चालू घडामोडी :- 20 डिसेंबर 2023

◆ नवीन शैक्षणिक धोरणात 'एआय'चा समावेश करणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षणमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

◆ नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोच्या अहवालानुसार सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र अपघातात तिसऱ्या क्रमांकावर आहे तर उत्तर प्रदेश पहिल्या क्रमांकावर आहे.

◆ ई-रक्तकोष पोर्टल :- ई-रक्तकोष पोर्टलच्या माध्यमातून आपल्या जिल्ह्यातील रक्त केंद्र आणि रक्ताची उपलब्धता याची माहिती या व्यासपीठावर मिळणार आहे.

◆ नोव्हेंबर 2022 मध्ये आधार अपडेटची मोहीम केंद्र सरकारच्या आदेशावरून जिल्हा प्रशासनाकडून सुरू झाली.

◆ ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉ. रघुनाथ माशेलकर यांच्या हस्ते सामाजिक उद्योजिका मधुलिका रामटेके यांना अंजनी माशेलकर प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.

◆ मधुलिका यांना राष्ट्रपतींनी 2021 मध्ये प्रतिष्ठित नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित केले आहे.

◆ छत्तीसगडमधील सामाजिक उद्योजिका असलेल्या रामटेके दोन दशकाहून अधिक काळ 'मॉ बमलेश्वरी बँक'च्या माध्यमातून महिलांच्या आर्थिक स्वातंत्र्याचा राजमार्ग प्रशस्त करत आहेत.

◆ कोलकाता नाइट रायडर्सने तब्बा 24 कोटी 75 लाखात मिचेल स्टार्कला आपल्या संघात सामावून घेतले.

◆ हैदराबादने तब्बल 20 कोटी 50 लाखात पॅट कमिन्सला संघात सामावून घेतले आहे.

◆ "ऊर्जा संवर्धन सप्ताह 14 डिसेंबर[“राष्ट्रीय ऊर्जा संवर्धन दिवस"] ते 20 डिसेंबर" दरम्यान साजरा होत आहे.

◆ 19 डिसेंबर रोजी दुबईमध्ये होत असलेल्या 2024 IPL लिलावादरम्यान भारताचा वेगवान गोलंदाज हर्षल पटेलला पंजाब किंग्जने 11.75 कोटी रु. मध्ये आपल्या संघात सामावून घेतले आहे.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...