Monday 29 November 2021

हृदय (Heart)

◆- मानवी हृदय हे उरोभागात दोन्ही फुफ्फुसांच्या मध्ये आणि छातीच्या हाडाच्या मागे स्थित असते. ते तंतोतंत मध्यभागी नसून काहीसे तिरकस आणि डावीकडे असते.

◆- वजन :पुरुष – ३४० ग्रॅम्स, स्त्री – २५५ ग्रॅम्स

★ कार्य :

◆ - हृदय हे रक्तभिसरण संस्थेचे महत्वाचे इंद्रिय आहे आकुंचन व प्रसारणाद्वारे रक्ताचे संपूर्ण शरीरात अभिसरण घडवून आणणे, हे त्याचे प्रमुख कार्य आहे. टेलीग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆- हृदय हा एक स्नायूंचा पंप (Muscular Pump) आहे. त्याची पंपिंग क्षमता (Pumping Capacity) 0.2 HP इतकी असते.

◆- हृदयाचा आकार साधारणपणे त्रिकोणाकृती असून त्याचे आकारमान हाताच्या मुठीएवढे असते, ते हृत्स्नायू (Cardiac Muscles) नी बनलेले असते आणि त्यावर ह्रद्यावरण (Pericardium) हे संरक्षणात्मक दुहेरी आवरण असते.

★ हृदयाची रचना

◆- मानवी हृदयात एकूण चार कप्पे व पाच झडपांचा समावेश होतो. वरच्या बाजूस दोन अलिंद व खालच्या बाजूस दोन निलय असे कप्पे असतात. अशा रीतीने चार कप्प्यांमध्ये

◆- डावी कर्णिका/अलिंद (Left Autrium)
◆- उजवी कणिका/ अलिंद (Right Autrium)
◆- डावी जवनिका /निलय (Left Ventricle)
◆- उजवी जवनिका/ निलय (Right Ventricle) यांचा समावेश होतो.

◆- अलिंदांच्या भिंती पातळ असतात, तर निलय जाड भिंतीची बनलेली असतात. वरची दोन अलिंदे एका पातळ स्थायुमय पटलाने विभक्त झालेली असतात. त्यास अंतरकालिंदी पट (Inter -Artrial Septum) असे म्हणतात. खालची दोन निलये मात्र जाड अंतरनिलयी पटलाने (Inter-Ventricular Septum) विभागलेली असतात.

◆- उजव्या अलिंदात पुढील तीन रक्तवाहिन्यांद्वारे ऑक्सिजनविरहित रक्त आणले जाते.

१) ऊर्ध्व शिरारक्त गुहा (Superior Vena Cava),
२) अधोशीरा रक्त गुहा (Inferior Vena Cava) आणि
३) परिमंडली शिरानाल (Coronary Sinus)

◆- उजवे अलिंद आणि उजवे निलय यांमधील रक्तप्रवाह त्रिदली झडपांच्या (Tricuspid Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते.

◆- उजव्या निलयाच्या वरील भागाकडून फुफ्फुस धमनी (Pulmonary Artery) निघते.

◆ उजव्या अलिंदातून उजव्या निलयात आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत फुफ्फुसांकडे वाहून नेले जाते.

◆- डाव्या अलिंदात फुफ्फुस शिरांची (Pulmonary Veins) चार रंध्रे उघडतात, त्यांद्वारे ऑक्सिजनयुक्त रक्त फुफ्फुसांकडून डाव्या अलिंदात आणले जाते.

◆- डावे अलिंद आणि डावे निलय यांच्यातील रक्तप्रवाह द्विदली (Bicuspid) किंवा मिट्रल झडप (Mitral Valve) च्या साहाय्याने नियंत्रित केले जाते. टेलीग्राम चॅनल टार्गेट एमपीएससी एम एच.

◆- डाव्या निलयाच्या वरच्या आतील भागापासून एक प्रमुख धमनी निघते, जिला महाधमनी (Aorta) असे म्हणतात. डाव्या अलिंदातून डाव्या निलयामध्ये आलेले ऑक्सिजनयुक्त रक्त तिच्यामार्फत शरीराच्या विविध अवयवांना पुरविले जाते.

◆- हृयाच्या स्नायूंना परिहृद धमनी (Coronary Artery) द्वारे रक्त पुरविले जाते.

◆ हृदयातील झडपांमुळे रक्त एकाच दिशेने प्रवाहित केले जाते.

No comments:

Post a Comment

Latest post

G7 बद्दल माहिती

🔖सौदीने तेल 300% महाग केले होते आणि 1973 मध्ये G7 ची स्थापना हालचाल सुरू झाली 📌 इस्रायल आणि अरब राष्ट्रांमध्ये युद्ध झाले. दरम्यान, अमेरि...