चालू घडामोडी :- 25 डिसेंबर 2023

◆ भारताचे माजी केंद्रीय कृषि मंत्री डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त केंद्र सरकार 125 रुपयांचे नाणे काढणार आहे.

◆ इंग्लिश प्रीमिअर लीग फुटबॉल स्पर्धेत रेफ्रीची भूमिका बजावणारी रेबेका वेल्च ही पहिली महिला ठरली आहे.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार गेल्या 5 वर्षात देशात 140 खाजगी विद्यापीठाची स्थापना झाली असून गुजरात राज्यात सर्वाधिक 28 खाजगी विद्यापीठ आहेत.

◆ केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार महाराष्ट्र राज्यात एकूण 15 खाजगी विद्यापीठे आहेत.

◆ महाराष्ट्र सरकारने राज्यात दिव्यांग विद्यापीठ स्थापन करण्यासाठी डॉ. मुरलीधर चांदेकर यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन केली आहे.

◆ चेन्नई बुद्धिबळ ग्रँडमास्टर्स स्पर्धा 2023 चे विजेतेपद डी. गुकेश याने पटकावले आहे.

◆ ओपेक या संघटनेतून अंगोला देश बाहेर पडला आहे.

◆ 2024 मध्ये तामिळनाडू मध्ये होणारी खलो इंडिया युथ स्पर्धा सहाव्या क्रमांकाची असणार आहे.

◆ कवयित्री सुकृता पॉल कुमार यांना 'मीठ आणि मिरपूड' साठी रवींद्रनाथ टागोर साहित्य पुरस्कार जाहीर.

◆ वस्त्रोद्योग मंत्रालयाने जूट शेतकऱ्यांसाठी 'पाट-मित्रो ॲपचे अनावरण केले.

◆ प्रोफेसर मविता लाडगे यांना रसायनशास्त्र शिक्षणातील उत्कृष्टतेसाठी नायहोम पुरस्कार प्रदान करण्यात आला.

◆ पूनम खेत्रपाल सिंग यांना 'नॅशनल ऑर्डर ऑफ मेरिट गोल्ड मेडल ने सन्मानित.

◆ 2022 आणि 2023 चे SASTRA - रामानुजन पुरस्कार बर्कले येथील कॅलिफोर्निया विद्यापीठाशी संलग्न असलेल्या युनकिंग तांग आणि रुईीझयांग झांग या गणितज्ञांना प्रदान करण्यात आले.

◆ नौदलाच्या 'इंफाळ' या स्टील्थ गाईडेड क्षेपणास्त्र विनाशिकेचा संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या उपस्थितीत नेव्हल डॉकयार्ड येथे  मंगळवारी मुंबईमध्ये लोकार्पण सोहळा होणार आहे.

◆ इंफाळ ही स्वदेशी बनावटीची सर्वात मोठ्या विनाशिकेपैकी ही एक असून विशाखापट्टणम श्रेणीच्या विनाशिकेतील तिसरी आहे.

◆ इंफाळची बांधणी मुंबईच्या माझगाव डॉक लिमिटेड येथे झाली आहे.

◆ महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी आपल्या दालनातील पाटीवर वडिलांच्या नावाआधी आईचे नाव लिहिले आहे.

◆ मुलाला आपल्या आईचे आडनाव लावण्याचा अधिकार आहे, त्याबाबत त्या मुलाचे वडील सक्ती करू शकत नाहीत, असा महत्त्वपूर्ण निर्णय दिल्ली उच्च न्यायालयाने दिलेला आहे.

◆ 25 डिसेंबर हा माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्मदिन आहे. त्यांच्या देदीप्यमान नेतृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारतात हा दिवस 'सुशासन दिन' म्हणून पाळण्याचे ठरविण्यात आले.

◆ 2014 साली भारतीय जनता पक्षाद्वारे दरवर्षी भारतात 25 डिसेंबरला सुशासन दिवसाच्या रूपात साजरा करण्याची घोषणा केली गेली होती.

◆ 2023 सालचे साहित्य अकादमी पुरस्कार 9 कविता संग्रह, 6 कादंबऱ्या, 5 लघुकथा, 3 निबंध आणि 1साहित्यिक अभ्यासाला मिळाले आहेत.

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...