Tuesday 4 May 2021

प्रधानमंत्री आवास योजनेच्या मार्गात जागेचा अडसर.

🔰प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत अमरावती जिल्ह्य़ात सुमारे २९ हजार ७८८ घरकु लांचे काम केवळ लाभार्थ्यांकडे जागा नसल्याने रखडल्याचे वास्तव समोर आले असून आता यासाठी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, सरपंच, उपसरपंचांना पुढाकार घ्यावा लागणार आहे.

🔰प्रधानमंत्री आवास योजनेत प्राधान्याने बेघर लाभार्थीना घरकु लाचा लाभ देण्याबाबतचे सरकारचे धोरण आहे. या योजनेअंतर्गत सर्वाना घरकु लांचा लाभ मिळावा, यासाठी १९ नोव्हेंबर २०२० पासून राज्यात महाआवास अभियान राबवण्यात येत आहे.

🔰जिल्ह्य़ातील ग्रामीण भागात २०१६-१७ ते २०-२१ पर्यंत एकू ण ९३ हजार १९२ घरकु ले उभारण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले होते. त्यापैकी ६३ हजार ४०४ घरकू ल लाभार्थीना मंजुरी देण्यात आली. जागा नसलेल्या लाभार्थीसाठी पंडित दीनदयाल उपाध्याय जागा खरेदी योजनेअंतर्गत जागा खरेदी, अतिक्र मण नियमानुकू ल करणे, जागा नसलेल्या लाभार्थीना खुले भूखंड उपलब्ध करून देणे तसेच ई आणि एफ वर्ग शासकीय जमिनीमधून जागा उपलब्ध करून देण्यात येत असली, तरी अजूनही जिल्ह्य़ात तब्बल २९ हजार ७८८ लाभार्थ्यांच्या घरकु लांना मंजुरी मिळू शकलेली नाही. बहुतांश प्रकरणांमध्ये लाभार्थ्यांकडे घरकू ल बांधकामासाठी जागा नसल्याचे दिसून आले आहे

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...