Sunday 7 January 2024

चालू घडामोडी :- 06 जानेवारी 2024

◆ 27 व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या बोधचिन्ह आणि शुभंकर चिन्हाचे अनावरण शुक्रवारी केंद्रीय क्रीडामंत्री अनुराग ठाकूर व मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते दृकश्राव्य माध्यमातून करण्यात आले.

◆ पश्चिम बंगालने मध, तांदूळ आणि टांगेल, साड्यांसाठी GI टॅग मिळवले.

◆ पीयूष गोयल यांनी इंडिया इंटरनॅशनल ज्वेलरी ट्रेड शोचे उद्घाटन केले.

◆ पंतप्रधान नरेंद्र मोदी राजस्थान इंटरनॅशनल सेंटर, जयपूर येथे होणाऱ्या अखिल भारतीय पोलीस महासंचालक आणि महानिरीक्षकांच्या 2023 परिषदेला उपस्थित राहणार आहेत.

◆ काँग्रेसने 'भारत न्याय यात्रा'चे नाव बदलून 'भारत जोडो न्याय यात्रा' केले. काँग्रेसने 14 जानेवारीपासून मणिपूर ते मुंबई अशी 'भारत जोडो न्याय यात्रा' सुरू केली आहे.

◆ 9 ते 13 जानेवारी दरम्यान राष्ट्रीय पॅरा अथेलेटीक्स स्पर्धा पणजी येथे होणार आहेत.

◆ 12th Fail या भारतीय चित्रपटाला IMDB मध्ये 2023 या वर्षातील पहिल्या क्रमांकाचे ranking मिळाले आहे.

◆ ब्लुंमबर्ग बिलिनेयर इंडेक्स नुसार गौतम अदानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

◆ भारतीय उद्योगपती गौतम अदानी श्रीमंताच्या जागतिक यादीत 12व्या क्रमांकावर आहेत.

◆ ईलॉन मस्क हे जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत.

◆ ICC कसोटी क्रिकेट रँकिंग मध्ये भारताला मागे टाकून ऑस्ट्रेलिया या संघाने प्रथम स्थान पटकावले आहे.

◆ विज्ञान व संशोधनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने "पृथ्वी विज्ञान" या नव्या योजनेला मंजूरी दिली आहे.

◆ केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत अभियानांतर्गत स्वच्छ सर्वेक्षणात महाराष्ट्र राज्यातील पुणे महानगर पालिकेला फाईव्ह स्टार रँकिंग मिळाले आहे.

◆ अरबी समुद्रात अपहरण झालेले MV लीला नोरफोक हे लायेबेरिया या देशाचे जहाज आहे.

◆ नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे शुभंकर चिन्ह म्हणुन शेकरू प्रण्याची निवड करण्यात आली आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील नाशिक येथे 12 ते 16 जानेवारी या कालावधीत राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ "विकसित भारत 2047" या संकल्पनेवर आधारित नाशिक येथे राष्ट्रीय युवा महोत्सवाचे आयोजन करण्यात येत आहे.

◆ नाशिक येथे होणाऱ्या राष्ट्रीय युवा महोत्सवाच्या शुभंकर चिन्ह म्हणुन शेकरू चे अनावरण "अनुराग ठाकूर आणि एकनाथ शिंदे" यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ महाराष्ट्र राज्यात 16 वर्षांनी राष्ट्रीय युवा महोत्सव होत आहे.

◆ ICC च्या वर्षातील सर्वोत्तम क्रिकेटपट्टला मिळणाऱ्या सर गारफील्ड सोबर्स करंडक पुरस्कारासाठी विराट कोहली आणि रवींद्र जडेजा या दोन भारतीय खेळाडूंना नामांकन मिळाले आहे.

◆ केंद्र सरकारच्या 24 तास पाणी पुरवठा करणाऱ्या नल से जल या योजनेत महाराष्ट्र राज्यातील छत्रपती संभाजीनगर या शहराचा सामावेश झाला आहे.

◆ राष्ट्रीय खेल प्रोत्सहान पुरस्कार 2023 "जैन युनिव्हर्सिटी बंगळुरू युनिव्हर्सिटी" ला देण्यात आला आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

काकोरी कट घटना

( काकोरी ट्रेन लुट म्हणूनही ओळखली जाते) ही ब्रिटिश वसाहतवादी शासनाविरुद्धच्या भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील एक महत्त्वपूर्ण घटना होती.  - दिना...