10 September 2025

चालू घडामोडी :- 09 सप्टेंबर 2025



◆ 152 मतांनी विजयी होत सी.पी. राधाकृष्णन हे भारताचे 15 वे उपराष्ट्रपती बनले आहेत.

◆ 102 वर्षीय कोकिची अकुझावा हे जपान देशाचे सर्वोच्च आणि प्रतिष्ठित शिखर माउंट फुजी चढणारे सर्वात वयस्कर व्यक्ती ठरले आहेत.

◆ ‘Mother Mary Comes to Me’ हे पुस्तक अरुंधती रॉय यांनी लिहिले आहे.

◆ 2025 च्या यूएस ओपनमध्ये पुरुष एकेरीचे विजेतेपद कार्लोस अल्काराज ने जिंकले आहे. 

◆ दरवर्षी जागतिक फिजिओथेरपी दिन 8 सप्टेंबर रोजी साजरा केला जातो.

◆ जागतिक फिजिओथेरपी दिन 2025 ची थीम "निरोगी वृद्धत्व" आहे

◆ भूपेंद्र गुप्ता यांची राष्ट्रीय जलविद्युत ऊर्जा महामंडळ (NHPC) च्या अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक (CMD) पदी नियुक्ती झाली आहे.

◆ भारताने पुरुष हॉकी आशिया कप 2025 चे विजेतेपद जिंकले आहे. [अंतिम सामना बिहारमधील राजगीर स्पोर्ट्स कॉम्प्लेक्समध्ये झाला]

◆ 28वी आशियाई टेबल टेनिस टीम चॅम्पियनशिप ही ओडिशा राज्यातील भुवनेश्वर येथे 11 ते 15 ऑक्टोबर 2025 दरम्यान आयोजित केली जाईल.

◆ 82 वा व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव 27 ऑगस्ट ते 6 सप्टेंबर 2025 या काळात व्हेनिस, इटली येथे पार पडला. [आयोजक :
ला बिएनाले डी व्हेनेझिया]

◆ 82 व्या व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातील प्रमुख विजेत्यांमध्ये जिम जार्मशच्या 'फादर मदर सिस्टर ब्रदर' या चित्रपटाला गोल्डन लायन (सर्वोच्च पुरस्कार) मिळाला आहे.

◆ अनुपर्णा रॉय यांनी व्हेनिस चित्रपट महोत्सवाच्या Orizzonti विभागात 'सॉन्ग्स ऑफ फॉरगॉटन ट्रीज' या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकाचा पुरस्कार जिंकला आणि त्या या पुरस्काराच्या पहिल्या भारतीय महिला चित्रपट निर्मात्या ठरल्या आहेत. 

◆ उल्लास कार्यक्रमांतर्गत भारतातील चौथे पूर्ण साक्षर राज्य हिमाचल प्रदेश बनले आहे.
━━━━━━༺༻━━━━━━

No comments:

Post a Comment