23 October 2021

प्रश्न मंजुषा

१. देशातील कायद्यांची निर्मिती करणारी सर्वोच्च संस्था म्हणजे ..... होय

1) राज्य विधिमंडळ 

2) कार्यकारी मंडळ   

3) संसद ✓

4) न्यायमंडळ

२.  योग्य विधान ओळखा

1)कुरबुडे हा कोकण रेल्वे मार्गावरील सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे

2) पानवठ हा पूल कोकण रेल्वे मार्गावरील सर्वात उंच पूल आहे

A)1 बरोबर

B) 2 बरोबर

C) दोनीही बरोबर ✓💐🏅

D) दोनीही चूक

३. ________ याला सहकाराचा जनक मानतात.

रॉबर्ट ओवेन✓
रॉबर्ट हूक
मायकेल ओवेन
यापैकी नाही

४. आपल्या कुठल्या पुस्तकात गांधीनी क्रांतिकारकांची 'वाट चुकलेले देशभक्त' अशी संभावना केली ? 

हिंद स्वराज संघ

हिंदुस्‍थान स्‍वराज्‍य संघ

हिंद स्वराज✓.

यापैकी नाही

५. भारतातून ____ हे वृत्त जाते.

कर्कवृत्त✓✓

मकरवृत्त

विषुववृत्त

कोणतेही जात नाही

६. कर्मवीर दादासाहेब गायकवाड यांचा जन्म ...साली झाला ?

1901

1902✓✓✓

1903

1904

७. 1976 साली कोणत्या घटनादुरुस्तीने 'समाजवाद' हा शब्द संविधानाच्या सरनाम्यात घालण्यात आला ? 

..42...वी घटनादुरुस्ती ✓

८. महाराष्ट्र शासन कोणत्या शहरात 'भाषा भवन' बांधत आहे?

औरंगाबाद

नाशिक

पुणे

मुंबई✅✅

९. भारतातील पहिले उपग्रह दळणवळण केंद्र कोठे आहे?

नागपूर

आर्वी✅✅

अहमदाबाद

चंद्रपूर

१०. अयोध्या हे शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

सरस्वती

यमुना

शरयू✓

घंडक

११. प्राथमिक शिक्षणाचा मुलभूत हक्कांत समावेश २००२ सालच्या .......... घटनादुरुस्ती नुसार करण्यात आला .

....८६... व्या✅✅

१२. भारताचे पहिले उपपंतप्रधान कोण होते?

A. सरदार वल्लभभाई पटेल✓

B. जी. बी. पंत

C. जी. एल. नंदा

D. लाल बहादूर शास्त्री

१३. लोकसभेचे पिता ..... आहे.

A. अनंतसांणम

B. झिकीर हुसैन

C. बासमम

D. मावळणकर✓

१४. महाराष्ट्रात लोकसभेच्या किती जागा आहेत?

48✓✓

१५. .....ह्या भारताच्या एकमेव महिला राष्ट्रपती आहेत

प्रतिभादेवी पाटील✓

१६. महाराष्ट्रामधील राज्यसभेच्या पदांची संख्या काय आहे

19✓✓

१७. पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग

२) राजेन्द्रप्रसाद

३) मेघनाद ✓

४) नरेंद्र मोदी

१८. ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे

CFC✓

१९. युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते

2015✅✅

२०. घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?


  ब्रिटेन  ✅

〰〰〰〰〰〰〰〰〰

राष्ट्रपती बद्दल संपूर्ण माहिती


🕹भारतीय संसद ही लोकसभा व राज्यसभा व राष्ट्रपती मिळून तयार झालेली आहे.

🕹भारतीय घटनेच्या कलम 52 मध्ये भारताला एक राष्ट्रपती असेल असे स्पष्ट म्हटलेले आहे.

🕹भारतीय लोकशाही पद्धतीमध्ये दुहेरी स्थान शासन व्यवस्था दिसून येते. यामध्ये केंद्राचा कारभार हा संसदेमार्फत चालतो. तर घटक राज्याचा कारभार हा राज्य विधीमंडळामार्फत चालतो.
परंतु या दोन्ही प्रकारच्या राजकीय सत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी राष्ट्रपती हे पद संविधानाने तयार केलेले आहे.

🕹भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासन प्रमुख आहेत.
🕹देशातील सर्व राज्यकारभार हा राष्ट्रपतीच्या नावाने चालतो. संसदेचा प्रत्येक कायदा राष्ट्रपतीच्या सहिने तयार होत असतो.

🕹राष्ट्रपती हे देशाचे प्रथम नागरिक म्हणून ओळखले जातात.
🕹 राष्ट्रपतीला 26 जानेवारीच्या दिवशी मानवंदना स्वीकारण्याचा अधिकार आहे.

🕹राष्ट्रपती हे पद अतिशय जबाबदारीचे असल्यामुळे राष्ट्रपतीला काही घटनात्मक विशेष अधिकार देखील देण्यात आलेले आहेत.


🕹राष्ट्रपती हा तिन्ही दलांचा सर सेनापती असून घटक राज्याच्या राज्यकारभारावर देखील राज्यपालाच्या मार्फत त्याचे नियंत्रण असते. असे असले तरी भारताचे राष्ट्रपती हे इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेने सत्तेवर येत नाही किंवा अमेरिकेच्या राष्ट्रपतीपदाप्रमाणे भारताचे राष्ट्रपतीपद तयार केलेले नाही.

🕹अमेरिकेमध्ये राष्ट्रपती हे वास्तविक शासन प्रमुख आहे. तर भारतात राष्ट्रपती हे नामधारी शासनप्रमुख आहेत.

🕹भारताच्या राष्ट्रपतीपदाची परंपरा ही अतिशय महत्वाची आहे.

🕹भारताचे पहिले राष्ट्रपती डॉ. बाबू राजेंद्र प्रसाद तर 11 वे राष्ट्रपती के.आर. नारायणन तर बारावे राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम होते.

🕹तेराव्या राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील व चौदावे राष्ट्रपती म्हणून प्रवण मुखर्जी हे कार्यरत होते.
🕹 सध्याचे राष्ट्रपती हे रामनाथ कोविंद आहेत.

🕹 *पात्रता* –
👑भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार-

🕹ती व्यक्ती भारताची नागरिक असावी.

🕹त्या व्यक्तीने वयाची 35 वर्षे पूर्ण केली असावी.

🕹त्याचे नाव देशाच्या कोणत्याही मतदार यादीत असणे आवश्यक आहे.

🕹ती व्यक्ती लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावी.

🕹संसदेने वेळोवेळी कायदा करून विहित केलेल्या अटी त्या व्यक्तीने पूर्ण केलेल्या असाव्यात.

🕹 *अपात्रता* –
भारतीय घटना कलम 1951-56 (84-अ) च्या कलमानुसार

🕹ती व्यक्ती सरकारी नोकर असल्यास.

🕹ती व्यक्ती सरकारी लाभ प्राप्त करणारी असल्यास.

🕹ती व्यक्ती वेडी किंवा दिवाळखोर असल्यास.

🕹ती व्यक्ती न्यायालयाने एखाद्या गुन्ह्यासाठी शिक्षा सुनावलेली असल्यास.

🕹त्या व्यक्तीची परदेशाशी निष्ठा असल्यास.

🕹 *निवडणूक* :-

🕹राष्ट्रपतीपद हे अतिशय महत्वाचे असल्यामुळे भारतीय घटनेच्या कलम 54 व 55 नुसार राष्ट्रपतीच्या निवडणुकीची पद्धत ठरवून दिलेली आहे.

🕹राष्ट्रपतीची निवड ही जनतेच्या प्रतिनिधीमार्फत एकलसंक्रमणीय पद्धतीनुसार होत असते.

🕹 *कार्यकाल*
भारतीय संविधानाच्या घटना कलम 83 नुसार राष्ट्रपतीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा निश्चित केला आहे.

🕹राष्ट्रपती पदाची मुदत पाच वर्षाची असली तरी मुदतपूर्व राष्ट्रपती आपल्या पदाचा राजीनामा उपराष्ट्रपतीकडे देऊ शकतो.

🕹याशिवाय त्याने घटनेचा भंग केला असेल किंवा घटनाविरोधी कृत्य केले असेल अशा परिस्थितीत राष्ट्रपतीवर संसदेमध्ये महाभियोगाचा खटला चालविला जातो व हा महाभियोगाचा खटला सिद्ध झाल्यास राष्ट्रपतीला आपल्या पदाचा त्याग करावा लागतो.

🕹एक व्यक्ती राष्ट्रपतीपदासाठी किमान दोन वेळा निवडणूक लढवू शकते.

*🕹वेतन, भत्ते व सुविधा*
🕹राष्ट्रपतीला दरमहा 1,50,000 रु. वेतन प्राप्त होते.

🕹त्याशिवाय त्याच्या पदाला साजेल व शोभेल अशा सर्व सुविधांनी युक्त राष्ट्रपती भवन हे निवासस्थान प्राप्त होते.

🕹कार्यकालीन कामांसाठी देशी विदेशी प्रवास हा देखील मोफत असतो.

🕹एकदा निश्चित झालेले वेतन कोणी कमी करू शकत नाही.

🕹आर्थिक आणीबाणी लागू केली तर तेव्हा मात्र त्यांच्या वेतनात कपात होऊ शकते.

🕹निवृत्त वेतन प्राप्त करण्याचा अधिकार आहे.   

*🎯राष्ट्रपतीचे कार्ये व अधिकार:-*

🕹भारताचे राष्ट्रपती हे देशाचे सर्वोच्च परंतु नामधारी शासनप्रमुख असतात.

🕹भारतीय संविधानाने राष्ट्रपतीला काही विशेष अधिकार दिलेले आहेत.

🕹भारतीय राज्यघटनेत कलम 47 मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की, मंत्रीमंडळाने दिलेल्या सल्ल्यानुसार राष्ट्रपती आपले कार्ये पार पाडतील साधारणत: राष्ट्रपतीला पुढील कार्ये पार पाडावी लागतात.

*🕹कार्यकारी अधिकार* –

राष्ट्रपती पंतप्रधनाची नेमणूक करतो व पंतप्रधानाच्या सल्ल्यानुसार इतर मंत्र्यांची नेमणूक करतो.

🕹संसदेने केलेल्या सर्व कायद्याची अंमलबजावणी

घटना उद्देशपत्रिके बाबत वादविवाद.


🅾उद्देश पत्रिका घटनेचा भाग आहे व नाही याबद्दल वरील प्रमाणे तीन खटले झाले

🅾 केशवानंद भारती खटला 1973 नुसार
प्रस्ताविकेत कलम 368 अंतर्गत घटना दुरुस्ती करता येते पण घटनेच्या मौलिक संरचनेला हात न लावता त्यात घटना दुरुस्ती करता येते   

🅾 प्रस्ताविकेत आतापर्यंत एका वेळेसच घटना दुरुस्ती करण्यात आली आहे

🧩 42 वी घटनादुरुस्ती 1976 याद्वारे प्रस्ताविकेमध्ये :-

🅾 समाजवादी
🅾 धर्मनिरपेक्ष
🅾 एकात्मता ही नवीन तत्त्वे समाविष्ट करण्यात आली

🅾प्रस्ताविका न्यायप्रविष्ट नाही म्हणजे तिच्यातील तरतुदींचा न्यायालयीन अंमल घडवून आणता येत नाही

🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋 🦋

भारतातील नद्यांच्या काठावरील शहरे


 *गंगा - हरिद्वार, कानपूर,पटना,वाराणसी.*
 *सिंधू - लेह.*
 *सतलज - फिरोजपुर,लुधियाना.*
 *तापी - भुसावळ,सुरत.*
 *महानदी - कटक,संबलपुर.*
 *कृष्णा - मिरज,वाई,कराड,गंगाखेड,राजमुंद्री,सांगली,विजयवाडा.*
 *मुसी - हैदराबाद.*
 *यमुना - दिल्ली,आग्रा.*
 *शरयू - अयोध्या.*
 *ब्रह्मपुत्र - गुवाहाटी,दिब्रुगड.*
 *झेलम - श्रीनगर.*
 *नर्मदा - जबलपूर, भरुचा.*
 *साबरमती - अहमदाबाद.*
 *गोदावरी - नाशिक,पैठण,नांदेड,कोपरगाव.*
 *भीमा - पंढरपूर.*
 *कावेरी - श्रीरन्गपत्तनम, तिरुचिरापल्ली*
 *हुगळी- कोलकाता*

काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक

💐 मोजकेच पण महत्वाचे 💐

काही महत्वाचे सिध्दांत, वर्ष संशोधक

1) अणू सिध्दांत 1803 - जॉन डॉल्टन

2) उत्क्रांतीचा सिद्धांत 1858 - चार्ल्स डार्विन

3) गुरुत्वाकर्षणाचा सिध्दांत 1687 - आयझॅक न्यूटन

4) सापेक्षतः सिध्दांत 1905 - अल्बर्ट आईन्स्टाईन

5) भूखंड वाहनाचा सिध्दांत  1912 - आल्फ्रेड वेगणर

6) बिग - बँग सिध्दांत  1927 - जॉर्जेस जोसेफ लेमित्रे

पोलीस भरतीसाठी आजचे महत्त्वाचे प्रश्न

1) 39 व्या जागतिक कवी परिषदेचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : भुवनेश्वर

2) पुर्णपणे विजेवर उडणारे NASA चे पहिले प्रायोगिक विमान कोणते?
उत्तर : X-57’s Mod II

3) ‘ईशान्य हातमाग आणि हस्तकला प्रदर्शनी 2019’ या कार्यक्रमाचे उद्घाटन कुठे झाले?
उत्तर : मिझोराम

4) भारतीय रिझर्व्ह बँकेनी एकदाच वापरल्या जाणाऱ्या प्लास्टिकवर कधीपासून बंदी घातली आहे?
उत्तर : 5 ऑक्टोबर 2019

5) जागतिक अंतराळ सप्ताह ऑक्टोबर महिन्यात कधी साजरा केला जातो?
उत्तर : 4 ते 10 ऑक्टोबर

6) ‘गृह फायनान्स’ ही गृहनिर्माण कंपनी कोणत्या बँकेत विलीन होणार आहे?
उत्तर : बंधन बँक

7) अरुणाचल प्रदेश राज्यामध्ये होणाऱ्या पहिल्या पर्वतीय युद्ध सरावाचे नाव काय?
उत्तर : 'हिम विजय'

8) “KAZIND-2019” नावाचा लष्करी सराव कोठे आयोजित करण्यात आला आहे?
उत्तर : उत्तराखंड

9) CISF ने कोणत्या जलविद्युत प्रकल्पावर पाळत ठेवण्याची घोषणा केली आहे?
उत्तर : बागलीहार जलविद्युत प्रकल्प

10) अमेरिकेने कोणत्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्राची नुकतीच चाचणी घेतली?
उत्तर : मिनिटेमन II|

मराठी व्याकरणाशी करूया मैत्री - पोलीस भरती स्पेशल

मराठी व्याकरण आपला मित्र होऊ शकतो...! तुम्ही असा विचार कधी केला आहे का ? आणि समजा मराठी व्याकरणाशी आपली मैत्री झाली तर...? परीक्षेत पैकीच्या पैकी मार्क्स मिळवण्या पासून आपणास कोणीच थांबवू नाही शकणार.

हा लेख लिहण्या मागील हेतू हाच आहे की, खरच आपली मराठी व्याकरणाशी मैत्री होऊ शकते का ? आणि मैत्री होऊ शकते तर ती आपण कशा प्रकारे करू शकतो.

मराठी व्याकरणाशी मैत्री करायची असेल तर सर्वात सुरवातीस मराठी विषयाची तुलना आपल्या दैनंदिन जीवनाशी करावी लागेल. आपण जर मराठी विषयातील घटकांची सांगड आपल्या दैनंदिन जीवनातील घटकांशी घातली तर ते अभ्यासातील घटक आपल्याला पाठ करण्याची किंवा लक्षत ठेवण्याची गरज लागणार नाही. ते सर्व घटक आपल्या कायमस्वरूपी लक्षात राहतील व अभ्यास पण एकदम मजेशीर स्वरूपात होऊन जाईल. जो अभ्यास तुम्हाला कंटाळवाणा वाटतो, तोच अभ्यास तुम्ही हसत खेळत कराल. मी माझ्या शॉर्टकट मराठी व्याकरण पुस्तकात सर्व आशा सर्व गोष्टी एकदम मजेशीर स्वरूपात लिहल्या आहेत, जेणे करून तुमचे हसत खेळत मराठी व्याकरण तोंडपाठ होईल.

चला तर मग, आपण पाहू की, मराठी घटकांची सांगड दैनंदिन जीवनातील घटकांशी कशी घातली जाऊ शकते.

वाक्य :- अर्थ पूर्ण शब्दांच्या समूहाला वाक्य म्हणतात.
असे समजा की वाक्य म्हणजे आपले कुटुंब आहे. जसे विविध शब्द एकत्र आले की वाक्य बनते, तसेच विविध माणसे एकत्र आले की कुटुंब बनते.

मराठीत पुढीलप्रमाणे शब्दांच्या आठ जाती आहेत, त्या जातींची तुलना आपण विविध व्यक्ती नुसार करू -

1. नाम ( Noun ) :- प्रत्येक्षात असणाऱ्या किंवा कल्पनेने जाणवणाऱ्या वस्तुंना किंवा त्यांच्या गुणधर्माला नाम असे म्हणतात.  
ट्रिक्स - असे समजा की, नाम म्हणजे मुलगा. मुलगा जन्माला म्हणजे त्याचे काही तरी नाव ठेवावं लागते, त्यालाच नाम म्हणतात.
2. सर्वनाम ( Pronoun ) :-  नामाऐवजी वापरल्या जाणाऱ्या शब्दाला सर्वनाम असे म्हणतात. 
ट्रिक्स :- असे समजा की, सर्वनाम म्हणजे आत्या. नामाबद्दल वापरला जाणारा शब्द म्हणजे सर्वनाम, तसेच आत्या मुला बद्दल नाव ठेवत असते.
3. विशेषण ( Adjective ) :- नामाबद्दल विशेष माहिती सांगणार्याय शब्दास विशेषण असे म्हणतात.
ट्रिक्स - असे समजा की, विशेषण म्हणजे आई. नामाबद्दल विशेष माहिती सांगणाऱ्या शब्दास विशेषण म्हणतात, तसेच आई मुलाबद्दल विशेष माहिती सांगत असते.
4. क्रियापद ( Verb ) :- वाक्याचा अर्थ पूर्ण करणाऱ्या क्रियावाचक शब्दाला क्रियापद म्हणतात.
ट्रिक्स - असे समजा की, क्रियापद म्हणजे मुलगी. जसे क्रियापदा शिवाय वाक्य पूर्ण होत नाही, तसेच मुली शिवाय कुटुंब पूर्ण दिसत नाही.
5. क्रियाविशेषण अव्यय ( Adverb ) :- जे शब्द क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगतात, परंतु कर्त्याच्या लिंग, वचन व पुरुषानुसार बदलत नाहीत त्यांना क्रियाविशेषण अव्यय म्हणतात.
ट्रिक्स :- असे समजा की, क्रियाविशेषण म्हणजे वडील. जसे क्रियाविशेषण क्रियापदा बद्दल विशेष माहिती सांगते, तसेच वडील ( क्रियाविशेषण ) मुली ( क्रियापद ) बद्दल विशेष माहिती सांगत असतात.        
6. उभयान्वयी अव्यय ( Conjunction ) :- दोन किंवा अधिक शब्द अथवा दोन किंवा अधिक वाक्ये यांना जोडणाऱ्या शब्दाला उभयान्वयी अव्यय असे म्हणतात.
ट्रिक्स :- असे समजा की, उभयान्वयी अव्यय म्हणजे आजोबा. जसे उभयान्वयी अव्यय दोन शब्द किंवा दोन वाक्य यांना जोडण्याचे काम करते, तसेच आजोबा देखील कुटुंबातील माणसांना किंवा दोन कुटुंबांना जोडण्याचे काम करत असतात.
7. शब्दयोगी अव्यय ( Prepositions ) :- काही शब्द नामांना किंवा सर्वनामाना जोडून येतात व त्या वाक्यातील दुस‌या एखाद्या शब्दाशी संबंध दाखवतात अशा शब्दांना शब्दयोगी अव्यय म्हणतात.  
ट्रिक्स :-  असे समजा की, शब्दयोगी अव्यय म्हणजे मामा. जसे शब्दयोगी अव्यय म्हणजे नामांना किंवा सर्वनामांना जडून येणारे शब्द, तसेच मामा हे देखील मुलगा ( भाचा ) व आत्या ( बायको ) यांच्याशी जुडलेला असतो.
8. केवलप्रयोगी अव्यय ( Exclamatory Words ) :- मानवी मनातील भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय.
ट्रिक्स :- असे समजा की, केवलप्रयोगी अव्यय म्हणजे मामाची मुलगी. भावना अचानक व्यक्त करण्यासाठी वापरला जाणारा शब्द  म्हणजे केवल प्रयोगी अव्यय, अशाच प्रकारे मामाच्या मुलीला पाहताच भावना अचानक  व्यक्त होतात.
" वाह....! किती छान ही मामाची मुलगी."

संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न

1) शरीर पिळदार व्हावे म्हणून मी व्यायाम करतो. – या वाक्यात गौण वाक्याचा प्रकार ओळखा.

   1) काळदर्शक क्रियाविशेषण वाक्य    2) नाम वाक्य
   3) कारणदर्शक क्रियाविशेषण वाक्य    4) विशेषण वाक्य

उत्तर :- 3

2) खालील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा.

     ‘समीप’

   1) करणवाचक    2) स्थलवाचक   
   3) संग्रहवाचक    4) यापैकी नाही

उत्तर :- 2

3) परिणामबोधक संयुक्तवाक्य बनविताना कोणत्या उभयान्वयी अव्ययांचा वापर होतो ?

   1) म्हणून, सबब    2) अथवा, किंवा   
   3) परी, पण    4) व, आणि

उत्तर :- 1

4) ‘हुडु !’ या अव्ययातून कोणता भाव व्यक्त होतो.

   1) तिरस्कार    2) विरोध     
   3) संबोधन    4) यापैकी नाही

उत्तर :- 1

5) ‘तो निजत असेल’ – या विधानातील काळ ओळखा.

   1) भूतभविष्य काळ    2) वर्तमानभविष्य काळ 
   3) भविष्यभविष्य काळ    4) यापैकी एकही नाही

उत्तर :- 2

6) ‘देवघर’ या शब्दाचे लिंग कोणते?

   1) स्त्रीलिंग    2) पुल्लींग   
   3) नपुंसकलिंग    4) यापैकी नाही

उत्तर :- 3

7) सर्वनामाची खालीलपैकी कोणती विभक्ती होत नाही.

   1) पंचमी    2) संबोधन   
   3) सप्तमी    4) षष्ठी

उत्तर :- 2

8) अबब ! केवढा हा उंचच उंच कडा. – वाक्याचा प्रकार सांगा.

   1) विधानार्थी    2) प्रश्नार्थी   
   3) उद्गारवाची    4) होकारार्थी

उत्तर :- 3

9) “हवा कोंदट असल्यास मनुष्याची प्रकृती बिघडते.”

     वरील वाक्यातील विधेय विस्तारक कोणते  ?

   1) हवा कोंदट असल्यास      2) मनुष्याची
   3) प्रकृती        4) बिघडते

उत्तर :- 1

10) पुढील पर्यायातू ‘भावे प्रयोग’ ओळखा.

   1) रामाने रावणास मारला      2) रामाकडून रावण मारला गेला
   3) राम रावणास मारील      4) रामाने रावणास मारले

उत्तर :- 4

22 October 2021

OnlineTest Series

काही जुन्या पण महत्त्वपूर्ण शब्दांचे अर्थ

🌷झूल

बेंदरा दिवशी बैलाच्या अंगावर रेशमी रंगीबेरंगी त्याच्या शरीराच्या मापाचे कापड असते. त्यावर वेगवगळ्या प्रकारची चित्र असतात. त्याला झूल म्हणतात.

🌷आंबवणी, चिंबवणी

शेतात कोणत्याही रोपाची कांदा, वांगी, कोबी,फ्लॉवर, ऊस, लागण करण्यापूर्वी शेताची खूप मशागत केलेली असते. त्यामुळे माती भुसभुशीत झालेली असते. रोप लावल्यानंतर पाणी दिले तरी ते आजूबाजूची माती पाणी शोषून घेते व रोपांना पाणी कमी पडते म्हणून दुसरे दिवशी पाणी दिले जाते त्याला आंबवणी व पुन्हा दोन दिवसांनी पाणी दिले जाते त्याला चिंबवणी म्हणतात.

🌷वाफा, सारा

कोणत्याही पिकाला पाणी देण्यासाठी वाफे किंवा सारे करतात. वाफा किंवा सारा म्हणजे त्याच्या एका बाजूला पाण्यासाठी पाट असतो व बाकी तिन्ही बाजूला उंचवटा केला जातो.जेणेकरून पाटाचे पाणी दिले की ते पाटाच्या बाहेर जाऊ नये. लहानआकाराचा असतो त्याला वाफा म्हणतात, तर मोठ्या आकाराचा असतो त्याला सारा म्हणतात.

🌷खांदमळणी

बैलांचा महत्त्वाचा सण बेंदूर. बेंदरापर्यंत बैलांची उन्हाळ कामं, खरीपाची पेरणी ही कामं उरकली जायची. बेंदरात बैलांचा सण असल्याने बेंदराच्या आदल्या दिवशी बैलांनी खूप कष्ट केलेले असतात. त्यांच्या मानेवर कायम जू असते. बैलाच्या मानेला साद हणतात. खांदाला त्रास झालेला असतो म्हणून खांदाला तेल, हळद, तूप लावून त्याचे मालीश केले जाते त्याला खांदमळणी म्हणतात.

🌷कंडा

बेंदरादिवशी प्रत्येक शेतकरी बैलाला गरम पाण्याने धुऊन चांगला सजवतो त्याच्या गळ्यात रंगबेरंगी धाग्याच्या गोलाकार कासरा बांधला जातो त्याला कंडा म्हणतात.

🌷चाळ

बैलाच्या मानेएवढा कातडी पट्टा घेऊन त्यात वेगवेगळ्या आकाराचे घुंगरू ओवले जातात त्याला चाळ म्हणतात.

🌷शेंट्या

बेंदराच्या अगोदरच बैलाची शिंग घोळली जातात. बेंदरा दिवशी शिंग रंगवून बेगड लावून शिंगाच्या वरच्या बाजूला लोखंडी किंवा पितळी शेंट्या बसवल्या जातात त्याला गोंडे जोडलेले असतात.

🌷आडणा

वाड्याच्या मुख्य दरवाजाला आतून एक आडवं लाकूड लावलं जायचं जेणेकरून दरवाजाचं दार जोरात ढकललं तरी उघडू नये.

🌷फण

कुरीच्या दिंडाला तीन किंवा चार चौकोनी भोकं असतात त्यात *फण* बसवला जातो. फणाला मध्येच एक पूर्ण बोगदा पाडलेला असतो. त्यात नळ जोडला जातो. हे नळ चाड्याला जोडले जातात. चाड्यातून बी पेरल्यानंतर ते जमिनीत समान अंतरावर पडतं. फण झिजू नये म्हणून जो भाग जमिनीत जातो त्यावर लोखंडी पट्टी बसवली जाते. त्याला फासळ म्हणतात.

🌷भूयट्या

जमीन भुसभुशीत असेल तर औत, कुळक, फरांदी, कुरी दिंडावर उभं न राहता मोकळी चालवली जाते. औताच्या पाठीमागे फक्त चालायचं. त्याला भूयट्या म्हणतात.

🌷रूमण

औत भूयट्या चालवताना दिंडाला मधोध एक भोक असतं त्यामध्ये एक दांडा उभा केला जातो व दांड्याच्य वरच्या बाजूला एक आडवं लाकूड लावलं जातं. त्यावर थोडा थोडा भार दिला जातो.त्याला रूमण म्हणतात.

🌷उभाट्या

जमीन कठीण असेल औत जमिनीत जास्त जात नसेल तर दिंडावर उभं राहून औत चालवलं जातं त्याला उभाट्या म्हणतात.

वाक्यप्रचार व त्यांचे अर्थ


१】"खसखस पिकणे" या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
     ~मोठ्याने हसणे .

२】"गंगेत घोडे न्हाने "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~ योजलेले काम कसेबसे पार पाडणे .

३】"थुंकी झेलणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~भलती खुशामत करणे.

४】" विडा उचलणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
     ~ प्रतिज्ञा करणे .

५】"रक्ताचे पाणी करणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
    ~ खूप कष्ट करणे .

६】"वाटाण्याच्या अक्षता लावणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय?
    ~ स्पष्ट शब्दात नकार देणे .

७】"अत्तराचे दिवे जाळणे "या वाक्यप्रचाराचा अर्थ काय ?
    ~भरपूर उधळपट्टी करणे.

८】" असतील शिते तर जमतील भुते" या म्हणीचा अर्थ काय?
    ~ आपल्या जवळ पैसे असल्यास आपल्याभोवती             खुशामतकऱ्यांची गर्दी जमते.

९】"काखेत कळसा आणि गावाला वळसा" या म्हणीचा अर्थ काय ?
   ~ वस्तू जवळ असूनही सर्वत्र शोधणे.

१०】" कुत्र्याची शेपूट नळीत घातली तरी वाकडी" या चा अर्थ काय ?
   ~एखाद्या व्यक्तीचा मूळ स्वभाव कोणत्याही प्रयत्नाने बदलू शकत नाही.

११】" गाढवाला गुळाची चव काय" याचा अर्थ काय?
    ~ मूर्ख माणूस आज चांगल्या गुणांची पारख नसते.

१२】" चार दिवस सासूचे चार दिवस सुनेचे" या म्हणीचा अर्थ काय?
   ~ प्रत्येकाला आयुष्यात गाजवण्याची संधी कधीतरी संधी चालून येते .

१३】"वरातीमागून घोडे "या म्हणीचा अर्थ काय?
   ~ वेळ निघून गेल्यावर कृती करणे.

१४】" पी हळद अन हो गोरी "चा अर्थ काय?
     ~एखाद्या गोष्टीपासून त्वरित लाभ मिळण्याची अपेक्षा.

१५】" डोंगर पोखरून उंदीर काढणे" या म्हणीचा अर्थ काय?
   ~ अफाट कष्ट नंतर शिल्लक लाभ पदरी पडणे.

१६】" ताकापुरती आजी" या म्हणीचा अर्थ काय ?
  ~आपले काम होईपर्यंत एखाद्याचे गुणगान करणे.

महराष्ट्रातील महत्त्वाच्या संताची समाधीस्थाने

1) गाडगे महाराज - अमरावती

2) समर्थ रामदास- सज्जनगड

3) संत एकनाथ - पैठण

4) गजानन महाराज - शेगाव

5) संत ज्ञानेश्वर - आळंदी

6) संत गोरोबा कुंभार - ढोकी

7) संत चोखा मेळा - पंढरपूर

8) मचिन्द्रनाथ - सप्तशृंगी

9) संत तुकडोजी  - मोझरी

10) संत तुकाराम - देहू

11) साईबाबा - शिर्डी

12) जनार्दन स्वामी - कोपरगाव

13) निवृत्तीनाथ - त्र्यंबककेश्वर

14) दामाजी पंत - मंगळवेढा

15) श्रीधरस्वामी - पंढरपूर

16) गुरुगोविंदसिंह - नांदेड

17) रामदासस्वामी - जांब

18) सोपानदेव - आपेगाव

19) गोविंदप्रभू - रिधपुर

20) जनाबाई - गंगाखेड

21) निवृत्तीनाथ - आपेगाव

22) नरसी - हिंगोली