इंदिरा आवास योजना✳️इदिरा आवास योजना 1986 पासून सुरू करण्यात आली असली तरी 1995 अखेर पर्यंत ही योजना जवाहर रोजगार योजनेची उपयोजना म्हणून राबविली जात होती.

1 जानेवारी 1996 पासून ही योजना स्वतंत्रपणे केंद्र पुरस्कृत योजना म्हणून राबविण्यात येत आहे.


उद्देश :


 ✳️दारिद्ररेषेखालील कुटुंबांना गृहबांधणीसाठी मोफत अनुदान स्वरूपात सरकार द्वारे निश्चित धनराशी उपलब्ध करून देणे

✳️सदर योजनेच्या मार्गदर्शक तत्त्वानुसार या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी व्यक्तीचे नाव ग्रामसभेने मंजूर केलेल्या बेघर कुटुंबांच्या प्रतीक्षायादीत असणे आवश्यक आहे.

✳️या योजनेअंतर्गत उपलब्ध निधीच्या 40% निधी बिगर अनुसूचित जाती जमाती साठी 60% निधी अनुसूचित जाती जमाती साठी 3% अपंगांसाठी राखून ठेवण्यात येतो.

✳️या योजनेअंतर्गत जिल्हा निहाय घरकुलांचे वाटप केंद्र शासनाच्या ग्रामीण विकास मंत्रालयाकडून जिल्ह्यांना परस्पर करण्यात येते.

✳️कद्र शासनाने निश्चित केलेल्या उद्दिष्टांच्या अनुषंगाने इंदिरा आवास योजनेतील घरकुल आन बाबतची कार्यवाही प्रकल्प संचालक संबंधित जिल्हा यंत्रणा यांचेमार्फत पूर्ण करण्यात येते.

✳️इदिरा आवास योजना प्रामुख्याने ग्रामीण गृहनिर्माण प्रकारच्या गृह निर्मितीस प्रोत्साहन देते.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...