Sunday, 2 March 2025

मराठी व्याकरण लिहून घ्या


1) चमचम हे कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण आहे 
👉अनुकरणदर्शक

2) धोनी क्रिकेट चांगला खेळतो या वाक्यातील चांगला हा शब्द काय दर्शवतो ?
👉क्रियाविशेषण

3) या वाक्यातील क्रियाविशेषण अव्यय ओळखा माणसाने सदा हसमुखत राहावे ?
👉 सदा
 
4) वारा फार जोराने वाहत होता अधोरेखित शब्दाची जात ओळखा ?
👉 क्रियाविशेषण अव्यय

5) क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार किती ?
👉 नऊ
 
6) एकदा ,दोनदा ,तीनदा , हजारदा ही कोणती क्रियाविशेषण आहेत ?
👉 आवृत्तीदर्शक
 
7) पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा लहान मुलांना हळुवार शाब्बासकी द्यावी ?
👉 हळुवार
 
8) वर खाली पुढे मागे हे खालीलपैकी कोणत्या जातीचे शब्द आहेत? 
👉 क्रियाविशेषण
 
9) कालदर्शक, आवृत्तीदर्शक, सातत्य दर्शक, हे कोणत्या क्रियाविशेषण अव्ययाचे प्रकार आहेत ?
👉 कालवाचक
 
10) क्रियाविशेषण हे क्रियापदाचे ......असते ?
👉 विशेषण

━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━━

No comments:

Post a Comment

Latest post

इंग्रजीतील 100 समानार्थी शब्द (Synonyms) आणि त्यांचे मराठीत अर्थ खाली दिले आहेत:

1️⃣ व्यक्तिमत्व व वर्तन (Personality & Behavior)  1. Brave – Courageous (शूर)  2. Honest – Truthful (प्रामाणिक)  3. Happy – Joyful (आनंद...