◆ वर्ल्ड डायरेक्टरी ऑफ मॉडर्न मिलिटरी एअरक्राफ्ट (WDMMA) नुसार, भारतीय हवाई दल चीनला मागे टाकून जगातील तिसरी सर्वात शक्तिशाली हवाई दल बनले आहे.
◆ हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेत्री मधुमती ऊर्फ हुतोक्सी रिपोर्टर यांचे (वय 87) निधन झाले.
◆ गोंदिया जिल्ह्याचे नवीन पालकमंत्री म्हणून इंद्रनील नाईक यांची नियुक्ती करण्यात आली आहे.
◆ हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेड (HSL) ला 14 ऑक्टोबर 2025 रोजी भारत सरकारने 'मिनी रत्न' दर्जा दिला आहे.
◆ भारताची संयुक्त राष्ट्र मानवाधिकार परिषदेवर (UNHRC) 2026-2028 या तीन वर्षांच्या कार्यकाळासाठी बिनविरोध निवड झाली आहे.
◆ भारत आणि दक्षिण कोरिया यांच्यातील नौदल द्विपक्षीय सराव (IN-RoKN) ची पहिली आवृत्ती दक्षिण कोरियातील बुसान नौदल तळावर आयोजित करण्यात आली होती.
◆ जागतिक आरोग्य संघटनेची 16वी वार्षिक बैठक - हर्बल मेडिसिनसाठी आंतरराष्ट्रीय नियामक सहकार्य (WHO-IRCH) ही इंडोनेशियातील जकार्ता येथे आयोजित करण्यात आली होती.
◆ पंतप्रधान विकास योजनेंतर्गत (PMJDV), अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाने वारसा आणि अभिजात भाषांना प्रोत्साहन देण्यासाठी विविध विद्यापीठांमध्ये उत्कृष्टतेची केंद्रे स्थापन केली आहेत.
◆ भारतीय रिझर्व्ह बँकेने (RBI) भूतान, नेपाळ आणि श्रीलंका या देशांमधील व्यक्ती आणि बँकांना भारतीय रुपयांमध्ये कर्ज देण्यास परवानगी दिली आहे.
◆ उत्तर प्रदेश सरकारने प्रत्येक विभागीय मुख्यालयात दिव्यांग पुनर्वसन केंद्र सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.
◆ मेघालय सरकारने शिलाँगला 'भारताची फुटबॉल राजधानी' म्हणून स्थापित करण्यासाठी नॉर्थईस्ट युनायटेड एफसी (NEUFC) या फुटबॉल क्लबसोबत तीन वर्षांच्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केली आहे.
◆ जागतिक भूक निर्देशांक 2025 मध्ये भारत 123 देशांपैकी 102 व्या क्रमांकावर आहे.
◆ दरवर्षी आंतरराष्ट्रीय गरिबी निर्मूलन दिन 17 ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
No comments:
Post a Comment