Ads

18 November 2019

10 सराव महत्त्वाचे प्रश्न उत्तरे 18/11/2019

1. सन 1996 हे लिपवर्ष आहे. 1 जानेवारी 1996 रोजी सोमवार असेल तर 1 जानेवारी 1997 रोजी कोणता वार येईल?

 शुक्रवार

 मंगळवार

 गुरुवार

 बुधवार

उत्तर : बुधवार

 2. राधा व रमा या बहिणी आहेत. सरला व विमला याही बहिणी आहेत. सरलाचे वडील हे रमाचे भाऊ आहेत तर विमला ही राधाची कोण?

 मावस बहीण

 पुतणी

 भाची

 आत्या

उत्तर :भाची

 3. K हा J चा भाऊ आहे. M ही K ची बहीण आहे. P हा N चा भाऊ आहे. N ही J ची मुलगी आहे. S हा M चा बाप आहे. तर P चा काका कोण?

 K

 J

 N

 S

उत्तर :K

 4. आर्या याच जन्म 18 ऑक्टोबर 1993 रोजी झाला. त्यावर्षी गांधी जयंतीचा वार शनिवार होता. तर आर्याचा आठव्या वाढदिवसाच्या दिवशी कोणता वार येईल?

 गुरुवार

 बुधवार

 सोमवार

 रविवार

उत्तर :गुरुवार

 5. खालील मालिकेत 8 नंतर 18 ही संख्या किती वेळा आली आहे?

 818881881811818181881888111818181181881

 9 वेळा

 10 वेळा

 11 वेळा

 8 वेळा

उत्तर :10 वेळा

 6. खालील गटामध्ये जोड अक्षरे शब्द किती आहेत?

 ग्रह, कृपा, कृषी, तंत्र, गृह, क्रम, कृती, क्षमा.

 पाच

 सात

 आठ

 वरील सर्व

उत्तर :पाच

 7. खुर्ची म्हटले की पुढीलपैकी कोणती बाब आवश्यक आहे?

 लाकूड

 हात

 बैठक

 पॉलिश

उत्तर :बैठक

 8. गुलाबाला बटाटा म्हटले, बटाट्याला गुळ म्हटले, गुळाला आंबा म्हटले आणि आंब्याला गवत म्हटले तर खालीलपैकी मानवाने तयार केलेली वस्तु कोणती?

 आंबा

 गुळ

 बटाटा

 गवत

उत्तर :आंबा

 9. इंग्रजी वर्णमालेतील क्रमांक 25, 19 आणि 5 ही अक्षरे जुळवून एक शब्द तयार होतो, तर त्या शब्दातील शेवटचे अक्षर कोणते?

 E

 W

 S

 R

उत्तर :S

 10. प्रश्नचिन्हाच्या जागी योग्य पर्याय लिहा?

 7497:5255:111:?

 312

 121

 393

 101

उत्तर :393

महापरीक्षा ने विचारलेले प्रश्न


1)मेकलओडगंज हे ठिकाण कोठे आहे ?

👉हिमाचल प्रदेश

2)राजस्थान ,हरियाणा आणि गुजरातच्या काही भागात कोणत्या वाळवंटाचा प्रदेश आहे ?

👉 थरचे वाळवंट

3) जोग धबधबा कोणत्या राज्यात आहे ?

👉 कर्नाटक

4)सर्वाधिक लोकसंख्या असलेल्या राज्यांमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागतो ?

👉 दुसरा

5) कुल्लू, सोलन आणि मंडी ठिकाण कोठे आहेत ?

👉 हिमाचल प्रदेश

6)2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्ये पैकी हिंदू धर्माची लोकसंख्या किती टक्के आहे ?

👉 79.8

7)सध्या भारतातील स्व देशांतर्गत ची सर्वात मोठी प्रवासी विमान वाहतूक कंपनी कोणती आहे ?

👉 इंडिगो

8) कार्बेट राष्ट्रीय उद्यान कोठे आहे ?

👉उत्तराखंड

9)भारतात बॉक्साइट धातूचा मोठा साठा ॲल्युमिनियम बनवण्यासाठी वापरला जातो तो साठा देशाच्या कोणत्या भागात सर्वात जास्त प्रमाणात आहे ?

👉 ओडिसा

10)भारतात खाऱ्या पाण्याचा तलाव कोठे आहे ?

👉 सांभर तलाव

11) गिर वन्यजीव अभयारण्य कोठे आहे ?

👉गुजरात

12) लोटस टेम्पल कोठे आहे ?

👉 दिल्ली

13) पायर्‍यांच्या विहिरी म्हणजे मानवनिर्मित तलाव आहेत ज्यामध्ये पायऱ्या उतरून पाण्यापर्यंत पोहोचता येते जगात सर्वात खोल असलेली अशी विहीर कोठे आहे ?

👉 चांद बाओरी राजस्थान

14) भारताच्या कोणत्या राष्ट्रीय उद्यानात जगातील दोन तृतीयांश एक शिंगाच्या गेंड्यांच्या  संख्येचे गेंडे आहेत ?

👉 काझीरंगा राष्ट्रीय उद्यान

15) भारतातील कोणत्या राज्यात सर्वात मोठी वनक्षेत्र आहे ?

👉 मध्य प्रदेश

16)महाराष्ट्र मधील एक असे सुप्रसिद्ध गाव आहे कारण गावात कोणत्याही घरांना दरवाजे नाहीत केवळ दरवाज्याची फ्रेम बसवलेली आढळते ?

👉 शनि शिंगणापूर

भूगोल प्रश्नसंच 19/11/2019

🔹 1. मुंबई बंगलोर NH-4 हा कोणता मार्ग आहे.
राष्ट्रीय महामार्ग ✅
राज्य मार्ग
जिल्हा मार्ग
ग्रामीण मार्ग

🔹 2. खालीलपैकी कोणती पर्वतीय रांग नर्मदा आणि तापी खोरे यामधील जलविभजक आहे.
अरवली
विंध्य
सहयाद्री
सातपुडा ✅

🔹 3. सह्याद्री पर्वतास दुसऱ्या कोणत्या नावाने ओळखतात?
पश्चिमी घाट ✅
निलगिरी पर्वत
अरवली पर्वत
सातपूडा पर्वत

🔹 4. भारतातील प्रमुख अवकाश केंद्र ………… आहे
श्रीहरीकोटा ✅
कोचीन
हसन
बेंगलोर

🔹 5. भाक्रा नांनगल प्रकल्प………… नदिवर आहे.
कॄष्णा
दामोदर
अलमाटी
सतलज ✅

🔹 6. ........... हा भारतातील सर्वात उंच धबधबा आहे.
जोग ✅
नायगारा
कपिलधारा
शिवसमुद्र

🔹 7. पृथ्वीच्या उत्तर किंवा दक्षिण धृवाकडे चालत गेल्यास कोणत्या रेखा किंवा अक्ष वृत्तवर पृथ्वीच्या भूपृष्ठाचा शेवट होतो.
९०° अक्षांश
६०° अक्षांश
१८०° अक्षांश ✅
३८०° अक्षांश

🔹 8. आठव्या पंचवार्षिक योजनेत रेल्वेच्या कशावर अधिक भर देण्यात आला आहे.
विद्युतीकरणावर ✅
रूंदीकरणावर
संगणकीकरणावर
खासगीकरणावर

🔹 9. ............... हे जगातील सर्वात मोठे बेट आहे.
श्रीलंका
आयर्लंड
ग्रीनलंड ✅
ऑस्ट्रेलिया

🔹 10. नैसर्गिक परिस्थिती कशावर अवलंबून असते?
पाणी
तापमान
वातावरण ✅
वरील सर्व

भूगोल प्रश्नसंच 18/11/2019

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

● आजचे प्रश्न 18/11/2019

📌फिट इंडिया चळवळ आणि महिला सशक्तीकरणाच्या मोहिमेस प्रोत्साहन देण्याच्या उद्देशाने केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलाच्या 16 महिला सदस्यांच्या चमूने कोणते पर्वतशिखर यशस्वीरित्या सर केले?

(A) नंदादेवी
(B) चौखंबा
(C) सतोपंथ✅✅✅
(D) पंचचुली

📌कोणाला प्रशिक्षण देण्याकरिता आंतरराष्ट्रीय वित्त महामंडळ (IFC) आणि ‘वित्त उद्योग विकास परिषद (FIDC)’ सोबत सामंजस्य करार झाला?

(A) ब्रेथवेट अँड कंपनी
(B) बिगर-बँकिंग वित्त कंपनी✅✅✅
(C) भारतीय निर्यात पत हमी महामंडळ
(D) हेवी इंजीनियरिंग कॉर्पोरेशन

📌खालीलपैकी कोणते विधान सम-विषम वाहतूक योजनेबद्दल खरे नाही?

(A) मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी ही योजना जाहीर केली

(B) ही योजना सात-कलमी कृती योजनेचा एक भाग आहे

(C) शेजारी राज्यांमध्ये कापणीनंतर राहिलेले धान्याच्या रोपांचे खुंट जाळण्यामुळे होणार्‍या हानिकारक परिणामांचा प्रतिकार करण्याच्या उद्देशाने ही योजना आहे.

(D) हा शाश्वत विकास लक्ष्यांचा एक भाग आहे, ज्याचा सर्वांसाठी एक शाश्वत आणि निरोगी भविष्य साध्य करण्यासाठी रोगींची संख्या आणि मृत्यूचे प्रमुख कारण ठरणार्‍या हवेच्या संदर्भात सर्व आवश्यक कृती करणे आवश्यक आहे हा हेतू आहे.✅✅✅

📌13 सप्टेंबरला कोणत्या सूक्ष्मजीवशास्त्रज्ञाची 166 वी जयंती साजरी करण्यात आली?

(A) हान्स ख्रिश्चन जोएचिम ग्राम✅✅✅
(B) मार्टिनस बेन्जेरिन्क
(C) सेलमॅन वाक्समन रोनाल्ड रॉस
(D) फॅनी हेसे

📌ARIIA याचे पूर्ण नाव काय आहे?

(A) अटल रँकिंग ऑफ इंस्टीट्यूशन्स ऑन इनोव्हेशन अचिव्हमेंट्स✅✅✅
(B) एव्रेज रँक्स ऑफ इंस्टीट्यूशन्स इनोव्हेशन अचिव्हमेंट्स
(C) एव्रेज रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एव्हिएशन
(D) अटल रँकिंग ऑफ इंडियन इंस्टीट्यूट्स ऑफ एस्ट्रॉनॉमी

📌भारतीय अंतराळ संशोधन संस्थेनी (ISRO) जाहीर केले आहे की संस्था ‘SpaceIL’ या संस्थेसोबत करार करणार आहे.; ‘SpaceIL’ कोणत्या देशाचे अवकाश केंद्र आहे?

(A) जर्मनी
(B) ब्रिटन
(C) इस्त्राएल✅✅✅
(D) स्लोव्हेनिया

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) धातू ओळखण्याचे अक्षर कोणते?
   1) नी      2) णा      3) ने      4) णे

उत्तर :- 4

2) इकडे, मध्ये, रातोरात, आज इ. ही कोणत्या प्रकारची क्रियाविशेषण अव्यये आहेत ?

   अ) स्थलवाचक विशेषण      ब) कालवाचक क्रियाविशेषण
   क) संख्यावाचक क्रियाविशेषण    ड) रीतिवाचक क्रियाविशेषण

   1) अ व ब बरोबर  2) अ, क बरोबर    3) ब, ड बरोबर    4) अ, ड बरोबर

उत्तर :- 1

3) खालीलपैकी चतुर्थी विभक्ती प्रतिरूपक शब्दयोगी अव्यय ओळखा.

   अ) प्रती    ब) स्तव      क) समोर      ड) सह
   1) अ आणि ब    2) क आणि ड    3) ब आणि ड    4) अ आणि क

उत्तर :- 1

4) ‘उभयान्वयी अव्ययाचा’ विचार करताना पुढील बाबींचा विचार करावा लागेल.

   अ) दोन किंवा अधिक वाक्ये जोडणा-या विकारी शब्दांना उभयान्वयी अव्यये म्हणतात.
   ब) प्रधानसुचक व गौणत्वसूचक असे दोन मुख्य प्रकार उभयान्वयी अव्ययात आहेत.
   क) ‘अन’, ‘आणखी’, ‘आणि’ हे समुच्चयबोधक उभयान्वयी अव्ययाची उदाहरणे आहेत.
   ड) ‘विजयने उत्तम अभ्यास केला म्हणून त्याला यश मिळाले.’
        या वाक्यातून न्यूनत्वबोधक उभयान्वयी वाक्य आहे.

   1) फक्त अ    2) अ, ब, क    3) ब, क      4) ब, क, ड

उत्तर :- 3

5) छे, छट्, ऊ:, छेछे, च
     वरीलपैकी किती विरोधीदर्शक अव्यये आहेत.
   1) वरील सर्व    2) चार      3) पाच      4) तीन

उत्तर :- 1

6) ‘सुरेश गीत गात होता’ काळ ओळखा.

   1) पूर्ण भूतकाळ      2) अपूर्ण भूतकाळ   
   3) चालू भूतकाळ    4) सामान्य भूतकाळ

उत्तर :- 2

7) पुढे काही शब्दांची स्त्रीलिंगी रूपे ‍दिली आहेत.

      पती-पत्नी, दीर-जाऊ, रेडा-म्हैस, तर खोंड ?
   1) कालवड    2) भाटी      3) लांडोर    4) गाय

उत्तर :- 1

8) खालील शब्दातून एकवचनी शब्द ओळखा.

   1) लाटा    2) झरा      3) धारा      4) गारा

उत्तर :- 2

9) खालील विधानातील अधोरेखित शब्दाचा चतुर्थी विभक्तीचा कारकार्थ कोणता ?

     ‘लाठीच्या एकेका तडाक्यास त्याने एकेक इसम लोळविला.’
   1) कर्ता    2) कर्म      3) कारण      4) अपादान

उत्तर :- 3

10) तू काही आता लहान नाहीस. यासाठी खालील पर्यायातून होकारार्थी वाक्य निवडा.

   1) तू आता मोठा झाला आहेस    2) तू आता लहान उरला नाहीस
   3) तू केव्हा मोठा होणार आहेस    4) मोठा हो जरा आता तरी

उत्तर :- 1

भारतात विश्व कबड्डी चषक 2019 खेळवली जाणार

🔰दिनांक 1 डिसेंबर ते 9 डिसेंबर या काळावधीत होणार्‍या ‘विश्व कबड्डी चषक 2019’ या स्पर्धेचे यजमानपद भारताकडे आले आहे. ही स्पर्धा पंजाब राज्यात खेळवली जाणार आहे.

🔰यावर्षी भारत, अमेरिका, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, श्रीलंका, केनिया, न्यूझीलँड, पाकिस्तान आणि कॅनडा अश्या नऊ संघांचा या स्पर्धेत सहभाग असणार आहे.

🔰या स्पर्धेचे उद्घाटन 1 डिसेंबर रोजी गुरु नानक क्रिडामैदान, सुलतानपूर लोधी येथे होणार असून त्या दिवशी चार सामने खेळवले जाणार आहेत. तर डेरा बाबा नानक येथील शहीद भगतसिंग क्रिडामैदानावर या स्पर्धेचा समारोप होणार आहे. स्पर्धेचे इतर सामने अमृतसर, फिरोजपूर, भटिंडा, श्री आनंदपूर साहिब येथे होणार आहेत.

✅जागतिक कबड्डी महासंघाविषयी

🔰दिनांक 1 ऑक्टोबर 2004 रोजी जागतिक कबड्डी महासंघाची स्थापना झाली.

🔰आंतरराष्ट्रीय पातळीवर कबड्डी या खेळाला प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने ही संघटना तयार करण्यात आली.

🔰 ह्यामध्ये 31 राष्ट्रीय संघांचा समावेश आहे. संघटनेचे मुख्यालय नवी दिल्ली, भारत येथे आहे.

🔰जनार्दन सिंग गेहलोत हे संघटनेचे संस्थापक आणि विद्यमान अध्यक्ष आहेत.

‘अग्नी-२’ची रात्रीची चाचणी यशस्वी

🅱 अग्नी-२ या जमिनीवरून जमिनीवर मारा करणाऱ्या क्षेपणास्त्राची ओडिशा किनारपट्टीवरून घेतलेली रात्रीची चाचणी शनिवारी यशस्वी झाली. या क्षेपणास्त्राचा पल्ला दोन हजार किलोमीटर असून, ते यापूर्वीच लष्कराच्या ताफ्यात दाखल करण्यात आले आहे. हे क्षेपणास्त्र प्रथमच रात्रीच्या वेळी प्रक्षेपित करण्यात आले.

🅱 २० मीटर लांबी असलेल्या या क्षेपणास्त्राचे प्रक्षेपण करतेवेळी वजन १७ टन होते आणि ते एक हजार किलोग्रॅम वजन अण्वस्त्रे वाहून नेण्याची या क्षेपणास्त्राची क्षमता आहे. या क्षेपणास्त्रात अत्याधुनिक दिशादर्शक यंत्रणा बसविण्यात आली आहे.

🅱 ही नियमित चाचणी असल्याचे स्पष्ट करण्यात आले. ची वैशिष्ट्ये अग्नी २ हे जमिनीवरून जमिनीवर मारा करण्यास सक्षम आहे. याची लांबी सुमारे २० मीटर आहे आणि एक हजार किलो पेलोड घेऊन जाण्यास हे क्षेपणास्त्र सक्षम आहे. दोन टप्प्यात आपलं लक्ष्य गाठणारं हे क्षेपणास्त्र सॉलिड फ्युएलवर चालतं. हे डीआरडीओने तयार केलं आहे.

चालू घडामोडी वन लाइनर्स, 17 नोव्हेंबर 2019.

✳ 16 नोव्हेंबर: आंतरराष्ट्रीय सहिष्णुता दिन

✳ 14 - 20 नोव्हेंबर: राष्ट्रीय सहकारी सप्ताह

✳ 19 - 25 नोव्हेंबर: युनेस्को जागतिक वारसा सप्ताह

✳ गुरबानीची डिजिटल आवृत्ती I आणि B मंत्री प्रकाश जावडेकर यांच्या हस्ते रिलीज झाली

✳ रजत शर्मा यांनी दिल्ली व जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सहाय्यक अध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे

✳ 1च्या पहिल्या सहामाहीत फेसबुकवरून वापरकर्त्याच्या माहितीसाठी भारत सरकारचा दुसरा क्रमांक आहे 2019

✳ सीएसआयआरएस-एनजीआरआय, हैदराबादने 1 ला एवर जिओकेमिकल बेसलाइन अटलस ऑफ इंडिया जारी केला

✳ डीएम राजनाथ सिंह अरुणाचल प्रदेशात सिसेरी नदी पुलाचे उद्घाटन केले

✳ भारतातील परकीय चलन साठा 447.81 अब्ज डॉलर्सच्या नव्या उच्चांकाला स्पर्श करते

✳ अकील अब्दुलहिमद कुरेशी यांनी त्रिपुरा हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून शपथ घेतली

✳ इंडियाने बांगलादेशला एक डाव जिंकला आणि 1-0 धावांनी आघाडी मिळविली

✳ आयसीसी वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप पॉइंट्स टेबलमध्ये भारताने अव्वल स्थान मिळविले

✳ वाळूज कलाकार सुदर्सन पट्टनाईक यांना इटालियन गोल्डन वाळू कला पुरस्कार

✳ विशाखापट्टणममध्ये 2 रा वर्ल्ड वॉटरफॉल रॅपेलिंग वर्ल्ड कप

✳ हरिथा द्वितीय धबधबा रेपेलिंग वर्ल्ड कपची ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आहे

✳ 2020 मध्ये युएनच्या विकास कार्यांसाठी भारत $13.5 एम चे योगदान देणार आहे

✳ जम्मू-काश्मीरच्या केंद्रशासित प्रदेशात राष्ट्रीय मिशन 'निशता' सुरू झाली

✳ राष्ट्रीय आदिवासी महोत्सव आदि महोत्सव नवी दिल्लीत सुरू होईल

✳ आंध्र प्रदेशचे मुख्य सचिव म्हणून नीलम सावनी यांची नेमणूक

✳ दक्षिण आशियातील बांगलादेशातील सर्वात वरचा व्यवसाय लाचखोरीचा धोका

✳ जागतिक लाचखोरी जोखीम निर्देशांकात भारताचा 78 वा क्रमांक आहे

✳ ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष जैर बोलसोनारो प्रजासत्ताक दिन 2020 मध्ये प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहतील

✳ रॉबर्ट डी नीरो यांना एसएजी लाइफ अचिव्हमेंट अवॉर्डसह गौरविण्यात येईल

✳ कर्नाटक बँकेने कासा मोहीम 2019 सुरू केली

✳ नाझीच्या वादाच्या नंतर नासाने अल्टिमा थुलेला एरोकोथ असे नाव दिले

✳ भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) थीम सॉंगचे अनावरण

✳ 50 वा आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव (आयएफएफआय) गोवा येथे होणार आहे

✳ आयटीसी ब्रँड अ‍ॅम्बेसेडर म्हणून कार्तिक आर्यन मध्ये दोर्‍या जोडते

✳ जेएफ डी’सूझा कोंकणी कुटम साहित्य पुरस्कार जाहीर

✳ रिलायन्स कम्युनिकेशनचे संचालक म्हणून अनिल अंबानी यांचा राजीनामा

✳ सोशल व्हिडिओ अॅप टिकटॉकने 1.5 अब्ज डाउनलोड्स गाठले आहेत

✳ ट्विटरवर त्याच्या प्लॅटफॉर्मवरील सर्व राजकीय जाहिरातींवर अधिकृतपणे बंदी आहे

✳ फ्रान्सने बीएनपी परिबाजच्या फेड चषक शीर्षक 2019 ची 57 वी आवृत्ती जिंकली

✳ फुटबॉलर आशालता देवी एएफसी प्लेअर ऑफ द इयरसाठी नामांकित

✳ संदीप सिंगने हरियाणाचे नवीन क्रीडामंत्री म्हणून पदभार स्वीकारला

✳ 5 भारतीय विद्यार्थी ऑक्सफोर्ड बिग रीड एशिया स्पर्धेसाठी पात्र

✳ नळाच्या पाण्याच्या गुणवत्तेसाठी मुंबईतील रँकिंग क्रमांक: अहवाल

✳ दिल्लीत सर्वाधिक असुरक्षित नळ पाणी आहे: अहवाल

✳ गोव्यात इंडियन नेव्ही एअरक्राफ्ट मिग -29 के क्रॅश झाले

✳ चीन इंटरनॅशनल ट्रॅव्हल मार्ट (सीआयटीएम) ची चीन येथे सुरुवात

✳ पर्यटन मंत्रालय चीन आंतरराष्ट्रीय ट्रॅव्हल मार्टमध्ये भाग घेतो

✳ रवी रंजन यांना झारखंड हायकोर्टाचे मुख्य न्यायाधीश म्हणून नियुक्त केले

✳ एआयआयबी उपनगरीय रेल्वे नेटवर्क विकसित करण्यासाठी भारताला 500 मी अमेरिकन डॉलर्स कर्ज देईल

✳ दिल्ली हे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहर आहेः आयक्यूएअर व्हिज्युअल रिपोर्ट

✳ 3 टाइम्स मोटोजीपी विश्वविजेते जॉर्ज लॉरेन्झो सेवानिवृत्त

✳ स्टार स्पॅनिश स्ट्रायकर डेव्हिड व्हिला फुटबॉलमधून निवृत्त झाला.

महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे 18/11/2019

1. पुढील शब्दाचा सामासिक प्रकार कोणता? (दारोदार)
अव्ययीभाव
बहुव्रीही
व्दंद
तत्पुरुष

● उत्तर - अव्ययीभाव

2. थंड फराळ करणे या वाक्प्रचाराचा अर्थ खालील पैकी कोणता?
उपाशी राहणे
थंड पदार्थ खाणे
भरपुर फराळ करणे
थंड करून मग खाणे

● उत्तर - उपाशी राहणे

3. शिपायाने चोरास पकडले प्रयोग ओळखा.
कर्मणी
भावे
कर्मभावसंस्कार
कर्तरी-कर्म संकर

● उत्तर - भावे

4. पद्य सुरावर म्हणण्याची पध्दत म्हणजे खालील पैकी काय?
कविता
चाल
गद्य
गाण

● उत्तर - गाण

5. ‘ शब्द लावणे’ या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ द्या .
दोष देणे
शब्दांनी रचना करणे
लेखन करणे
बोलणे

● उत्तर - दोष देणे

6. 'उंदिर' या नामाचे अनेक वचन कोणते?
उंदरे
उंदरांना
उंदीरं
अनेकवचन होत नाही

● उत्तर - अनेकवचन होत नाही

7. 'दही' या शब्दाचा प्रकार कोणता?
तत्सम
तद्भव
परभाषिक
यापैकी नाही

● उत्तर - यापैकी नाही

8. 'बोलका पोपट उडून गेला.'
'बोलका' हे कोणत्या प्रकारचे विशेषण आहे?
धातुसाधित विशेषण
गुण विशेषण
अनिश्चय वाचक
ते विशेषणाच नाही

● उत्तर - गुण विशेषण

9. हत्ती गेला ...... राहिले.
चिन्ह
अंकुश
शेपूट
माहूत

● उत्तर - शेपूट

10. नाशिकहून मुंबई २०० किलोमिटर आहे.
तृतीय
पंचमी
सप्तमी
व्दितीय

● उत्तर - पंचमी