Ads

05 May 2020

राज्य घटनेची वैशिष्ट्ये :

a)विस्तृत लिखित राज्यघटना:

जगामध्ये दोन प्रकारच्या राज्यघटना अस्तित्वात आहेत. लिखित राज्यघटना व अलिखित राज्यघटना. अमेरिकेच्या राज्यघटनेकडे पाहिल्यास या घटनेमध्ये फक्त १४ कलमे आहेत.
मात्र भारताच्या राज्यघटनेमध्ये ८ परिशिष्टे व ३९५ कलमे होती. सध्या १२ परिशिष्टे व ४५० कलमांचा समावेश करण्यात आला आहे.

b) विविध स्त्रोतांपासून निर्मिती:

- राज्यघटना बनवत असताना इतर देशांच्या राज्यघटनांचा अभ्यास करण्यात आला.
- या राज्यघटनेवर १९३५ च्या कायद्याचा जास्त प्रमाणावर प्रभाव दिसून येतो.
- अमेरिकन राज्यघटनेवरून मुलभूत हक्क / न्यायालयीन पुनर्विलोकन या बाबींचा समावेश भारतीय राज्यघटनेत करण्यात आला.
- आयर्लंडच्या राज्यघटनेवरून मार्गदर्शक तत्वांचा स्वीकार करण्यात आला.

c) मुलभूत हक्क:

- राज्यघटनेनुसार देशातील नागरिकांना काही मुलभूत हक्क देण्यात आलेले आहेत.
- राज्यघटनेमध्ये एकूण सहा प्रकारचे मुलभूत हक्क देण्यात आले आहेत.
- मुलभूत हक्कांचा समावेश राज्यघटनेच्या तिसऱ्या विभागामध्ये करण्यात आला आहे.

d) लवचिक व ताठर राज्यघटना :

- अमेरिकन राज्यघटना ही खूपच ताठर आहे. कारण या राज्यघटनेतील कलमांमध्ये सहजासहजी बदल / दुरुस्त्या करता येत नाहीत.
- तर ब्रिटिश राज्यघटना ही खूपच लवचिक आहे.
- मात्र घटनाकर्त्यांनी या दोन्हींचा विचार करून मधला मार्ग निवडला आहे.
- काही कलमांची दुरुस्ती ही सहज करता येते तर काही कलमांच्या दुरुस्तीसाठी विशेष अशा बहुमताची गरज असते.

e) मुलभूत कर्तव्य :

- १९७६ च्या ४२ व्या घटनादुरुस्तीन्वये राज्यघटनेमध्ये एकूण ११ कर्तव्यांचा समावेश करण्यात आला आहे.
- मुलभूत कर्तव्यांचा राज्यघटनेमध्ये समावेश करण्यासाठी स्वर्ण सिंग समितीची स्थापना करण्यात आली होती.
- या समितीच्या शिफारसीनुसार राज्यघटनेमध्ये मुलभूत कर्तव्यांचा समावेश करण्यात आला.
- मात्र मुलभूत कर्तव्यांबाबत कायदेशीर बंधने घालण्यात आलेली नाहीत.
- ही केवळ आदर्शे आहेत.

f) निधर्मी राष्ट्र:

- पाकिस्तानसारखे राष्ट्र हे एक इस्लाम धर्म असणारे राष्ट्र आहे.
- मात्र भारतामध्ये वेगवेगळ्या धर्माचे लोक राहतात. कोणत्या एका धर्माला जास्त महत्व न देता सर्वांना समानता देण्यात आली आहे.
- सार्वजनिक सुव्यवस्था, नितीमत्ता, आरोग्य यांना बाधा न आणता सर्वांना धार्मिक आचरण करण्याचा अधिकार देण्यात आला आहे.
- अल्पसंख्यांकांना शिक्षण संस्था स्थापण्याचा व चालवण्याचा अधिकार देण्यात आला आहे.

g) मार्गदर्शक तत्व:

- घटनेच्या चौथ्या भागामध्ये मार्गदर्शक तत्वांचा समावेश करण्यात आला आहे.
- शासनाने आपला राज्यकारभार कोणत्या उद्देशासाठी करावा- हे स्पष्ट करणारी मार्गदर्शक तत्वे घटनेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहेत.
- ही मार्गदर्शक तत्वे- राजकीय, सामाजिक, आर्थिक, मानवहित, आरोग्य यासंबंधी आहेत.
- या मार्गदर्शक तत्वांची अंमलबजावणी कशी होते, त्यावरून त्या राज्याच्या शासनाच्या कार्याचे मूल्यमापन होत असते.

h) एकेरी नागरिकत्व :

- अमेरिकेमध्ये संघाचे व राज्याचे असे वेगवेगळे नागरिकत्व दिले जाते.
- भारतामध्येही अनेक राज्य अस्तित्वात आहेत, मात्र या प्रत्येक राज्यांना वेगवेगळे नागरिकत्व न देता सर्वांसाठी एकच (एकेरी) नागरिकत्व देण्यात आले आहे.

i) स्वतंत्र व एकेरी न्यायव्यवस्था :

- संपूर्ण देशासाठी एकसूत्री न्यायव्यवस्था निर्माण करण्यात आली आहे.
- सर्व देशासाठी सर्वोच्च न्यायालय हे अंतिम न्यायालय आहे. (apex court)

j)मतदानाचा अधिकार :

- पहिल्यांदा २१ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला होता.
- मात्र १९८९ मध्ये ५१ व्या घटनादुरुस्तीनुसार १८ वर्ष पूर्ण झालेल्या व्यक्तींना मतदानाचा अधिकार देण्यात आला आहे.

k)आणीबाणीची तरतूद :

- काही घटनात्मक पेचप्रसंगाच्या वेळी देशामध्ये गोंधळ निर्माण होण्याची शक्यता असते, अशा वेळी आणीबाणी लागू केली जाते. हे आणीबाणी लागू करण्याचे अधिकार राष्ट्रपतींना देण्यात आले आहेत.
- या आणीबाणीच्या काळामध्ये केंद्र हे प्रबळ बनते. राज्याचे सर्व अधिकार केंद्राकडे जात असतात.

l) त्रि–स्तरीय सरकारची स्थापना:

- केंद्र, राज्य, पंचायत राज
- यानुसार पूर्ण देशासाठी केंद्र सरकार अस्तित्वात असून, ही एक उच्च अशी शासनव्यवस्था आहे.
- प्रत्येक राज्यासाठी राज्य सरकारची निर्मिती करण्यात आली आहे.
- तर जिल्हा- तालुका- ग्राम( खेडे) यासाठी पंचायतराजची स्थापना करण्यात आली आहे.

राज्यघटनेविषयीचे काही दोष:

1. घटना निर्मिती करण्यासाठी जी घटना परिषद बनवण्यात आली होती, त्यातील सदस्यांची निवड ही प्रत्यक्ष मतदानाद्वारे करण्यात आली नव्हती.
2. लॉर्ड विस्काऊट सायमन व विन्स्टन चर्चिलच्या मते, “ भारतीय राज्यघटना ही हिंदू लोकांपासून बनवण्यात आलेली आहे.”
3. काहींच्या मते, “ घटना परिषद ही वकील- राजकीय व्यक्तींची बनलेली होती.”

पोलीस भरती प्रश्नसंच


▶️महाराष्ट्रातील कुस्तीगिरांचा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर — कोल्हापूर

▶️महाराष्ट्रातील लेण्यांचा जिल्हा म्हणून ओळख असलेला जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर  — औरंगाबाद

▶️विदर्भातील ............. जिल्ह्यात मोठय़ा संख्येने तलाव आहे.?
👉🏿 उत्तर —  गोंदिया

▶️महाराष्ट्रात मोठय़ा प्रमाणात मासेमारी ............. या जिल्ह्यात चालते.
👉🏿उत्तर — रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रातील तलावांचा जिल्हा म्हणून कोणता जिल्हा प्रसिद्ध आहे ?
👉🏿उत्तर — गोंदिया

▶️महाराष्ट्राचे पठार ............. या खडकाने बनलेले आहे.
👉🏿. उत्तर — बेसॉल्ट

▶️महाराष्ट्रातील पश्चिम घाटाला .....................म्हणून ओळखतात.
👉🏿 उत्तर — सह्याद्री

▶️महाराष्ट्रातील ............... जिल्हा आकाराने लहान पण लोकसंख्येने मोठा आहे.
👉🏿उत्तर — मुंबई

▶️ महाराष्ट्रातील ............... या जिल्ह्यात पुरुषांपेक्षा स्त्रियांचे प्रमाण अधिक आहे.
👉🏿. उत्तर — रत्नागिरी

▶️ महाराष्ट्रात ................... या जिल्ह्यात लोकसंख्येची घनता सर्वात कमी आहे.
👉🏿उत्तर — गडचिरोली

▶️ महाराष्ट्रातील १०० टक्के साक्षर जिल्हा कोणता ?

👉🏿 उत्तर — सिंधुदुर्ग, तालुका पन्हाळा.

▶️महाराष्ट्रात संपूर्ण विद्युतीकरण झालेला प्रथम जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर — वर्धा.

▶️महाराष्ट्रातील पहिला सहकारी साखर कारखाना कोणता आणि कोणत्या जिल्ह्यात स्थापन झाला ?

👉🏿 उत्तर —  प्रवरानगर, जिल्हा अहमदनगर.

▶️ भारतात सर्वात जास्त कापड गिरण्या कोणत्या राज्यात आहेत ?

👉🏿उत्तर — महाराष्ट्रात

▶️ महाराष्ट्रात चलनी नोटांचा कारखाना कोणत्या जिल्यात आहे ?

👉🏿 उत्तर — नाशिक

▶️ महाराष्ट्रातील सर्वात जास्त अवर्षणग्रस्त जिल्हा कोणता ?

👉🏿उत्तर — अहमदनगर.

▶️ भारतातील पहिले पक्षी अभयारण्य कर्नाळा हे कोणत्या जिल्ह्यात आहे ?

👉🏿 उत्तर —  रायगड

▶️महाराष्ट्रात सर्वाधिक पाऊस ................ येथे पडतो.

👉🏿उत्तर — आंबोली (सिंधुदुर्ग)

▶️ पढरपूर हे शहर .............. या नदीकाठी आहे. आणि त्या नदीलाच महाराष्ट्राची काशी म्हणतात.

👉🏿उत्तर — भीमा

▶️कोणत्या नदीला दक्षिण भारताची गंगा म्हणतात ?

▶️जगप्रसिद्ध लोणार सरोवर हे कोणत्या जिल्ह्यात आहे ? 
👉🏿
उत्तर — बुलढाणा

▶️बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणत्या जिल्ह्यास ओळखले जाते ?

👉🏿औरंगाबाद

▶️ पणे जिल्ह्यातील हे शहर बटाटय़ाच्या व्यापारासाठी प्रसिद्ध आहे.

👉🏿उत्तर - जुन्नर

भुगोल प्रश्नसंच


०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

04 May 2020

सरावासाठी प्रश्नसंच


1) रस्त्याच्या बाजूने काही माणसे चालली आहेत'

या वाक्यात आलेल्या विशेषणाच्या बाबतीत कोणते विधान बरोबर आहे ?

A]  हे गणनावाचक संख्याविशेषण आहे.

B] हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे.

C] हे आवृत्तिवाचक संख्याविशेषण आहे.

D]  हे अनिश्चित संख्याविशेषण आहे.✔️

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

2) रचनेनुसार संयुक्त वाक्य कोणते ? अचूक पर्याय निवडा :

(a) ती चार वाजता, एस.टी. ने, पुण्यास, न सांगता गेली.

(b) आधी नमन गणरायाला, नंतर देवाधिदेवांना.

(c) प्रसंग कोणताही असला, तरी संतांची चित्तवृत्ती बदलत नाही.

(d) मुलांना समजून घ्या, मग बघा ती मोठ्यांचे कसे ऐकतात.

पर्यायी उत्तरे :

A] फक्त (a) व (b) पर्याय बरोबर आहेत.

B]  फक्त (b) व (c) पर्याय बरोबर आहेत.

C] फक्त (b) व (d) पर्याय बरोबर आहेत.✔️

D]  फक्त (a) व (c) पर्याय बरोबर आहेत.

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

3) पालथ्या घड्यावर पाणी या म्हणीच्या समानार्थी असलेली अचूक म्हण कोणती? अचूक पर्याय निवडा.

A] कुत्र्याचे शेपूट वाकडे ते वाकडेच.✔️

B]  रात्रभर वाचली गीता कालचा गोंधळ बरा होता.

C]  शहाण्याला शब्दांचा मार.

D] गाढवाला गुळाची चव काय ?

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

4) अठरा गुणांचा खंडोबा या वाक्प्रचाराच्या विरुद्ध अर्थाचा वाक्प्रचार कोणता ? अचूक पर्याय निवडा,

A] पोटाचा पाईक

B] अल्लाची गाय✔️

C] उफारट्या काळजाचा

D]  उंटावरचा शहाणा

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

5) तपोबल, मनोरम, रजोगुण हे शब्द कोणत्या संधीची उदाहरणे आहेत. अचूक पर्याय निवडा :

A]  स्वरसंधी

B]  व्यंजनसंधी

C]  विसर्गसंधी✔️

D] पूर्णसंधी

〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

6) य, र, ल, व यांची उच्चारस्थाने अनुक्रमे ___ या स्वरांच्या उच्चारस्थानांसारखी आहेत.

A] इ, ऊ, ऋ, ल

B]  ई, उ, ऋ, ल

C]  इ, उ, ऋ, ल✔️

D] ई, ऊ, ऋ, लु

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

7) मराठी शब्दातील अन्त (शेवटचा वर्ण) 'अ' हा निभृत म्हणजे अर्धवट किंवा अपूर्ण उच्चारला जातो. याप्रमाणे कोणता शब्द योग्य नाही ?

A] पान

B] जवळ

C]  कपाट

D] करवत✔️

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

8) खालीलपैकी 'शुद्ध शब्दयोगी अव्यय ओळखा :

A] देवळच्या बाहेर

B] वृक्षाखाली

C] शहरोशहरी

D] गायसुद्धा✔️

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

9)स्वर्गवास, पोटशूळ, पाणकोंबडा, घरधंदा, कलाकुशल या सामासिक शब्दांचा समास कोणता ?

A]अलुक् तत्पुरुष

B] उपपद तत्पुरुष

C] सप्तमी तत्पुरुष ✔️

D]  चतुर्थी तत्पुरुष

〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️

10) पुढील विधाने वाचा :

(a) गंगा, सिंधू, ताप ही नद्यांची नावे विशेषनामे आहेत. परंतु नदी हे सामान्यनाम असून जातीवाचक आहे.

(b) स्वाधीन, हिमांशू, लक्ष्मण ही मुलांची नावे विशेषनामे नाहीत. परंतु मुलगा हे सामान्यनाम असून ते व्यक्तिवाचक आहे.

(c) सामान्यनामाचे अनेकवचन होत नाहीं.

(d) विशेषनामाचे अनेकवचन होते.

पर्यायी उत्तरे :

A] विधान (a) व (b) चूक

B] विधान (b), (c), (d) चूक✔️

C] सर्व बरोबर

D] फक्त (a) चूक

03 May 2020

राज्यात १३ हजार उद्योगांत उत्पादन सुरू.

🔰मुंबई : टाळेबंदीच्या काळात उद्योग-व्यवसायाला काही भागात परवानगी देण्याच्या धोरणाला आता चांगला प्रतिसाद मिळत असून ३० एप्रिलअखेर राज्यात एकू ण १३ हजार ५६० उद्योगांमध्ये उत्पादन सुरू होऊन एक लाख ३९ हजार कामगार कामावर रूजू झाल्याने अर्थचक्र  पुन्हा गती घेत आहे. त्यामुळे उद्योग क्षेत्रात विश्वासाचे वातावरण तयार होत असून पुढील काही दिवसांत ही संख्या वाढण्याची उद्योग विभागाची अपेक्षा आहे.

🔰देशात टाळेबंदीच्या काळात काही प्रमाणात उद्योग-व्यवसाय सुरू करण्याच्या धोरणानुसार २० एप्रिलपासून परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. त्यानुसार राज्य सरकारच्या उद्योग विभागाने आणि महाराष्ट्र राज्य औद्योगिक विकास महामंडळाने कारखाने सुरू करण्यासाठीच्या परवानग्यांची प्रणाली सुरू के ली.

🔰पहिले दोन-तीन दिवस काही तांत्रिक अडचणी, स्थानिक प्रशासनाच्या परवानग्या मिळण्यात अडचण असे अडथळे आले. पण नंतर हळूहळू परिस्थिती सुधारत आहे.

भूगोल प्रश्नसंच

◾️ महाराष्ट्रच्या उत्तर सीमेवर कोणता डोंगर स्थित आहे ?

1) सह्याद्री

2) सातपुडा ✅

3) मेळघाट

4) सातमाळा


◾️ मांजरा पठार कुठल्या भागात आहे ?

1) मराठवाडा ✅

2) पश्चिम महाराष्ट्र

3) विदर्भ

4) खानदेश


◾️ भामरागड टेकडया खालीलपैकी कुठे स्थित आहेत  ?

1) औरंगाबाद

2) गडचिरोली ✅

3) चंद्रपूर

4) नंदुरबार


◾️ खालीलपैकी कोणते शिखर अमरावती जिल्ह्यातील सर्वोच्च शिखर आहे.

1) वैराट ✅

2) अस्तंभा

3) हनुमान

4) जळगाव


◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्यात सर्वात कमी वनक्षेत्र आहे ?

A)  लातूर✅

B)  मुंबई उपनगर

C)  उस्मानाबाद

D) जालना

◾️खालील पैकी कोणत्या एका गटातील नद्या पश्चिमधाटात उगम पावून पश्चिमेकडे जातात ?

A)  तापी, सावित्री, काळू

B) सावित्री, काळू, उल्हास✅

C) काळू, गिरना, कुंडळिका

D)  सावित्री, उल्हास, गोदावरी

◾️खालील पैकी कुठले राष्ट्रीय उद्यान विदर्भ विभागात मोडत नाही ?

A)  नवेगाव

B)  गुगामाळ

C)  पेंच

D)  वरील पैकी कोणतेही नाही✅

◾️महाराष्ट्रातील कमी पावसाचा जिल्हा कोणता ?

A)  नाशीक जिल्हा

B) पुणे जिल्हा

C) चंद्रपूर जिल्हा

D)  यापैकी नाही✅

◾️खालील पैकी कुठल्या जिल्ह्याचा चांदोली राष्ट्रीय उद्यानामध्ये समावेश होत नाही ?

A)  सांगली

B)  सातारा

C) रायगड✅

D) रत्नागिरी

◾️गोदावरी व भीमा नद्यांची खोरी कोणत्या पर्वत रांगेने वेगळी झाली आहे ?

A) सातमाळा

B) अजिंठा

C)  हरीश्चंद्र-बालाघाट✅

D) गावीलगड

कोकणातील प्राकृतिक रचना

कोकण प्रदेश हा सलग मैदानी नाही.
हा भाग डोंगर दर्‍यांनी व्यापलेला आहे. परंतु कमी उंचीचा सखल भाग आहे.
किनार्‍य पासून पूर्वीकडे सखल भागाची समुद्र सपाटीपासून ऊंची सुमारे 15 मीटर इतकीच आहे.
कींनार्‍यापासून पूर्वीकडे सह्याद्रीच्या पायथ्याशी ही ऊंची सुमारे 250 मी. पर्यंतच वाढते.
उतार पूर्व-पश्चिम दिशेस ‘मंद’ स्वरूपाचा आहे.
या प्रदेशात समुद्राकडील बाजूस सागरी लाटांच्या खणन कार्याने व संचयन कार्याने वेगवेगळ्या प्रकारची तयार झालेली ‘भुरुपे’ आढळतात.

उदा . सागरी गुहा, स्तंभ, आखाते, पुळणे, वाळूचे दांडे इ.

◾️कोकणचे उपविभाग ◾️
1.उत्तर कोकण – ठाणे, मुंबई शहर, मुंबई उपनगर, रायगड.
हा भाग सखल, सपाट, व कमी अबडधोबड आहे.
ओद्योगिकदृष्ट्या प्रगत.
लोकसंख्येची घनता अधिक.
नागरी लोकसंख्या जास्त.
दक्षिण कोकण – रत्नागिरी, सिंधुदुर्ग
हा भाग खडकाळ व अबडधोबड आहे.
ओद्योंगिकदृष्ट्या अप्रगत.
लोकसंख्येची घनता कमी.
पारंपरिक व्यवसाय.
खनिज संपत्तीच्या दृष्टीने महत्वाचे.

◾️समुद्रसपाटीपासूनच्या उंचींनुसार कोकणचे आणखी दोन भाग पडतात.

1. खलाटी(पश्चिम कोकण) : समुद्र किनार्‍याला लागून असलेला कमी उंचीचा प्रदेश म्हणजे ‘खलाटी’ होय. या भागात गालाची चिंचोळी मैदाने आढळतात.

या भागात मोठया प्रमाणात नारळाच्या बागा आहेत.

2. वलाटी(पूर्व कोकण) : खलाटीच्या पूर्वेस असलेल्या सह्याद्रीच्या पायथ्यापर्यंतचा कमी-अधिक उंचीच्या डोंगराळ व टेकड्यांनी व्यापलेल्या तुलनात्मक उंच प्रदेश

म्हणजेच ‘वलाटी’ होय. हा भाग फलोत्पादांनाच्या दृष्टीने महत्वाचा ठरतो. डोंगर उतारवर भाताचे पीक घेतले जाते.

◾️खाडी - भारतीचे पाणी नदीच्या मुखात जेथपर्यंत आत शिरते त्या भागाला खाडी म्हणतात.

    🔹 ठाणे -  दाटीवरे, डहाणू, वसई, मनोरी, व ठाणे

🔹मुंबई उपनगर : मालाड, माहीम

🔹मुंबई : माहीम

🔹रायगड : पनवे, उरण, धरमतर, रोहा, राजापुरी, बाणकोट

🔹रत्नागिरी : दाभोळ, जयगड, विजयदुर्ग

🔹सिंधुदुर्ग : देवगड, कालवली, कर्ली, तेरेखोल

◾️पुळनी -  समुद्र किनार्‍याजवळ सागरी लाटांच्या संचयन कार्यामुळे उथळ कींनार्‍यावर तयार होणार्‍या वाळूच्या पट्टयाना ‘पुळन’ असे म्हणतात.

🔹मुंबई उपनगर : जिहू बीच

🔹मुंबई शहर

🔹दादर, गिरगाव

🔹रत्नागिरी : गणपतीपुळे, हर्न, गुहागर

🔹सिंधुदुर्ग : मालवनजवळ तरकर्ली, शिरोड, दापोली, उमादा

🔹रायगड : अलिबाग, मुरुड-जंजिरा, श्रीवर्धन

◾️वाळूचे दांडे : सागरी लाटांमुळे उथळ कींनार्‍यावर ‘वाळूचे दांडे’ तयार होतात.

खरदांडा(रायगड)

◾️ बेटे : मुंबई : मुंबई बेट

🔹रायगड : धारपूरी (एलिफंटा केव्ह)

🔹अलिबाग : खांदेरी, उंदेरी

🔹सिंधुदुर्ग : कुरटे (सिंधुदुर्ग किल्ला)

🔹मुंबई उपनगर : साष्टी, अंजदिव


◾️बंदरे : महाराष्ट्राच्या किनारपट्टीला लहानमोठे 49 बंदरे आहेत.

🔹मुंबई = मुंबई, ठाणे = अलिबाग, न्हावाशेवा(JNPT),

🔹रत्नागिरी = हर्न, जयगड = रत्नागिरी ,

🔹सिंधुदुर्ग = मालवण, वेंगुले, रेड्डी

◾️खनिजे : बॉक्साईट = ठाणे,

🔹म्यंगेणीज = सिंधदुर्ग,

🔹क्रोंमाईत = सिंधुदुर्ग, रत्नागिरी, लोह व

🔹जिप्सम = रत्नागिरी

राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ऐवजी २०२३मध्ये

- राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा २०२१ ऐवजी २०२३ मध्ये आयोजित करण्याचा निर्णय राष्ट्रकुल क्रीडा महासंघाने घेतला आहे. २०२१ मध्ये राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धेदरम्यानच टोक्यो ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा होणार आहे.

- करोनामुळे टोक्यो ऑलिम्पिक एक वर्ष लांबणीवर टाकण्यात आले आहे. या कारणास्तव राष्ट्रकुल युवा क्रीडा स्पर्धा दोन वर्षे लांबणीवर टाकण्यात आली.

- ‘‘राष्ट्रकुल क्रीडा महासंघाच्या संचालक मंडळाने २०२१ ऐवजी ही स्पर्धा २०२३ मध्ये घेण्याचे ठरवले आहे. ही स्पर्धा पुढील वर्षी होणार होती तेव्हा त्याच दरम्यान टोक्यो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात आले आहे.

-  या स्थितीत पुढील वर्षी स्पर्धा घेणे शक्य नाही,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले.

- ही स्पर्धा नियोजित वेळापत्रकानुसार १ ऑगस्ट ते ७ ऑगस्टदरम्यान त्रिनिदाद आणि टोबॅगो येथे होणार होती.

- ‘‘२०२३ मध्ये आता ही स्पर्धा होणार असली तरी यजमान म्हणून पहिली पसंती त्रिनिदाद आणि टोबॅगोलाच असणार आहे,’’ असे राष्ट्रकुल क्रीडा महासंघाकडून स्पष्ट करण्यात आले
--------------------------------------------------

1833 चा तिसरा सनदी कायदा

👉 कंपनीची मुदत 20 वर्षाने वाढविली.

👉 कंपनीची व्यापारी मक्तेदारी पूर्णपणे संपुष्टात आणली (चाची संपुष्टात i.e. चहा आणि चीन) म्हणजेच इतर ब्रिटिशांना भारतात व्यापार करण्याची परवानगी मिळाली.

👉 आता कंपनी फक्त प्रशासकीय कार्य करणार.

👉 बंगालचा गव्हर्नर जनरल हा भारताचा गव्हर्नर जनरल बनला. (पहिला - लॉर्ड विलयम बेंटिंग)

👉 मुंबई व मद्रास च्या गव्हर्नर चे कायदे करण्याचे अधिकार काढून घेतले.

👉 कोणत्याही भारतीयाला कंपनीत कोणतेही पद धारण करण्यास बंदी असणार नाही. (संचालक मंडळाच्या विरोधानंतर ही तरतूद रद्द केली)

👉 गुलामांची पद्धत नष्ट करण्याचा भारत सरकारला आदेश.

  〰〰〰〰〰〰〰〰〰〰〰

भारतीय संघाने गमावले कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान.

🔰आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी)  शुक्रवारी नवी क्रमवारी जाहीर केली  यानुसार भारतीय संघाला कसोटी क्रिकेटमधील आपले अव्वल स्थान गमवावे लागले.

🔰नव्या क्रमवारीनुसार आता ऑस्ट्रेलियाने अव्वल स्थान पटकावले असून भारतीय संघाची थेट तिसऱ्या स्थानी घसरण झाली आहे. तसेच न्यूझीलंड संघाने दुसरे स्थान मिळवले आहे.तर सुमारे चार वर्षांनंतर भारताने कसोटी क्रिकेटमधील अव्वल स्थान गमावले.आयसीसी क्रमवारी नियमानुसार वार्षिक क्रमवारी जाहीर करताना यामध्ये 2016-17 सालच्या कामगिरीचा समावेश करण्यात आलेला नाही.

🔰त्यामुळे भारताची तिसर्या स्थानी घसरण झाली असून, 2016 सालानंतर भारताला पहिल्यांदाच कसोटी क्रिकेटमधील पहिले स्थान गमवावे  लागले.त्याचवेळी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेतील अव्वल स्थान मात्र भारताने अद्याप कायम राखले आहे.

चंद्रावरून पडलेल्या उल्केचा होणार लिलाव.

🔰ख्रिस्तीज् या जगविख्यात लिलाव कंपनीने चंद्रावरून पृथ्वीवर पडलेल्या एका उल्केचा खासगी लिलाव करण्यात येणार असल्याचे जाहीर केले आहे.
13.5 किग्रॅ वजनाची ही उल्का साधारणपणे फूटबॉलएवढी मोठी असून, तिची 20 लाख पौंड (18.96 कोटी रुपये) एवढी राखीव किंमत ठेवण्यात आली आहे.

🔰पृथ्वीवर सापडलेल्या चंद्रावरील सर्वात मोठ्या उल्कांपैकी ही एक असून, ती आफ्रिकेतील सहारा वाळवंटात सापडली होती. ती ज्याला सापडली त्याच्यापासून अनेकांना विकली जाऊन आता ती लिलावासाठी उपलब्ध झाली आहे, असे ख्रिस्तीजकडून सांगण्यात आले.
एखादा लघुग्रह किंवा धुमकेतू आदळून चंद्राच्या पृष्ठभागाचा तुटलेला हा तुकडा पृथ्वीवर पडला  असावा, असे मानले जाते.

🔰अमेरिकेच्या ‘नासा’ने चंद्रावरील दगडांचे जे नमुने आणले आहेत त्यांच्याशी तुलना करून ही उल्काही चंद्रावरचीच असल्याची खात्री करून घेण्यात आल्याचेही या लिलाव कंपनीचे म्हणणे आहे.