Sunday 10 January 2021

निवडणूक खर्च मर्यादेत वाढ▪️लोकसभा आणि विधानसभा निवडणुक लढविणाऱ्या उमेदवारांना दिलासा देताना केंद्र सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा १० टक्क्यांनी वाढविली आहे.


▪️तयाअंतर्गत आता उमेदवार लोकसभा निवडणुकीत ७७ लाखांपर्यंत आणि विधानसभा निवडणुकीत जास्तीत जास्त

३०.८० लाख रुपये खर्च करू शकतील.


▪️लोकसभेत आतापर्यंत खर्चाची ही मर्यादा जास्तीत जास्त ७० लाख रुपये आणि विधानसभेत २८ लाख रुपयांपर्यंत होती.


▪️कद्रीय कायदा मंत्रालयाने दिलेल्या अधिसूचनेनंतर ही वाढ तातडीने अंमलात आली आहे.


▪️यापूर्वी निवडणूक खर्च मर्यादेमध्ये २०१४ मध्ये ही वाढ करण्यात आली होती. (डिटेल्स मध्ये या लेखानंतर माहिती देतो )


▪️अरुणाचल प्रदेश, गोवा, सिक्कीम, पुद्चेरी, अंदमान आणि निकोबार, दादरा नगर हवेली आणि दमण दीव, लक्षद्वीप, लडाख या छोट्या राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये सरकारने निवडणूक खर्चाची मर्यादा कमीच ठेवली आहे. लोकसभा निवडणुकीत ५९.४० लाख आणि विधानसभा निवडणुकीत २२ लाख रुपये.


▪️यासह मेघालय, त्रिपुरा, मिझोराम, मणिपूर, नागालँड या ईशान्येकडील राज्यांत लोकसभेने खर्चाची मर्यादा ७७ लाख ठेवली आहे, परंतु विधानसभा निवडणुकीत खर्चाची मर्यादा २२ लाख रुपये ठेवण्यात आली आहे.


♦️निवडणूक आयोगाकडून दोन सदस्यीय समिती: :-


▪️कद्रीय विधि व न्याय मंत्रालयाने निवडणूक खर्चात दहा टक्के वाढ केल्यानंतर यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी केंद्रीय निवडणूक आयोगाने २१ ऑक्टोबर २०२० रोजी दोन सदस्यांची समिती नियुक्त केली.


▪️माजी महसूल अधिकारी हरीश कुमार व उमेश सिन्हा यांची समिती उमेदवारांच्या निवडणूक खर्चाची मर्यादा वाढवण्याबाबत चार महिन्यांत आयोगाला अहवाल सादर करेल.


♦️निवडणूक खर्चाची मर्यादा - 2014.


▪️सन २०१४ मध्ये केंद्र सरकारने मोठ्या राज्यांतील लोकसभेच्या उमेदवारांसाठी निवडणूक खर्चाची कमाल मर्यादा पूर्वीच्या रु. ४० लाखांवरून रु.७० लाख अशी वाढविली. इतर राज्यांमध्ये व केंद्रशासित प्रदेशांमध्ये ही मर्यादा पूर्वीच्या रु.१६ लाख ते ४० लाख यांवरून रु. ५४ लाख करण्यात आली. 

▪️तयाचप्रमाणे मोठ्या राज्यातील विधानसभेच्या जागेसाठी ही मर्यादा पूर्वीच्या रु.१६ लाखांवरून रु. २८ लाख करण्यात आली.


▪️इतर राज्ये व संघराज्य प्रदेशांसाठी ही मर्यादा रु.८ लाख ते रु.१६ लाखांवरून रु. २० लाख करण्यात आली.


▪️ तसेच खर्चाच्या राज्यनिहाय मर्यादा वेगवेगळ्या आहेत.

......................................................

📌 आगामी राज्यसेवा मुख्य परीक्षा 100% प्रश्न विचारला जाऊ शकेल.


📌घटक - निवडणुक प्रक्रिया.


📌उपघटक - निवडणूकविषयक सुधारणा व निवडणुकीतील निवडणुकीतील खर्च


No comments:

Post a Comment

Latest post

𝐌𝐨𝐫𝐧𝐢𝐧𝐠 𝐁𝐨𝐨𝐬𝐭𝐞𝐫

❇️ पंजाब पोलीसांनी 'मिशन निश्चय' योजना सुरू केली आहे ◾️उद्देश : पंजाब पोलिसांनी ड्रग्जची मागणी आणि पुरवठा याबाबत गुप्तचर माहिती गो...