Thursday 17 December 2020

इस्रो’च्या उपग्रहाचे यशस्वी उड्डाण.🅾️भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने (इस्रो) भारताचा  42 वा संप्रेषण उपग्रह यशस्वीपणे अवकाशात  सोडला.


🅾️तर हा उपग्रह आपत्ती व्यवस्थापन आणि माहिती महाजाल संपर्कतेसाठी काम करणार आहे. कोविड-19च्या स्थितीत इस्रोने केलेले हे दुसरे प्रक्षेपण आहे.

श्रीहरिकोटा येथील द्वितीय प्रक्षेपण केंद्रातून पीएसएलव्ही-सी 50 रॉकेटने अवकाशात झेप  घेतली.


🅾️तसेच हा उपग्रह देशाच्या मुख्य भूमीसह अंदमान-निकोबार आणि लक्षद्वीपला व्यापणाऱ्या वारंवारिता स्पेक्ट्रमच्या विस्तारित सी बॅण्डमध्ये सेवा प्रदान करण्यासाठी तयार करण्यात आला आहे.


🅾️तर सीएमएस-01, इस्रोचा संप्रेषण उपग्रह आहे. ध्रुवीय उपग्रह प्रक्षेपण यानाचे हे 52 वे अभियान आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...