◆ नागपूर येथे देशातील पहिल्या संविधान उद्देशिका पार्क चे लोकार्पण भूषण गवई यांच्या हस्ते करण्यात आले आहे.
◆ पराग जैन यांची RAW संस्थेचे प्रमुख पदी नियुक्ती झाली आहे.
◆ त्रिभाषा सूत्राचा अभ्यास करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने नरेंद्र जाधव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे.
◆ जपानमध्ये जगातील सर्वाधिक वृद्ध लोकसंख्या आहे. [36.9 दशलक्ष पेक्षा जास्त लोक 65 वर्षांपेक्षा मोठे आहेत.]
◆ जगात वृद्धांची टक्केवारी सर्वात जास्त मोनॅको देशात आहे.
◆ राजेश कुमार यांची महाराष्ट्र राज्याच्या मुख्य सचिव पदी नियुक्ती झाली आहे.
◆ पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 मध्ये चेन्नई येथे पार पडला आहे.
◆ पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 चे महिला गटात विजेतेपद ओडिशा ने पटकावले आहे.
◆ पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 चे महिला उपविजेतेपद पंजाब ने पटकावले आहे.
◆ पहिला इंडिया हॉकी मास्टर्स कप 2025 मध्ये पुरुष श्रेणीमध्ये विजेतेपद तामिळनाडू ने पटकावले आहे. [उपविजेतेपद :- चंदीगड]
◆ क्रिकेटच्या तिन्ही फॉरमॅटमध्ये शतक झळकवणारी पहिली भारतीय महिला क्रिकेटपटू स्मृती मानधना ठरली आहे.
◆ भारताच्या नीरज चोप्राने पुरूषांच्या भालाफेकीच्या जागतिक क्रमवारीत ग्रेनाडाच्या अँडरसन पीटर्सला मागे टाकून पुन्हा पहिले स्थान मिळवले आहे.
No comments:
Post a Comment