ब्राह्मोस निर्यातीसाठी भारत-फिलिपाइन्स करार.


🔰फिलिपाइन्सच्या संरक्षण मंत्रालयाने भारताच्या ‘ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड’शी क्षेपणास्त्रांचा पुरवठा करण्यासाठी ३७४ दशलक्ष अमेरिकी डॉलरच्या करारावर शुक्रवारी स्वाक्षरी केली. भारताला मिळालेला ब्राह्मोस क्षेपणास्त्रांच्या निर्यातीचा हा पहिला देकार आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

🔰भारत-रशियन संयुक्त उपक्रमातून ब्राह्मोस एरोस्पेस प्रायव्हेट लिमिटेड (बीएपीएल) ब्राह्मोस या सुपरसॉनिक क्रूझ क्षेपणास्त्रांची निर्मिती करण्यात येत आहे. हे क्षेपणास्त्र पाणबुडी, जहाजे, विमाने आणि जमिनीवरूनही डागता येते, असे संरक्षण मंत्रालयाच्या निवेदनात म्हटले आहे. 

🔰लढाऊ जहाजविरोधी क्षेपणास्त्र प्रणाली पुरवण्यासाठी शुक्रवारी बीएपीएलने फिलिपाइन्सच्या राष्ट्रीय संरक्षण विभागाशी करार केला, असे संरक्षण मंत्रालयाने नमूद केले आहे.  बीएपीएल ही संरक्षण संशोधन आणि विकास संस्थे (डीआरडीओ)ची संयुक्त उपक्रम कंपनी आहे. भारत सरकारच्या संरक्षण निर्यातीला चालना देण्याच्या धोरणासाठी हे एक महत्त्वाचे पाऊल आहे, असेही संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नमंजुषा

 Q.1) इन्फोसिस पुरस्कार 2023 मध्ये भौतिकशास्त्र श्रेणीतील पुरस्कार कोणाला जाहीर झाला आहे? ✅ प्रो. मुकुंद थट्टाई Q.2) पहिल्या ‘लाईफटाईम डिस्ट...