Thursday 8 July 2021

शालेय शिक्षण व साक्षरता विभागाचा “निपुण भारत” उपक्रम..


⏹कद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण व साक्षरता विभागाने 5 जुलै 2021 रोजी “निपुण भारत (समजून घेत वाचनातील प्राविण्य मिळवणे आणि संख्यावाचन यासाठी राष्ट्रीय उपक्रम - NIPUN)” उपक्रमाचा प्रारंभ केला.


⏹या उपक्रमाचे पायाभूत साक्षरता आणि अंक साक्षरतेचे सार्वभौम अधिग्रहण सुनिश्चित करण्यासाठी सक्षम वातावरण निर्माण करणे हे लक्ष्य आहे, जेणेकरुन प्रत्येक मुलाला वर्ष 2026-27 पर्यंत त्याच्या तिसऱ्या इयत्तेपर्यंत वाचन, लेखन आणि अंकलेखन या विषयात आवश्यक शैक्षणिक क्षमता प्राप्त होईल.


⏹हा उपक्रम शालेय शिक्षण व साक्षरता विभाग राबविणार असून “समग्र शिक्षा” या नावाने या केंद्र-पुरस्कृत योजनेच्या अंतर्गत सर्व राज्ये आणि केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय-राज्य-जिल्हा-गट-शाळा पातळीवर योजनेची पाच स्तरीय अंमलबजावणी करणारी यंत्रणा कार्यरत करण्यात येईल.

No comments:

Post a Comment

Latest post

पठाराची स्थानिक नावे

1) गाविलगडचे पठार – अमरावती 2)  बुलढाण्याचे पठार – बुलढाणा 3) खानापूरचे पठार – सांगली 4) पाचगणीचे पठार – सातारा 5) औंधचे पठार – सातारा ...