Sunday 30 August 2020

तीन वार्षिक योजना



कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे ि निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही. हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली. या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ट स्वावलंबन हे होते.

१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७) १९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. ६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.

२) दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८) हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली. १९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले.

३) तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९) अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.

No comments:

Post a Comment

Latest post

वनस्पतींचे वर्गीकरण

##  मुख्य प्रकार दोन  : अ) अबीजपत्री (Cryptogamae) ब)  बीजपत्री  ( Phanerogame) --------------=========--------------- अ) अबीजपत्री (Cr...