परिश्रम = कष्ट, मेहनत
पती = नवरा, वर
पत्र = टपाल
पहाट = उषा
परीक्षा = कसोटी
पर्वा = चिंता, काळजी
पर्वत = डोंगर, गिरी, अचल
पक्षी = पाखरू, खग, विहंग
प्रकाश = उजेड
प्रवास = सफर, फेरफटका, पर्यटन
प्रवासी = वाटसरू
प्रजा = लोक
प्रत - नक्कल
प्रदेश = प्रांत
प्रवास = यात्रा
प्राण = जीव
पान = पत्र, पत्ता
प्रासाद = वाडा
पाखरू = पक्षी
पाऊल = पाय, चरण
पाऊलवाट = पायवाट
प्रार्थना = स्तवन
प्रामाणिकपणा = इमानदारी
प्रारंभ = सुरुवात, आरंभ
प्रेम = प्रीती, माया, जिव्हाळा
प्रोत्साहन = उत्तेजन
पाऊस = वर्षा, पर्जन्य
पाणी = जल, नीर, तोय, उदक
पिशवी = थैली
पुस्तक = ग्रंथ
पुतळा = प्रतिमा, बाहुले
पुरातन = प्राचीन
पृथ्वी = धरणी, जमीन, वसुंधरा, वसुधा
फलक = फळा
फांदी शाखा
फूल = पुष्प, सुमन, कुसुम
बदल = फेरफार, कलाटणी
बर्फ = हिम
बहीण = भगिनी
बक्षीस = पारितोषिक, पुरस्कार
बाग = बगीचा, उद्यान, वाटिका
बासरी = पावा
बेत = योजना
बाळ = बालक
बाप = पिता, वडील, जनक
बादशाहा = सम्राट
बुद्धी = मती
ब्रीद = बाणा
भरवसा = विश्वास
भरारी = झेप, उड्डाण
भव्य = टोलेजंग
भाट = स्तुतिपाठक
भारती = भाषा, वैखरी
भांडण = तंटा
भाळ = कपाळ
भाऊ = बंधू, सहोदर
भेसळ = मिलावट
भेदभाव = फरक
भोजन = जेवण
मदत = साहाय्य
ममता = माया, जिव्हाळा, वात्सल्य
मन = चित्त, अंतःकरण
मजूर = कामगार
महिना = मास
महिला = स्त्री, बाई, ललना
मजूर = कामगार
मस्तक = डोके, शीर, माथा
मानवता = माणुसकी
मान = गळा
मंगल = पवित्र
मंदिर = देऊळ, देवालय
मार्ग = रस्ता, वाट
म्होरक्या = पुढारी, नेता
मित्र = दोस्त, सोबती, सखा, सवंगडी
मिष्टान्न = गोडधोड
मुलगा = पुत्र, सुत, तनय
मुलगी = कन्या, तनया
मुद्रा = चेहरा, मुख, तोंड, वदन
मुख = तोंड, चेहरा
मुलुख = प्रदेश, प्रांत, परगणा
मेहनत = कष्ट, श्रम, परिश्रम
मैत्री = दोस्ती
मौज = मजा, गंमत
यश = सफलता
युक्ती = विचार, शक्कल
युद्ध = लढाई, संग्राम, लढा, समर
योद्धा = लढवय्या
रक्त = रुधिर
रणांगण = रणभूमी, समरांगण
र्हास = हानी
राग = क्रोध, संताप, चीड
राजा = नरेश, नृप
राष्ट्र = देश
रांग = ओळ
रात्र = निशा, रजनी, यामिनी
रान = वन, जंगल, अरण्य, कानन
रूप = सौंदर्य
रुबाब = ऐट, तोरा
रेखीव = सुंदर, सुबक
लग्न = विवाह, परिणय
लाट = लहर
लाज = शरम,
लोभ = हाव
वस्त्र = कपडा
वारा = वात, पवन, अनिल, मारुत, समीर, वायू
वाट = मार्ग, रस्ता
वाद्य = वाजप
वातावरण = रागरंग
वेग = गती
वेळ = समय, प्रहर
वेळू = बांबू
वेश = सोशाख
वेदना = यातना
विश्रांती = विसावा, आराम
वितरण = वाटप, वाटणी
विद्या = ज्ञान
विनंती = विनवणी
विरोध = प्रतिकार, विसंगती
विसावा = विश्रांती, आराम
विश्व = जग, दुनिया
वीज = विद्युर, सौदामिनी
वृत्ती = स्वभाव
वृद्ध = म्हातारा
वैराण = ओसाड, भकास, उजाड
वैरी = शत्रू, दुष्मन
वैषम्य = विषाद
व्यवसाय = धंदा
व्याख्यान = भाषण
शरीर = देह, तनू, काया, कुडी, अंग
शक्ती = सामर्थ्य, जोर, बळ
शर्यत = स्पर्धा, होड, चुरस
शहर = नगर
शंकर = चंद्रचूड
श्वापद = जनावर
शास्त्रज्ञ = वैज्ञानिक
शाळा = विद्यालय
शाळुंका = शिविलिंग
शेत =
शिवार, वावर, क्षेत्र
शिवार = शेत, वावर
शीण = थकवा
शील = चारित्र्य
शीतल = थंड, गार
शिक्षा = दंड, शासन
श्रम = कष्ट, मेहनत
सकाळ = प्रभात, उष:काल
सचोटी = खरेपणा
सफाई = स्वच्छता
सवलत = सूट
सजा = शिक्षा
सन्मान = आदर
संकट = आपत्ती
संधी = मोका
संत = सज्जन, साधू
संपत्ती = धन, दौलत, संपदा
सायंकाळ = संध्याकाळ
सावली = छाया
साथी = सोबती, मित्र, दोस्त, सखा
स्तुती = प्रशंसा
स्पर्धा = चुरस, शर्यत, होड, पैज
स्थान = ठिकाण, वास, ठाव
स्त्री = बाई, महिला, ललना
संध्याकाळ = सायंकाळ, सांज
स्फूर्ती = प्रेरणा
स्वच्छता = झाडलोट
सुवास = सुगंध, परिमल, दरवळ
सुंदर = सुरेख, रमणीय, मनोहर, छान
सागर = समुद्र, सिंधू, रत्नाकर, जलधी
सावली = छाया
सामर्थ्य = शक्ती, बळ
साहित्य = लिखाण
सेवा = शुश्रूषा
सिनेमा = चित्रपट, बोलपट
सिंह = केसरी, मृगराज, वनराज
सुविधा = सोय
सुगंध = सुवास, परिमळ, दरवळ
सूत = धागा, दोरा
सूर = स्वर
सूर्य = रवी, भास्कर, दिनकर, सविता
सोने = सुवर्ण, कांचन, हेम
सोहळा = समारंभ
हद्द = सीमा, शीव
हल्ला = चढाई
हळू चालणे = मंदगती
हकिकत = गोष्ट, कहाणी, कथा
हात = हस्त, कर, बाहू
हाक = साद
हित = कल्याण
हिंमत = धैर्य
हुकूमत = अधिकार
हुरूप = उत्साह
हुबेहूब = तंतोतंत
हेका = हट्ट, आग्रह
क्षमा = माफी
स्पर्धेच्या सागरात जर तुम्ही आताच उडी घेतली असेल तर, काळजी करू नका यशाचा राजमार्ग तुमच्या सोबत आहे
Ads
18 June 2020
संपूर्ण मराठी व्याकरण समानार्थी शब्द
शब्दसिद्धी
शब्द कसा तयार झाला आहे, म्हणजे सिद्ध कसा झाला आहे यालाच 'शब्दसिद्धी' असे म्हणतात.
शब्दांचे दोन प्रकार आहेत.
१) सिद्ध शब्द
२) साधित शब्द
🌷🌷१) सिद्ध शब्द :-
शब्द जसा आहे तसाच त्याचा भाषेत उपयोग केला म्हणजे त्या शब्दाला सिद्ध शब्द म्हणतात.
सिद्ध, साधित, उपसर्ग, प्रत्यय जा, ये, कर, बस, बोल, पी यासारखे मूळ धातू किंवा शब्द भाषेत असतात त्यांना सिद्ध शब्द असे म्हणतात.
उदा.
ये, जा, पी, उठ, कर, गा इ.
🌷🌷सिद्ध शब्दांचे चार प्रकार पडतात पुढीलप्रमाणे :-🌷🌷
अ) तत्सम शब्द -
जे संस्कृत शब्द मराठी भाषेत जसेच्या तसे काहीही बदल न होता आले आहेत त्यांना 'तत्सम शब्द' असे म्हणतात.
उदाहरणार्थ
कवि, मधु, गुरु, पिता, पुत्र, कन्या, वृक्ष, पुरुष, धर्म, सत्कार, समर्थन, उत्सव, पुष्प, जल, प्रीती, कर, ग्रंथ, पृथ्वी, भूगोल, विद्यवान, भगवान, परंतु, यद्यपि, यथामती, कर्ण, पर्ण, अरण्य, हस्त, मस्तक, कर्म, अग्नी, नदी, कमल इत्यादी
🌷🌷आ) तद्भव शब्द -
जे शब्द संस्कृत मधून मराठीमध्ये येताना त्यांच्या मूळ रूपात काही बदल होतो त्या शब्दांना ' तद्भव शब्द' असे म्हणतात.
उदाहरणार्थ
कान, चाक, आग, पान, विनंती, घर, पाय, भाऊ, सासू, सासरा, गाव, दुध, घास, कोवळा, ओठ, घाम, काम, इत्यादी
🌷🌷इ) देशी किंवा देशज शब्द -
महाराष्ट्रातील मूळ रहिवाशांच्या बोलीभाषेमधील वापरल्या जाणार्या शब्दांना 'देशी शब्द' असे म्हणतात.
उदाहरणार्थ
झाड, दगड, धोंडा, घोडा, डोळा, डोके, हाड, पोट, गुडघा, बोका, रेडा, बाजरी, वांगे, लुगडे, झोप, खुळा, चिमणी, ढेकुण, कंबर इत्यादी.
🌷🌷ई) परभाषीय शब्द –
संस्कृत व्यतिरिक्त इतर भाषांमधून मराठीत आलेल्या शब्दांना 'परभाषीय शब्द' असे म्हणतात.
याचे दोन उपप्रकार पडतात.
अ. परकीय किंवा विदेशी शब्द
ब. स्वदेशी शब्द (परप्रांतीय भारतीय शब्द)
🌷🌷अ) परकीय किंवा विदेशी शब्द
🌿इंग्रजी शब्द –
टेबल, पेपर, मार्क, नंबर, टीचर, सर, म्याडम, ऑफीस, ट्रेन, रेल्वे, बस, टिकीट, इयव्हर, मोटर, कडक्टर, स्टेशन, पोस्ट, कार्ड, पार्सल, नर्स, डॉक्टर, पेशंट, इंजेक्शन, हॉस्पिटल, शर्ट, पैंट, बटन, बट, बॉल, ड्रेस, ग्लास इत्यादी.
🌿पोर्तुगीज शब्द –
बटाटा, तंबाखू, पगार, बिजागरे, कोबी, हापूस, फणस इत्यादी.
🌿फारसी शब्द –
खाना, सामान, हकीकत, अत्तर, अब्रू, पेशवा, सौदागर, कामगार, गुन्हेगार, फडणवीस इत्यादी.
🌿अरबी शब्द –
अर्ज, इनाम, हुकूम, मालक, मौताज, नक्कल, जबाब, उर्फ, पैज, मजबूत, वाद, मदत, बदल इत्यादी
🌷🌷ब. स्वदेशी शब्द ( परप्रांतीय भारतीय शब्द )
🌿कानडी शब्द –
तूप, कुंची, हंडा, भांडे, अक्का, गाजर, भाकरी, अण्णा, पिशवी, खोली, बांगडी, लवंग, चाकरी, पापड, खलबत्ता, किल्ली, चिंधी, गुढी, विळी, आई, रजई, तंदूर, चिंच, खोबरे, कणीक, चिमटा, नथ इत्यादी
🌿गुजराती शब्द –
घी, दादर, शेट, दलाल, डबा, रिकामटेकडा इत्यादी
🌿तामिळी शब्द –
चिल्लीपिल्ली, सार, मठ्ठा इत्यादी
🌿तेलगु शब्द –
ताळा, शिकेकाई, अनरसा, किडूकमिडूक, बंडी, डबी इत्यादी
🌷🌷साधित शब्द 🌷🌷
सिद्ध शब्दाला म्हणजेच धातूच्या पूर्वी उपसर्ग किंवा नंतर प्रत्यय लागून 'साधित शब्द' तयार होतो.
कर यासारख्या सिद्ध धातूपासून करू, करून, कर्ता, करणारा, होकार, प्रतिकार, यासारखे शब्द बनवितात त्यांना साधित शब्द असे म्हणतात.
साधित शब्दांचे पुढील चार प्रकार पडतात.
🌷अ) उपसर्गघटित :-
मूळ शब्दाच्या मागे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही साधित शब्द बनवितात. या अक्षरांना उपसर्ग असे म्हणतात.
शब्दाच्या पूर्वी जी अक्षरे जोडली जातात त्यांना उपसर्ग असे म्हणतात तसेच अशी अक्षरे जोडून जे शब्द तयार होतात त्या शब्दांना 'उपसर्ग घटित शब्द' असे म्हणतात.
शब्दांच्या पूर्वी उपसर्ग लागून जे शब्द तयार होतात त्यांना उपसर्गघटीत शब्द असे म्हणतात.
उदाहरणार्थ
आ + हार = आहार, याचप्रमाणे विहार, परिहार, विहार, अपहार, संहार, उपहार, प्रहार, उपाहार इत्यादी
🌷🌷ब) प्रत्ययघटित शब्द :-
प्रत्ययघटीत शब्द शब्दांच्या किंवा धातूच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून काही शब्द तयार होतात अशा अक्षरांना प्रत्यय असे म्हणतात.
धातूच्या किंवा शब्दांच्या पुढे एक किंवा अधिक अक्षरे लावून प्रत्यय तयार होतात व तयार होणार्या शब्दांना 'प्रत्ययघटित शब्द' असे म्हणतात.
जन या धातूला प्रत्यय लागून जनन, जननी, जनता, जन्य यासारखे शब्द बनतात. या शब्दात न,क,ता,नी,य हे प्रत्यय होत. अशा त-हेचे प्रत्यय लागून बनलेल्या शब्दांना प्रत्ययघटीत शब्द असे म्हणतात.
उदा.
जनन, जनक, जननी, जनता, झोपाळू, ओढा
आजची प्रश्नमंजुषा
🟣 : ब्रिटीश गव्हर्नर जनरल 'मॉडर्न इंडिया मेकर' म्हणून ओळखले जातात?
1⃣ लॉर्ड कॅनिंग
2⃣ लॉर्ड डलहौसी✅✅✅
3⃣ लॉर्ड कर्झन
4⃣ लॉर्ड माउंटबॅटन
___________________________
🟤 भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे पहिले मुस्लिम अध्यक्ष कोण होते?
1⃣ मौलाना अबुल कलाम
2⃣ एम. ए. जिन्ना
3⃣ बद्रुद्दीन तायबजी✅✅✅
4⃣ रहीमतुल्ला एम सयानी
___________________________
🔴 पुढीलपैकी कोणत्या वर्षात ब्रिटीश कारभाराची राजधानी कलकत्ता ते
दिल्ली येथे स्थानांतरित झाली?
1⃣ 1911✅✅✅
2⃣ 1857
3⃣ 1905
4⃣ 1919
___________________________
🟠 खालीलपैकी कोणते कार्यक्रम-वर्ष संयोजन चुकीचे आहे?
1⃣ चौरी चौरा - 1922
2⃣ भारत सोडा - 1942
3⃣ दांडी मार्च - 1931✅✅✅
4⃣ बंगालचे विभाजन - 1905
___________________________
🟢भारत स्वातंत्र्याच्या वेळी भारतीय राष्ट्रीय कॉंग्रेसचे अध्यक्ष होते.?
1⃣ जवाहरलाल नेहरू
2⃣ राजेंद्र प्रसाद
3⃣ सी राजगोपालाचारी
4⃣ जे.बी.कृपलानी✅✅✅
___________________________
भूगोल प्रश्नसंच
🔹महाराष्ट्राचे एकूण भौगोलिक क्षेत्र किती आहे?
A. 200.60 लाख हेक्टर
B. 207.60 लाख हेक्टर
C. 307.70 लाख हेक्टर✔️✔️
D. 318.60 लाख हेक्टर
🔹कोकण रेल्वेमुळे मुंबई ते कोचीन दरम्यानचे अंतर__________ कि.मी. ने कमी झाले.
A. 513 ✔️✔️
B. 213
C. 102
D. 302
🔹 खालीलपैकी कोणती नदी गोदावरी खो-याचा भाग नाही ?
A. तेरणा
B. प्रवरा
C. मांजरा
D. भातसा ✔️✔️
🔹___________ गुजरात राज्यातील प्रमुख बंदर आहे.
A. कांडला ✔️✔️
B. कोची
C. मांडवी
D. वरीलपैकी नाही
🔹जागतिक वारसा शिल्पस्थानात _____ या लेणीची नोंद केलेली आहे.
A. अजंठा लेणी ✔️✔️
B. कार्ले लेणी
C. पितळखोरा लेणी
D. बेडसा लेणी
🔹खालीलपैकी कोणत्या राज्यात तलाव सिंचन जास्त आहे?
A. आंध्र प्रदेश ✔️✔️
B. महाराष्ट्
C. मध्य प्रदेश
D. गुजरात
🔹गोमित, पारधी, भील्ल या अनुसूचित जमाती खालीलपैकी प्रामुख्याने कोणत्या जिल्ह्यात आढळतात?
A. अकोला
B. बुलढाणा
C. धुळे ✔️✔️
D. ठाणे
🔹2011 च्या जनगणनेनुसार अनुसूचित जातीची लोकसंख्या महाराष्ट्रात ________ जिल्ह्यात सर्वाधिक आढळते.
A. नाशिक
B. औरंगाबाद
C. पुणे ✔️✔️
D. सोलापूर
🔹महाराष्ट्राचा प्रमुख जलविभाजक कोणता?
A. सह्याद्रि पर्वत ✔️✔️
B. सातपुडा पर्वत
C. निलगिरी पर्वत
D. अरवली पर्वत
🔹महाराष्ट्रातील पहिली अणुभट्टी _____ नावाने ओळखली जाते.
A. सायरस
B. ध्रुव
C. पूर्णिमा
D. अप्सरा✔️✔️
____________________________________
वाचा :- 20 महत्त्वाचे सराव प्रश्न उत्तरे
● आशियाचा नोबेल पुरस्कार म्हणून कोणता पुरस्कार समजला जातो?
: रॅमन मॅग्सेसे अवॉर्ड
● वायूच्या वितरणासाठी भारतातले पहिले व्यापार मंच कोणत्या मंडळाने तयार केले?
: इंडियन एनर्जी एक्सचेंज
● SAUNI योजना कोणत्या राज्यात राबविली जात आहे?
: गुजरात
● वृद्ध लोकांसोबत गैरवर्तन विषयक जागतिक जागृती दिनाची यंदाची (2020) संकल्पना काय होती?
: “लिफ्टिंग अप व्हॉईसेस”
● भारतीय निर्यात-आयात बँकेनी (EXIM बँक) कोणत्या देशाला 215.68 दशलक्ष डॉलर इतक्या पतमर्यादेची (LOC) घोषणा केली?
: मलावी (आफ्रिका)
● संयुक्त राष्ट्रसंघाच्या नेतृत्वात ‘कुटुंबाला रक्कम पाठवणे विषयी आंतरराष्ट्रीय दिन’ कधी पाळला जातो?
: 16 जून
● कोणत्या देशात “SIPRI ईयरबुक 2020” हा अहवाल प्रकाशित करणारी संस्था आहे?
: स्वीडन
● यंदाची (2020) ‘जागतिक बालमजुरी विरोधी दिन’ची संकल्पना काय होती?
: कोविड-19: प्रोटेक्ट चिल्ड्रेन फ्रॉम चाइल्ड लेबर, नाऊ मोअर दॅन एव्हर
● ‘IoT: ड्राईव्हिंग द पेटंट ग्रोथ स्टोरी इन इंडिया’ ही शीर्षक असलेला अहवाल कोणत्या संस्थेनी प्रकाशित केला?
: राष्ट्रीय सॉफ्टवेयर व सेवा कंपनी संघ (NASSCOM)
● यंदा (2020) जागतिक खाद्यान्न सुरक्षा दिनाची संकल्पना काय आहे?
: फूड सेफ्टी, एव्रीवन्स बिझनेस
● ‘EY वर्ल्ड एंत्रेप्रेन्योर ऑफ द इयर 2020’ हा सन्मान कोणाला दिला गेला?
: किरण मजुमदार शॉ
● मातृत्व वय, मातामृत्यू दर याच्या संबंधित बाबी तपासण्यासाठी नेमलेल्या कृती दलाचे अध्यक्ष कोण आहेत?
: जया जेटली
● BAFTA (ब्रिटीश अॅकॅडमी ऑफ फिल्म अँड टेलिव्हिजन आर्ट्स) या संस्थेच्या अध्यक्षपदी कोणाची नेमणूक झाली?
: कृष्णेन्दु मजुमदार
● देशात ‘डीप स्पेस ग्राउंड स्टेशन’ उभारण्यासाठी NASA संस्थेसोबत कोणत्या देशाने भागीदारी केली?
: दक्षिण आफ्रिका
● स्वदेशी “नासॉफरेन्जियल” (NP) स्वॅब कोणत्या संस्थेनी विकसित केले?
: राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा
● डिसेंबर 2020 या महिन्यात त्याचा ‘K-FON’ नावाचा निशुल्क इंटरनेट प्रकल्प कोणते राज्य कार्यरत करणार आहे?
: केरळ
〰〰〰〰〰〰〰〰〰〰
भारतातील महत्वाचे धबधबे
१) जोग / गिरसप्पा धबधबा = कर्नाटक राज्य = शरावती नदीवर आहे.
२) हुन्ड्रु धबधबा = झारखंड राज्य = सुवर्णरेखा नदी
३) धुवाधार धबधबा = मध्यप्रदेश राज्य = नर्मदा नदी
४) चित्रकोट धबधबा = छत्तीसगड राज्य = इंद्रावती नदी
५) शिवसमुद्रपूरम धबधबा = कर्नाटक राज्य = कावेरी नदी
६) गोकाक धबधबा = कर्नाटक राज्य = घटप्रभा नदी
७) चुलीया धबधबा = मध्यप्रदेश राज्य = चंबळ नदी
८) अथिरापल्ली धबधबा = केरळ राज्य = चालकुंडी नदी
पोलीस भरती प्रश्नसंच
1. जगात सर्वात मोठी लोकशाही कोणत्या देशाची आहे?
उत्तर : भारत
2. कोणत्या देशात पहिल्यांदा पुस्तक छापले गेले?
उत्तर : चीन
3. अमेरिकेच्या कोणत्या राष्ट्राध्यक्षाने आपल्या पदाचा राजीनामा दिला होता?
उत्तर : निक्सन
4. नकुल व सहदेव कोणाचे पुत्र होते?
उत्तर : माद्री
5. मालदीव देशाच्या संसदेला काय म्हणतात?
उत्तर : मजलीस
6. कलिंग प्रदेश कोणत्या राज्याचे ऐतिहासीक नाव आहे?
उत्तर : ओडिसा
7. तुर्की या देशाची राजधानी कोणती?
उत्तर : अंकारा
8. भारतात सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म कोठे आहे?
उत्तर : खरगपूर
9. डायनामाईटचा आविष्कार कोणी केला?
उत्तर : अल्फ्रेड नोबेल
10. भारत व पाकिस्तानला विभाजित करणाऱ्या रेषेचे नाव काय आहे?
उत्तर : रेडक्लिफ रेष
11. केसरी या वर्तमानपत्राची स्थापना कोणी केली?
उत्तर : बाळ गंगाधर टिळक
12. पं. जवाहरलाल नेहरू यांचा जन्म कोणत्या तारखेस झाला होता?
उत्तर : 14 नोव्हेंबर
13. शिवनेरी किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : पुणे
14. महाराष्ट्र विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन कोठे भरते?
उत्तर : नागपूर
15. पानझडी वृक्षांची अरण्ये महाराष्ट्रात कोठे आढळतात?
उत्तर : विदर्भ
16. कोकण भागात…...या प्रकारची मृदा आढळते
उत्तर : जांभी
डब्ल्यू टी ओ
🅾डब्ल्यूटीओची सर्वोच्च निर्णय घेणारी संस्था, मंत्री परिषद ही सहसा दर दोन वर्षांनी भेटते. हे डब्ल्यूटीओच्या सर्व सदस्यांना एकत्र आणते, हे सर्व देश किंवा सीमाशुल्क संघटना आहेत.
🅾 मंत्री परिषद कोणत्याही बहुपक्षीय व्यापार करारा अंतर्गत सर्व बाबींवर निर्णय घेऊ शकते. सिंगापूरमधील उद्घाटन मंत्री परिषद आणि मध्ये कॅनकन कॉन्फरन्ससारख्या काही बैठकींमध्ये विकसनशील आणि विकसनशील अर्थव्यवस्था यांच्यातयुक्तिवादाचा समावेश होता ज्यांना कृषी अनुदानासारख्या " सिंगापूरचे मुद्दे " असे संबोधले जाते 1999 in मध्ये सिएटलकॉन्फरन्ससारख्या इतरांनी मोठ्या प्रमाणात निदर्शने केली.
🅾 द चौथ्या सेवा परिषद मध्ये दोहा 2001 मध्ये जागतिक व्यापार संघटना चीन च्या नोंद मंजूर आणि सुरू दोहा विकास फेरी करून यावेत होते जे सहाव्या जागतिक व्यापार संघटना सेवा परिषद (मध्ये हाँगकाँग ) कृषी निर्यात अनुदान टप्प्याटप्प्याने आणि अवलंब मान्य जे युरोपियन युनियन च्या सर्व काही परंतु कमीतकमी विकसनशील देशांकडून आलेल्या वस्तूंच्या शुल्कासाठी शस्त्रास्त्रांचा पुढाकार.
🅾बारावा मंत्रालयीन परिषद (MC12) मध्ये आयोजित करण्यात सेट आहे नूर-सुलतान , कझाकस्तान जून 2020 पर्यंत.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
‘IMD वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ यामध्ये भारताचा 43 वा क्रमांक.
🅾इन्स्टिट्यूट फॉर मॅनेजमेंट डेव्हलपमेंट (IMD) या संस्थेनी त्यांचा ‘वर्ल्ड कॉम्पटेटिवनेस इंडेक्स 2020’ या शीर्षकाचा वार्षिक अहवाल प्रकाशित केला आहे. या अहवालात 63 अर्थव्यवस्थांच्या कामगिरीबद्दल स्पष्टता दिली गेली आहे.
🅾कमकुवत पायाभूत सुविधा आणि शिक्षण क्षेत्रात अपर्याप्त गुंतवणूक यासारख्या काही परंपरागत धोरणांमुळे भारताला “जागतिक स्पर्धात्मकता निर्देशांक 2020” या क्रमवारीत 43 वा क्रमांक प्राप्त झाला आहे.
🅾भारतासाठी, दीर्घकालीन रोजगारात वाढ, चालू खात्यातली शिल्लक, उच्च तंत्रज्ञानाची निर्यात, परकीय चलन साठा, शिक्षणावरील सार्वजनिक खर्च, राजकीय स्थैर्य आणि एकूणच उत्पादकता या क्षेत्रांमध्ये सुधारणा नोंदविण्यात आल्या आहेत. तथापि, विनिमय दर स्थिरता, वास्तविक GDP वृद्धी, स्पर्धात्मक कायदे आणि कर यासारख्या क्षेत्रात स्थिती कमकुवत झाली आहे.
🧩इतर ठळक बाबी...
🅾या 63 अर्थव्यवस्थांच्या यादीत सिंगापूर या देशाने पहिले स्थान कायम राखले आहे.
🅾सिंगापूरच्या यशामागील घटक म्हणजे त्याची मजबूत आर्थिक कामगिरी जी भक्कम आंतरराष्ट्रीय व्यापार आणि गुंतवणूक, रोजगार आणि कामगार बाजारपेठेच्या उपायांमुळे उद्भवते.
🅾शिक्षण प्रणाली आणि दूरसंचार, इंटरनेट बँडविड्थ वेग आणि उच्च तंत्रज्ञानाची निर्यात यासारख्या तंत्रज्ञानात्मक पायाभूत सुविधांमधील स्थिर कामगिरी देखील महत्त्वपूर्ण भूमिका बजावते.
🅾सिंगापूरच्या पाठोपाठ अनुक्रमे द्वितीय ते पाचव्या क्रमांकावर, डेन्मार्क, स्वित्झर्लँड, नेदरलँड्स आणि हाँगकाँग SAR या देशांचा क्रम लागतो आहे.
🅾मध्य-पूर्व प्रदेश तेलाच्या संकटामुळे नकारात्मकपणे प्रभावित झाले आहे.
BRICS देशांमध्ये चीननंतर भारत द्वितीय क्रमांकावर आहे. त्यानंतर जागतिक यादीत रशिया 50 वा, ब्राझील 56 वा आणि दक्षिण आफ्रिका 59 व्या क्रमांकावर आहे.
🅾सर्वेक्षणात समाविष्ट केलेल्या ASEAN देशांमध्ये केवळ सिंगापूर आणि थायलंड या देशांची आरोग्यासेवा संबंधी पायाभूत सुविधांच्या परिणामकारकतेत सकारात्मक कामगिरी आहे.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा संयुक्त ‘विज्ञान दळणवळण मंच’.
🅾कार्यक्रम आणि विज्ञान संप्रेषण केंद्रित उपक्रमांच्या समन्वयासाठी कार्य करते. ही परिषद विज्ञान समजून घेणे आणि लोकांमध्ये विज्ञानाची रूची वाढविण्यासाठी प्रयत्न करीत आहे. देशभरात कार्यक्रम आयोजित करणे, देशातील विज्ञान संप्रेषण आणि विज्ञान लोकप्रिय करण्यासाठी धोरणे आणि इतर क्रियाकलापांचे आयोजन करण्याची देखील जबाबदारी आहे.
🧩पार्श्वभूम..
🅾विज्ञान दळणवळणासाठी भारताची मजबूत संघटनात्मक रचना आहे. विज्ञान दळणवळणाच्या विकासासाठी कमीतकमी पाच राष्ट्रीय संस्था कार्यरत आहेत. त्या पुढीलप्रमाणे आहेत - राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आणि सूचना स्रोत संस्था (1951), होमी भाभा विज्ञान शिक्षण केंद्र (1974), राष्ट्रीय विज्ञान वस्तुसंग्रहालय परिषद (1978), राष्ट्रीय विज्ञान व तंत्रज्ञान दळणवळण परिषद (1982), आणि विज्ञान प्रसार (1989).
🅾याव्यतिरिक्त, विविध वैज्ञानिक संस्थांचे त्यांचे विज्ञान दळणवळण विभाग आहेत. यामध्ये विज्ञान प्रसार एकक (CSIR), कृषी ज्ञान व्यवस्थापन संचालनालय (ICAR), प्रकाशने व माहिती विभाग (ICMR), जनसंपर्क संचालनालय (DRDO), जन जागरूकता विभाग (DAE), मीडिया आणि जनसंपर्क कार्यालय (ISRO), विज्ञान कक्ष, आकाशवाणी इत्यादीचा समावेश आहे.
🅾या संस्था विज्ञान दळणवळणात हातभार लावण्यासाठी आणि त्यांचे मत लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी विविध पद्धती आणि माध्यमांचा उपयोग करीत आहेत. तथापि, सामान्य धोरणे विकसित करण्यासाठी आणि व्यापक स्तरावर सर्वोत्तम पद्धतींचा अवलंब करण्यासाठी संवाद आणि एकत्रीकरणासाठी यामध्ये पुरेसा वाव आहे. देशव्यापी कार्यक्रम संयुक्तपणे आयोजित करणे आवश्यक आहे. त्यातून राष्ट्रीय विज्ञान दळणवळण आराखडा उभा होऊ शकतो.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
महाराष्ट्रातील अभयारण्ये.
🅾नरनाळा - अकोला
🅾टिपेश्वर -यवतमाळ
🅾येडशी रामलिंग - उस्मानाबाद
🅾अनेर - धुळे, नंदुरबार
🅾अंधेरी - चंद्रपूर
🅾औट्रमघाट - जळगांव
🅾कर्नाळा - रायगड
🅾कळसूबाई - अहमदनगर
🅾काटेपूर्णा - अकोला
🅾किनवट - नांदेड,यवतमाळ
🅾कोयना - सातारा
🅾कोळकाज - अमरावती
🅾गौताळा औट्रमघाट - औरंगाबाद, जळगांव
🅾चांदोली - सांगली, कोल्हापूर
🅾चपराला - गडचिरोली
🅾जायकवाडी - औरंगाबाद
🅾ढाकणा कोळकाज - अमरावती
🅾ताडोबा - चंद्रपूर
🅾तानसा - ठाणे
🅾देऊळगांव रेहेकुरी - अहमदनगर
🅾नवेगांव - भंडारा
🅾नागझिरा - भंडारा
🅾नांदूर मध्यमेश्वर -नाशिक
🅾नानज - सोलापूर
🅾पेंच - नागपूर
🅾पैनगंगा - यवतमाळ, नांदेड
🅾फणसाड - रायगड
🅾बोर - वर्धा
🅾बोरीवली(संजय गांधी) - मुंबई
🅾भिमाशंकर - पुणे, ठाणे
🅾मालवण - सिंधुदुर्ग
🅾माळढोक - अहमदनगर, सोलापूर
🅾माहीम - मुंबई
🅾मुळा-मुठा - पुणे
🅾मेळघाट - अमरावती
🅾यावल - जळगांव
🅾राधानगरी - कोल्हापूर
🅾रेहेकुरी - अहमदनगर
🅾सागरेश्वर - सांगली
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋
17 June 2020
आता भारत-जपान मिळून चंद्रावर जाणार, जाक्साने जाहीर केला कार्यक्रम.
◾️या मोहिमेतंर्गत लँडर आणि रोव्हर चंद्रावर उतरवण्याचे उद्दिष्टय आहे.
◾️जपानची अवकाश संशोधन संस्था जाक्साने ही माहिती दिली आहे.
◾️मागच्यावर्षी चांद्रयान-२ मोहिमेत भारताला फक्त लँडिंगमध्ये अपयश आले होते.
◾️विक्रम लँडरचे चंद्रावर हार्ड लँडिंग झाले होते. ते अपयश मागे सोडून भारत आता जपानच्या साथीने पुन्हा चंद्रावर झेप घेणार आहे.
◾️भारत आणि जपानची ही संयुक्त चंद्र मोहिम २०२३ नंतर पार पडणार आहे.
◾️भारताने सध्या ‘मिशन गगनयान’ या मानवी अवकाश मोहिमेकडे लक्ष केंद्रीत केले आहे.
◾️२०२२ मध्ये भारतीय अंतराळवीरांना अवकाशात पाठवण्याची योजना आहे. लँडिंग मॉडयुल आणि👍 रोव्हरची निर्मिती जाक्सा करेल तर इस्रो लँडरची सिस्टिम बनवेल. जपानमधून या यानाचे उड्डाण होणार असून एच ३ रॉकेटमधून हे यान चंद्राच्या दिशेने झेपावेल.
❣