आजचे महत्वाचे करंट अफेअर्स 09 January - Current Affairs

🔖 प्रश्न - खालीलपैकी कोणती रायफल देशाची पहिली स्वदेशी असॉल्ट रायफल ठरली आहे?

ANS - उग्रम रायफल

🔖 प्रश्न - महाराष्ट्र राज्यातील कोणत्या जिल्ह्यातील पुरव्यवस्थापन प्रकल्पाला वित्त सहाय करण्यासाठी जागतीक बँकेने मंजुरी दिली आहे?

ANS - सांगली आणि कोल्हापूर

🔖 प्रश्न - कोणत्या देशाच्या युनायटेड लॉन्च अलायंस कंपनीच्या व्हल्कन या रॉकेट ने चंद्राच्या दिशेने प्रक्षेपण केले आहे?

ANS - अमेरिका - अमेरिका ५० वर्षानंतर हि चंद्रयान मोहिम राबवत आहे.

🔖 प्रश्न - ८१ व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट चित्रपटाचा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला आहे?

ANS - ओपेनहायमर - या चित्रपटाला एकूण ५ पुरस्कार मिळाले आहेत.

🔖 प्रश्न - शेख हसीना ह्या बांगलादेश देशाच्या कितव्यांदा पंतप्रधान होणार आहेत?

ANS - पाचव्यांदा

🔖 प्रश्न - कोलकता येथे सुरु असलेला ८५ व्या आंतरराज्य आणि १९ वर्षाखालील राष्ट्रीय टेबल टेनिस स्पर्धेत महाराष्ट्र राज्याने कोणते पदक पटकावले आहे?

ANS - सुवर्ण पदक

🔖 प्रश्न - भारताच्या वरून तोमर आणि ईशा सिंग यांनी आशिया ऑलिम्पिक पात्रता फेरीत कोणत्या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक जिंकून भारताला ऑलिम्पिक कोटा मिळवून दिला आहे?

ANS - नेमबाजी मध्ये

🔖 प्रश्न - केंद्रीय वाणिज्य सचिव सुनील बर्थवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार देशाची एकून निर्यात २०३० पर्यंत किती कोटी डॉलर वर नेण्याचे उद्दीष्ट आहे?

ANS - २ लाख

🔖 प्रश्न - नवी दिल्ली येथे इंट्सफूड शो २०२४ या दक्षिण आशियातील सर्वात मोठया खाद्य पर्दशनाचे उद्घाटन कोणाच्या हस्ते झाले आहे?

ANS - सुनील बर्थवाल यांच्या हस्ते

🔖 प्रश्न - अँगर मॅनेजमेंटमध्ये हे पुस्तक कोणत्या भारतीय माजी उच्चआयुक्ताने लिहिले आहे?

ANS - अजय बिसारीया यांनी

🔖 प्रश्न -  देशात प्रवासी भारतीय दीन म्हणुन कोणता दिवस साजरा करण्यात येतो?

ANS - ९ जानेवारी - २००३ पासून हा दिवस प्रवासी भारतीय दिन म्हणुन साजरा करण्यात येतो.

🔖 प्रश्न - देशात व्हायब्रंट जागतिक परिषद कोठे आयोजीत करण्यात येते?

ANS - गांधीनगर येथे

No comments:

Post a Comment

Latest post

चालू घडामोडी प्रश्नसंच

1.कोणत्या आशियाई देशाने लिथियम आणि ग्रेफाइटसह 20 गंभीर खनिज ब्लॉक्सचा ई-लिलाव सुरू केला आहे? [अ] श्रीलंका [ब] इंडोनेशिया [क] भारत [डी] बांगल...