प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र🔰डॉक्टरांच्या भेटीपासून औषधखरेदीपर्यंत सर्व प्रकारच्या आरोग्यसेवा आणि सुविधांसाठी वापरता येईल आणि आरोग्यविषयक माहितीची नोंद करता येईल, असे ‘राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्र’ प्रत्येकाला देण्याची घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी केली.

🔰ऐतिहासिक लाल किल्ल्यावरून ७४व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त देशाला उद्देशून केलेल्या भाषणात पंतप्रधानांनी ‘राष्ट्रीय डिजिटल आरोग्य योजना’ सुरू होत असल्याचे जाहीर केले. ते म्हणाले, ‘‘या योजनेनुसार प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र दिले जाईल.  सर्व आरोग्यसेवांसाठी त्याचा वापर करता येईल.’’ वैद्यकीय तपासणी अहवाल, डॉक्टरांनी दिलेली औषधे,  उपचार आदी माहिती ओळखपत्रात नोंदवलेली असेल. ही आरोग्य योजना  आयुष्मान भारत प्रधानमंत्री जनआरोग्य योजनेअंतर्गत राबवली जाणार असल्याचे पंतप्रधान मोदी यांनी सांगितले.

🔰‘स्वावलंबी भारत’ अशी घोषणा करताना मोदी म्हणाले की, किती काळ आपण कच्चा माल निर्यात करून वस्तू आयात करत राहणार? हे दुष्टचक्र थांबवण्याची वेळ आली आहे. देशासाठी गरजेच्या वस्तू देशातच बनवल्या गेल्या पाहिजेत, इतकेच नव्हे तर त्या जगभर निर्यातही केल्या पाहिजेत. ‘मेक इन इंडिया’तून ‘मेक फॉर वर्ल्ड’कडे वाटचाल करण्याचा निर्धार मोदी यांनी केला. करोनाच्या काळातही जगभरातून भारतात गुंतवणूक होत असून थेट परदेशी गुंतवणूक १८ टक्क्यांनी वाढली आहे. भारताकडे जागतिक उत्पादन केंद्र बनण्याची क्षमता असल्याचे जगभरातील गुंतवणूकदारांना वाटते. स्थानिक उद्योगांना चालना देण्यातून स्वावलंबी भारत घडू शकेल, असा विश्वास मोदी यांनी व्यक्त केला.

🔰कसे असेल ओळखपत्र? राष्ट्रीय आरोग्य ओळखपत्रावर व्यक्तीच्या आरोग्याशी संबंधित सर्व माहितीची साठवणूक असेल. राष्ट्रीय आरोग्य प्राधिकरणाच्या म्हणण्यानुसार, ज्यांना आपल्या प्रकृतीची नोंद डिजिटल स्वरूपात व्हावी अशी इच्छा आहे अशा प्रत्येकाला आरोग्य ओळखपत्र तयार करावे लागेल. नॅशनल डिजिटल हेल्थ मिशन  यासारख्या आरोग्य यंत्रणांशी हे ओळखपत्र जोडण्यात येईल. हे ओळखपत्र व्यक्तीची मूलभूत माहिती आणि मोबाइल क्रमांक किंवा आधार कार्ड क्रमांक वापरून तयार केले जाईल. ओळखपत्रधारकाला आपल्या आरोग्याच्या सर्व नोंदी या ओळखपत्राशी जोडण्याची सोय असेल.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...