Monday 8 January 2024

चालू घडामोडी :- 08 जानेवारी 2024

◆ श्रीकांत शिंदे, अमोल कोल्हे यांना संसदरत्न पुरस्कार तर सुप्रिया सुळे(16 व्या लोकसभेसाठी) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ सोळाव्या लोकसभेसाठी सुप्रिया सुळे (राष्ट्रवादी काँग्रेस), श्रीरंग बारणे (शिवसेना), भर्तृहरि महताब (बिजू जनता दल) यांना 'संसद महारत्न' पुरस्कार देण्यात येणार असल्याचे पुरस्कार समितीचे अध्यक्ष प्रियदर्शनी राहुल यांनी सांगितले.

◆ सतराव्या लोकसभेसाठी 'संसद महारत्न' पुरस्कार एन. के. प्रेमचंद्रन (आरएसपी), अधीररंजन चौधरी (काँग्रेस), विद्युत महातो आणि हीना गावित (भाजप) यांना जाहीर झाले आहेत.

◆ भारताचे आदित्य एल 1 यान पोहचलेल्या लांग्रेज पॉइंट चे पृथ्वी पासून अंतर 15 लाख किलोमीटर आहे.

◆ भारतीय ऑलम्पिक संघटनेच्या सीईओ पदी रघुराम अय्यर यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ रॉयल कॅरिबियन ने तयार केलेली "आयकॉन ऑफ दी सिज" जगातील सर्वात मोठी क्रुझ ठरली आहे.

◆ देशातील पहिले बीच गेम्स 2024 चे आयोजन "घोघला बीच, दीव व दमण' बीचवर करण्यात आले आहे.

◆ प्राईम फाउंडेशन चेन्नई कडून देण्यात येणारा संसदरत्न पुरस्कार यंदा देशातील 5 खासदाराना जाहीर झाला आहे.

◆ महाराष्ट्र राज्यातील "डॉ. अमोल कोल्हे आणि श्रीकांत शिंदे" खासदारांना यावर्षीचा संसदरत्न खासदार पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ खासदार डॉ. अमोल कोल्हे यांना तिसऱ्यांदा संसदरत्न पुरस्कार जाहीर झाला आहे.

◆ भारतात अहमदाबाद येथे अंतरराष्ट्रीय पतंग महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.

◆ बांगलादेशाच्या सार्वत्रिक निवडणुकीत बांगलादेश नॅशनालिस्ट पार्टी या राजकीय पक्षाने बहिष्कार घातला आहे.

◆ केंद्र सरकारच्या फार्मर आयडी या पथदर्शी उपक्रमात महाराष्ट्र राज्यातील बीड जिल्ह्याची निवड झाली आहे.

◆ ऑल इंडिया रबर इंडस्ट्रीज असोसिएशनच्या अध्यक्षपदी शशी सिंह यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ अंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट मध्ये 3000 धावा पूर्ण करणारी स्मृती मानधना ही दुसरी भारतीय महिला क्रिकेट खेळाडू ठरली आहे.

◆ भारताच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या नविन प्रवक्ता पदी रणधीर जैस्वाल यांनी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ इंद्रमणी पांडे(3 वर्षासाठी) या भारतीय अधिकाऱ्याने नुकताच बिमस्टेक च्या सरचिटणीस पदाचा पदभार स्वीकारला आहे.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे उद्घाटन पिंपरी चिंचवड या ठिकाणाहून झाले आहे.

◆ 100 व्या अखिल भारतीय मराठी नाट्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष शरद पवार हे आहेत.

◆ सफरचंदाची चोरी रोखण्यासाठी हिमाचल प्रदेश या राज्यात ॲपल ऑन व्हील्स हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

◆ आयर्लंड च्या सिलियन मर्फी ला Oppenheimer चित्रपटात केलेल्या मुख्य भूमिकेसाठी मिळाला गोल्डन ग्लोब सर्वोत्तम अभिनेता पुरस्कार.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

साहित्य अकादमी पुरस्कार :- माहिती

◾️ साहित्य अकादमी ची स्थापना " 12 मार्च 1954 " रोजी झाली ◾️ मुख्यालय " नवी दिल्लीला " आहे ◾️ साहित्य अकादमी चे पहिले ...