Ads

06 April 2020

महाराष्ट्रात सर्वात कमी काळ मुख्यमंत्रीपद भूषवणारे नेते

1. देवेंद्र फडणवीस (भाजप) 
4 दिवस, 23 नोव्हेंबर ते 26 नोव्हेंबर, 2019

2. पी के सावंत (काँग्रेस) -
10 दिवस, 24 नोव्हेंबर ते 4 डिसेंबर 1963

3. नारायण राणे (शिवसेना) -
259 दिवस, 1 फेब्रुवारी ते 17 ऑक्टोबर 1999

4. शिवाजीराव पाटील निलंगेकर (काँग्रेस) -
277 दिवस, 3 जून 1985 ते 6 मार्च 1986

5. मारोतराव कन्नमवार (काँग्रेस) - 370 दिवस, 20 नोव्हेंबर 1962 ते 24 नोव्हेंबर1963

6. बाबासाहेब भोसले (काँग्रेस) - 377 दिवस, 21 जानेवारी 1982 ते 1 फेब्रुवारी 1983

मुंबई-पुणे महामार्गावरील ऐतिहासिक अमृतांजन पूल जमीनदोस्त

📌बोरघाटातून मुंबई पुण्याला जोडणारा ऐतिहासिक अमृतांजन पूल आज (रविवार) तोडण्यात आला. सध्या करोनामुळे असलेल्या लाॅकडाउन व प्रवासबंदीमुळे वाहतूक रोडावल्याचे निमित्त साधत हे काम करण्यात आले.

📌द्रुतगती मार्ग झाल्यानंतरही अमृतांजन पूलाच्या ठिकाणी नेहमी वाहतूक कोंडी होती. हा द्रुतगती मार्ग जरी झाला असला तरी या पुलाजवळील काही प्रवासी पट्टा जुन्या महामार्गाला व द्रुतगती मार्गाला सामाईक आहे त्यामुळेच येथे कायम वाहतूक कोंडी होत असते.

📌यावर कायमस्वरुपी उपाय म्हणून पर्यायी मार्ग व उड्डाण पुलांचे काम सुरू आहे. दरम्यान जीर्ण झालेला व अडचणीचा ठरत असलेला हा ऐतिहासिक पूल आज  पाडण्यात आला आहे.

📌त्यामुळे  पुणे-मुंबई द्रुतगतिमार्गावरील हा १९० वर्षे जुना अमृतांजन पूल आता  इतिहास जमा झाला आहे. आज सायंकाळच्या सुमारास हा पूल पाडण्यात आला तेव्हा त्या ठिकाणी काही प्रशासनातील महत्वाचे अधिकारी उपस्थित होते.

📌अनेक दिवसांपासून हा पूल पडायचा होता. परंतु, द्रुतगतिमार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक असते, त्यामुळे ते शक्य होत नव्हते. मात्र, सध्या करोना विषाणू च्या पार्श्वभूमीवर पुणे-मुंबई द्रुतमार्गावरील वाहतुक कमी आहे.

📌त्यामुळे हा सर्वात जुना ब्रिटिशकालीन पूल पाडण्यात आला. १० नोव्हेंबर १८३० साली अमृतांजन पूल बांधण्यात आला होता.

कोरो फ्लू’ लशीची भारतात निर्मिती


📌हैदराबाद येथील भारत बायोटेक या जैवतंत्रज्ञान कंपनीने करोना संसर्गावर नाकावाटे देण्याची लस तयार करण्याचे काम सुरू केले आहे.

📌युनिव्हर्सिटी ऑफ विस्कॉन्सिन (मॅडिसन), लस कंपनी फ्लुजेन यांच्या मदतीने ही लस तयार करण्यात येत असून त्यात भारत बायोटेक कंपनीने पुढाकार घेतला आहे.

📌त्यांनी ही लस तयार करण्याचे काम सुरू केले असून या लशीचे नाव ‘कोरो फ्लू’ असे ठेवण्यात आले आहे. भारत बायोटेक कंपनी लस तयार करून त्याच्या वैद्यकीय चाचण्या घेणार आहे.

📌या लशीचे एकूण तीस कोटी डोस जगात वितरित केले जाणार आहेत फ्लू जेन ही लस कंपनी त्यांची सध्याची उत्पादन प्रक्रिया भारत बायोटेकला देणार असून त्यामुळे लशीचे उत्पादन वाढवण्यास मदत होणार आहे, असे मत भारत बायोटेकचे उद्योग विकास प्रमुख डॉ. राचेश एला यांनी व्यक्त केले आहे.

📌या लसीचा भविष्यातील वापर प्रभावीरित्या केला जाऊ शकतो, त्यासाठी हा पुढाकार घेण्यात आल्याचे या वेळी कंपनीच्या वतीने सांगण्यात आले.

✍कोरोनाला रोखण्याचे तंत्र

📌कोरोनावर उपचार पद्धती विकसित करण्यासाठी जोरात काम सुरू असून सार्स सीओव्ही २ म्हणजे करोना विषाणू मानवी पेशीत ज्या दरवाजांनी प्रवेश करतो ते बंद करण्यासाठी एक अभिनव उपचार पद्धती विकसित केली जात आहे.

📌‘सेल’ या नियतकालिकात प्रसिद्ध संशोधनानुसार सार्स सीओव्ही २ विषाणूला पेशींमध्ये प्रवेश नाकारण्याच्या दिशेने प्रयत्न केले जात आहेत. कॅनडातील ब्रिटिश कोलंबियाचे जोस पेनिंगर यांनी म्हटले आहे की, यातील निकाल उत्साहवर्धक असून संबंधित औषध रक्तवाहिन्या व मूत्रपिंडावर कसा परिणाम करते याचीही माहिती उपलब्ध आहे.

📌एसीई २ हे पेशींवरील प्रथिन सध्या या विषाणूच्या प्रवेशास कारण ठरत आहे. सार्स सीओव्ही २ या विषाणूवरील ग्लायकोप्रोटिनची ओळख  एसीई २ प्रथिनामुळे पटवली जाते व विषाणू पेशीत घुसून थैमान घालतो असे दिसून आले आहे.

📌२००३ मध्ये सार्स सीओव्ही १ विषाणूतही ग्लायकोप्रोटिनची ओळख एसीई २ प्रथिनामुळे पटून तो विषाणू पेशीत घुसण्यात यशस्वी होत होता. कुठल्याही विषाणूरोधक औषधात नेमकी विषाणूची पेशीत घुसण्याची क्रिया रोखली जात असते. यात एपीएन ०१ या औषधाने हवा तो परिणाम साधला जातो.

General Knowledge

▪️ कोणती संस्था देशातली प्रथम हायपरलूप पॉड स्पर्धा आयोजित करणार?
उत्तर : भारतीय तंत्रज्ञान संस्था, मद्रास

▪️ रशिया नंतर कोणत्या देशाने कॉमन हायपरसोनिक ग्लाइड बॉडी (C-HGB) या क्षेपणास्त्राची चाचणी घेतली?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका

▪️ 2020 साली जागतिक क्षयरोग दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : इट्स टाइम

▪️ कोणत्या बँकेनी चलनातली तरलतेची मागणी पूर्ण करण्यासाठी आपत्कालीन पतमर्यादा जाहीर आहे?
उत्तर : भारतीय स्टेट बँक

▪️ कोणत्या राज्याने ‘ई-नाईट बीट’ तपासणी यंत्रणा अंमलात आणली आहे?
उत्तर : हिमाचल प्रदेश

▪️ कोणत्या देशाने राष्ट्रपती अल्फा कॉन्डे यांच्या राजवटीचा कार्यकालावधी वाढविण्यासंबंधी जनमत घेण्याचे ठरविले?
उत्तर : गिनी

▪️ 2020 या साली जागतिक हवामान दिनाची संकल्पना काय आहे?
उत्तर : क्लायमेट अँड वॉटर

▪️ 18 मार्च 2020 रोजी पाळण्यात आलेल्या वैश्विक पुनर्नवीनीकरण दिनाची संकल्पना काय होती?
उत्तर : रीसायकलिंग हीरोज

▪️ मे 2020 या महिन्यात कोणती अंतराळ संस्था आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर अंतराळवीर पाठविणार आहे?
उत्तर : स्पेसएक्स

▪️ 'COVID-19 आर्थिक प्रतिसाद कार्य दल' याचे नेतृत्व कोण करणार आहे?
उत्तर : अर्थमंत्री

गोदावरी नदी

📌गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यांतच वाहून जाते. नदीच्या प्रवाहाची रुंदी काही ठिकाणी २०० मीटर (पूर्व घाट पार करताना) तर काही ठिकाणी ६.५ कि.मी. (समुद्रास मिळण्याआधी) इतकी होते.

📌आपल्या पाण्यामुळे गोदावरीस महाराष्ट्र व आंध्र प्रदेशराज्यांची जीवनवाहिनी समजतात. ही नदी दक्षिण गंगा म्हणून ओळखली जाते. त्याच सोबत नांदेड शहराला गोदावरीचे नाभी-स्थान म्हणून ओळखले जाते. नाशिकच्या कुंभमेळाव्याला नांदेड च्या नंदी तट, उर्वशी तट इत्यादी स्नानाचे महत्त्व आहे.

📌सह्याद्रीच्या कुशीत पश्चिम घाटात १,०६७ मीटर उंचीवर सुरू होणाऱ्या गोदावरीचा प्रवास मुख्यत्त्वे दख्खनच्या पठारावरूनसाधारणत: आग्नेय दिशेने होतो. आंध्रप्रदेशात भद्राचलम्‌नंतर गोदावरी पूर्वेच्या निमुळत्या डोंगर रांगांतून (पापी टेकड्या) पुढे सरकते. या ठिकाणी तिची रुंदी २०० मीटरपेक्षा कमी व खोली ६० फुटाच्या आत एवढीच असते.

📌गोदावरी खोरे ३,१२,८१२ चौरस किलोमीटर क्षेत्र व्यापते. त्यांतील महाराष्ट्रात १,५२,१९९ चौरस किलोमीटर, आंध्र प्रदेश ७३,२०१ चौरस किलोमीटर, मध्य प्रदेश ६५,२५५ चौरस किलोमीटर, ओरिसात १७,७५२ चौरस किलोमीटर तर कर्नाटकात गोदावरीने व्यापलेले खोरे ४,४०५ चौरस किलोमीटर आहे.

📌गोदावरीचा त्रिभुज प्रदेश ५,१०० चौरस किलोमीटरचा असून अत्यंत सुपीक समजला जातो. तज्ज्ञांच्या मते या त्रिभुज प्रदेशाच्या उत्क्रांतीचे तीन मुख्य टप्पे असून शेवटच्या दोन टप्प्यांमध्ये गाळाचे प्रमाण जमिनींचा शेतीकरिता वाढता वापर व वाढत्या जंगलतोडीमुळे वाढल्याचे दिसून येते.

🌸इतर नद्यांशी तुलना

📌एकूण लांबीत गोदावरीचा जगात ९२वा क्रमांक आहे. ६,६९० किलोमीटर लांबी असलेली आफ्रिका खंडातील नाईल नदीप्रथम क्रमांकावर आहे. तर सिंधू नदी ३,१८० कि.मी. लांबीसह २१व्या क्रमांकावर आहे. ब्रह्मपुत्रा २,९४८ कि.मी.(२८वा क्रमांक), तर २,५१० कि.मी. वाहून गंगा ३९वा क्रमांकावर येते. यमुना १,३७६ कि.मी., सतलज १,३७० कि.मी. लांबीच्या आहेत व अनुक्रमे १०२ व १०३ क्रमांकांवर आहेत. कृष्णा १,३०० कि.मी. वाहून ११४व्या तर १,२८९ कि.मी. वाहून नर्मदा ११६व्या क्रमांकवर येते. १,००० कि.मी. पेक्षा अधिक लांबीच्या जगात सुमारे १६० नद्या आहेत.

🌸गोदावरी -उपनद्या आणि प्रकल्प🌸

✍ऊर्ध्व गोदावरी

दारणा नदी - दारणा धरण, कोळगंगा - वाघाड प्रकल्प, उणंद - ओझरखेड प्रकल्प, कडवा - करंजवन प्रकल्प, मुळा नदी [मुळा धरण] प्रवरा नदी- भंडारदरा जिल्हा अहमदनगर, निलवंडे धरण, म्हाळुंगी - म्हाळुंगी प्रकल्प (सोनेवाडी ता. सिन्नर), आढळा - आढळा प्रकल्प, मुळा - मुळा प्रकल्प, शिवणी - अंबाडी प्रकल्प

✍मध्य गोदावरी

कर्पुरा नदी, दुधना नदी, यळगंगा नदी, ढोरा नदी, कुंडलिका नदी, सिंदफणा नदी, तेरणा नदी, मनार नदी, तीरू नदी, सुकना नदी, माणेरू नदी, मंजिरा किन्नेरासानी नदी, पूर्णा नदी, मन्याड नदी, आसना नदी, सीता नदी, लेंडी नदी, वाण नदी, बिंदुसरा नदी

✍विदर्भ आणि मध्यप्रदेशातील वर्धेचे खोरे

📌मध्यप्रदेशातून येणारी
 वैनगंगा सातपुडा रांगांतून जवळपास ३६० मैलांचा प्रवास करून वर्धेस मिळते. वर्धा नदी मध्यप्रदेशात मुलताई येथे सातपुडा रांगांतून विदर्भात येते. तेथे तिचा संगम वैनगंगा आणि पैनगंगा या नद्यांशी होतो. नंतर गोदावरीस मिळेपर्यंत तिला प्राणहिता असे म्हणतात. मध्यप्रदेशातून येणारी इंद्रावती (इंद्रायणी) सातपुडा रांगांतून येऊन गोदावरीस मिळते.

📌खेक्रनाला - खेक्रनाला प्रकल्प, पेंच - पेंच प्रकल्प, बाग - बावनथडी (सागरा) प्रकल्प या विदर्भातून येणाऱ्या इतर उपनद्या आहेत.

📌नाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगानाग कोलार कन्हाण पेंच वैनगंगा गोसीखूर्द प्रकल्प

✍कर्नाटकातून येणारी

📌कर्नाटक राज्यातील गोदावरीचे पाणलोट क्षेत्र १७०१ वर्ग मैल आहे. मांजरा आणि तिच्या उपनद्या तेरणा, कारंजा, हलदी, लेंडी, मन्नार मिळून एकूण पाणलोट क्षेत्र ११९०० वर्ग मैल आहे.

✍ओरिसातून येणाऱ्या नद्या

📌इंद्रावती नदी (काही ठिकाणी महाराष्ट्र राज्य व छत्तीसगड राज्य यांची सीमा इंद्रावती नदीने निश्चित होते.)

सिलेरु
शबरी नदी

✍आंध्रप्रदेशातून येणारी

तालिपेरू

🌸निसर्ग,शेती व आर्थिक

📌नांदुर-मधमेश्वर, जायकवाडी जलअभयारण्यात रोहित, करकोचा, सारस पक्षांच्या विभिन्न प्रजाती आढळून येतात. @anilkoltempsc

📌नैसर्गिकदृष्ट्या दख्खनच्या पठारावरील गोदावरीच्या सुरुवातीचा प्रदेश कमी पर्जन्यमानाचा असल्यामुळे मुख्यत्वे या प्रदेशात कापूस, ज्वारी ही पिके घेतली जातात. सिंचित क्षेत्रामध्ये मुख्यत्वे ऊस, कापुस व केळी ही पिके घेतली जातात. तेलंगण आणि आंध्रप्रदेशात साधारणपणे भाताची शेती केली जाते.

📌गोदावरी नदीत मुख्यत: गोड्या पाण्यातील Cyprinidae माशांच्या प्रजाती आढळून येतात.

📌गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशात ऍव्हिसेनिआ प्रजातीच्या मॅंग्रोव्ह झाडांची जंगले आढळतात त्यांना स्थानिक तेलुगू लोक माडा अडावी असे म्हणतात. मॅंग्रोव्ह झाडांची जंगले जमिनीचे आणि परिसराचे नैसर्गिकरीत्या संरक्षण करतात.

🌸गोदावरीवरील सिंचन प्रकल्प🌸

📌नाशिक व मराठवाडा मिळून ६६ लाख हेक्टर शेतीयोग्य जमिनींपैकी १६ टक्के क्षेत्रास सिंचनाचा फायदा झाला आहे तर अधिकतम प्रलंबित क्षमता २९ टक्के एवढी आहे. 

📌पैठण येथील जायकवाडी प्रकल्पाने किमान १,३२,००० हेक्टर जमीन भिजणे प्रस्तावित होते, परंतु प्रत्यक्षात ४५,००० हेक्टर जमीनच सिंचनाखाली येऊ शकली. विष्णुपुरी उपसा जलसिंचन प्रकल्प (आशियातला सर्वांत मोठा उपसा जलसिंचन प्रकल्प - नांदेड) मराठवाडा विभागात सर्व प्रकल्प मिळून ४८,००,००० हेक्टर शेतजमिनींपैकी ८,००,००० हेक्टर जमीन सिंचनाखाली आहे. याशिवाय गोदावरीवर गंगापूर, नांदूर, मधमेश्वर (इ.स.१९०७), भावली (प्रस्तावित), वाकी (प्रस्तावित), भाम, मुकणे, अलिसागर - निझामाबाद पूरकालीन उपसा सिंचन प्रकल्प, श्रीरामसागर प्रकल्प - पोचमपाड, पोलावरम प्रकल्प (प्रस्तावित) इत्यादी प्रकल्प आहेत. 

✍उपनद्यांवरील बंधारे

📌जलापुट बंधारा मचकुंड नदीवर आंध्रप्रदेश-ओडिशा सीमेवर आहे. बालीमेला सिंचन प्रकल्प (ओरिसा), अप्पर इंद्रावती नदी प्रकल्प, मंजीरा नदीवर निजामसागर प्रकल्प, कड्ड्म प्रकल्प, मेहबूबनगर प्रकल्प, लोअर तेरणा प्रकल्प, पुर्णा प्रकल्प, अप्पर पैनगंगा प्रकल्प, लोअर दुधना प्रकल्प, भंडारा सिंचन प्रकल्प, मुळा प्रकल्प, अप्पर प्रवरा प्रकल्प, अप्पर वैनगंगा, गोदावरी कॅनॉल, मनार प्रकल्प - कंधार, ऊर्ध्व पैनगंगा - पुसद इत्यादी. 

✍बंधारे, पूल, नौकानयन

📌डौलेश्वर या गोदावरीच्या त्रिभुज प्रदेशातील बंधारा ब्रिटिश अभियंता सर आर्थर थॉमस कॉटन याने बांधून पूर्ण केल्यानंतर हे क्षेत्र भाताची शेती, नौकानयन व मासेमारी यामुळे संपन्न झाले. 

✍जलव्यवस्थापन

📌गोदावरीतील पाणी ऋतूप्रमाणे कमी-अधिक असते. नदीतून वाहणार्‍या पाण्यापैकी ८०% पाणी जुलै-ऑक्टोबर या चार महिन्यातच वाहून जाते. उर्वरीत काळात खोऱ्यात दुष्काळाची स्थितीही असू शकते. हे पाणी व्यवस्थित वापरले जावे, पुरांचा प्रश्न मिटावा व ज्या ठिकाणी नदी पोहचत नाही त्या भागात पाणी उपलब्ध व्हावे यासाठी गोदावरी खोऱ्यात अनेक पाटबंधारे प्रकल्पांची निर्मिती केली गेली आहे. 

📌नदी खोऱ्यातील विविध समूहांच्या गरजा वाढल्यामुळे इतर नद्यांप्रमाणेच गोदावरी नदीच्या पाणीवाटपाचे प्रश्न गंभीर झाले आहेत. नदीकाठांवर व कालव्यांवर असलेली अनेक खेडी, शहरे, राज्ये इत्यादी पिण्यासाठी, शेतीसाठी व औद्योगिक वापरांकरिता लागणार्‍या पाण्याकरिता परस्परांशी संघर्ष करीत असतात. पाण्याचा अपव्यय टळावा व योग्य पाणीव्यवस्थापन व्हावे यासाठी शासन प्रयत्न करत असल्याचा दावा करते. 

📌गोदावरीखोऱ्याचे पाणलोट क्षेत्र ३,१९,८१० कि.मी. असून भारताच्या एकूण क्षेत्रफळाच्या ९.५% भाग व्यापते. महाराष्ट्राकरिता गोदावरी खोऱ्यात १,७९८ टी.एम.सी. उपलब्ध पाण्यापैकी ७५% म्हणजे १,३१८ टी.एम.सी. भरवशाचे असले तरी आंतरराज्य निवाड्यानुसार महाराष्ट्राच्या वाट्यास अधिकतम १,०९७ टी.एम.सी. उपलब्ध होणार आहे. (कृष्णा खोरे १,२०१ टी.एम.सी., तापी खोरे ३२२ टी.एम.सी., नर्मदा खोरे २० टी.एम.सी. क्षमता असली तरी आंतरराज्य लवादानुसार सर्व खोरे मिळून एकूण १,८९० टी.एम.सी. पाणी महाराष्ट्रास उपलब्ध राहील.

📌आंध्र प्रदेश राज्यास किमान १,४८० टी.एम.सी. पाणी गोदावरी खोऱ्यातून मिळू शकते.

ओडिशा सरकारचा ‘मो प्रतिवा’ कार्यक्रम

- संयुक्त राष्ट्रसंघ बाल निधी (UNICEF) यांच्या सहकार्याने ओडिशा सरकारने 'मो प्रतिभा' नावाचा एक नवा कार्यक्रम सादर केला आहे.

- हा ऑनलाईन स्पर्धा कार्यक्रम आहे. कोविड-19 महामारीच्या पार्श्वभूमीवर घरात अडकलेल्या विद्यार्थ्यांना विविध कल्पनात्मक कार्यांमध्ये गुंतवून ठेवण्यासाठी विविध स्पर्धांचे आयोजन केले जात आहे. घरातूनच संगणकांच्या माध्यमातून भाग घेता येणार आहे.

▪️स्पर्धेविषयी

- स्पर्धांमध्ये घोषवाक्य लेखन, विविध कला, लघुकथा लेखन, भित्तिपत्रिका आणि काव्य लेखन अश्या कला-कौशल्यांचा समावेश आहे.

- या स्पर्धांमध्ये 5 ते 18 वर्ष या वयोगटातले विद्यार्थी भाग घेऊ शकतात. विजेत्यांना वयानुसार तीन गटांमध्ये विभाजित केले जाणार आहे. विजेत्यांबरोबरच इतर भाग घेणाऱ्यांना प्रोत्साहनपर प्रमाणपत्रांचे वाटप केले जाणार आहेत.

- या स्पर्धा दोन संकल्पनांवर आधारित आहेत - (i) संचारबंदीच्या काळात घरी राहणे आणि (ii) कोविड-19 महामारीच्या काळात तरुण नागरिक म्हणून माझी जबाबदारी.
---------------------------------------

2019 सातवे सर्वात उष्ण वर्ष

🔰आंतरराष्ट्रीय हवामान संस्थेने 7 जानेवारी 2020 रोजी 2019 साठी हवामान स्थिती अहवाल [ State of Climate Report] जाहीर केला.

🔰अहवालानुसार हवामान बदलामुळे 2019 या वर्षांमध्ये भारतात 1659 लोकांचा बळी गेला आहे .

🔰1901 पासून 2019 हे वर्ष भारतासाठी सातवे सर्वात उष्ण वर्ष ठरले आहे.

🔰1901 पासून IMD हवामानातील नोंद ठेवते.

🔰गेल्या 100 वर्षात भारतामध्ये 0.61 डिग्री सेल्सिअस तापमान वाढले आहे.

🔰कोपर्निकस हवामान बदल कार्यक्रम या युरोपियन हवामान संस्थेने 2019 हे दुसरे सर्वात उष्ण वर्ष होते असे नुकतीच घोषित केले.

🔰आतापर्यंत सर्वात उष्ण वर्ष
    [ सरासरीपेक्षा जास्त तापमान]

    ▪️2009 :-  +0.54°C
    ▪️2010 :-  +0.54°C
    ▪️2015 :-  +0.42°C
    ▪️2016 :-  +0.71°C
    ▪️2017 :-  +0.53°C

RBI ( ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ) information

🔸दिनांक १ एप्रिल १९३५ रोजी म्हणजे ८५ वर्षांपूर्वी 'भारतीय रिझर्व्ह बँक' स्थापन झाली होती.

‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ ही देशातील सर्वोच्च वित्तीय संस्था असून तिच्यामार्फत द्रव्यविषयक धोरण राबवले जाते. १९२६ साली हिल्टन यंग यांच्या अध्यक्षतेखाली ‘दि रॉयल कमिशन ऑन इंडियन करन्सी अ‍ॅण्ड फायनान्स’ या नावाने एक आयोग स्थापन करण्यात आला. या आयोगाने एक स्वतंत्र अशी मध्यवर्ती बँक स्थापन करून तिला ‘रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया’ असे नाव द्यावे, अशी शिफारस केली.

८ सप्टेंबर १९३३ रोजी राजकीय वर्चस्वापासून मुक्त अशा मध्यवर्ती बँकेच्या स्थापनेविषयीचे विधेयक कायदेमंडळात मांडण्यात आले. ६ मार्च १९३४ रोजी गव्हर्नर जनरलची त्याला संमती मिळाली. त्यामुळे हे विधेयक ‘आरबीआय अ‍ॅक्ट १९३४’ या नावाने स्वीकृत झाले. अशा रीतीने १ एप्रिल १९३५ रोजी ‘आरबीआय’ची स्थापना झाली.

सुरुवातीला ‘आरबीआय’ची स्थापना खासगी भागधारकांची बँक म्हणून झाली. तिचे अधिकृत भागभांडवल पाच कोटी रुपयांचे होते व प्रत्येक भागाची किंमत १०० रुपये होती. तिचा कारभार १६ सदस्यीय मध्यवर्ती संचालक मंडळाकडे सोपविण्यात आला.

‘आरबीआय’ची सत्ता काही व्यक्तींच्या हातात एकवटू नये, ‘आरबीआय’च्या व सरकारच्या धोरणात सुसूत्रता असावी आदी कारणांसाठी ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला. १ जानेवारी १९४९ पासून ‘आरबीआय’चे राष्ट्रीयीकरण करण्यात आले. यासाठी (सार्वजनिक मालकीकडे हस्तांतरण) ‘आरबीआय कायदा १९४८’ संमत करण्यात आला. ‘आरबीआय’च्या राष्ट्रीयीकरणाबाबतचे विधेयक तत्कालीन अर्थमंत्री सी. डी. देशमुख यांनी मांडले.

* ‘आरबीआय’चे व्यवस्थापन *

गव्हर्नर हा मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून काम पाहतो. त्याची नेमणूक केंद्र सरकारमार्फत पाच वर्षांसाठी केली जाते. ‘आरबीआय’चे पहिले गव्हर्नर ऑसबॉर्न अर्कल स्मिथ होते. (१ एप्रिल १९३५ ते ३० जून १९३७) तर पहिले भारतीय गव्हर्नर सी. डी. देशमुख हे होते. त्यांच्या कालखंडातच भारत-पाकिस्तान फाळणी झाली. ‘आरबीआय’चे सध्याचे गव्हर्नर शक्तीकांत दास असून ते ‘आरबीआय’चे २५ वे गव्हर्नर आहेत. त्यांच्याआधी २४वे गव्हर्नर उर्जित पटेल होते.

भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष (अकाउंटिंग ईयर) आणि भारत सरकारचे वित्त वर्ष (फायनान्शियल ईयर) 2020-21 या वर्षापासून एकच करण्याची शिफारस समितीने केली आहे.

सध्या भारतीय रिझर्व्ह बँकेचे लेखा वर्ष 1 जुलै ते 30 जून असून, वित्त वर्ष 1 एप्रिल ते 31 मार्च असे आहे. या निर्णयानुसार, दोनही वर्षे जुळविल्यास रिझर्व्ह बँकेला अंतरिम लाभांश देण्याची गरज पडणार नाही.

भारतीय रिझर्व्ह बँक (RBI) ही भारत सरकारने स्थापना केलेली व चालवलेली मध्यवर्ती पतपेढी आहे.

🔸 RBIची स्थापना दिनांक 1 एप्रिल 1935 रोजी करण्यात आली. त्याचे मुख्य कार्यालय मुंबई (महाराष्ट्र) येथे आहे. RBIचे 1949 साली भारत सरकारद्वारे राष्ट्रीयीकरण गेले आहे.

🔸 RBI वार्षिक तसेच तिमाही आर्थिकधोरण व पतधोरण जाहीर करते.

🔸 भारतीय रिझर्व बँकेचे प्रमुख उद्देश - भारतीय चलनी नोटांची छपाई गरजेनुसार करणे, भारताचा FDI प्रवाह (गंगाजळी) राखणे, भारताची आर्थिक स्थिती राखणे, भारतीय चलन आणि पत यांचे रक्षण करणे.

🔸 RBIने शैली आणि दृष्टीकोन डॉ. बाबासाहेब आंबेडकर ह्यांच्या ‘दि प्राॅब्लम ऑफ रूपी: इट्स ओरीजीन अँड इट्स सोल्यूशन’ या पुस्तकातून घेतले.

🔸 सर ओस्बॉर्न स्मिथ हे RBIचे पहिले गव्हर्नर (1 एप्रिल 1935 ते 30 जून 1937) होते. सर चिंतामण द्वारकानाथ देशमुख हे पहिले भारतीय मूल निवासी गव्हर्नर (तिसरे गव्हर्नर) दि. 11 ऑगस्ट 1943 रोजी या पदावर विराजमान झाले.

🔸 वर्तमानात, शक्तीकांत दास गव्हर्नर आहेत. बी. पी. कानुंगो, एन. एस. विश्वनाथन, महेश कुमार जैन आणि मायकल पात्रा असे चार डेप्युटी गव्हर्नर आहेत.

* ‘आरबीआय’चे चलनविषयक धोरण *
(Monetary Policy of the RBI )
‘भारतीय रिझर्व्ह बँक’ ही भारताची मध्यवर्ती बँक आहे. या बँकेच्या विविध कार्यापकी पतनियंत्रण हे एक महत्त्वाचे कार्य आहे. भारतातील व्यापारी बँकांच्या ठेवी स्वीकारणे, कर्जे देणे किंवा पतपुरवठा करणे या आपल्या व्यवहारातून रिझव्‍‌र्ह बँक पतपेढीची निर्मिती करीत असते.

देशातील पसा आणि पतपसा यांचा एकूण पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या प्रमाणात ठेवण्याची जबाबदारी रिझर्व्ह बँकेवर आहे; कारण पैसा, पतपैसा यांचा पुरवठा अर्थव्यवस्थेच्या गरजेच्या तुलनेत जास्त झाल्यास चलनवाढ आणि कमी झाल्यास चलनघट होण्याचा धोका असतो. त्यामुळेच भारतीय रिझर्व्ह बँक अधिनियम, १९३४ आणि भारतीय बँकिंग नियमन अधिनियम, १९४९ या दोन्ही कायद्यांन्वये व्यापारी बँकांच्या पतपैशावर नियंत्रण ठेवण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला प्रदान करण्यात आला. या दोन्ही कायद्यांतील तरतुदींनुसार संख्यात्मक आणि गुणात्मक पतनियंत्रण साधनांचा उपयोग रिझर्व्ह बँक करू शकते..

सर्वाधिक लोकसंख्येचे प्रथम १० देश


____________________________________
▪️1) चीन (१८.२%)

▪️2) भारत (१७.५%)

▪️3) यु.एस.ए. (४.२८%)

▪️4) इंडोनेशिया (३.४६%)

▪️5) ब्राझिल (२.७४%)

▪️6) पाकिस्तान (२.६५%)

▪️7) नायजेरिया (२.५२%)

▪️8) बांग्लादेश (२.१६%)

▪️9) रशिया (१.९२% )

▪️10) जपान (१ ६५%)

__________________________________