Sunday 6 September 2020

फुफ्फुसांचा कॅन्सर आणि सर्व काही जाणून घ्या



फुफ्फुसाच्या कॅन्सरमुळे दरवर्षी जगभरात लाखो लोकांचा मृत्यू होतो. या आजाराची लक्षणे, कारण आणि त्याला कसे रोखता येईल, याविषयी माहिती पाहुयात...

धुम्रपान केल्याने या आजाराचा धोका अधिक आहे. मात्र ज्यांनी आयुष्यात कधीच ध्रुम्रपान केलेले नाही, अशांना देखील तो होऊ शकतो. विशेष म्हणजे याची लक्षणे सुरुवातीच्या टप्प्यात लक्षात येत नाहीत. आजार अ‍ॅडव्हान्स स्टेजवर पोहचल्यावर याची माहिती मिळते.

📚 लक्षणे काय? :

वारंवार खोकला, खोकल्यातून रक्त पडणे, श्वास घेण्यास त्रास, छातीत वेदना, घसा बसणे, छातीत कफ होणे, वजन कमी होणे, हाडे दुखणे आणि डोके दुखी.

📚 परमुख कारण :

● धुम्रपान हेच प्रामुख्याने या आजाराचे कारण आहे. मात्र या व्यतिरिक्त या आजाराचे आणखीही काही कारणे आहेत.
● जर तुम्ही अन्य प्रकारच्या कॅन्सरसाठी रेडिएशन थेरेपी केली असल्यास, या आजाराचा धोका उद्भवतो.
● रेडॉन गॅसच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होता.
● अर्सेनिक, क्रोमियम आणि निकेल सारख्या एलिमेंटच्या संपर्कात आल्याने देखील हा आजार होतो.
● दरम्यान तुम्ही कोठे राहता? काय काम करता? हे देखील खूप महत्त्वाचे ठरते.
● धुम्रपान करणारे किंवा या धुराच्या संपर्कात येणाऱ्यांनाही हा आजार होऊ शकतो. मात्र या प्रकारात कॅन्सरचे कारण शोधता येत नाही.

❓ फफ्फुसाच्या कॅन्सरचे प्रकार किती? : याला दोन भागात विभागण्यात आले आहे. 'स्मॉल सेल लंग कॅन्सर' आणि 'नॉन स्मॉल सेल लंग कॅन्सर'.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...