Sunday 31 December 2023

चालू घडामोडी :- 31 डिसेंबर 2023


◆ डॉ. नितीन करीर यांची मुख्य सचिव, महाराष्ट्र शासन, मंत्रालय, मुंबई या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.


◆ मराठी भाषा गौरव दिन 2024 संकल्पना :- '३५० वा शिवराज्याभिषेक छत्रपती शिवाजी महाराजांचा, उत्सव मराठी भाषा गौरव दिनाचा'


◆ दरवर्षी 27 फेब्रुवारी रोजी महाराष्ट्राचे ज्येष्ठ कवी "विष्णू वामन शिरवाडकर उर्फ कुसुमाग्रज" यांच्या जन्मदिवशी साजरा करण्यात येतो.


◆ ठाणे या ठिकाणी जगातील सर्वात मोठा क्लस्टर प्रकल्प साकारला जात आहे.


◆ पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांनी 17 सप्टेंबर 2023 रोजी विश्वकर्मा जयंतीनिमित्त PM विश्वकर्मा योजना सुरू केली.


◆ परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी लिहिलेल्या व्हाय भारत मॅटर्स या पुस्तकाची पहिली प्रत त्यांनी शनिवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिली.


◆ राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी अरविंद पनगरिया यांची 16 व्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी नियुक्ती केली आहे.


◆ अरविंद पनगरिया यांची सप्टेंबर 2015 मध्ये G20 चर्चेसाठी भारताचे शेर्पा म्हणून नियुक्ती करण्यात आली होती.


◆ अरविंद पनगरिया यांना अर्थशास्त्र आणि सार्वजनिक धोरणाच्या क्षेत्रातील योगदानाबद्दल 2012 मध्ये भारताच्या राष्ट्रपतींच्या हस्ते पद्मभूषण पुरस्काराने प्राप्त.


◆ प्रधानमंत्री उज्ज्वला योजना (PMUY) मे 2016 मध्ये सुरू करण्यात आली होती.


◆ सिंधुदुर्ग जिल्ह्यातील रिया आवळेकर ठरल्या देशातील पहिल्या तृतीयपंथी शासकीय शिक्षिका.


◆ अजेंटिनाचे राष्ट्राध्यक्ष जेवियर मिले यांनी ब्रिक्स सदस्यत्व नाकारले आहे.


◆ BRICS मधील देशांचा समावेश असलेल्या G20 गटामध्ये इथिओपिया, इराण, सौदी अरेबिया, इजिप्त आणि संयुक्त अरब अमिराती हे 5 देश 01 जानेवारी 2024 रोजी सामील होणार.


◆ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी 31 डिसेंबर 2023 रोजी महास्वच्छता अभियानाची सुरवात "गेट वे ऑफ इंडिया" या ठिकाणावरून केली.


No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी :- 26 एप्रिल 2024

◆ दरवर्षी 26 एप्रिल रोजी जागतिक बौद्धिक संपदा दिवस जगभरात साजरा केला जातो. ◆ बॉलिवूड अभिनेता रणदीप हुड्डा याला लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार...