२९ मार्च २०२५

चालू घडामोडी :- 28 मार्च 2025



◆ महाराष्ट्र विधिमंडळाच्या लोकलेखा समितीच्या अध्यक्षपदी विजय वडेट्टीवार यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

◆ केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या वतीने कनिष्ठ गृहमंत्री नित्यानंद राय यांनी यांनी लोकसभेत इमिग्रेशन आणि फॉरेनर्स बिल-2025 विधेयक सादर केले.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास सात वर्षाची शिक्षेची तरतूद आहे.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून त्यात देशात येणाऱ्या नागरिकाकडे वैध कागदपत्रे नसल्यास 10 लाख रुपये दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

◆ इमिग्रेशन आणि फॉरेनर्स विधेयक 2025 लोकसभेत मंजूर करण्यात आले असून ते गृह मंत्रालयाशी संबधित आहे.

◆ महाराष्ट्र राज्य सरकारने नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर देवस्थानाला अ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा दिला आहे.

◆ नाशिकमध्ये 2027 वर्षी सिंहस्थ कुंभमेळा भरणार आहे.

◆ भारतीय स्वदेशी बनावटीच्या लुकॲप सर्च इंजिन चे उद्घाटन रक्षा खडसे यांच्या हस्ते करण्यात आले आहे.

◆ तामिळनाडू राज्याने केंद्र सरकारच्या वक्फ दुरुस्ती विधेयक 2024 ला विरोध करणारा ठराव मंजूर केला आहे.

◆ भारतीय स्वदेशी बनावटीचे लुकॲप सर्च इंजिन पुणे ठिकाणच्या आर्यन्स ग्रुप ऑफ कंपनीने बनवले आहे.

◆ रोशनी नाडर जागतिक स्तरावर पाचव्या सर्वात श्रीमंत महिला बनल्या आहेत.[सर्वात श्रीमंत भारतीय महिला :-रोशनी नाडर]

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने पाचवे स्थान पटकावले आहे.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 43 पदके जिंकली आहेत.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने एकूण 18 सुवर्ण पदक मिळवले आहेत.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये महाराष्ट्र राज्याने टेबल टेनिस मध्ये 3 सुवर्ण पदक जिंकले आहेत.

◆ एशियन रेसलिंग चॅम्पियनशिप 2025 मध्ये सुनील कुमार ने 87 किलो वजनी गटात कांस्य पदक जिंकले आहे.

◆ ICC One Day Women World Cup 2025 चे आयोजन भारत देशात करण्यात येणार आहे.

◆ खेलो इंडिया पॅरा गेम्स मध्ये हरियाणा राज्याने सर्वाधिक 104 पदके जिंकून प्रथम स्थान पटकावले आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा

Latest post

१० चालू घडामोडी २६ एप्रिल २०२५

१. भारत सरकारने अलीकडेच किती नवीन आयुष आरोग्य आणि कल्याण केंद्रांना मान्यता दिली आहे? अ. ३००० बी.५००० सी.७००० डी.१०,००० उत्तर: डी. १०,००० स्...