू करण्यात आली?
: आंध्रप्रदेश

● ‘पूर्णपणे डिजिटल’ कार्यभार चालविणारी बांधकाम क्षेत्रातली पहिली संस्था कोण?
: भारतीय राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI)

● संकेतस्थळ आधारित ‘आरोग्यपथ’ या नावाचे व्यासपीठ कोणत्या संस्थेनी कार्यरत केले?
: वैज्ञानिक व औद्योगिक संशोधन परिषद (CSIR)

● ‘कॅप्टन अर्जुन’ रोबोट कोणत्या शहराच्या रेल्वे स्थानकावर तैनात करण्यात आले आहे?
: पुणे रेल्वे स्थानक

● आंतरराष्ट्रीय अल्बिनिझम जागृती दिन कधी साजरा केला जातो?
: 13 जून

● ‘घर घर निगरानी’ मोबाईल अ‍ॅप कोणत्या राज्य सरकारने तयार केले?
: पंजाब

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...