Tuesday 29 March 2022

मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्रा यांच्या हस्ते संसदरत्न पुरस्कार प्रदान. #Prize

🔰 नवी दिल्लीत आज संसदरत्न पुरस्कार प्रदान करण्यात आले. यात महाराष्ट्रातल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या सुप्रिया सुळे, भाजपाच्या डॉ. हिना गावित यांना संसदरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आलं.

🔰 सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा तर, हिना गावीत यांना सलग सहाव्यांदा हा पुरस्कार मिळत आहे. संसद विशिष्ट रत्न पुरस्कार शिवसेनेचे मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांना देण्यात आला आहे.

🔰 संसदेत मतदारासंघाचे प्रश्न प्रभावीपणे मांडण्यासोबतच अनेक विषयांवर अभ्यासपूर्ण मतं  मांडणाऱ्या सदस्यांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येते.

🔰 प्राईम पॉईन्ट फाऊंडेशनच्या वतीनं दिल्या जाणाऱ्या या पुरस्कारांची घोषणा फेब्रुवारी महिन्यात करण्यात आली होती.

🔰 आज दिल्लीमधल्या नव्या महाराष्ट्र सदनामध्ये भारत सरकारचे मुख्य निवडणुक आयुक्त सुशील चंद्रा आणि संसदीय कार्य राज्य मंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीमध्ये हे पुरस्कार देण्यात आले■■

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...