Wednesday 8 March 2023

अकबराचे साम्राज्य



अकबरने राज्यावर आले  की ठरवले की शेरशाह सुरीच्या, ज्याने हुमायूॅला दिल्लीतून हाकलुन देउन दिल्लीचे तख्त काबीज केले होते, वंशाचा नायनाट करायचा.


 शेरशाहची तीन मुले वेगवेगळ्या ठिकाणी स्वतंत्र राज्ये चालवित होती. अकबरने त्यातील सगळ्या बलाढ्य अशा सिकंदरशाह सुरी वर चाल केली. दिल्लीची सल्तनत तर्दी बेग खानच्या हातात सोपवून अकबर स्वतः पंजाबकडे चालून गेला.


सिकंदरशाहने अकबरचा सामना न करता त्याला हुलकावण्या देणे पसंत केले. 


अकबर त्याचा पाठलाग करीत असताना दिल्लीवर सिकंदरशाहचा भाऊ आदिलशाह सुरीच्या हेमचंद्र विक्रमादित्य नावाच्या हिंदू सेनापतीने चाल केली. तर्दी खानने दिल्लीची तटबंदी केलेली नव्हती व हेमूचा हल्ला होताच तो शहर सोडून पळून गेला.


 हेमूने दिल्ली जिंकल्यावर आदिलशाहची सत्ता झुगारून दिली व स्वतःला राजा विक्रमादित्य या नावाने राज्याभिषेक करून घेतला. अशा प्रकारे हेमू दिल्लीवर राज्य करणारा शेवटचा हिंदू सम्राट झाला.


दिल्लीने अशाप्रकारे नांगी टाकल्याची खबर अकबरला मिळाल्यावर त्याच्या सल्लागारांनी त्याला आल्यावाटेने काबूलला पळ काढण्याचा सल्ला दिला.


 राजधानी गमावलेली असताना व सम्राट होउन अवघे काही महिने झालेले असताना राज्य परत मिळवण्याऐवजी काबूलमधील आपल्या नातेवाईकांचा आसरा घेणे जास्त हितावह असल्याचा तो सल्ला होता.


 अकबरच्या सेनानींपैकी एक बयराम खानने याचा विरोध केला व दिल्लीतून घूसखोरांना हाकलून देउन आपले राज्य परत घेण्यास अकबरला उद्युक्त केले.


 अकबरने आपले असलेले सगळे सैन्य घेउन दिल्लीवर चाल केली. दिल्लीतून पळालेला तर्दी बेग खान आता परत अकबरला येउन मिळाला व त्यानेही दिल्लीकडे न जाता परस्पर काबूलला जाण्याचा सल्ला दिला. 


काही काळानंतर बयरामखानने तर्दी बेग खानवर पळपुटेपणाचा आरोप ठेवून त्याला मृत्यूदंड दिला. अबुल फझल व जहांगीरच्या मते बयरामखानने हे निमित्त काढून आपल्या प्रतिस्पर्ध्याचा निकाल लावला.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 27 मार्च 2024

◆ भारत सरकारने हिंसाचारग्रस्त हैतीमध्ये अडकलेल्या भारतीयांना शेजारच्या डोमिनिकन रिपब्लिकमध्ये स्थलांतरित करण्यासाठी 'ऑपरेशन इंद्रावती&#...