Monday 13 May 2024

चालू घडामोडी :- 13 मे 2024

◆ रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी आंद्रेई बेलोसोव्ह यांची नवीन संरक्षण मंत्री म्हणून नियुक्ती केली आहे.

◆ कुवेतचे नवे अमीर शेख मिशाल अल-अहमद अल-सबाह यांनी देशाची संसद बरखास्त केली आहे.

◆ भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने ॲडिटीव्ह मॅन्युफॅक्चरिंग तंत्रज्ञान वापरून तयार केलेल्या नवीन द्रव रॉकेट इंजिनची यशस्वी चाचणी केली आहे.

◆ संरक्षण गुप्तचर संस्थेचे महासंचालक लेफ्टनंट जनरल डी एस राणा संयुक्त रिपब्लिक ऑफ टांझानियाच्या अधिकृत दौऱ्यावर रवाना झाले आहेत.

◆ मलेशियातील पुत्रजया येथे आसियान-भारत वस्तू व्यापार करार संयुक्त समितीची चौथी बैठक पार पडली.

◆ नेपाळची प्रसिद्ध गिर्यारोहक 'कामी रिता शेर्पा' हिने सर्वाधिक वेळा एव्हरेस्टवर चढाई करण्याचा नवा विक्रम केला आहे.

◆ ZETA ने बँकांसाठी UPI-लिंक्ड 'डिजिटल क्रेडिट सेवा' सुरू केली आहे.

◆ पाकिस्तानने आपला मित्र देश चीनसोबत आपली पहिली चंद्र मोहीम ‘iCUBE-Q’ लाँच केली आहे.

◆ हरियाणातील फरिदाबाद येथे ‘राष्ट्रीय लोक अदालत’चे आयोजन करण्यात आले आहे.

◆ ओंकार साळवी यांची मुंबई क्रिकेट संघाच्या मुख्य प्रशिक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ इंग्लंड देशाचा क्रिकेटपटू जेम्स अँडरसन ने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली असून त्याच्या नावावर कसोटी क्रिकेट मध्ये 700 विकेट ची नोंद आहे.

◆ 2003 नंतर 20 वर्षांनी जगातील सर्वाधिक शक्तिशाली सौर वादळ पृथ्वीवर धडकले आहे.

◆ भारतीय भुदलात हर्मीस 900 स्टरलाईनर ड्रोन हैद्राबाद या ठिकाणी सामील होणार आहे.

◆ 250 आयपीएल सामने खेळणारा विराट कोहली हा चौथा क्रिकेटपटू ठरला आहे.

◆ पॅरिस ऑलम्पिक मध्ये अमन हा एकमेव भारतीय पुरुष हा कुस्ती खेळामध्ये देशाचे प्रतिनिधित्व करणार आहे.

◆ भारताची ट्रॅक धावपटू के. एम. दिक्षा हिने लॉस एंजलिस येथे साउंड रनींग ट्रॅक महोत्सवात महिलांच्या 1500 मिटर शर्यतीत तिसरा क्रमांक पटकावला आहे.

◆ लॉस एंजलिस येथे साउंड रनिंग ट्रॅक महोत्सवात पुरुषांच्या 5000 मिटर शर्यतीत भारताचा धावपटू अविनाश साबळे दुसऱ्या स्थानावर राहिला आहे.

◆ दोहा डायमंड लीग 2024 स्पर्धेत चेक प्रजासत्ताक देशाचा भालाफेक पटू याकूब वाडले ने 88.38 मिटर भालाफेक करत सुवर्ण पदक जिंकले आहे.

◆ चीन मध्ये 12 ते 16 जून या कालावधीत 22 वी आशियाई सांघिक स्कॉश चॅम्पियनशिप स्पर्धा 2024 चे आयोजन करण्यात येणार आहे.

◆ AI तंत्रज्ञानाचा समावेश असलेल्या Lancet कामीकाझ ड्रोन रशिया देशाने विकसित केले आहे.

◆ RBI ने आर. लक्ष्मीकांत राव यांची Excutive director (ED) म्हणून नियुक्ती केली आहे.

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

BIS Recruitment 2024

BIS Recruitment : BIS Bharti 2024 भारतीय मानक ब्युरो नवीन नोकरी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. या भरती प्रक्रियेमध्ये एकूण 345 रिक्त असणाऱ्...