Ads

28 August 2019

Article 370: सुप्रीम कोर्टाची केंद्र सरकारला नोटीस, सात दिवसांत उत्तर देण्याचा आदेश

👉🏻_ जम्मू काश्मीर राज्याला विशेष राज्याचा दर्जा देणारं ३७०वं कलम रद्द करण्याच्या निर्णयाविरोधात दाखल याचिकांवर सुनावणी करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला आहे. पाच न्यायाधीशांचं संविधान पीठ या प्रकरणांची सुनावणी करणार आहे. न्यायालयानं केंद्र सरकार आणि जम्मू काश्मीर सरकारलाही यासंदर्भात नोटीस जारी केली आहे.

👉🏻_ याप्रकरणी नोटीस जारी करण्याची गरज नाही, असा दावा महाधिवक्ता के के वेणुगोपाल यांनी केला होता, तो देखील सरन्यायाधीश रंजन गोगोई यांच्या अध्यक्षतेखालच्या पीठानं फेटाळून लावला आहे. सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस जारी करत ऑक्टोबरच्या पहिल्या आठवड्यात कलम ३७० शी संबंधित सर्वच याचिकांवर सुनावणी घेण्याचे निर्देश दिले आहेत.

ऑक्टोबर महिन्यात विधानसभा निवडणुका होण्याची शक्यता

⚡ 15-20 ऑक्टोबर दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकाचे बिगुल वाजण्याची शक्यता!

💁‍♂ विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार, याबद्दल अनेक अंदाज व्यक्‍त होत असले,  तरी 12 सप्टेंबरनंतर निवडणुकीच्या तारखा जाहीर होण्याची शक्यता आहे.

📆 साधारणतः 15 ते 20 ऑक्टोबरच्या दरम्यान निवडणूका होऊ शकतात तसेच 2 टप्प्यांत मतदान होईल, अशी शक्यता आहे.

📍 या विधानसभेचा कार्यकाळ 9 नोव्हेंबरला संपत असून त्याआधी निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होणे आवश्यक आहे. दिवाळी 25 ऑक्टोबरपासून सुरू होत असून त्याआधी मतदान होईल, असे सांगितले जाते.

📢 राज्यात प्रचार यात्रा सक्रिय : येत्या काही दिवसांमध्ये निवडणुकांच्या अधिकृत तारखा जाहीर केल्या जाणार आहे. दरम्यान; राज्यात मुख्यमंत्री फडणवीसांची महाजनादेश यात्रा, काँग्रेसची पर्दाफाश यात्रा, राष्ट्रवादीची शिवस्वराज्य यात्रा, शिवसेनेची जनआशीर्वाद यात्रा सध्या सुरू आहे.

मुंबईत विद्यापीठ, नाशिकमध्ये मेट्रो; मंत्रिमंडळाचा निर्णय

राज्य मंत्रिमंडळाच्या आज झालेल्या बैठकीत महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मुंबईत हैदराबाद विद्यापीठ स्थापन करण्याचा आणि नाशिकमध्ये मेट्रो प्रकल्प राबविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. त्यात हे महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले. यावेळी नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता देण्यात आली आहे. तसेच मुंबई येथे हैद्राबाद (सिंध) नॅशनल कॉलिजिएट युनिव्हर्सिटी स्थापन करण्यासही मंजुरी देण्यात आली आहे.

शैक्षणिक सुधारणांवर जोर

आज झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शैक्षणिक सुधारणांवर सर्वाधिक जोर देण्यात आला. या बैठकीत शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय घेण्यात आला. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्यास मान्यता देण्यात आली. तसेच शासकीय वैद्यकीय, दंत व आयुर्वेद आणि शासन अनुदानित आयुर्वेद व युनानी महाविद्यालयातील आंतरवासितांचे विद्यावेतन सहा हजारांवरून अकरा हजार रुपये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णयही घेण्यात आला आहे. कवयित्री बहिणाबाई उत्तर महाराष्ट्र विद्यापीठामध्ये 'कवयित्री बहिणाबाई चौधरी अध्ययन व संशोधन केंद्र' सुरू करण्यास मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्र ट्रायबल पब्लिक स्कूल सोसायटी नाशिक अंतर्गत एकलव्य निवासी शाळांमध्ये पहिली ते पाचवीचे वर्ग सुरू करण्यात येणार असून कायमस्वरुपी बंद करण्यात आलेल्या आदिवासी विभागाच्या अनुदानित आश्रमशाळा ठाणे जिल्ह्याच्या कल्याण येथील अखिल भारतीय मागासवर्गीय समाज प्रबोधन संस्थेस हस्तांतरित व स्थलांतरित करून आदिम जमातीतील विद्यार्थ्यांसाठी आश्रमशाळा चालविण्यास मान्यता देण्यात आली आहे.

मंत्रिमंडळाचे निर्णय

>> ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ

>> मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा २ व ३ ला मान्यता

>> मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा क्लस्टरद्वारे पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा

>> शहरांमधील विघटनशील (ओल्या) कचऱ्यापासून तयार करण्यात येणाऱ्या कंपोस्ट खत निर्मितीला चालना देण्यासाठी प्रोत्साहन अनुदान

>> नागपूरच्या मिहान प्रकल्पास सुधारित प्रशासकीय व वित्तीय मान्यता

>> वर्धा येथे नवीन एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय सुरू करण्यास मान्यता

>> नाशिकच्या शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळाला राष्ट्रीय अनुसूचित जमाती वित्त विकास महामंडळाकडून कर्ज स्वरुपात निधी मिळण्यासाठी शासन हमी

>> महाराष्ट्र दारुबंदी अधिनियम-१९४९ मध्ये सुधारणा करण्यास मान्यता. अवैध साठा, विक्री केल्यास शिक्षेत वाढ

>> सरपंच, पंचायत समिती सभापती आणि जिल्हा परिषद अध्यक्षांना जात वैधता प्रमाणपत्र सादर करण्यास पुरेसा कालावधी मिळणार

>> सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम २०१९ नव्याने तयार करण्यात येणार.

मंत्रिमंडळ बैठकीत निर्णयांचा वर्षाव

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बुधवारी मंत्रीमंडळाच्या झालेल्या बैठकीत निर्णयांचा वर्षाव करण्यात आला. या बैठकीला अर्थमंत्री सुधीर मनगुंटीवर आणि गिरीश महाजन यांचीही उपस्थिती होती. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण्याच्या निर्णयाबरोबरच बैठकीमध्ये २५ निर्णय घेण्यात आले आहेत.

‼️मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय (28 ऑगस्ट 2019)‼️

1. राज्यातील मान्यवर ज्येष्ठ साहित्यिक व कलावंतांच्या मानधनात दीडपटीने वाढ.

2. मुख्यमंत्री सौर कृषीपंप योजनेच्या टप्पा 2 व 3 ला मान्यता.

3. सदनिकांच्या मालकी अधिकाराची नोंद अभिलेखात घेण्यासाठी महाराष्ट्र जमीन महसूल नियम 2019 नव्याने तयार करण्यात येणार.

4. शासकीय आश्रमशाळांचे इंग्रजी व सेमी इंग्रजी माध्यमामध्ये रुपांतर करण्याचा निर्णय.

5. नाशिक महानगर प्रदेश क्षेत्रात सार्वजनिक जलद परिवहन व्यवस्था प्रकल्पांर्गत मेट्रो प्रकल्प राबविण्यास मान्यता.

6. मुंबई शहरातील जीर्ण व मोडकळीस आलेल्या उपकरप्राप्त व बिगर उपकरप्राप्त इमारतींचा समूह पद्धतीने पुनर्विकास करण्यासाठी म्हाडा अधिनियमात सुधारणा.

7. विनाअनुदानित शाळांना अनुदान देण

बेझंट ॲनी : 🌸

(१ ऑक्टोबर १८४७ – २० सप्टेंबर १९३३).

विख्यात थिऑसॉफिस्ट आणि भारतीय राजकारण, धर्म, शिक्षण, समाजसुधारणा इ. क्षेत्रांत महान कार्य केलेली एक ब्रिटिश महिला. त्यांचा जन्म लंडनमध्ये झाला. त्यांची आई एमिली ही आयरिश होती आणि वडील विल्यम पेजवुड हेही मातृवंशाकडून आयरीशच होते. आई धार्मिक, कष्टाळू व मानी आणि वडील विद्वान, तत्त्वज्ञ व बहुभाषी होते. ॲनी बेझंट या पाच वर्षांच्या असताना त्यांचे वडील वारल्यामुळे (१८५२) या कुटुंबापुढे अनेक अडचणी निर्माण झाल्या. परंतु त्यांच्या आईच्या मॉरिएट नावाच्या एका श्रीमंत मैत्रिणीने त्यांना शिक्षणासाठी आपल्याकडे ठेवून घेतले व त्यांना जर्मन, फ्रेंच इ. भाषा व संगीत यांचे शिक्षण दिले तसेच समाजसेवेचीही आवड त्यांच्या ठिकाणी निर्माण केली. या काळात त्या वृत्तीने धार्मिक बनल्या. पुढे रेव्हफ्रॅंक बेझंट या ख्रिस्ती धर्मोपदेशकाशी त्यांचा विवाह झाला (१८६७). त्यांना दिग्बी हा मुलगा व मेबेल ही मुलगी अशी दोन अपत्ये झाली. परंतु मुलांच्या आजारपणामुळे त्या नास्तिक बनल्याने आणि पतीच्या इच्छेपुढे शरणागती पत्करणे हा त्यांचा स्वभाव नसल्यामुळे त्यांना पतीपासून अलग व्हावे लागले (१८७३). त्यानंतर त्यांना खूप हालअपेष्टा सोसाव्या लागल्या. त्यांच्या आईलाही या घटनेचा धक्का बसला व तिचा मृत्यू झाला (१८७४).

नॅशनल रिफॉर्मर पत्राच्या वाचनाने प्रभावीत होऊन त्या सुप्रसिद्ध नास्तिक चार्ल्झ ब्रॅडलॉ (१८३३–९१) यांच्या ‘नॅशनल सेक्युलरसोसायटी’ मध्ये दाखल झाल्या (१८७४). पुढे त्या सोसायटीच्या उपाध्यक्षा आणि सोसायटीचे मुखपत्र असलेल्या नॅशनल रिफॉर्मरच्या सहसंपादिका बनल्या. त्या काळात नास्तिकता, संततिनियमन, स्त्रियांचा मतदानाचा हक्क इत्यादींचा प्रचार केल्यामुळे त्यांचा खूप सामाजिक छळ झाला व त्यांच्यावर खटलेही भरले गेले. १८८५ साली त्या ‘फेबिअन सोसायटी’च्या सभासद बनल्या. जॉर्ज बर्नार्ड शॉ व इतर समाजवादी विचारवंतांच्या सान्निध्यात आल्यावर त्यांनी समाजवादाचा प्रचार केला. लंडनमधील पहिल्या ट्रेड युनियन्स स्थापन करण्यास त्याच कारणीभूत झाल्या. त्यांनी काड्यापेट्यांच्या कारखान्यात काम करणाऱ्या ७०० मुलींचा संप घडवून आणला (१८८८) आणि अकुशल कामगार संघटित होऊ शकतात, हे दाखवून दिले. या काळातील बहुतेक सर्व समाजसुधारणांसाठी त्यांनी लेखनभाषणादी मार्गांनी भरीव कार्य केले.

थिऑसॉफिकल सोसायटीच्या संस्थापिका मॅडम ⇨ हेलेना ब्लाव्हॅट्‌स्की (१८३१-९१) यांचा द सीकेट डॉक्ट्रिन हा दोन खंडांत प्रसिद्ध झालेला ग्रंथ त्यांच्याकडे परीक्षणार्थ आला (१८८९). त्याच्या प्रभावाने त्यांनी ब्लाव्हॅट्‌स्की यांचे शिष्यत्व पत्करले आणि सोसायटीचे सभासदत्व स्वीकारून त्या पुन्हा आस्तिक बनल्या. १८९३ साली त्यांनी अमेरिकेस भेट दिली आणि तेथे त्यांनी शिकागोच्या सर्वधर्मपरिषदेत अत्यंत प्रभावी भाषण करून श्रोत्यांची हृदये हेलावून सोडली.

त्या १८९३ साली भारतात आल्या आणि पुढे आयुष्याच्या अखेरपर्यंत त्या भारतातच राहिल्या. येथे त्यांनी प्रथम धर्म, शिक्षण व समाजसुधारणा या क्षेत्रांकडे लक्ष दिले. त्यांनी हिंदू धर्म व संस्कृतीचे सखोल अध्ययन केले. आपण पूर्वजन्मी हिंदू होतो आणि या जन्मातही जन्माने नाही, तरी श्रद्धेने हिंदू आहोत, असे त्या मानू लागल्या. त्यांनी भारतभर प्रवास करून रामायण, महाभारत, उपनिषदे इत्यादींवर अनेक व्याख्याने दिली. गीतेचे इंग्रजीत भाषांतर केले (१९०५). भारतीयांनी आपली प्राचीन परंपरा विसरू नये, म्हणून त्यांनी भारताच्या प्राचीन श्रेष्ठत्वाचे चित्र लोकांपुढे उभे केले. त्यांनी वृत्तपत्रांतून प्रचंड लेखन केले. लेखन व व्याख्यानांतून मिळालेल्या पैशाच्या प्रचंड देणग्या दिल्या. त्यांच्या ग्रंथांची संख्या सु. ४५० आहे. त्यांपैकी काही महत्त्वाचे ग्रंथ पुढीलप्रमाणे : माय पाथ टू अथेइझम (१८७७), रॅडिकॅलिझम अँड सोशिअ‍ॅलिझम (१८८७), द एन्शंटविजडम (१८९७), एज्युकेशन अ‍ॅज अ नॅशनल ड्युटी (१९०३), अ स्टडी इन कॉन्शसनेस (१९०४), हिंदू आयडियल्स (१९०४), हिंट्‌स ऑन द स्टडी ऑफ द भगवद्‌गीता(१९०५), फोर ग्रेट रिलिजन्स (१९०६), इंट्रोडक्शन टू योग (१९०८), द रिलिजस प्रॉब्लेम्स इन इंडिया (१९०९), यूनिव्हर्सल टेक्स्ट बुक ऑफ रिलिजन अँड मॉरल्स (३ खंड, १९११-१५), सोशल प्रॉब्लेम्स (१९१२), द फ्यूचर ऑफ इंडियन पॉलिटिक्स (१९२२), वर्ल्ड प्रॉब्लेम्स ऑफ टुडे (१९२५), हिस्टरी ऑफ द फ्रेंच रेव्होल्यूशन (१९३१). एका पाश्चात्य स्त्रीने भारतीय संस्कृतीचे मोठेपण सांगितलेले पाहून भारतीय लोक प्रभावित झाले. ते त्यांना ईश्वराचा, गार्गीचा वा सरस्वतीचा अवतार मानू लागले. सनातनी हिंदू मात्र त्यांना हिंदूंचा प्रच्छन्न शत्रू म्हणत होते.

त्यांनी बनारस येथे सेंट्रल हिंदू कॉलेज काढले (१८९८) व सरकारी अनुदान न घेता ते चालविले. त्याच्याच आधारावर पुढे बनारस हिंदू विश्वविद्यालयाची स्थापना झाली. या विश्वविद्यालयाने त्यांना सन्मान्य डी. लिट्. देऊन त्यांचा गौरव केला. त्यांनी ‘इंडियन बॉइज स्काउट्‌स असोसिएशन’ स्थापन केली (१९१७). मदनपल्ली येथे नॅशनल कॉलेज (१९१५) आणि राष्ट्रीय शिक्षणाला चालना देण्यासाठी एक संस्था (१९१७) तसेच अड्यार येथे नॅशनल युनिव्हर्सिटी (१९१८) स्थापन केली. यांखेरीज अनेक शाळा, वसतिगृहे इत्यादींची स्थापनाही त्यांनी केली. सहभोजने, बालविवाहांना प्रतिबंध, स्त्रियांची सुधारणा इ. क्षेत्रांतही त्यांनी प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष कार्य केले. त्यांनी विमेन्स इंडियन असोसिएशनची स्थापना केली. (१९१७).

कर्नल ऑल्‌टकटच्या मृत्यूनंतर थिऑसॉफिकल सोसायटीच्या अध्यक्षा म्हणून त्यांची प्रचंड बहुमताने निवड झाली (१९०७). मृत्यूपर्यंत त्याच अध्यक्षा होत्या. जिद्‌दू कृष्णमूर्ती (सध्याचे जे. कृष्णमूर्ती) या लहान मुलाला मसीहा मानून त्यांनी त्याचे शिक्षण केले (१९०९); त्याच्यासाठी ‘पूर्वतारक संघ’ स्थापन करून हेरल्ड ऑफ द स्टार हे मुखपत्र सुरू केले.

भारताच्या राजकीय नेतृत्वात १९१४ च्या सुमारास एक प्रकारची शिथिलता आली होती. यावेळी राजकीय उन्नतीशिवाय भारताची खरी उन्नती नाही, हे त्यांनी ओळखले आणि त्या राजकारणात उतरल्या. अल्पावधीतच त्या अत्यंत लोकप्रिय झाल्या. त्यांनी मद्रास येथे कॉमनवील आणि न्यू इंडिया ही दोन वृत्तपत्रे सुरू केली (१९१४). त्यांनी होमरूल लीगची स्थापना केली (१९१६). या बाबतीत त्यांना लो. टिळकांचे सहकार्य मिळाले. महायुद्ध सुरू होताच ब्रिटिशांची अडचण तीच भारतीयांची संधी, असे त्यांनी घोषित केले. १५ जून १९१७ रोजी मद्रास सरकारने त्यांना ऊटकमंड येथे तीन महिने स्थानबद्ध केले. १९१७ सालीच भारतीय काँग्रेसच्या कलकत्त्याच्या अधिवेशनाचे अध्यक्षपद त्यांना देण्यात आले. त्यांनी जहाल व मवाळ या पक्षांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला. परंतु पुढे काँग्रेसचे नेतृत्व म. गांधीजींकडे गेले. त्यांची असहकारिता व सामुदायिक सत्याग्रह ही आंदोलने अ‍ॅनी बेंझंटना मान्य नसल्यामुळे त्यांचे गांधीजींशी पटू शकले नाही. त्यामुळे १९१९ नंतर त्यांनी जवळजवळ काँग्रेस सोडल्यासारखेच केले आणि त्या राजकारणात अत्यंत अप्रिय झाल्या. त्यांना भारतासाठी स्वातंत्र्य हवे असले, तरी भारताने कॉमनवेल्थमध्ये रहावे, असे त्यांना वाटत असे.

अलौकिक वक्तृत्व, प्रकांड पांडित्य, प्रचंड कार्यक्षमता, विलक्षण स्मरणशक्ती, दीर्घोद्योग, वक्तशीरपणा, जन्माने ब्रिटिश असूनही भारतीयांविषयीची आत्मीयता, समाजाच्या उत्थानाची तळमळ इ. सद्‌गुणांमुळे त्यांचे व्यक्तीमत्त्व अष्टपैलू बनले होते. त्यामुळेच त्या ज्या ज्या क्षेत्रात गेल्या, त्या त्या क्षेत्रात अल्पावधीतच त्यांना नेतृत्त्व प्राप्त झाले.

थिऑसॉफिकल सोसायटीचे केंद्र असलेल्या अड्यार या उपनगरात त्यांचे निधन झाले.

श्रावणबाळ योजनेत तब्बल 10 वर्षांनंतर बदल


◾️श्रावण वृद्धापकाळ योजनेचे निकष तब्बल 10 वर्षांनंतर बदलले आहेत. 2009 मध्ये शासनाने अनुदानात 100 रुपयांची वाढ केली होती, त्यानंतर आता यामध्ये 400 रुपये अनुदानात वाढ करण्यात आली आहे. विशेष म्हणजे सरकारने अधिवेशनात वयाचा भेदभाव न करता सरसकट 600 वरून हे अनुदान थेट एक हजार रुपये करण्याचा निर्णय घेतला असून शासनाच्या या निणर्याचे स्वागत राज्यभरातील 'थरथरत्या हातां'कडून होत आहे.

◾️श्रावणबाळ वृद्धापकाळ योजनेच्या लाभार्थ्यांचे अनुदान आता 600 वरून 1 हजार करण्यात आले आहे. विधवा महिलांना एक अपत्य असल्यास 1100, दोन अपत्य असल्यास 1200 रुपये दरमहा मिळणार आहेत

एका ओळीत सारांश, 28 ऑगस्ट 2019

🌹🌳🌴संरक्षण🌴🌳🌹

👉ही ई-कॉमर्स कंपनी भारतात मिलिटरी व्हेटेरन्स एम्प्लॉयमेंट प्रोग्राम नावाचा कार्यक्रम राबववित आहे - अॅमेझॉन इंडिया.

🌹🌳🌴अर्थव्यवस्था🌴🌳🌹

👉केंद्र सरकारला भारतीय रिझर्व्ह बँकेकडून (RBI) लाभांश व अतिरिक्त राखीव निधीपोटी इतका निधी मिळणार - 1 लक्ष 76 हजार कोटी रुपये.

👉ही सरकारी संस्था ई-तपासणी प्रणाली चालू करण्याची योजना आखत आहे - कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संस्था (EPFO).

👉26 ऑगस्ट 2019 रोजी भारतीय रिझर्व्ह बँकेनी किसान क्रेडिट कार्डच्या माध्यमातून मत्स्यपालन व पशुपालनात गुंतलेल्या शेतकर्‍यांना दोन लक्ष रुपयांपर्यंतच्या अल्प मुदतीच्या कर्जावर इतके व्याज अनुदान देण्याच्या पद्धती जाहीर केली - 2%.

🌹🌳🌴आंतरराष्ट्रीय🌴🌳🌹

👉नेपाळची राजधानी काठमांडू आणि हे भारतीय शहर यांच्यादरम्यान 650 किलोमीटरच्या प्रवासासाठी एक बस सेवा सुरू झाली - पश्चिम बंगालमधले सिलीगुडी.

👉पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना या देशाच्या राजाने "द किंग हमाद ऑर्डर ऑफ रेनेसेन्स" देऊन गौरवले - बहरीन.

🌹🌳🌴राष्ट्रीय🌴🌳🌹

👉27 ते 29 ऑगस्ट 2019 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित 7 व्या कम्युनिटी रेडियो संमेलनाचा विषय - कम्युनिटी रेडियो फॉर एसडीजीस.

👉26 ऑगस्ट 2019 रोजी केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांनी या ठिकाणी एकात्मिक वस्त्रोद्योग पर्यटन संकुलाचे भुमिपूजन केले - नोंगपोह, री भोई जिल्हा, मेघालय.

👉सार्वजनिक क्षेत्राच्या गटात ‘BML मुंजाल अवॉर्ड फॉर बिझिनेस एक्सलन्स थ्रू लर्निंग अँड डेव्हलपमेंट’ या पुरस्काराचे विजेता – भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI).

🌹🌳🌴व्यक्ती विशेष🌴🌳🌹

👉जीवनगौरव गटात तेनझिंग नोर्गे नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018 याचे विजेता - वांगचूक शेर्पा.

🌹🌳🌴विज्ञान व तंत्रज्ञान🌴🌳🌹

👉भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) संस्थेच्या शास्त्रज्ञांनी पाण्याच्या पृष्ठभागावर चालणार्‍या किंवा धावू शकणार्‍या ‘मेसोव्हेलिया’ या कुटुंबातल्या अर्ध-जलचर किटकांच्या इतक्या प्रजाती शोधल्या - सात (अंदमान बेटे, मेघालय, तामिळनाडू येथे).

🌹🌳🌴सामान्य ज्ञान🌴🌳🌹

👉बहरीन - राजधानी: मनामा; राष्ट्रीय चलन: बहरीनी दिनार.

👉भारतीय लघुउद्योग विकास बँक (SIDBI) - स्थापना वर्ष: सन 1990; मुख्यालय: लखनऊ, उत्तरप्रदेश.

👉भारत सरकारच्यावतीने साहसी क्षेत्रात व्यक्तींना दिला जाणारा पुरस्कार - तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार.

👉हिमालयाचे शिखर सर करणारे पहिले व्यक्ती - न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी तेनझिंग नोर्गे (1953 साली).

👉भारतीय प्राणीशास्त्र सर्वेक्षण (ZSI) याचे स्थापना वर्ष – सन 1916.

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) – स्थापना वर्ष: सन 1935; मुख्यालय: मुंबई (महाराष्ट्र).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले गव्हर्नर - सर ओसबोर्न स्मिथ (1935 - 1937).

👉भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) याचे पहिले भारतीय गव्हर्नर - सर सी॰ डी॰ देशमुख (1943-1949).

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार 2018:-

● 2018 या वर्षासाठी तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

● पुरस्कार विजेते –

● जीवनगौरव पुरस्कार - वांगचूक शेर्पा
● भू साहस – गिर्यारोहक अपर्णा कुमार, दिवंगत दिपंकर घोष, मनिकंदन के.
● जल साहस - जलतरणपटू प्रभात राजू कोळी
● हवाई साहस - रामेश्वर जांग्रा

● राष्ट्रपती भवनात 29 ऑगस्ट 2019 रोजी होणाऱ्या एका कार्यक्रमात इतर क्रिडा पुरस्कारांसह हे पुरस्कार राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतील. मानचिन्ह, प्रमाणपत्र आणि पाच लक्ष रुपये असे या पुरस्काराचे स्वरूप आहे.

●पुरस्काराबद्दल

तेनझिंग नोर्गे राष्ट्रीय साहस पुरस्कार दरवर्षी साहसी क्षेत्रात व्यक्तींच्या कर्तृत्वाचा सन्मान करण्यासाठी भारत सरकारच्यावतीने दिला जातो.

तरुणांना धीर देण्याची, जोखीम घेण्याची, सहकार्याची आणि आव्हानात्मक परिस्थितीत तयार राहण्याची भावना उत्पन्न करण्यासाठी प्रोत्साह देण्याच्या उद्देशाने हा पुरस्कार तयार करण्यात आला आहे.

या पुरस्काराचे भू, जल, हवाई साहस आणि जीवन गौरव पुरस्कार अशा चार भागात वर्गीकरण करण्यात येते.

हिमालयाच्या शिखरावर पहिली चढाई 1953 साली ब्रिटिश मोहिमेतले न्यूझीलंडचे एडमंड हिलरी व भारतीय-नेपाळी नागरिक शेर्पा तेनझिंग नोर्गे यांनी केली होती. त्यांच्या स्मृतीत हा पुरस्कार दिला जात आहे.

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न


1) ‘तिने भिका-याला पैसा दिला’, हे वाक्य क्रियापदांच्या कोणत्या प्रकारातील आहे ?

   1) विधानपूरक      2) फक्त सकर्मक      3) व्दिकर्मक    4) उभयविध

उत्तर :- 3

2) अ) त्याचे वागणे त्याच्या बोलण्याच्या बरोबर विरुध्द होते.
    ब) सभेतील मतदानाच्या वेळी तिने ठरावाविरुध्द मत नोंदवले.

          या दोन वाक्यातील अव्यये कोणती आहेत ?

   1) शब्दयोगी व क्रियाविशेषण    2) क्रियाविशेषण अव्यय व शब्दयोगी
   3) दोन्ही शब्दयोगी      4) दोन्ही क्रियाविशेषण अव्यये

उत्तर :- 2

3) वाघ माझ्यासमोरून गेला – या वाक्यातील अव्ययाचा प्रकार निवडा.

   1) उभयान्वयी अव्यय    2) शब्दयोगी अव्यय   
   3) क्रियाविशेषण अव्यय    4) केवलप्रयोगी अव्यय

उत्तर :- 2

4) ‘देह जावो अथवा राहो | पांडूरंगी दृढ भावो’
      या संतवचनात .................... या उभयान्वयी अव्ययाचा वापर केला आहे.

   1) विकल्पबोधक    2) न्यूनत्वबोधक      3) कारणबोधक    4) उद्देशबोधक

उत्तर :- 1

5) खालील किती शोकदर्शक केवलप्रयोगी अव्यये आहे.

     ऊं, ॲ:, अरेरे, अयाई, अगाई, हाय
   1) पाच        2) चार        3) सर्व      4) तीन

उत्तर :- 3

6) ‘कर’ या धातूपासून ‘मी करा’ या एकवचनी पद्यरूपाचे अनेकवचनी रीतिभूतकाळात रुपांतर कसे होईल. बरोबर पर्याय निवडा.

   1) आम्ही करू    2) मी करीन   
   3) मी करून    4) आम्ही करावे

उत्तर :- 1

7) पुढील शब्दाचे लिंग ओळखा. – पुरणपोळी

   1) स्त्रीलिंगी    2) पुल्लिंग   
   3) नपुंसकलिंगी    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

8) षष्ठी विभक्तीचे एकवचनी प्रत्यय खालीलपैकी कोणते आहेत ?

   1) ने, ए, ई, शी    2) ऊन, हून   
   3) त, ई, आ    4) चा, ची, चे

उत्तर :- 4

9) वाक्याचा प्रकार ओळखा. – ‘सर्वांनी शांत बसा.’

   1) संकेतार्थी    2) विध्यर्थी   
   3) संयुक्त    4) आज्ञार्थी

उत्तर :- 4

10) ‘एके दिवशी युध्द बंद झाल्याची बातमी येऊन धडकली,’ या वाक्यातील विधेय विस्तार कोणते ?

   1) धडकली    2) युध्द बंद झाल्याची    
   3) बातमी     4) येऊन, एके दिवशी

उत्तर :- 4