15 February 2020

Current affairs questions

🔸‘2019 ATP वर्ल्ड टुर फायनल्स’ या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) स्टेफॅनोस सित्सिपास✅✅
(B) रॉजर फेडरर
(C) डोमिनिक थीएम
(D) राफेल नदाल

🔸 कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅
(B) एम. एफ. हुसेन
(C) राजा रवी वर्मा
(D) नंदालाल बोस

🔸कोणत्या ठिकाणी भारतीय भूदलाचा “सिंधू सुदर्शन सराव” आयोजित जाणार आहे?

(A) राजस्थान✅✅
(B) मध्यप्रदेश
(C) गुजरात
(D) जम्मू व काश्मीर

🔸कोणत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाच्या (AIBA) प्रथम क्रिडापटू आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली?

(A) सरिता देवी✅✅
(B) मेरी कोम
(C) सिमरनजित कौर
(D) पिंकी राणी

चालू घडामोडी प्रश्नसंच


(1)
कोणते मंत्रालय ‘स्कूल हेल्थ अँड वेलनेस अम्बॅसडर’ उपक्रम राबवत आहे?
(A) मनुष्यबळ विकास मंत्रालय
(B) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय✅✅
(C) सामाजिक न्याय मंत्रालय
(D) महिला व बाल विकास मंत्रालय

(2)
‘भारतीय नौदल जलविज्ञान विभाग’ याचे कार्यालय ___ येथे आहे.
(A) देहरादून✅✅✅
(B) चेन्नई
(C) गोवा
(D) दिल्ली

(3)
‘आंतरराष्ट्रीय कृषी विकास निधी’च्या संदर्भात पुढील विधाने विचारात घ्या.

1. ही संयुक्त राष्ट्रसंघाची एक विशेष संस्था आहे.

2. ही संस्था विकसनशील देशांमधल्या ग्रामीण व शहरी भागात दारिद्र्य आणि उपासमार निर्मूलनासाठी कार्य करते.

दिलेल्यापैकी कोणते विधान अचूक आहे?

(A) केवळ (1)✅✅✅
(B) केवळ (2)
(C) (1) आणि (2)
(D) ना (1), ना (2)

(4)
कोणत्या हॉकीपटूला आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाच्या वतीने ‘प्लेअर ऑफ दी इयर 2019’ हा किताब दिला गेला?
(A) अजित पाल सिंग
(B) मनप्रीत सिंग✅✅
(C) कृष्ण बहादुर पाठक
(D) हरमनप्रीत सिंग

(5)
खादी व ग्रामोद्योग आयोगाचे मुख्य कार्यालय _____ येथे आहे.
(A) नवी दिल्ली
(B) मुंबई✅✅✅
(C) कोलकाता
(D) बेंगळुरू

(6)
कोणती व्यक्ती पंधराव्या वित्त आयोगाने नेमलेल्या ‘संरक्षण व अंतर्गत सुरक्षा गट’चे अध्यक्ष आहे?
(A) एन. के. सिंग✅✅
(B) ए. एन. झा
(C) सुशील कुमार
(D) रितेश शर्मा

(7)
कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय सेंद्रिय खाद्य’ महोत्सवाचे आयोजन करण्यात आले?
(A) नवी दिल्ली✅✅
(B) मुंबई
(C) नोएडा
(D) हैदराबाद

(8)
‘भारतीय नौदल अकादमी’ _____ मध्ये आहे.
(A) गोवा
(B) केरळ✅✅✅
(C) दिल्ली
(D) मुंबई

(9)
कोणते देश शांघाई सहकार्य संघटना (SCO) याचे सदस्य आहेत?

1. भारत

2. पाकिस्तान

3. चीन

4. संयुक्त राज्ये अमेरिका

5. कॅनडा

योग्य पर्यायाची निवड करा.

(A) केवळ (1) आणि (2)
(B) केवळ (1), (2) आणि (3)✅✅✅
(C) (1), (2), (3) आणि (4)
(D) (1), (2), (3), (4) आणि (5)

(10)
कोणत्या मंत्रालयाने ‘फिरते मधमाशा पालनगृह’ (Apiary on Wheels) हा उपक्रम राबविण्यास सुरुवात केली?
(A) सूक्ष्म, लघू व मध्यम उद्योग मंत्रालय✅✅✅
(B) ग्रामीण विकास मंत्रालय
(C) कृषी मंत्रालय
(D) आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय

📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕📕

General Knowledge

▪ ‘ पहलेसेफ्टी’ ही मोहीम कुणाद्वारे चालवली गेली आहे?
उत्तर : गुगल इंडिया

▪ कोणत्या संस्थेनी ‘भाभा कवच’ नावाने बुलेटप्रुफ जॅकेट तयार केले?
उत्तर : भाभा अणू संशोधन केंद्र (BARC)

▪ कोणत्या राज्य सरकारने ‘भूजल कायदा-2020’ तयार केला आहे?
उत्तर : उत्तरप्रदेश

▪ 2020 सालाच्या ‘विज्ञानात महिला व मुलींचा सहभाग विषयक आंतरराष्ट्रीय दिन’ याची संकल्पना काय होती?
उत्तर : इन्व्हेस्टमेंट इन विमेन अँड गर्ल्स इन सायन्स फॉर इंक्लूसिव ग्रीन ग्रोथ

▪ कोणत्या संस्थेच्या वतीने “BIMSTEC आपत्ती व्यवस्थापन सराव-2020” आयोजित करण्यात आली?
उत्तर : भारत सरकारचे राष्ट्रीय आपत्ती निवारण दल

▪ भारतीय प्रतिस्पर्धा आयोग (CCI) हे कुणाचे वैधानिक मंडळ आहे?
उत्तर : केंद्र सरकार

▪ भारतीय नौदलाच्या पूर्व ताफ्याचे प्रमुखपद कोणत्या व्यक्तीने सांभाळले?
उत्तर : संजय वत्सयन

▪ ‘वन धन योजना’ हा कुणाचा उपक्रम आहे?
उत्तर : आदिवासी कल्याण मंत्रालय

▪ कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय ई-प्रशासन परिषद 2020’ आयोजित करण्यात आली होती?
उत्तर : मुंबई

▪ पद्मश्री-प्राप्त गिरिराज किशोर कोण होते?
उत्तर : कादंबरीकार

General Knowledge 2020

1) रोम रॅंकिंग सिरिज या कुस्ती स्पर्धेत महिलांच्या 53 किलो वजनी गटात कुणी सुवर्णपदक जिंकले?
उत्तर : *विनेश फोगट*

2) कोणत्या व्यक्तीने प्रसारमाध्यम या क्षेत्रातल्या उत्कृष्टतेसाठी 2019 सालासाठीचा ‘लिखो पुरस्कार’ जिंकला?
उत्तर : *रुक्मिणी एस.*

3) कोणते राज्य सरकार विद्यापीठ व महाविद्यालयांमध्ये "गांधी विभाग" उभारणार आहे?
उत्तर : *मध्यप्रदेश*

4) कोणत्या वर्षापर्यंत “कार्बन निगेटिव” होण्याची मायक्रोसॉफ्ट या कंपनीची योजना आहे?
उत्तर : *वर्ष 2030*

5) 29 वा ‘सरस्वती सन्मान’ हा मानाचा साहित्यिक पुरस्कार कोणाला देण्यात आला?
उत्तर : *वासदेव मोही*

6) ‘2020 ICC अंडर-19 क्रिकेट वर्ल्ड कप’ ही क्रिडास्पर्धा कोणत्या देशात खेळवली जात आहे?
उत्तर : *दक्षिण आफ्रिका*

7) ICCचा ‘ODI क्रिकेटर ऑफ द इयर’ पुरस्कार कुणाला मिळाला?
उत्तर : *रोहित शर्मा*

8) कोणत्या राज्याने आंतरराष्ट्रीय निसर्ग संवर्धन संघासोबत सामंजस्य करार केला आहे?
उत्तर : *अरुणाचल प्रदेश*

9) कोणत्या देशाशी अमेरिकेचा व्यापार कराराच्या पहिल्या टप्प्याला मान्यता देणारा करार झाला?
उत्तर : *चीन*

10) ‘इंडियन हेरिटेज इन डिजिटल स्पेस’ या प्रदर्शनीचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : *नवी दिल्ली*

14वी महाराष्ट्र विधानसभा निवडणूक

- एकूण जागा --288 (अनुसूचित जाती 29 ,अनुसूचित जमाती 25 )
- मतदानाची तारीख--21 ऑक्टोबर 2019
- मतमोजणी तारीख --24 ऑक्टोबर
- महाराष्ट्र राज्याबरोबरच हरियाणा राज्याच्या ही विधानसभा निवडणुका पार पडल्या विधानसभा
- निवडणुकीचा खर्च मर्यादा 28 लाख रुपये
- चौदाव्या विधानसभा तक्रार निवारण क्रमांक- 1950 (टोल फ्री क्रमांक )
- तक्रार निवारण अँप- सी-व्हिजीलॲप व सुविधा ॲप
- विधानसभा निवडणुकीसाठी अर्थसंकल्पात 850 कोटीची तरतूद महाराष्ट्र शासनाने केली होती
- एकूण उमेदवार - 3239

- 14 विधानसभेचे सदिच्छा दूत
-माधुरी दिक्षित, अनिल काकोडकर, मधु मंगेश कर्णिक, प्रशांत दामले,मृणाल कुलकर्णी, निशिगंधा वाड, उषा जाधव, स्मृती मंधना, ललिता बाबर.
★तृतीयपंथी व्यक्ती गौरी सावंत★

- दिव्यांग कार्यकर्ता निलेश सिंगीत●
- महिला उमेदवार -235
- चौदाव्या विधानसभेत महिलांनी अधिकाधिक सहभाग घ्यावा यासाठी सखी मतदान केंद्र स्थापन करण्यात आली

- चौदाव्या विधानसभेत सर्वात जास्त उमेदवार देणारा पक्ष
१.बसपा 262 उमेदवार
२.भाजप 164
३.काँग्रेस 147
४.शिवसेना 126

- महाराष्ट्रातला सर्वात मोठा मतदारसंघ -पनवेल जिल्हा रायगड
- महाराष्ट्रातला सर्वात लहान मतदार संख्येनुसार चा विधानसभा मतदारसंघ- वर्धा

- सर्वात जास्त नोटा चा वापर
१.लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघ
२. क्रमांक पलूस केडगाव विधानसभा मतदारसंघ

- तुरुंगातून निवडणूक लढविलेल्या व्यक्ती- रत्नाकर गुट्टे (गंगाखेड मतदार संघ , पक्ष- राष्ट्रीय समाज पक्ष)

- 14 विधानसभेतील सर्वात तरुण आमदार -आदित्य ठाकरे (वय 29वर्ष )
- चौदाव्या विधानसभेतील सर्वात वयोवृद्ध आमदार -हरिभाऊ बागडे फुलंब्री मतदारसंघ

★ सर्वात जास्त जागा मिळवणारे पक्ष
1. भाजप 105
2. शिवसेना 56
3. राष्ट्रवादी काँग्रेस 54
4.काँग्रेस 44

★सर्वाधिक मतांनी निवडून येणारा आमदार★ --अजित पवार (बारामती मतदार संघ एक लाख 65 हजार 265 )

★सर्वात कमी मतांनी निवडून येणारा आमदार* --दिलीप लांडे (चांदिवली मतदारसंघ 409 मते पक्ष शिवसेना)

- 14 विधानसभेत निवडून आलेल्या एकूण महिला - 24

- चौदाव्या विधानसभेत सर्वात जास्त मते मिळवणारा पक्ष
1.भाजप 1 कोटी 41 लाख
2.राष्ट्रवादी काँग्रेस 92 लाख 16 हजार

13 February 2020

चालू घडामोडी प्रश्नसंच 13/2/2020


🔸‘2019 ATP वर्ल्ड टुर फायनल्स’ या स्पर्धेचे विजेतेपद कोणी जिंकले?

(A) स्टेफॅनोस सित्सिपास✅✅
(B) रॉजर फेडरर
(C) डोमिनिक थीएम
(D) राफेल नदाल

🔸 कोणती व्यक्ती ‘इटालियन गोल्डन सॅन्ड आर्ट पुरस्कार’ जिंकणारा पहिला भारतीय आहे?

(A) सुदर्शन पटनाईक✅✅
(B) एम. एफ. हुसेन
(C) राजा रवी वर्मा
(D) नंदालाल बोस

🔸कोणत्या ठिकाणी भारतीय भूदलाचा “सिंधू सुदर्शन सराव” आयोजित जाणार आहे?

(A) राजस्थान✅✅
(B) मध्यप्रदेश
(C) गुजरात
(D) जम्मू व काश्मीर

🔸कोणत्या खेळाडूची आंतरराष्ट्रीय मुष्टियुद्ध संघाच्या (AIBA) प्रथम क्रिडापटू आयोगाचे सदस्य म्हणून निवड झाली?

(A) सरिता देवी✅✅
(B) मेरी कोम
(C) सिमरनजित कौर
(D) पिंकी राणी

(1) नवकल्पना, संशोधन व विकास आणि कौशल्य विकासाला प्रोत्साहन देण्यासाठी __________ या कंपनीने "सायन्स अँड अप्लाइड रिसर्च अलायन्स अँड सपोर्ट (SARAS)" या संस्थेची स्थापना केली आहे.
(A) नॉर्दन कोलफिल्ड्स लिमिटेड✅✅
(B) कोल इंडिया लिमिटेड
(C) हिंदाल्को इंडस्ट्रीज लिमिटेड
(D) यापैकी नाही

(2)♻️♻️
कोणत्या संस्थेनी कोरोना विषाणू (nCoV) याच्या प्रसाराला अडथळा करण्यासाठी दोन दशलक्ष डॉलर एवढ्या निधीची घोषणा केली?
(A) आशियाई विकास बँक (ADB)✅✅
(B) आंतरराष्ट्रीय नाणेनिधी (IMF)
(C) जागतिक बँक
(D) भारतीय रिझर्व्ह बँक (RBI)

(3) ♻️♻️
कोणत्या देशात ‘वन्य प्राण्यांच्या स्थलांतरण करणाऱ्या प्रजातींचे संवर्धन’ विषयक करारनाम्याची 13 वी पक्षीय परिषद (COP) आयोजित केली जाणार आहे?
(A) ऑस्ट्रेलिया
(B) फिलीपिन्स
(C) संयुक्त राज्ये अमेरिका
(D) भारत✅✅✅✅

(4) पंकज अडवाणीला पराभूत करून आदित्य मेहताने ‘राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद 2020’ ही स्पर्धा जिंकली. ‘राष्ट्रीय स्नूकर अजिंक्यपद 2020’ कोणत्या शहरात खेळवली गेली?
(A) मुंबई
(B) पुणे✅♻️✅
(C) भुवनेश्वर
(D) नवी दिल्ली

(5) ♻️♻️
कोणत्या दिवशी राष्ट्रीय निर्जंतुकीकरण (Deworming) दिन पाळला जातो?
(A) 11 फेब्रुवारी
(B) 9 फेब्रुवारी
(C) 10 फेब्रुवारी✅✅✅
(D) 12 फेब्रुवारी

(6) ♻️✅♻️
काम्या कार्तिकेयन ही __________ शिखर गाठणारी जगातली सर्वात तरुण मुलगी ठरली आहे.
(A) अॅकोनकागुआ शिखर✅✅♻️
(B) कंचनजंगा शिखर
(C) लोटसे शिखर
(D) एव्हरेस्ट शिखर

(7) ♻️♻️
पद्मश्री-प्राप्त गिरिराज किशोर ह्यांचे 9 फेब्रुवारी 2020 रोजी निधन झाले. ते _________ होते.
(A) गायक
(B) कादंबरीकार✅♻️✅✅
(C) पत्रकार
(D) कवी

(8) ♻️♻️
कोणत्या शहरात ‘राष्ट्रीय ई-प्रशासन परिषद 2020’ आयोजित करण्यात आली होती?
(A) नवी दिल्ली
(B) हैदराबाद
(C) मुंबई✅✅♻️
(D) बेंगळुरू

(9) ✅♻️♻️
आरमंड ड्युप्लांटिस ह्याने बांबू-उडीच्या खेळात फ्रान्सच्या रेनॉड लॅव्हिलेनी ह्याने केलेला विश्वविक्रम मोडला. आरमंड ड्युप्लांटिस कोणत्या देशाचे प्रतिनिधित्व करतो?
(A) संयुक्त राज्ये अमेरिका
(B) स्वीडन✅✅♻️✅
(C) ऑस्ट्रेलिया
(D) रशिया

(10)♻️♻️
बेंगळुरूची भारतीय व्यवस्थापन संस्था (IIM) याला MOOCLab या संस्थेच्या “बिझिनेस स्कूल रँकिंग 2020”मध्ये ______ क्रमांकावर स्थान मिळाले आहे.
(A) 5 वा
(B) 8 वा
(C) 11 वा
(D) 3 रा✅✅✅

12 February 2020

पृथ्वीवरील भूस्वरुपाचे प्रकार

🌿1. व्दिपकल्प - एखाद्या भूभागाच्या तीन भागास पाणी व एका भागास जमीन असेल तर त्यास व्दिपकल्प असे म्हणतात. भारताचा दक्षिणेकडील भाग हा व्दिपकल्प म्हणून ओळखला जातो.

 

🌿2. भूशीर - व्दिपकल्पाचे अत्यंत निमुळते टोक समुद्रात खोलवर गेले असेल तर ते टोक भूशीर म्हणून ओळखले जाते. आफ्रिका खंडाच्या दक्षिणेकडील टोक केप ऑफ गुड होप जगातील सर्वात मोठे भूशीर ओळखले जाते.

 

🌿3. खंडांतर्गत समुद्र - मध्यभागी समुद्र व भोवताली जमीन असल्यास त्या समुद्राला खंडातर्गत समुद असे म्हणतात.

🌿4. बेट - एखाद्या भूखंडाच्या सभोवताली सर्वच बाजूने पाणीच असेल तर, असा भूखंड बेट म्हणून ओळखला जातो.

 

🌿5. समुद्रधुनी - काही ठिकाणी पाण्याचा चिंचोळा भाग दोन भूखंडाच्यामध्ये पसरलेला असतो. ही चिंचोळी पाण्याची पट्टी सागराच्या दोन्ही भागाला जोडली जाते. त्याला समुद्रधुनी असे म्हणतात.

 

🌿6. संयोगभूमी - दोन खंडांना जो डणारा जमिनीचा चिंचोळा भाग म्हणजे संयोगभूमी होय.

 

. 🌿आखात - उपसागरांहूनही निमुळता असा समुद्राचा भाग तीन बाजूंनी जमिनीचे वेढला जातो तेव्हा त्यास आखात असे म्हणतात.

 

🌿8. खाडी - आखातापेक्षाही चिंचोळा जमिनीत घुसलेला समुद्राचा पट्टा म्हणजे खाडी होय.

 

🌿9. समुद्र किंवा सागर - महासागरापेक्षा आकाराने लहान असणार्‍या खार्‍या पाण्याच्या साठयाला समुद्र किंवा सागर असे म्हणतात. सागर हे महासागराचाच भाग असतो तर, काही समुद्र हे भुवेष्टित असतात.

उदा. अरबी समुद्र, भूमध्यसमुद्र, कॅस्पियन समुद्र

 

🌿10. उपसागर - खार्‍या पाण्याच्या ज्या जलाशयाला तीनही बाजूंनी जमिनीने वेढलेले असते त्या जलाशयाला उपसागर असे म्हणतात. उपसागर हा सागरापेक्षा लहान असतो. उदा. बंगालचा उपसागर

जागतिक वारसा स्थळे - देशनिहाय

________________________

●चीन - 55 (प्रथम स्थानी)
●इटली - 54
●जर्मनी - 47
●स्पेन - 47
●फ्रांस -  45
●भारत - 38 (भारत 38 स्थळांसह 6 व्या स्थानी)
●मेक्सिको - 35
●युनायटेड किंगडम - 31
●रशिया - 28
●इराण - 24
●अमेरिका - 23
●जपान - 23
●ब्राझील - 22
●ऑस्ट्रेलिया -  20
●कॅनडा - 20
●ग्रीस -  18
●तुर्कीस्थान -  18
●पोलंड -  16
●स्वीडन -  15

याआधी कधी कधी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर झाली होती


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
अत्यंत टोकाची स्थिती असेल, तेव्हाच जागतिक आरोग्य संघटना 'जागतिक आरोग्य आणीबाणी' जाहीर करते. गेल्या काही वर्षात चारवेळा अशी आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

स्वाईन फ्ल्यू (2009) - H1N1 व्हायरसने 2009 साली धुमाकूळ घातला होता. जगभरात हा व्हायरस पसरत होता. टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब. जवळपास दोन लाख लोकांना या विषाणूची लागण झाली होती. त्यावेळी सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

पोलिओ (2014) - पोलिओचं 2012 साली पूर्णपणे निर्मुलन झाल्याचं बोललं जात असतानाच, 2013 साली पुन्हा या रोगानं डोकं वर काढलं. त्यावेळी जागतिक आरोग्य संघटनेनं आणीबाणी जारी करत वेगानं पावलं उचलली होती.

झिका (2016) - अमेरिकेमध्ये झिका व्हायरस इतक्या झपाट्यानं पसरला होता की, 2016 साली जागतिक आरोग्य संघटनेनं तात्काळ सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जारी केली आणि झिकाविरोधात लढण्यासाठी संशोधनाला प्रोत्साहन दिलं. टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब.  झिकाची लक्षणं सौम्य होती, मात्र याचा सगळ्यात जास्त त्रास गर्भवती महिलांना होत होता.

इबोला (2014 आणि 2019) - पश्चिम आफ्रिकेत इबोला व्हायरसनं अक्षरश: उच्छाद मांडला होता. 11 हजारहून अधिक जणांचा जीव इबोलानं घेतला. याची दखल घेत जागतिक आरोग्य संघटनेनं ऑगस्ट 2014 ते मार्च 2016 या काळात सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर केली. इबोलानं गेल्या वर्षी म्हणजे 2019 साली डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ द काँगो या देशात डोकं वर काढलं होतं. टेलीग्राम चॅनल एमपीएससी हब. त्यावेळीही सार्वजनिक आरोग्य आणीबाणी जाहीर करण्यात आली होती.

भारताने स्विकारलेले विविध पर्यावरण विषयक आंतरराष्ट्रीय करार

१) रामसर करार -
वर्ष - १९७१

दलदली प्रदेशाचे पान पक्ष्यांचा प्रमुख अधिवास म्हणून संवर्धन व धोरणी वापर
अमलात येण्याचे वर्ष - १९७५
भारताने मान्य केला - १९८२

२) CITES -
वर्ष - १९७३

संकटग्रस्त प्राणी व वनस्पतींमधील आंतरराष्ट्रीय व्यापाराचे नियंत्रण
अमलात येण्याचे वर्ष - १९७६
भारताने मान्य केला - १९८०

३) बोन करार -
वर्ष -१९७९

स्थलांतर करणाऱ्या वन्य प्राण्यांचे व त्यांच्या अधिवासाचे संवर्धन व व्यवस्थापन
अमलात येण्याचे वर्ष - १९८३
भारताने मान्य केला -१९८३

४) व्हिएन्ना करार -
वर्ष - १९८५

ओझोन थर संरक्षण* अमलात येण्याचे वर्ष - १९८८
भारताने मान्य केला - १९९१

५) बँसेल करार -
वर्ष - १९८९

हानिकारक त्याज पदार्थांची सीमापार होणारी हालचाल व विल्हेवाट
अमलात येण्याचे वर्ष - १९९२
भारताने मान्य केला - १९९

६) UNFCCC -
       वर्ष - १९९२

हवामान बदल रोखणे
अमलात येण्याचे वर्ष - १९९४
भारताने मान्य केला - १९९३

७) UNFCCC अंतर्गत क्योटो करार - वर्ष - १९९७

हरितवायू उत्सर्जनात घट
अमलात येण्याचे वर्ष - २००५
भारताने मान्य केला - २००२

८) CBD जैवविविधता करार -
वर्ष -१९९२

जैवविविधता व जैविक संसाधनांचे संवर्धन व व्यवस्थापन
अमलात येण्याचे वर्ष - १९९३
भारताने मान्य वर्ष - १९९४

९) CBD अंतर्गत कार्टाजेना प्रोटोकॉल -वर्ष - २०००

जनुकीय संशोधित जीवांच्या सीमापार होणाऱ्या जैवसुरक्षाहालचालींवर , हाताळणीवर व वापरावर नियंत्रण
अमलात येण्याचे वर्ष - २००३
भारताने मान्य केला - २००३

१०) वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्षासाठी संयुक्त राष्ट्राचाकरार -
वर्ष - १९९४

वाळवंटीकरणाविरूद्ध संघर्ष व दुष्काळ ( विशेषतः आफ्रिकेत ) निवारण
अमलात येण्याचे वर्ष - १९९६
भारताने मान्य केला - १९९६

११) रोटरडँम करार -
वर्ष - १९९८

हानिकारक रसायनांच्या आंतरराष्ट्रीय व्यापारात पूर्वसुचित मान्यतेची पद्धत अमलात आणणे व त्यातून पर्यावरणाचे व मानवी आरोग्याचे संरक्षण करणे .
अमलात येण्याचे वर्ष - २००४
भारताने मान्य केला - २००५

१२) स्टॉकहोम करार -
वर्ष - २००१

अ) मानवी आरोग्य व पर्यावरणांचे टिकून राहणाऱ्या सेंद्रिय प्रदुषकांपासून संरक्षण .

ब) एंडोसल्फान बंदी संबंधित करार
अमलात येण्याचे वर्ष - २००४

बीसीसीआय बनली जगातील सर्वांत शक्तिशाली क्रिकेट संघटना

◾️ भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) ही जगातील सर्वात शक्तिशाली क्रिकेट संस्था बनली आहे. 

◾️आता एवढ्या मोठ्या संख्येत क्रिकेट फॅन्स असणाऱ्या देशात तितकेच मोठे क्रिकेट स्टेडियम उभारले जात आहे.

◾️गुजरातच्या अहमदाबादमध्ये उभारण्यात येणारे मोटेरा स्टेडियम हे जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम ठरणार आहे.

◾️ मोटेरा स्टेडियममध्ये एकाचवेळी तब्बल 1 लाख 10 हजार प्रेक्षक बसतील एवढी याची आसन क्षमता तयार करण्यात आली आहे.

◾️याचबरोबर हे मोटेरा स्टेडियम सध्या जगातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मेलबर्न क्रिकेट ग्राउंडला (एमसीजी) मागे टाकेल.

◾️ एमसीजीची आसनक्षमता 1 लाख 24 इतकी आहे. जानेवारी 2018 मध्ये मोटेरा स्टेडियमच्या उभारणीस प्रारंभ झाला असून सध्या याचे निम्म्याहून अधिक काम झाले आहे.

◾️गुजरात क्रिकेट असोसिएशन (जीसीए) च्या देखरेखेखाली मोटेरा स्टेडियमचे बांधकाम सुरू आहे. भव्यदिव्य अशा या मोटेरा स्टेडियममध्ये तांबड्या आणि काळ्या मातीपासून तयार केलेल्या तब्बल 11 खेळपट्ट्या असतील. आणि फिरकी आणि वेगवान अशा दोन्ही गोलंदाजांना अनुकूल अशी खेळपट्टी बनविण्यात येत असल्याची माहिती जीसीएचे अध्यक्ष धनराज नथवानी यांनी दिली. 

◾️ मोटेरा हे भारतातील सर्वात मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कोलकातामधील ऐतिहासिक ईडन गार्डनलाही मागे टाकेल. ईडन गार्डन्सची आसन क्षमता 68 हजार एवढी आहे.

◾️ऑस्ट्रेलियातील एमसीजीनंतर ईडन गार्डन हे सध्या जगातील दुसरे मोठे क्रिकेट स्टेडियम म्हणून ओळखले जाते.

◾️ त्यानंतर पर्थ स्टेडियम आणि हैदराबादमधील राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानाचा क्रमांक लागतो.

✍जगातील सर्वात मोठी क्रिकेट स्टेडियम (मोटेरासहित) : 
📌1) मोटेरा क्रिकेट स्टेडियम, अहमदाबाद (भारत)
📌2) मेलबर्न क्रिकेट ग्राउंड, मेलबर्न (ऑस्ट्रेलिया)
📌3) ईडन गार्डन, कोलकाता (भारत)
📌4) पर्थ स्टेडियम, पर्थ (ऑस्ट्रेलिया)
📌5) राजीव गांधी आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदान, हैदराबाद (भारत)

पुण्यात २९ वे मराठी बालकुमार साहित्य संमेल

◾️ अ.भा मराठी बालकुमार साहित्य
संस्थेचे 29 वे अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन
बालेवाडी, पुणे येथे 8 व 9 फेब्रुवारी आयोजित करण्यात आले आहे.

◾️यामध्ये सुप्रसिध्द लेखक, कवी प्रा. प्रवीण दवणे संमेलनाचे अध्यक्ष
असून, योगिराज पतसंस्था, बाणेरचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर तापकी यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे. 8 रोजी सकाळी दहा वाजता संमेलनाचे उद्घाटन होणार आहे.

◾️ 9 रोजी दुपारी चार वाजता
संत साहित्याचे गाढे अभ्यासक डॉ. रामचंद्र देखणे यांच्या उपस्थितीत समारोप होणार आहे.

◾️अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संस्था गेल्या 44
वर्षांपासून बालसाहित्य क्षेत्रात कार्यरत आहे.

◾️2017 मध्ये ही संस्था विसर्जित करून तिचे अमरेंद्र भास्कर मराठी बालकुमार साहित्य संस्था असे नामकरण करण्यात आले. या संस्थेने मुलांसाठी अनेक उपक्रम राबवले आहेत.

◾️बालकुमार साहित्य संमेलन हा त्यातील एक उपक्रम आहे.

◾️मंगेश पाडगावकर, विजया वाड, महावीर जोंधळे, शंकर सारडा, न.भ. जोशी, राजीव तांबे, अनिल अवचट अशा
नामवंत साहित्यिकांनी या संमेलनाचे अध्यक्षपद भूषवले आहे.

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

राष्ट्रीय अजिंक्यपद वेटलिफ्टिंग स्पर्धा : मीराबाई चानूचा राष्ट्रीय विक्रम


🏈🏈ऑलिम्पिक पदकाची अपेक्षा असलेली आणि माजी जगज्जेती मीराबाई चानू हिने मंगळवारी राष्ट्रीय वेटलिफ्टिंग अजिंक्यपद स्पर्धेत नव्या राष्ट्रीय विक्रमाची नोंद केली. तिने ४९ किलो वजनी गटात आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढत २०३ किलो वजन उचलत सुवर्णपदक पटकावले.

🏈🏈मणिपूरच्या २५ वर्षीय मीराबाईने स्नॅच प्रकारात ८८ तर क्लिन आणि जर्क प्रकारात ११५ किलो वजन उचलत एकूण २०३ किलो वजनाचा विक्रम आपल्या नावावर केला. यापूर्वी तिने गेल्या वर्षी सप्टेंबर महिन्यात थायलंड येथील जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत २०१ किलो वजनाचा राष्ट्रीय विक्रम प्रस्थापित केला होता.

🏈🏈रेल्वेचे प्रतिनिधित्व करणाऱ्या मीराबाईची सहकारी संजिता चानू हिने १८५ किलो वजन उचलत रौप्यपदक पटकावले तर तेलंगणाच्या टी. प्रियदर्शिनी हिने १६८ किलो वजनासह कांस्यपदक प्राप्त केले.

🏈🏈मीराबाईने मंगळवारी साकारलेल्या या कामगिरीमुळे तिने जागतिक क्रमवारीत चौथ्या स्थानी मजल मारली. ती चीनची जियांग हुईहुआ (२१२ किलो) आणि होऊ झिहुई (२११ किलो) आणि कोरियाची री संग गम (२०९ किलो) यांच्यानंतर चौथ्या स्थानी आहे.

🏈🏈आशियाई अजिंक्यपद स्पर्धेसाठी माझ्याकडे अद्याप पुरेसा वेळ आहे. टोक्यो ऑलिम्पिकमध्ये मी २१० किलो वजन उचलेन, अशी आशा आहे. प्रत्येक दिवस माझ्या कामगिरीत सुधारणा होत असून नियोजित रणनीतीनुसार सर्व काही गोष्टी घडत आहेत. आशियाई स्पर्धेत २०६ किलो वजन उचलण्याचा माझा प्रयत्न असेल. काही तांत्रिक बाबींवर मेहनत घेत आणि स्वत:ची शक्ती वाढवत ऑलिम्पिकमध्ये देशाचा नावलौकिक उंचावण्यासाठी मी प्रयत्नशील आहे.