Thursday 22 April 2021

हवामानविषयक शिखर परिषद (एप्रिल 22-23, 2021).



⏹अमेरिकेचे अध्यक्ष जोसेफ आर. बायडेन  यांनी दिलेल्या निमंत्रणावरून   पंतप्रधान  नरेंद्र मोदी 22-23 एप्रिल  2021 रोजी होणाऱ्या हवामान विषयावरील नेत्यांच्या व्हर्चुअल शिखर परिषदेत सहभागी होतील.  


⏹पतप्रधान 22 एप्रिल  2021 रोजी सायंकाळी 5.30 ते 7.30 दरम्यान होणाऱ्या  पहिल्या सत्रात  “Our Collective Sprint to 2030” यावर आपले विचार मांडतील.


⏹या शिखर परिषदेत जगातील सुमारे 40 अन्य नेते सहभागी होत आहेत.  मेजर इकॉनॉमीज फोरमचे सदस्य असलेल्या देशांचे आणि हवामान बदलाचा धोका असलेल्या देशांचे ते प्रतिनिधित्व करतील (भारत याचा  सदस्य आहे). 


⏹हवामानातील बदल, हवामानसंबंधी उपाययोजनांत वाढ,  कार्बन उत्सर्जन  कमी करण्यासाठी अर्थसहाय्य जमवणे, निसर्ग आधारित उपाय, हवामान सुरक्षा तसेच स्वच्छ उर्जेसाठी नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान यावर नेते आपली मते व्यक्त करतील.


⏹राष्ट्रीय परिस्थिती आणि शाश्वत विकासाच्या प्राथमिकतांचा आदर करतांना  सर्वसमावेशक आणि लवचिक आर्थिक विकासाशी हवामान कृतीची जग कशी सांगड घालू शकेल यावरही नेते चर्चा करतील.


⏹नोव्हेंबर 2021 मध्ये होणाऱ्या सीओपी 26 च्या अनुषंगाने हवामानविषयक समस्यांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी आयोजित केलेल्या जागतिक बैठकांच्या मालिकेचा ही  शिखर परिषद एक भाग आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here