Thursday 10 March 2022

साताऱ्याच्या सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले.


♻️साताऱ्यातील सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी मागील ६१ वर्षांत पहिल्यांदाच खुले झाले आहेत. सैनिक स्कूलमध्ये ६११ विद्यार्थिनींमधून पहिल्यांदाच दहा मुली प्रवेश प्रक्रिया पार पाडून दाखल झाल्या आहेत.

♻️ देशातील पहिल्या  सैनिक स्कूलमध्ये महिला अधिकारी घडवण्याचे काम सुरू झाले आहे.

♻️जागतिक महिला दिनानिमित्त सैनिक स्कूलमध्ये नव्याने प्रवेश झालेल्या १० मुलींशी संवाद साधला. संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार माजी मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुढाकाराने २३ जून १९६१ रोजी देशातील पहिली सैनिकी शाळा साताऱ्यात सुरू झाली. या निवासी शाळेत इयत्ता ६ वी ते १२ वीपर्यंत शिक्षण दिले जाते. ६४० विद्यार्थी येथे शिकतात. पैकी १० मुलींना यावर्षी प्रथमच प्रवेश मिळाला आहे.

♻️निवासी शाळेत शिकणारी ही मुलींची पहिलीच बॅच आहे.

♻️सैनिक स्कूलचे उपप्राचार्य िवग कमांडर बी लक्ष्मीकांत यांनी  सांगितले की आत्तापर्यंत या शाळेत केवळ मुलांना प्रवेश दिला जात होता.

♻️राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीत (एनडीए) मुलींना प्रवेश देण्याचा निर्णय मागील वर्षी शासनाने घेतला. त्यामुळे  सैनिक स्कूलचे दरवाजे मुलींसाठी गेल्या ६१ वर्षांत  खुले झाले. २०२१-२२ या शैक्षणिक वर्षांसाठी १० मुलींना निवासी शाळेत प्रवेश देण्यात आला आहे.

♻️ यात दोन पश्चिम बंगालच्या, एक बिहारची तर उर्वरित सात विद्यार्थिनी महाराष्ट्रातील आहेत. भविष्यात मुलींच्या संख्येमध्ये वाढ होऊ शकते.

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...