Saturday 3 October 2020

महत्त्वाचे प्रश्नोत्तरे

१) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) भारतीय भूमिपृष्ठाचा तोल दक्षिण कातळाने (डेक्कन ट्रॅपने ) सांभाळला आहे. या दक्षिण कातळावरच्या महाराष्ट्र प्रदेशाने भारताच्या राष्ट्रीय जीवनाला असाच भक्कम आधार दिलेला आहे.

ब) अतिप्राचीन काळच्या इतिहासाचा कानोसा घेतला नाही तरी गेल्या सहस्त्रकातील महाराष्ट्राची जडणघडण त्याचे मोठेपण सांगून जाते. 

क) या हजार वर्षांत महाराष्ट्राची अस्मिता विविध अंगांनी संपन्न होत गेलेली आहे. 

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त क योग्य 

४. वरील सर्व योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 


२) महाराष्ट्राची भूमी याबद्दल खालीलपैकी कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

अ) महाराष्ट्राची भूमी थंड झालेल्या लाव्हाच्या थरांची बनलेली आहे. 

ब) सुमारे नऊ कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.

१. विधान : अ योग्य 

२. विधान : ब योग्य 

३. वरील दोन्ही विधान योग्य 

४. वरील दोन्ही विधान अयोग्य 

उत्तर : १. विधान : अ योग्य 

[ब) सुमारे सात कोटी वर्षापूर्वी घडलेल्या नैसर्गिक उद्रेकाने ही घटना घडली असे भूगूर्भशास्त्र सांगते.]


३) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) सह्याद्रीच्या पूर्वेकडील जमीन मात्र सावकाश सपाटीकडे जाणारी आहे. 

ब) या पठाराच्या प्रदेशाला देश महणतात. 

क) देशावरील जमिनीचा पोत आणि कस यांत फार विविधता आहे.

१. फक्त अ व ब योग्य

२. फक्त ब व क योग्य 

३. फक्त अ व क योग्य 

४. वरील सर्व विधान योग्य 

उत्तर : ४. वरील सर्व विधान योग्य 


४) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सांगली-सोलापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.

ब) नगर-सोलापूरकडाची जमीन बव्हंशी कोरडी, रूक्ष आणि परिणामी नापीक, कोकणच्या मानाने देशावरची शेती अधिक बरकतीची आहे.

क) एकंदरीत पाहता महाराष्ट्रातील लोकांना शेतीभाती पिकविण्यासाठी फार मेहनत करावी लागते.

१. फक्त अ योग्य 

२. फक्त ब योग्य 

३. फक्त ब व क योग्य 

४. फक्त अ व क योग्य 

उत्तर : ३. फक्त ब व क योग्य 

[अ) वऱ्हाड-खानदेशकडची काळी जमीन आणि सातारा-कोल्हापूरकडची मळईची जमीन सुपीक आहे.]


५) खालीलपैकी कोणते विधान योग्य आहे ते सांगा.

१. भूमीच्या वैशिष्ट्यांबरोबर सृष्टी आणि हवामान यांतही विविधता निर्माण होणे स्वाभाविक आहे. 

२. पावसाचे प्रमाण सर्वत्र भिन्नभिन्न असल्यामुळे महाराष्ट्राला अर्थातच एकजिनसी रूप नाही.

३. वरील दोन्ही योग्य 

४. वरील दोन्ही अयोग्य 

उत्तर : ३. वरील दोन्ही योग्य 


६) कितव्या शतकात उद्योतनसूरी या जैन ग्रंथकाराने कुवलय माला नामक ग्रंथात रेखलेली मराठ्यांची प्रतिमा आजही यथातथ्य वाटते ?

१. सहाव्या 

२. सातव्या 

३. आठव्या 

४. नवव्या 

उत्तर : ३. आठव्या 


७) खालीलपैकी कोणते विधान अयोग्य आहे ते सांगा.

अ) मराठे कलहप्रिय अभिमानी असलेल्या प्रसंग ओढवल्याशिवाय ते लढायला बाहेर पडत नाहीत.

ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा शेतकरी समाज आहे. 

क) वायव्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही. 

ड) वैऱ्याचा सूड घ्यावा, स्वातंत्र्य आणि स्वाभिमान यांचे रक्षण करावे आणि अन्यायाचा प्रतिकार करावा ही मराठ्यांची जीवनमूल्ये आहेत.

१. फक्त अ व ब अयोग्य 

२. फक्त ब व क अयोग्य 

३. फक्त अ व ड अयोग्य 

४. फक्त क व ड अयोग्य 

उत्तर : २. फक्त ब व क अयोग्य 

[ब) मूलत: शांतपणे शेतीभाती करणारा हा कृषीवेल समाज आहे. 

क) ईशान्य आशियातल्या टोळ्यांप्रमाणे क्रूर लांडगेतोड करीत आक्रमण करणे, प्रचंड नरमेध आणि विध्वंस करणे मराठ्यांच्या स्वभावात नाही.]


८) खाली काही सातवाहन बद्दल कोणती विधान योग्य आहे ते सांगा.

१. ख्रिस्ती कालगणनेच्या सुरवातीच्या काळात गोदातीरावरील प्रतिष्ठान म्हणजेच आताचे पैठण या ठिकाणाहून राज्य करणार्‍या सातवाहन राजघराण्यापासून महाराष्ट्राच्या इतिहासाची संगती सहजपणे लावला येते.

२. सातवाहन हे पहिले महाराष्ट्रीय राज्यकर्ते.

३. सातवाहनांनंतर पश्चिम महाराष्ट्रात त्रैकूटक, भांदकचे वाकाटक, चालुक्य, मान्यखेटचे राष्ट्रकूट आणि देवगिरीचे यादव हि राजघराणी विशेषत्वाने नावारूपास आली.

४. वरील सर्व योग्य

उत्तर : ४. वरील सर्व योग्य 

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...