12 October 2019

पनामा कालवा: अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडणारा अभियांत्रिकी शास्त्राचा उत्कृष्ट नमूना

🔺कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन १०६ वर्षे पूर्ण झाली 

◾️जगातील माननिर्मित आश्चर्यांपैकी एक असणाऱ्या पनामा कालव्याचे बांधकाम पूर्ण होऊन आज १०६ वर्षे पूर्ण झाली. १९१३ साली आजच्याच दिवशी अमेरिकेचे २८ वे राष्ट्राध्यक्ष वूड्रो विल्सन यांनी व्हाइट हाऊसमधून टेलिग्राफ सिग्नलच्या माध्यमातून या कालव्याचे उद्घाटन केले. असे असले तरी ३ ऑगस्ट १९१४ रोजी कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. या कालव्यामुळे अटलांटिक व पॅसिफिक महासागर जोडले गेले. कालव्याच्या अटलांटिक किनाऱ्यावर कोलोन तर पॅसिफिक किनाऱ्यावर पनामा ही बंदरे आहेत. पनामा कालव्याची लांबी ८० किमी आणि रुंदी १८० ते ३३० किमी आहे. या कालव्यामुळे अमेरिकेच्या अटलांटिक व पॅसिफिक किनाऱ्यामधील अंतर कमी झालेले आहे. पनामा कालव्यामुळे संयुक्त संस्थाने, ऑस्ट्रेलिया, संयुक्त संस्थाने ते जपान हे अंतर कमी झाले आहे. जाणून घेऊयात आधुनिक अभियांत्रिकी शास्त्राचा सर्वोत्तकृष्ट नमूना म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पनामा कालव्याबद्दलच्या खास गोष्टी…
पनामा कालवा हा मध्य अमेरिकेच्या पनामा देशामधील एक कृत्रिम कालवा आहे. हा कालवा अटलांटिक महासागराच्या कॅरिबियन समुद्राला प्रशांत महासागरासोबत जोडतो.

>
पनामा कालवा जगातील सर्वात महत्त्वाच्या व वर्दळीच्या जलमार्गांपैकी एक आहे. हा कालवा वापरणाऱ्या जहाजांची वार्षिक संख्या १९१४ साली १००० होती तर २००८ पर्यंत ही संख्या १४,७०२ पर्यंत पोचली होती. २००८ सालापर्यंत एकूण ८.१५ लाख जहाजांनी पनामा कालव्याचा वापर केला होता.

>
ह्या कालव्याच्या बांधणीसाठी अनेक नैसर्गिक व कृत्रिम तलावांचा वापर करण्यात आला. हे तलाव

समुद्रसपाटीपासून सुमारे २६ मी उंच असल्यामुळे पनामा कालव्यामध्ये दोन्ही बाजूंना बंदिस्त बांध (लॉक्स) बांधले आहेत. ह्या बांधांमध्ये अनुक्रमे पाणी सोडत आत शिरणाऱ्या जहाजांना वर चढवले जाते. कालव्यामधून बाहेर पडणाऱ्या जहाजांसाठी उलटी क्रिया करून खाली उतरवले जाते. सध्याच्या घडीला ह्या बांधांची रूंदी ११० फूट आहे. पनामा कालव्याची एकूण लांबी ७७.१ किमी (४८ मैल) आहे.

>
अमेरिकन स्थापत्य अभियांत्रिकी संघटनेने पनामा कालव्याचा आपल्या जगातील सात नव्या आश्चर्यांपैकी एक असल्याचे सांगत या कालव्याचा आधुनिक युगातील आश्चर्यांच्या यादीमध्ये समावेश केला आहे.
>

पनामा कालवा बांधण्यापूर्वी प्रशांत महासागरामधून अटलांटिक महासागरात पोचण्यासाठी बोटींना दक्षिण अमेरिका खंडाला वळसा घालून धोकादायक मेजेलनच्या सामुद्रधुनीमधून प्रवास करावा लागत असे. मध्य युगापासून हा प्रवास टाळण्यासाठी मानवनिर्मित कालव्याची कल्पना मांडली जात होती.

>
पनामाचे मोक्याचे स्थान व अरूंद भूमीचा पट्टा पाहता येथेच हा कालवा काढणे सहजपणे शक्य होते. रोमन साम्राज्याचा राजा पहिला कार्लोस याने १५३४ साली ह्या कालव्यासाठी पाहणी करण्याचे आदेश दिले होते. १८५५ साली अमेरिकेने पनामा कालव्याचा प्रस्ताव मांडला. ह्याच काळात सुवेझ कालव्याचे निर्माण करण्यात फ्रेंचांना यश मिळाल्यामुळे पनामा कालव्याच्या बांधकामाबद्दल स्थापत्यकारांना हुरूप आला.

>
११८१ साली फ्रान्सने पनामा कालव्याचे बांधकाम हाती घेतले. परंतु सुमारे २८ कोटी अमेरिकन डॉलर खर्च केल्यानंतर हा उपक्रम दिवाळखोरीत निघाला व १८९० साली काम थांबले.

>
पुढील १३ वर्षे अमेरिकेने अनेक पाहण्या व अभ्यास केले. अखेर १९०४ साली राष्ट्राध्यक्ष थियोडोर रूझवेल्टच्या नेतृत्वाखाली अमेरिकेने ह्या कालव्याचे हक्क विकत घेतले व बांधकाम पुन्हा सुरू झाले. अनेक अडचणींचा सामना करीत अमेरिकन अभियंत्यांनी १९१४ साली कालव्यामधून जाहजांची वाहतूक सुरु झाली. १९९९ सालापर्यंत पनामा कालव्याचा ताबा अमेरिकेकडेच होता.

चालू घडामोडी वन लाइनर्स,11 ऑक्टोबर 2019.

✳ जागतिक महिला बॉक्सिंग स्पर्धेची सुरुवात रशियामध्ये होते

✳ मेरी कोमने जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

✳ मंजू राणीने जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

✳ बी लोव्हलिनाने जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

✳ जमुना बोरोने जागतिक महिला बॉक्सिंग चँपियनशिपच्या उपांत्य फेरीत प्रवेश केला

✳ डॉ हर्षवर्धन यांनी पुढाकार ‘सुरक्षा मातृत्व आकाश’ सुरू केला

✳ बहुतेक आरोग्यदायी साखर पेयांसाठी जाहिरातींवर बंदी घालणारा सिंगापूर पहिला देश बनला

✳ 26 वी आंतर रेल संरक्षण बल हॉकी स्पर्धा भुवनेश्वर येथे प्रारंभ

✳ पीके गुप्ता यांची राष्ट्रीय बिल्डिंग कन्स्ट्रक्शन कॉर्पोरेशनच्या अध्यक्षपदी नियुक्ती

✳ केरळ बँकेच्या स्थापनेसाठी आरबीआयने केरळ सरकारला मान्यता दिली

✳ नवी दिल्ली येथे भारत-थायलंड आयोजित आठव्या संयुक्त आयोगाची बैठक

✳ *साहित्य 2018-19 मधील नोबल पुरस्कार*

✳ पोलंडच्या ओल्गा टोकार्झुकला साहित्य 2018 मधील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले

✳ ऑस्ट्रियाच्या पीटर हँडके यांना साहित्य 2019 मधील नोबेल पुरस्काराने गौरविण्यात आले

✳ इंडिया मोबाइल कॉंग्रेस 2019 नवी दिल्ली येथे होणार आहे

✳ भारत रेटिंग्सने भारताच्या 2019-20 चा जीडीपी विकास दर 6.1% पर्यंत कमी केला

✳ आयसीसी स्पर्धेत भारताची जी.एस. लक्ष्मी प्रथम महिला सामना रेफर ठरली

✳ जीएसटी महसूल वाढविण्यासाठी उपाययोजना सुचविण्यासाठी सरकार पॅनेलचे गठन करते

✳ सतीश रेड्डी यांनी भारतीय फार्मास्युटिकल आघाडीचे अध्यक्ष म्हणून नियुक्ती केली

✳ मिगुएल डायझ-कॅनेल हे रिपब्लिक ऑफ क्यूबाचे अध्यक्ष म्हणून निवडले गेले

✳ अझरबैजानचे पंतप्रधान नोव्ह्रोज मम्माडोव्ह यांनी पदाचा राजीनामा दिला

✳ अली असडोव अझरबैजानचे नवीन पंतप्रधान म्हणून नेमणूक केली

✳ यूएसएने 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगला अव्वल स्थान दिले

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये चीन दुसर्‍या क्रमांकावर आहे

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये जर्मनी तिसरा क्रमांकावर आहे

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये जपानचा चौथा क्रमांक लागतो

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये यूकेचा पाचवा क्रमांक लागतो

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये भारताचा 7 वा क्रमांक आहे

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये कॅनडाचा आठवा क्रमांक आहे

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये दक्षिण कोरियाचा 9 वा क्रमांक आहे

✳ 2019 च्या ब्रँड फायनान्स नेशन्स रँकिंगमध्ये इटलीचा दहावा क्रमांक लागतो

✳ 50 वर्षांवरील जवळपास 12% भारतीयांना मधुमेह आहे: सर्वेक्षण

✳ मूडीजने भारताच्या आर्थिक वर्षाच्या वाढीचा अंदाज 5.8% पर्यंत कमी केला.

✳ चौथी पुरूषांच्या राष्ट्रीय बॉक्सिंग स्पर्धेची सुरुवात बद्दी येथे

✳ शिवा थापाने राष्ट्रीय बॉक्सिंग चँपियनशिपमध्ये सुवर्ण जिंकले

✳ विराट कोहली 50 कसोटी सामन्यांमध्ये आघाडीवर असलेला दुसरा भारतीय कर्णधार ठरला

✳ लक्ष्य सेन, राहुल भारद्वाज डच ओपनच्या क्वार्टर-फायनल्समध्ये प्रवेश

✳ गुन्हेगारी तक्रारी नोंदवण्यासाठी रेल्वेने "सहयात्री" अॅप सुरू केले

✳ मानव संसाधन विकास मंत्रालयाने विद्यार्थ्यांसाठी '' ध्रुव '' सुरू केले

✳ इंडियाबुल्स आणि लक्ष्मीविलास बँकेचे विलीनीकरण रिझर्व्ह बॅंकेने नाकारले

✳ भारतीय रेल्वे 150 गाड्यांचे खासगीकरण करण्यासाठी, 50 स्थानकांचा विकास करणार आहे.

UNICEF- क्रिप्टोकरन्सीमध्ये व्यवहार करणारी संयुक्त राष्ट्रसंघाची पहिली संस्था

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (UNICEF) या संघटनेनी “UNICEF क्रिप्टोकरन्सी फंड” नावाने नव्या कोषाची स्थापना केली आहे. येथे इथर आणि बिटकॉइन या क्रिप्टोकरन्सीच्या माध्यमातून निधी प्राप्त केले जाणार, साठविणे आणि वितरित केले जाणार.

- संयुक्त राष्ट्रसंघाची ही पहिलीच संस्था आहे जी जगभरातल्या बालकांना आणि तरुणांना फायदा देण्याच्या उद्देशाने मुक्त स्त्रोत तंत्रज्ञानासाठी क्रिप्टोकरन्सीचा वापर करणार.

▪️क्रिप्टोकरन्सी म्हणजे काय?

- क्रिप्टोकरन्सी हे एक डिजिटल आभासी चलन असून यामध्ये व्यवहारांच्या सुरक्षिततेसाठी, चलनाच्या नियंत्रणासाठी व पैसे पाठवणे याविषयी योग्यता तपासून पाहण्यासाठी क्रिप्टोग्राफीचा वापर केलेला असतो.

- आभासी चलन अर्थात ‘क्रिप्टोकरन्सी’ हे संगणकीय अल्गोरिदमच्या आधारे निर्माण करण्यात आलेले चलन आहे. या चलनाला भौतिक रूप नसते. मात्र, आर्थिक देवाणघेवाणीसाठी ते वापरले जाऊ शकते. 2009 साली सातोशी नाकामोतो नावाच्या एका अभियंत्याने ‘बिटकॉइन’ची संकल्पना जन्माला घातली. एका संगणकीय प्रोग्रॅममधली गणितीय आकडेमोड करून ‘बिटकॉइन’ अस्तित्वास आले. त्यानंतर गेल्या दशकभरात शेकडो प्रकारच्या ‘क्रिप्टोकरन्सी’ संगणकीय जगात निर्माण झाल्या. अशा प्रकारच्या आभासी चलनाद्वारे केलेले आर्थिक व्यवहार अतिशय गोपनीय असतात.

- या चलनाच्या व्यवहारांसाठी कोणत्या बँकेशी संलग्न राहण्याची आवश्यकता नाही. विकेंद्रित व्यवस्था असल्याने या आभासी चलनावर कोणा एका कंपनीची वा देशाची मक्तेदारीही नाही. कोणत्याही देशाच्या सीमेचे बंधन नसल्याने आणि कोणत्याही स्वरूपाचा कर त्यांना लागू होत नसल्याने गेल्या दशकभरात आभासी चलनाचा वापर वाढत चालला आहे. त्यामुळे गेल्या दशकभरात या आभासी चलनांची उलाढाल अब्जावधी डॉलरच्या घरात पोहोचली आहे. अनेक देशांतील बँका, हॉटेल, कंपन्या, संकेतस्थळे यांनी आभासी चलनाचा स्वीकार केला आहे. त्यामुळे या चलनाचे मूल्यही दिवसेंदिवस वाढत चालले आहे. यातूनच या आभासी चलनांचे विनिमय बाजार उभे राहिले. बाजारांमध्ये जगभरातल्या आभासी चलनांचे भौतिक चलनांच्या तुलनेतले मूल्य दररोज ठरते. एकदा बिटकॉइनचे मूल्य 6 लक्ष 6 हजार रुपये इतके होते.

▪️UNICEF बाबत

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल कोष (United Nations Children's Fund -UNICEF) याचे मुख्यालय न्यूयॉर्क शहर (न्यूयॉर्क, अमेरिका) येथे आहे. UNICEF आधी दिनांक 11 डिसेंबर 1946 रोजी ‘युनायटेड नेशन्स इंटरनॅशनल चिल्ड्रन्स इमर्जन्सी फंड’ या नावाने तयार करण्यात आले होते, ज्यामधून द्वितीय विश्वयुद्धाच्या धर्तीवर प्रभावित झालेल्या बालकांना आपत्कालीन अन्न व आरोग्य सेवा प्रदान करण्यासाठी याची स्थापना केली गेली होती

- पोलंडचे डॉक्टर लुडविक राज्चमॅन हे UNICEFचे संस्थापक म्हणून ओळखले जातात आणि ते या संघटनेचे पहिले अध्यक्ष होते.

- पुढे 1950 साली सर्वत्र विकसनशील देशांमधील बालकांच्या आणि महिलांच्या दीर्घकाळाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी संघटनेचा विस्तार करण्यात आला.

-1953 साली तो संयुक्त राष्ट्रसंघाचा भाग बनला आणि नावामधील ‘इंटरनॅशनल’ व ‘इमर्जन्सी’ शब्द वगळण्यात आले, मात्र मूळ संक्षिप्त नाव काम ठेवण्यात आले. UNICEFचे कार्यक्षेत्र 190 देश आणि प्रांतांमध्ये पसरलेले आहे.
———————————————

भारत सीमेलगत सौर व पवन प्रकल्प उभारणार

सन 2022 पर्यंत 175 गीगावॉट स्वच्छ ऊर्जा साध्य करण्याचे भारताचे लक्ष्य आहे. त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून पाकिस्तानलगत आंतरराष्ट्रीय सीमेजवळ सौर आणि पवन प्रकल्प उभारण्याची भारताची योजना आहे.

ठळक बाबी

🎯हा प्रकल्प गुजरातच्या कच्छ जिल्ह्यात सीमेजवळ 30 किलोमीटर लांबी आणि 20 किमी रूंदीच्या भुखंडावर उभारला जाणार आहे.

🎯प्रस्तावित प्रकल्पांमधून प्रत्येकी 2 हजार मेगावॅट ऊर्जेची निर्मिती होणार.

🎯प्रकल्प वस्ती नसलेल्या निर्जन जागेवर बांधण्यात येत आहे.

🎯सीमेवर राहणार्‍या लोकांच्या गरजा भागविण्याच्या उद्देशाने सीमेजवळच्या वाळवंटी प्रदेशात तेथे निर्माण झालेल्या ऊर्जेचा वापर केला जाऊ शकतो.

सध्या भारत 82,580 मेगावॅट सौर ऊर्जेचे उत्पादन घेत आहे, जे देशाच्या एकूण ऊर्जेच्या 23% आहे.

नोबेल शांतता पुरस्कार इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना जाहीर

◾️ इथिओपियाचे पंतप्रधान अॅबी अहमद यांना यंदाचा नोबेल शांतता पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे.

◾️एरिट्रियाबरोबर केलेल्या शांती करारासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला आहे.

◾️त्यांच्या पुढाकारामुळे गेल्यावर्षी एरिट्रियासोबत झालेल्या शांतताकरारामुळे 20 वर्षांपासूनचा लष्करी तिढा सुटला आहे.

◾️१९९८ ते २००० दरम्यान झालेल्या सीमायुद्धापासून या तिढ्याला सुरुवात झाली होती.

◾️📌शांततेच्या नोबेल पुरस्कारांचं हे १०० वं वर्षं ❗️असून ओस्लोमध्ये याची घोषणा करण्यात आली.

◾️याच शांतता पुरस्कारासाठी तरूण पर्यावरण कार्यकर्ती ग्रेटा थुनबर्गच्या नावाचीही शिफारस करण्यात आल्याची चर्चा होती.

◾️अत्यंत प्रतिष्ठेच्या या पुरस्कारासाठी यावर्षी एकूण ३०१ नावं सुचवण्यात आली होती. यामध्ये २२३ व्यक्ती आणि ७८ संस्थांचा समावेश होता.

◾️नोबेलच्या शिफारसीसाठीच्या नियमांनुसार शिफारस करण्यात आलेल्या व्यक्तींच्या नावांची यादी पुढची ५० वर्षं प्रसिद्ध केली जात नाही.

        कोण आहेत अॅबी अहमद?

◾️43 वर्षांचे अॅबी अहमद हे एप्रिल २००८मध्ये इथिओपियाचे पंतप्रधान झाले.

◾️त्यानंतर त्यांनी देशात मोठ्या प्रमाणावर उदारीकरण केलं. तोपर्यंत इथिओपियामध्ये मोठ्या प्रमाणावर निर्बंध होते.

◾️तुरुंगामध्ये डांबून ठेवण्यात आलेल्या हजारो विरोधकांची - कार्यकर्त्यांची त्यांनी मुक्तता केली आणि हद्दपार करण्यात आलेल्यांना घरी परतण्याची परवानगीही दिली.

◾️सगळ्यांत महत्त्वाचं म्हणजे इथिओपियाचा शेजारी देश असणाऱ्या एरिट्रियासोबत शांतता करार करत त्यांनी दोन दशकांचा संघर्ष संपुष्टात आणला.

                 नोबेल  पुरस्कार

📌 भौतिकशास्त्र,
📌 रसायनशास्त्र,
📌 वैद्यकशास्त्र,
📌 साहित्य आणि
📌 शांतता या
क्षेत्रातल्या कामगिरीसाठी नोबेल पुरस्कार देण्यात येतात.
📌 या पुरस्कारांमध्ये स्वीडनच्या सेंट्रल बँकेने १९६८मध्ये अर्थशास्त्राच्या पुरस्काराची भर टाकली. पण याला नोबेल पुरस्कार म्हटलं जात नाही

◾️आधीच्या १२ महिन्यांमध्ये ज्यांनी मानवजातीसाठी अतिशय महत्त्वाचं काम केलेलं आहे, अशांचा सन्मान या पुरस्काराने करण्यात येतो.

◾️१९०१ मध्ये 📌पहिल्यांदा नोबेल पुरस्कार देण्यात आले.

      याआधीचे प्रसिद्ध विजेते

📌अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांना २००९मध्ये शांततेसाठीचं नोबेल देण्यात आलं.
📌 जिमी कार्टर (२००२),
📌 मलाला युसुफजाई (संयुक्तपणे २०१४मध्ये)मुलींच्या शिक्षणासाठी चळवळ उभारणारी कार्यकर्ती,
📌युरोपियन युनियन (२०१२), 
📌कोफी अन्नान (२००१मध्ये संयुक्तपणे) युनायटेड नेशन्स आणि त्यांचे सरचिटणीस आणि
📌मदर टेरेसा (१९७९) यांचा या पुरस्काराने सन्मान करण्यात आला आहे.

◾️लेखक आणि विचारवंत जीन - पॉल सार्त्र यांनी १९६४मध्ये हा पुरस्कार नाकारला होता.

◾️तर व्हिएतनामचे राजकारणी ल ड्युक थो यांनी १९७३मध्ये पुरस्कार नाकारला.

◾️तर इतर चार जणांवर त्यांच्या देशांनी हा पुरस्कार नाकारण्याची जबरदस्ती केली.

◾️२०१६मध्ये साहित्यासाठीचा नोबेल पुरस्कार गायक बॉब डिलन यांना देण्यात आला होता.

तुम्ही हे वाचले आहे का ?

भारताचे विविध देशासोबत चालणारे युद्ध सराव

◆युद्ध अभ्यास:- भारत आणि अमेरिका

◆ मैत्री :- पाकिस्तान आणि रशिया

◆प्रबल दोस्त्यांक :- भारत आणि कझाकिस्तान

◆मलबार:- भारत , जपान आणि अमेरिका

◆सहयोग कायजीन - भारत व जपान तटरक्षक दल

◆शक्ती :- भारत आणि फ्रान्स लष्करी

◆Lamitye :-भारत आणि सेशल्स

◆इंद्र :- भारत आणि रशिया

◆गरुडशक्ती:- भारत आणि ईडोनीशीया

◆सूर्यकिरण:- भारत आणि नेपाळ

◆कोब्रा गोल्ड:- थायलंड, भारत ,जपान आणि मलेशिया

◆वरूण:- भारत आणि फ्रान्स नौदल

◆Ekuverin:- भारत आणि मालदीव

◆मित्रशक्ती - भारत आणि श्रीलंका

◆समप्रिती- भारत आणि बांगलादेश

◆सिमबेक्स- भारत आणि सिंगापूर नौदल

◆Ausindex - भारत आणि ऑस्ट्रेलिया

◆गरुडा - भारत आणि फ्रान्स वायुदल सराव

◆कोकण - भारत आणि ब्रिटन नौदल

📒भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार-
१) रामसर करार -
वर्ष - १९७१

* दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर

* अमलात येण्याचे वर्ष - १९७५

* भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

* संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण

*अमलात येण्याचे वर्ष - १९७६

* भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

* स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९८३

* भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

* ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८

* भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

* हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट

* अमलात येण्याचे वर्ष - १९९२

* भारताने मान्य केला - १९९

२६) UNFCCC -
वर्ष - १९९२

* हवामान बदल रोखणे

* अमलात येण्याचे वर्ष - १९९४

* भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

* हरितवायू उत्सर्जनात घट

* अमलात येण्याचे वर्ष - २००५

* भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार - वर्ष -१९९२

* जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन

* अमलात येण्याचे वर्ष - १९९३

* भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -
वर्ष - २०००

* जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण

* अमलात येण्याचे वर्ष - २००३

* भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

* वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण

* अमलात येण्याचे वर्ष - १९९६

* भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

* हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .

* अमलात येण्याचे वर्ष - २००४P

* भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

*अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान

* अमलात येण्याचे वर्ष - २००४

* भारताने मान्य केला - २००६

नक्की सोडवा, सराव 20 प्रश्नउत्तरे

1. कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी हे धरण कोणत्या नदीवर बांधण्यात आले आहे.

 पंचगंगा

 भोगावती

 कोयना

 वारणा

उत्तर : भोगावती

2. महाराष्ट्रात कोणत्या ठिकाणी खनिज तेलाचे उत्पादन केले जाते?

 मुंबई हाय

 कोल्हापूर

 चंद्रपूर

 नाशिक

उत्तर : मुंबई हाय

3. जगातील सर्वात लांब सागरी कालवा कोणता?

 सुएझ कालवा

 पनामा कालवा

 राजस्थान कालवा

 कील कालवा

उत्तर : सुएझ कालवा

4. प्रकाश संश्लेषण प्रक्रियेत सौरऊर्जेचे रूपांतर कोणत्या उर्जेत होते.

 यांत्रिक ऊर्जा

 रासायनिक ऊर्जा

 गतिज ऊर्जा

 चुंबकीय ऊर्जा

उत्तर : रासायनिक ऊर्जा

5. वित्त आयोगाची नियुक्ती करण्याचे अधिकार कोणास आहेत?

 उपराष्ट्रपती

 वित्त मंत्री

 संसद   

 राष्ट्रपती

उत्तर : राष्ट्रपती

6. ‘कमीजास्त’ शब्दाचा समास ओळखा.

 वैकल्पिक व्दंव्द

 समहार व्दंव्द

 इयरेतर व्दंव्द

 अव्ययीभाव

उत्तर : वैकल्पिक व्दंव्द

7. थायरॉक्झीन या संप्रेरकाच्या निर्मितीसाठी कोणता खनिजपदार्थ आवश्यक आहे?

 मॅग्नेशियम

 लोह

 फॉस्फोरस

 आयोडीन

उत्तर : आयोडीन

8. खालीलपैकी ध्वनीच्या तीव्रतेचे एकक कोणते?

 मीटर/सेकंद

 अर्ग

 फॅदम

 डेसिबल

उत्तर : डेसिबल

 

9. यवतमाळ जिल्ह्यातील वणी हे ठिकाण कोणत्या खाणीसाठी प्रसिद्ध आहे.

 दगडी कोळसा

 संगमरवर

 बॉक्साईट

 तांबे

उत्तर : दगडी कोळसा

10. केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्तांची नियुक्ती कोण करते?

 राष्ट्रपती

 मुख्यमंत्री

 विधानसभा अध्यक्ष

 लोकसभा सभापति

उत्तर : राष्ट्रपती

11. शुद्ध शब्द ओळखा

 इस्पित

 ईस्पित

 ईस्पीत

 ईस्पिता

उत्तर : ईस्पित

12. यातील ‘नामाचा’ शब्द ओळखा.

 लिहितो

 श्रीमंत

 मुलगा

 तर

उत्तर : मुलगा

13. विरुद्धार्थी शब्द ओळखा.

 जलxपाणी

 थंडxगरम

 पवनxवारा

 रवीxसूर्य

उत्तर : थंडxगरम

14. भूतकाळातील वाक्य कोणते?

 किती छान आहे हे

 किती सुंदर होता तो मोर

 काय सुंदर अक्षर आहे तिचे

 यापैकी नाही

उत्तर : किती सुंदर होता तो मोर

15. आम्ही रोज क्रिकेट खेळतो. भूतकाळ करा.

 आम्ही रोज क्रिकेट खेळू

 आम्ही रोज क्रिकेट खेळतो

 आम्ही रोज क्रिकेट खेळणार

 यापैकी नाही

उत्तर : यापैकी नाही

16. वाक्यात पुढे येणार्‍या दर्शक सर्वनामाशी निगडीत संबंधित असणार्‍या सर्वनामांना —– सर्वनामे म्हणतात.

 संबंधी

 दर्शक

 प्रश्नार्थक

 सामान्य

उत्तर : संबंधी

17. ‘स्वरसंधी’ ओळखा.

 तट्टिका

 यशोधन

 प्रश्नार्थक

 सामान्य

उत्तर : प्रश्नार्थक

18. काळ ओळखा ‘मधुने लाडू खाल्ला आहे’

 भूतकाळ

 भविष्यकाळ

 वर्तमानकाळ

 रिती भूतकाळ

उत्तर : वर्तमानकाळ

19. ‘लहान मुलांनापासून वृद्ध माणसांपर्यंत’ शब्द समूहाबद्दल एक शब्द सांगा.

 आजनभाऊ

 अनुयायी

 अतिथी

 आबाल वृद्ध

उत्तर : आबाल वृद्ध

20. ‘सकाळाची रंग तुझा पावसाळी नभापरि’ वाक्यातील अलंकार ओळखा.

 उपमा

 उत्प्रेक्षा

 व्यतिरेक

 अतिशयोक्ती 

उत्तर : उपमा