Ads

29 November 2021

कश्मीर प्रश्नाबाबत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार आणि भूमिका ......

प्रस्तावना :- आंतरराष्ट्रीय राजकारणात "विदेश नीती" महत्वपूर्ण असते, कोणत्या देशासोबत कसे संबंध असले पाहिजेत हे विदेश निती ठरवते. 1945 ला दुसरे महायुद्ध संपले आणि वेगवेगळे देश दोन गटांमध्ये विभागले गेले, एक गट अमेरिकेचा आणि दुसरा गट रशियाचा , 1947 ला इंग्रज निघून गेले आणि भारताची सत्ता काँग्रेसच्या हातामध्ये आली, पंडित नेहरू यांनी दोन्ही गटात न जाता अलिप्तवाद स्वीकारला , यालाच अलिप्तवादी धोरण म्हंटले गेले, परंतु बाबासाहेब आंबेडकर अलिप्त राहण्याच्या विरोधात होते , त्यांनी म्हंटले की "जर उद्या चीन ने आपल्यावर आक्रमण केले तर रशिया मदतीला येणार नाही कारण तो त्या गटाचा भाग आहे आणि अमेरिकासुद्धा मदतीला येणार नाही कारण आपण त्या गटात नाहीत" आणि बाबासाहेब आंबेडकरांचे राजकीय भविष्य खरे ठरले , नंतर खरंच चीन ने आपल्यावर आक्रमण केले आणि आपल्या देशाचा काही भाग चीनने गिळंकृत केला, आपल्या बाजूने ना रशिया आला  ,ना अमेरिका..

कश्मीर प्रश्नाची पार्श्वभूमी :- इंग्रजांनी भारत सोडून जाताना संस्थानिकांसाठी(राजे ,रजवाडे ) तीन पर्याय ठेवले होते
1)ते भारत देशात सहभागी होऊ शकतात.
2)ते पाकिस्तान देशात सहभागी होऊ शकतात
3)ते स्वतंत्र देश म्हणून सुद्धा राहू शकतात
हैदराबाद संस्थान अर्थात निजाम आणि कश्मीर चा राजा हरिसिंग वगळता सर्व संस्थानिक भारत किंवा पाकिस्तान देशात सहभागी झाले होते . त्या काळातील काँग्रेस सरकारने हैदराबाद संस्थान पोलीस ॲक्शन च्या नावाखाली अर्थात मिल्ट्री पाठवून हैदराबाद संस्थान ताब्यात घेतले, आणि समर्थन असे केले की "हैदराबाद संस्थानामध्ये प्रजा हिंदू आहे आणि राजा मुसलमान आहे , आणि प्रजेची मागणी आहे की त्यांना भारत देशात सहभागी व्हायचे आहे"..पाकिस्तान ने सुद्धा कश्मीर वर हमला केला आणि हाच तर्क दिला "की कश्मीरची जनता मुसलमान आहे आणि राजा हिंदू आहे आणि मुसलमान लोकांची मागणी आहे की त्यांना पाकिस्तान मध्ये सहभागी व्हायचे आहे "..कश्मीर चा राजा हरिसिंग कश्मीर स्वतंत्र देश ठेवू इच्छित होता त्यामुळे तो भारत किंवा पाकिस्तान मध्ये सहभागी झाला नव्हता. पाकिस्तान कडून पराभव होऊ शकतो म्हणून मजबुरी मध्ये त्याने भारताची मदत मागितली , परंतु पंडित नेहरूंनी एक अट ठेवली "तुम्ही भारतात जर सहभागी होत असाल तरच आम्ही तुम्हाला मदत करू " आणि राजा हरिसिंग यासाठी तयार झाला आणि सविधानातील आर्टिकल 370 बनले (काही अटी आणि शर्ती च्या आधारावर कश्मीर देश भारत देशात सहभागी झाला, त्या अटी आणि शर्ती म्हणजेच संविधानातील आर्टिकल  370 होय ) ....

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमिका :-
कश्मीर जसा ही भारतात विलीन झाला ,तातडीने कॅबिनेटची बैठक बसली ,आणि पाकिस्तान सोबत च्या युद्धाची रणनीती ठरवली गेली, बाबासाहेबांनी भूमिका मांडली की "महार रेजिमेंटच्या सैन्याला तातडीने कश्मीरला पाठवण्यात यावे" आणि सर्वप्रथम पठाणकोट वरून हेलिकॅप्टर उडाले ते महार रेजिमेंटच्या जवानांना घेऊन , श्रीनगरला पोहोचल्यानंतर एक मिनिटाची विश्रांती न घेता महार रेजिमेंटच्या जवानांनी पाकिस्तानच्या सैन्यावर हल्ला केला , श्रीनगर पासून 20 किलोमीटरवर असलेले पाकिस्तानी सैन्य 100 किलोमीटर पाठी मागे हटले, बाबासाहेब आंबेडकर यांनी युद्धनीती वरील 400 पुस्तके वाचली होती , जी त्यांच्या ग्रंथालयात होती, महार रेजिमेंटच्या  जवानांना वीर चक्र आणि परमवीर चक्र सुद्धा मिळाली ..बाबासाहेबांचे युद्धासंबंधी धोरण असे होते की "संपूर्ण कश्मीर ताब्यात घेऊ आणि भारताचे सैन्य लाहोरपर्यंत घेऊन जाऊ , तोपर्यंत कश्मीरचा प्रश्न आंतरराष्ट्रीय न्यायालयात किंवा युनोमध्ये घेऊन जायचा नाही " ..

पंडित नेहरू ची ऐतिहासिक चूक :-
1) डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या धोरणाविरोधात जाऊन " संपूर्ण कश्मीर ताब्यात घेण्या  अगोदरच ,नेहरू ने काश्मीरप्रश्न युनोमध्ये मांडला , आणि जी भीती बाबासाहेब आंबेडकरांना होती तेच झाले , युनोने युद्ध थांबवण्याचा आदेश दिला आणि LOC अर्थात लाईन ऑफ कंट्रोल तयार झाली आणि कश्मीरप्रश्न खितपत पडला ..बाबासाहेब आंबेडकरांचे ऐकले असते तर कश्मीर प्रश्नाचा निकाल त्याच काळात निघाला असता ....
2)नंतरची परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी बाबासाहेबांनी दुसरी योजना तयार केली " जम्मू आणि काश्मीरचे तीन राज्यांमध्ये विभागणी करणे a)जम्मु , हिंदूंचा भूभाग ( ऐतिहासिक दृष्ट्या जम्मू हा कधीच कश्मीर देशाचा भाग नव्हता,) b)लेह आणि लदाख (बुद्धिस्ट लोकांचा भूभाग) c) कश्मीर चे खोरे ...मुसलमान लोकांचा भूभाग
जम्मू आणि लेह लदाख भारतात विलीन करायचा आणि कश्मीर खोऱ्या बाबत तेथील लोकांचे जनमत घ्यायचे ..आणि कश्मीर खोर्‍यातील लोकांचे म्हणणे काय आहे "त्यांना भारतात विलीन व्हायचे आहे, की त्यांना पाकिस्तानमध्ये विलीन व्हायचे आहे, हे ठरवण्याचा अधिकार तेथील लोकांना देण्यात यावा ...परंतु असे जनमत न घेता कश्मीर चा प्रश्न तसाच भिजत ठेवण्यात आला ....
  बाबासाहेब आंबेडकर हे अर्थशास्त्रातील तज्ञ व्यक्ती होते, MA, Phd, Msc, Dsc एवढ्या कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये त्यांनी डिग्र्या घेतल्या होत्या ...त्यामुळे देशाची प्रचंड संपत्ती कश्मीर प्रश्नावर लावण्यात येत होती , एवढा प्रचंड पैसा जर देशाच्या विकासावर खर्च केला असता तर देश प्रगतीपथावर गेला असता , परंतु काश्मीरचा प्रश्‍न तसाच ठेवल्यामुळे प्रचंड पैसा अर्थात साधन आणि संसाधन कश्मीर वरती खर्च करावे लागते , सतत युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यामुळे प्रचंड प्रमाणात युद्धाची तयारी करून ठेवावी लागते , देश हितासाठी हे करणे योग्य आहे परंतु जर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दोन्ही योजनेवर नेहरूंनी अमलबजावणी केली असती तर कश्मीर प्रश्नाचा निकाल लागला असता ...काँग्रेस आणि नेहरूंच्या ऐतिहासिक चुकीची सजा आज ही देश भोगत आहे , आमच्या वीर जवानांना शहीद व्हावे लागत आहे ...हे सर्व नेहरुच्या चुकीच्या विदेश नीती आणि कश्मीर बाबत चुकीचे धोरण ठरवल्यामुळे झाले आहे ...
बाबासाहेब आंबेडकर यांनी जो मंत्रिपदाचा राजीनामा दिला होता , त्या चार कारणांपैकी हे एक प्रमुख कारण होते की "नेहरूचे कश्मीर प्रश्नावर चुकीचे धोरण आहे अर्थात नेहरुची विदेश निती खराब आहे "

------------------------------------------------

कॅग कर्तव्ये.

🅾घटनेतील तरतुदीनुसार कॅगचा (डीपीसी) (कर्तव्ये, अधिकार व सेवा अटी) कायदा १ 1971.. लागू करण्यात आला. विविध तरतुदींनुसार, कॅगच्या कर्तव्यांमध्ये ऑडिट समाविष्ट आहेः

🅾भारतीय समेकित निधी व राज्य व केंद्र शासित प्रदेश विधानसभेचे असणारी पावती व खर्च.

🅾ट्रेडिंग, मॅन्युफॅक्चरिंग, नफा आणि तोटा खाती आणि ताळेबंद आणि इतर सहाय्यक खाती कोणत्याही सरकारी विभागात ठेवली जातात; शासकीय कार्यालये किंवा विभागांत ठेवलेली स्टोअर व साठा यांचे लेखा

🅾कंपनी अ‍ॅक्ट, २०१ of मधील तरतुदीनुसार सरकारी कंपन्या .

🅾संबंधित कायद्याच्या तरतुदीनुसार संसदेने बनविलेल्या कायद्यांनुसार किंवा त्या अंतर्गत स्थापना केलेली महामंडळे.

🅾केंद्र आणि राज्य सरकारांच्या एकत्रित निधीतून प्राधिकरणास आणि संस्थांना मोठ्या प्रमाणात वित्तपुरवठा केला जातो. एकत्रीकृत निधीकडून भरीव अर्थसहाय्य दिले गेलेले नसले तरीही कोणाचे किंवा प्राधिकरण, त्याचे लेखापरीक्षण सीएंडएजीकडे सोपविले जाऊ शकते.

🅾विशिष्ट उद्देशाने संस्था व प्राधिकरणास शासनाने दिलेले अनुदान व कर्ज.

🅾तांत्रिक मार्गदर्शन व समर्थन (टीजीएस) अंतर्गत पंचायती राज संस्था आणि शहरी स्थानिक संस्था यांचेकडे सोपविलेले ऑडिट.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

जिवाणू (bacteria)

- साधारण एक पेशीय असतात
- विषाणू पेक्षा आकाराने मोठे असतात
- जिवाणू मध्ये केंद्रक नसते म्हणून गुणसूत्रे मुक्त असतात. टेलीग्राम चॅनल व्हीजेएस ईस्टडी.
- जिवाणूंना चांगली अशी पेशी रचना असते ज्यात पेशीभित्तिका पेशीपटल तसेच पेशीरस व पेशीअंगके असतात
- जिवाणू हे फायदेशीर पण असतात पण बहुतांश जिवाणू घातक असतात
- पृथ्वीवर जिवाणू मानवापेक्षा जास्त काळापासून होतात जिवाणू हे कोणत्याही वातावरणात राहू शकतात
- जमिनीमध्ये खोलवर तसेच अंतराळात जगू शकतात.
- एक प्रकारचा जिवाणू चंद्रावर दोन वर्ष जगण्याचा पुरावा मिळाला आहे.

● फायदेशीर जिवाणू

- शिंबाधारी वनस्पतीच्या मुळात असणारे रायझोबियम हे जिवाणू हवेतील नायट्रोजन वनस्पतीची साठी उपयोगात आणतात म्हणून रायझोबियम चा उपयोग जैविक खत करतात आणि रायझोबियम अन्नासाठी वनस्पतीवर अवलंबून असतात
- मातीतील अझोटोबॅक्टर जिवाणू हवेतील नायट्रोजनचे स्वतंत्रपणे स्थिरीकरण घडवून आणतात.
- लॅक्टोबॅसिलस दह्या मधील जिवाणू शरीरात पाणी पोहोचत नाही

● घातक जीवाणू

- स्टॅफिलोकोकस जिवाणु खाद्यपदार्थावर वाढताना एन्टोरो टॉक्झिन नावाचे विषारी रसायन तयार करते त्यामुळे असे पदार्थ खाताच जुलाब उलट्या होतात
- हवाबंद डब्यातील खाद्यपदार्थांची वापराची मुदत संपली की त्यात क्लोस्ट्रिडियम जिवाणू वाढण्याची शक्यता असते
- जेव्हा पदार्थावर बुरशी चढते तेव्हा त्यात मायको टॉक्झिन हे विष तयार होते
- क्लोस्ट्रिडियम यांच्या सुमारे 100 प्रजाती आहेत ते विनाॅक्सी परिस्थितीत वाढतात
- बर्ड फ्लू हा H5N1 या विषाणूमुळे होतो

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक

🔸जन्म- 23 जुलै 1856 रत्नागिरी, चिखली.
🔸मूळ नाव - केशव
🔸मराठा (इंग्रजी भाषेत) - 2 जानेवारी 1881 संपादक टिळक.
🔸केसरी (मराठी भाषेत) - 14 जानेवारी 1881 संपादक आगरकर.
🔸1893 - सार्वजनिक गणपती उत्सव .
🔸1895 - शिवजयंती उत्सव.
🔸1905- स्वदेशी चळवळ सुरू करून "स्वराज्य, स्वदेशी, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण" या चतुसूत्री चा पुरस्कार केला.
🔸मृत्यू- 1 ऑगस्ट 1920
〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️〰️
🔹सामान्य जनतेशी जवळचा संपर्क ठेवणारे टिळक हे पहिले राष्ट्रीय नेते.

🔹देशासाठी तुरुंगात जाणारे टिळक हे पहिले काँग्रेस नेते.

🔹टिळकांनी सर्वात प्रथम स्पष्ट शब्दात स्वराज्याची मागणी केली, "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" अशी घोषणा केली.

🔹टिळकांना "लोकमान्य व भारताचा अनभिषिक्त राजा" म्हणून ओळखले जात असे.

🔹जनतेला संघटित करण्यासाठी त्यांनी आखाडे, लाठी क्लब, गोवध विरोधी संस्था, गणपती व शिवाजी उत्सव सुरू केले.

🔹त्यांनी बिपिनचंद्र पाल व लाला लजपतराय यांच्यासोबत जहाल गट निर्माण केला.

🔹त्यांच्या प्रयत्नांमुळे 1906 च्या कोलकता अधिवेशनात "स्वराज्य, बहिष्कार व राष्ट्रीय शिक्षण" हे ठराव संमत करण्यात आले.

🔹व्हॅलेंटाईन चिरोल याने टिळकांना "भारतीय असंतोषाचे जनक" असे संबोधले.

🔹लखनऊ करारावर टिळक व जीना यांनी सह्या करून राष्ट्रीय सभा व लीग यांच्यात राष्ट्रीय ऐक्य घडवून आणण्याचा प्रयत्न केला.

🔹बॅरिस्टर जीना टिळकांना गुरुस्थानी मानत.
टिळक हे निष्णात गणितज्ञ  तसेच भाषातज्ञ होते.

🔹टिळकांचे गीतारहस्य मराठीत होते.

🔹इंग्लंडमधील कामे आटपून टिळक 6 नोव्हेंबर 1919 ला "इजिप्त" नावाच्या बोटीतून भारतात यायला निघाले. हा प्रवास साधारण वीस दिवसांचा होता. यावेळी डॉक्टर वेलकर त्यांच्यासोबत होते.

🔹"जर देवाने अस्पृश्यता सहन केली तर त्याला मी देव म्हणणार नाही" असे उद्गार लोकमान्य टिळक यांनी डिप्रेस्ड क्लास मिशन च्या दुसऱ्या सभेत काढले.

♦️पी. सीतारामय्या- " गोखले हे काळाच्या बरोबर होते तर टिळक काळाच्या पुढे होते."

♦️महात्मा गांधी- "टिळक हे मला उत्तुंग हिमालयासारखे वाटले."

♦️अरविंद घोष- "धडाडी, स्वार्थत्याग कष्टाळूपणा, राजकीय मुत्सद्देगिरी, व व्यवहारी वृत्ती या सर्वांचा समावेश टिळकांमध्ये होता."

हृदय (Heart)

◆- मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

◆- वजन :पुरुष – ३४० ग्रॅम्स, स्त्री – २५५ ग्रॅम्स

★ कार्य :

◆ - हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे. टेलीग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆- हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.

◆- हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

★ हृदयाची रचना

◆- मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये

◆- डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
◆- उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
◆- डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
◆- उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle) यांचा समावेश होतो.

◆- अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.

◆- उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.

१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)

◆- उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.

◆- उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.

◆ उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.

◆- डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.

◆- डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते. टेलीग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆- डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.

◆- हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.

◆ हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.

महाराष्ट्रातील पिकांचे प्रकार (Crops of Maharashtra)

🔸तृणधान्य :

Eg.ज्वारी ,बाजरी ,तांदूळ ,गहू

🔸कडधान्य :

Eg. तूर मूग उडीद मटका हरभरा

🔸गळीत धान्य:

Eg.भुईमूग ,तीळ, सूर्यफूल ,करडई.

🔸नगदी पिके:
 सर्वात जास्त पैसा इथून मिळतो.

Eg.कापूस, ऊस ,हळद ,तंबाखू

🔸वन पिके

Eg.बाभूळ, नेम सारा ,चिंच ,निलगिरी.

🔸चारा-पिके :

Eg.नेपियर गवत ,मक्का ,लसूण घास ,चवळी

महाराष्ट्र जमीन वापर 2015- 16 2011 आकडेवारी

▪️एकूण भौगोलिक क्षेत्रफळ तीन लाख सात हजार 58 लाख हेक्टर

कारण आपण शेती हेक्टर मध्ये करतो

वने 52.0 5 हेक्टर 16.9 % तसे पाहिले तर 33% वने राहिले पाहिजे

▪️महाराष्ट्रातील पेरणी क्षेत्र

68 लाख हेक्टर निवड पेरणी क्षेत्र 56. 4% पडीक जमिनीखालील क्षेत्र 25. 93 लाख हेक्टर 8.4%

▪️महाराष्ट्रातील अन्नधान्य उत्पादन 2014- 15

◆ 1960 – 61 – 70. 44 लाख टन

◆ 2014-15 – 109.48 लाख टन

◆ 2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकाखालील सर्वाधिक क्षेत्र असणारे प्रमुख जिल्ह्यांच्या उतरता क्रम.

● सर्वाधिक क्षेत्र (2014- 15)

●अहमदनगर> सोलापूर> बीड> उस्मानाबाद >पुणे

●विदर्भातून एकही जिल्हा नाही आहे.

◆2014- 15 अनुसार अन्नधान्य पिकांचे सर्वाधिक उत्पादन करणारे प्रमुख जिल्हे

●जळगाव >अहमदनगर> नाशिक> सांगली >पुणे

महाराष्ट्र जिल्हे

जिल्हे व तालुका संख्या

◆अकोला 7 तालुके

◆ अमरावती 14 तालुके

◆ औरंगाबाद 9 तालुके

◆ अहमदनगर 14 तालुके

◆ बीड 11 तालुके

◆ बुलढाणा 13 तालुके

◆ भांडारा 7 तालुके

◆ चंद्रपूर 15 तालुके

◆धुळे 4 तालुके

◆ गोंदिया 8 तालुके

◆ गडचिरोली 12 तालुके

◆ हिंगोली 5 तालुके

◆ जालना 8 तालुके

◆ जळगांव 15 तालुके

◆ कोल्हापूर 12 तालुके

◆ लातूर 10 तालुके

◆ मुंबई उपनगर 3 तालुके

◆ मुंबई शहर एक ही तालुका नाही

◆ नागपूर 14 तालुके

◆ नाशिक 15 तालुके

◆नांदेड 16 तालुके

◆नंदुरबार 6 तालुके

◆ पुणे 14 तालुके

◆ परभणी 9 तालुके

◆ पालघर 8 तालुके

◆ रायगड 15 तालुके

◆ रत्नागिरी 9 तालुके

◆ सिंधुदुर्ग 8 तालुके

◆ सोलापूर 11 तालुके

◆ सांगली 10 तालुके

◆ सातारा 11 तालुके

◆ ठाणे 7 तालुके

◆ उस्मानाबाद 8 तालुके

◆ वाशीम 6 तालुके

◆ वर्धा 8 तालुके

◆ यवतमाळ 16 तालुके

■एकही तालुका नसलेला जिल्हा मुंबई शहर

■राज्यातील सर्वाधिक तालुके
असणारे दोन जिल्हे यवतमाळ व नांदेड १६

■राज्यात एकच जिल्हा असा आहे की त्यात फक्त 13 जिल्हे आहेत तो म्हणजे बुलढाणा

■असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की ज्यात 14 तालुके आहेत.पूणे. नागपूर. अमरावती. अहमदनगर

■असे एकूण चार जिल्ह्ये आहेत की त्यात 15 तालुके आहेत चंद्रपूर. जळगाव.रायगड. नाशिक

■असे दोन जिल्ह्ये आहेत की जेथे फक्त 10 तालुके आहेत.सांगली. लातूर

■असा एकमेव जिल्हा आहे की जेथे फक्त तीन तालुके अहेत तो म्हणजे मुंबई उपनगर

■असे :सतरा:जिल्ह्ये आहेत जी त्यांच्या तालुक्यांची संख्या दहाच्या खाली आहे

■धुळे हा एकमेव जिल्हा आहे की ज्यात फक्त चार तालुके आहेत.

■हिंगोली हा असा एकमेव जिल्हा आहे की त्यात फक्त पाच तालुके आहेत
____________________________

बेनामी मालमत्ता म्हणजे काय?


1) दुसऱ्याच्या नावावर खरेदी केलेली मालमत्ता म्हणजे बेनामी मालमत्ता होय. ज्याच्या नावे ही मालमत्ता खरेदी केली जाते, त्याला बेनामदार म्हणतात. जो मालमत्तेचे पैसे दतो, तो तिचा खरा मालक असतो. आणी ही मालमत्‍ता ज्‍याच्‍याजवळ असते त्‍यास बेनामी मालमत्‍ता म्‍हणतात.

2) बेनामी व्यवहार म्हणजे असे व्यवहार, ज्यात मालमत्ता ज्याचे नावे रजिस्टर केली जाते, ती व्यक्ती त्या व्यवहाराचे पैसे देत नाही. कोणी तरी दुसरीच व्यक्ती त्याचे पैसे अदा करते. अन्य कोणाच्या तरी फायद्यासाठी दुसराच कोणी तरी हे व्यवहार करीत असतो.

3) उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून पत्नी अथवा मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता, भाऊ, बहीण अथवा अन्य नातेवाईकांच्या नावे घेतलेली अशी मालमत्ता जिची किंमत उत्पन्नाच्या ज्ञात स्रोतांतून अदा करण्यात आलेली आहे. कुळांच्या नावे घेतलेली, पण या व्यवहारात विश्वस्त अथवा लाभधारक असलेली मालमत्ता. ही मालमत्‍तेला बेनामी मालमत्‍ता म्हणतात.

4) ज्ञात स्रोताबाह्य उत्पन्नातून पत्नी व मुलांच्या नावे खरेदी केलेली मालमत्ता, भाऊ अथवा बहिणींसोबत भागिदारीत घेतलेली अज्ञात स्रोतांच्या पैशांतील मालमत्ता. कुळांच्या नावे घेतलेली मालमत्ता. याचा अर्थ असा होतो की, कोणी आपल्या आई-वडिलांच्या नावे मालमत्ता घेतली असेल, तर तीही बेनामी मालमत्ता होऊ शकते.

5) चल - अचल संपत्ती, कुठल्याही प्रकारचे हक्क अथवा हित, कायदेशीर दस्तावेज, सोने, वित्तीय रोखे इ. कोणत्याही प्रकारच्या संपत्तीसाठी केलेले सर्व व्यवहार बेनामी व्यवहारात येतात.
🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

तीन वार्षिक योजना.

🅾कालावधी: इ.स. १९६६ - इ.स. १९६९तिसऱ्या योजनेच्या अपयशामुळे ि निर्माण झालेल्या आर्थिक अस्थैर्यामुळे सरकारला चौथी योजना सुरू करता आली नाही.

🅾हि सुटी १ एप्रिल,१९६६ ते ३१ मार्च, १९६९ दरम्यान राहिली. या सुट्टीच्या कालावधीत सरकारने तीन वार्षिक योजना राबवल्या ज्यांचे उद्दिष्ट स्वावलंबन हे होते.

१) पहिली वार्षिक योजना (१९६६-६७) १९६६ च्या खरीप हंगामात सरकारने हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानाचा वापर केला. ६ जून १९६६ मध्ये रुपयाचे ३६.५ टक्क्यांनी अवमूल्यन घडवण्यात आले.

२) दुसरी वार्षिक योजना (१९६७-६८) हरित क्रांतीच्या तंत्रज्ञानामुळे व पुरेशा मान्सूनमुळे अर्थव्यवस्थेची परिस्थिती सुधारण्यास सुरवात झाली. १९६७-६८ मध्ये अन्नधान्यांचे उच्चांकी उत्पादन झाले.

३) तिसरी वार्षिक योजना (१९६८-६९) अन्नधान्य उत्पादन व किमती स्थिरावल्या. व्यवहारतोल सुधारला व चौथी योजना सुरु करण्यास अनुकूल परिस्थिती निर्माण झाली.


🅾तिसर्‍या योजनेत शेती आणि गहू उत्पादन सुधारण्यावर भर देण्यात आला, परंतु १९६२ च्या छोट्या भारत-चीन युद्धाच्या अर्थव्यवस्थेने कमकुवतपणा उघडकीस आणला आणि संरक्षण उद्योगाकडे लक्ष वेधले. १ पाकिस्तानने भारताशी युद्ध केले.

🅾 महागाई आणि प्राथमिकतेच्या नेतृत्वात युद्धाची किंमत स्थिरतेकडे वळविली गेली. धरणाचे बांधकाम चालूच होते. बरीच सिमेंट आणि खताची रोपेही बांधली गेली. गव्हाचे मोठ्या प्रमाणात उत्पादन पंजाबमध्ये सुरू झाले. ब rural्याच ग्रामीण भागात प्राथमिक शाळा सुरू झाल्या. 

🅾यासाठी तळागाळात लोकशाही आणण्याच्या प्रयत्नात पंचायत निवडणुका सुरू झाल्या आणि अधिक विकासाशी संबंधित जबाबदा the्या राज्यांना देण्यात आल्या. राज्य विद्युत मंडळे व राज्य माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन केली गेली. 

🅾राज्य, माध्यमिक आणि उच्च शिक्षणासाठी जबाबदार होते. रस्ते वाहतूक कॉर्पोरेशनची राज्ये ही राज्ये होती आणि स्थानिक रस्ते बांधणीसाठी ही राज्ये जबाबदार ठरली.
जीडीपी (जीडीपी) चे लक्ष्य .6..6 टक्के विकास दर साध्य करण्याचे होते . साध्य केलेला विकास दर 2.84 टक्के होता.

🅾जॉन सॅंडी आणि सुखमय चक्रवर्ती मॉडेल्सवर आधारित ही योजना होती. या योजनेनंतर 1967-1969 पर्यंत कोणतीही नवीन योजना लागू केली गेली नव्हती. या कालावधीला प्लॅन हॉलिडे असे म्हणतात. हे मिर्डेनच्या मॉडेलवर आधारित आहे.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋