Wednesday 22 September 2021

डिजिटल कृषीव्यवस्था पुढे नेण्यासाठी केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाचे पाच खासगी कंपन्यांसोबत सामंजस्य करार..🔰14 सप्टेंबर 2021 रोजी नवी दिल्लीत कृषी भवन येथे केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने खासगी कंपन्यांसोबत पाच सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या केल्या.


🔰सिस्को, निंजाकार्ट, जिओ प्लॅटफॉर्म लिमिटेड, आयटीसी लिमिटेड आणि एनसीडीईएक्स ई-मार्केट्स लिमिटेड (NeML) या खासगी कंपन्यांसोबत हे करार करण्यात आले आहेत.


🔴ठळक बाबी...


🔰या प्रायोगिक प्रकल्पांनंतर, शेतकऱ्यांना शेतात कुठली पिके लावायची, कोणत्या प्रकारची बियाणे वापरायची, जास्तीत जास्त पीक येण्यासाठी कोणत्या पद्धतीचा वापर करायचा, अशा सगळ्या प्रश्नांवर, तंत्रज्ञानाच्या मदतीने माहिती पुरवली जाईल.


🔰पराप्त माहितीच्या आधारे ते अधिक शास्त्रशुद्ध पद्धतीने निर्णय घेऊ शकतील. कृषी पुरवठा साखळी उद्योगात असलेले लोकही त्यांच्या खरेदीविषयक तसेच मालाच्या दळणवळणासाठीची मालवाहतूक व्यवस्था याविषयी अचूक आणि नेमका निर्णय घेऊ शकतील. 


🔰तयाशिवाय, आपल्या पिकांची विक्री करायची की साठा ठेवायचा याचा निर्णय घेण्यासाठी शेतकऱ्यांना आधी हवामानाची पूर्वसूचनाही याच तंत्रज्ञानातून मिळू शकेल.

No comments:

Post a Comment

Latest post

पोलीस भरतीसाठी महत्वाचे 50 प्रश्न उत्तरे

1) जगातील सर्वात लांब नदी कोणती आहे? ◾️  नाईल (4,132 मैल) 2) जगातील सर्वात मोठा खंड कोणता आहे? ◾️ आशिया 3) जगातील सर्वात मोठा देश कोणता...