09 December 2021

वाऱ्याच्या खननकार्यामुळे निर्माण झालेली भूरूपे :

अपवहन खळगे : 

वाळवंटी प्रदेशात वाऱ्याच्या आघाताने खडकाचे तुकडे होऊन तसेच खड्डय़ाच्या जागी कधी पाणी साचून खडक कुजून कमकुवत होतात. हे तुकडे वाऱ्याबरोबर वाहत जाऊन तेथे खड्डे तयार होतात. या खळग्यांनाच ‘अपवहन खळगे’ असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा, आफ्रिकेतील कलहारी, आशियातील मंगोलिया, पश्चिम ऑस्ट्रेलिया इ. वाळवंटी प्रदेशात अपवहन खळगे आहेत.

भूछत्र खडक :

वारा वाहत असताना वाऱ्याबरोबर वाळूचे अनेक कण वाहत असतात. अशा वेळी वाऱ्याच्या मार्गात एखादा शिलाखंड आल्यास व वाऱ्याची दिशा सतत बदलत राहिल्यास शिलाखंडाच्या पायथ्यापासून एक ते दीड मीटर उंचावर असलेल्या भागाची चोहोबाजूंनी घर्षणाने झीज होते. त्याला छत्रीसारखा आकार प्राप्त होतो. अशा वैशिष्टय़पूर्ण शिलाखंडाच्या आकाराला भूछत्र खडक असे म्हणतात. अशी उदाहरणे सहारा व इराणच्या वाळवंटात मोठय़ा प्रमाणात आहेत.

झ्युजेन :

वाळवंटी प्रदेशात क्षितिजसमांतर कठीण व मृदू खडकांचे स्तर एकमेकांवर आडवे असल्यास व त्यात जोड किंवा संधी असल्यास ऊन, वारा आणि जास्तीत जास्त तापमान व कमीत कमी तापमान यामुळे जोड रुंदावत जातात. अशा वेळी कठीण खडकाची फारशी झीज होत नाही. जो आकार प्राप्त होतो, त्यास झ्युजेन असे म्हणतात. झ्युजेनची उंची साधारण ४० ते ४५ मीटपर्यंत असते. अशी भूरूपे अरेबिया, इजिप्त व लिबियाच्या वाळवंटी प्रदेशात आढळतात.

यारदांग :

वाळवंटात ज्या ठिकाणी कठीण आणि मृदू खडक हे लंबवत स्थितीत वाऱ्याच्या दिशेला समांतर व एकानंतर एक असतील किंवा एकमेकांना समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या खननकार्यामुळे मृदू खडकाची जास्तीत जास्त झीज होऊन मृदू खडक किंवा स्तर नाहीसा होऊन यारदांग तयार होतात. अशी यारदांगे मध्य आशिया खंडातील गोबीच्या वाळवंटात, दक्षिण अमेरिकेतील अटाकामाच्या वाळवंटात आढळतात.

द्वीपगिरी :

वाळवंटी प्रदेशात एखादा चबुतरा असल्यास चबुतऱ्याच्या आजूबाजूचा भाग वाऱ्याच्या खननकार्यामुळे झिजून आतील कठीण खडकाचा उंच भाग तसाच शिल्लक राहतो. हा भाग घुमटाकार होत जाऊन वाळूच्या टेकडीसारखा दिसू लागतो. त्यांची फारशी झीज होत नाही. हे उंच व घुमटाकार आकार वाळूच्या टेकडय़ांसारखे असतात. यांनाच ‘द्वीपगिरी’ असे म्हणतात.

वाळवंटी प्रदेशात वारा आणि काही प्रमाणात पाऊस यांच्या संयुक्त कार्यामुळे द्वीपगिरीची निर्मिती होते. कलहारी वाळवंटात, नायजेरियाच्या वाळंवटात आणि ऑस्ट्रेलियाच्या वाळवंटात द्वीपगिरीची उदाहरणे आढळतात. द्वीपगिरी म्हणजे तीव्र उताराच्या टेकडय़ा होय.

मेसा व बुटे :

वाळवंटी प्रदेशात कठीण व मृदू खडकांचे थर एकमेकांवर आणि आडव्या दिशेने समांतर असतील तर अशा वेळी वाऱ्याच्या घर्षणामुळे मृदू खडकांची झीज जास्त प्रमाणात होऊन तिथे चौकोनी टेबलासारखा भाग दिसतो. त्यास मेसा असे म्हणतात. मेसाच्या बाजू तीव्र उताराच्या असतात. मेसा या टेबलासारख्या भागावर सतत झीज होत राहिल्यास त्याचा आकार लहान ठोकळ्यासारखा दिसतो. त्यास बुटे असे म्हणतात.

पुणे प्रशासकीय विभागाबद्दल संपूर्ण  माहिती

जिल्हयाचे मुख्य ठिकाण – पुणे      

क्षेत्रफळ – 15,643 चौ.कि.मी.

लोकसंख्या – 94,26,959 (सन 2011 च्या जनगणनेनुसार)

तालुके – 14 – जुन्नर, आंबेगांव, खेड (राजगुरूनगर), इंदापूर, शिरूर, मावळ (वडगाव), वेल्हे, पुणे शहर, दौंड, भोर, हवेली (पुणे), मुळशी (पौड), पुरंदर (सासवड), बारामती.

सीमा – उत्तर व पूर्वेस अहमदनगर जिल्हा, पश्चिमेस रायगड जिल्हा, दक्षिणेस सातारा👌 जिल्हा आहे. आग्नेयेस सोलापूर तर वायव्येस ठाणे जिल्हा आहे.

पुणे जिल्हा विशेष

‘विधेचे माहेरघर’ असे पुणे शहरास म्हणतात. याच ठिकाणी महात्मा ज्योतीबा फुल्यांच्या समाज-परिवर्तनाच्या कार्यास सुरुवात झाली. आगरकर, गोपाळ कृष्ण गोखले, महर्षी धोंडो केशव कर्वे यासारख्या नररत्नाचे कर्तृत्व याच पुण्याने फुलविले. लोकमान्य टिळकांची ही कर्मभूमी होय.

राष्ट्रकूट, राजवटीत या गावाचा पुनवडी नावाने उलेख केला जाई. ‘पुण्य’ या शब्दावरून ‘पुणे’ हे नाव पडले असावे, अशी एक उपपती मांडली जाते.

देशातील सर्वात पहिले उपग्रह दळणवळण केंद्र जुन्नर तालुक्यात आर्वी येथे 1971 पासून कार्यरत अष्टविनायकापैकी (1) श्री विघ्नेश्वर, ओझर (2) श्री गणपती, राजणगांव (3) गिरजात्मक, लेण्याद्री (4) चिंतामणी, थेऊर (5) मोरेश्वर, मोरगाव या पाच अष्टविनायकाचे स्थान या जिल्हात आहे.

पुणे जिल्ह्यातील महत्वाची स्थळे

पुणे – मुळा-मुठा नद्यांच्या संगमावर पुणे शहर आहे. शिवाजी महाराजांचे बालपण, पेशव्यांची राजधानी, शनिवारवाडा यांमुळे पुण्यास ऐतिहासिक महत्व आहे. पुण्यात शिक्षण विभागाचे संचालनालय, महाराष्ट्र राज्याचे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, महाराष्ट्र राज्य पाठयपुस्तकनिर्मिती व अभ्यासक्रम संशोधन मंडळ, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण संस्था, पुण्याजवळच्या मोसरी येथे राष्ट्रीय एड्स अनुसंधान संस्था. तसेच निगडी येथे ‘अप्पूघर‘ हे करमणुकीचे केंद्र आहे.

पिंपरी-चिंचवड – पिंपरी-चिंचवड, परिसरात अनेक उधोगधंदे आहेत. चिंचवड येथे श्री. मोरया गोसावी या सत्पुरुषाची समाधी आहे. स्कूटर, रिक्षा, मोटार, कृत्रिम धागा, पेनिसिलीन, रसायने इत्यादीचे कारखाने येथे आहेत. निगडी येथील ‘अप्पूघर’ हे एक करमणुकीचे केंद्र आहे.

जुन्नर – जुन्नर जवळच सातवाहन काळातील शिवनेरी हा किल्ला आहे. येथेच शिवाजी महाराजाचा जन्म झाला. किल्यावर शिवाईदेवीची मंदिर आहे. जुन्नर गावात दादोजी कोंडदेवांचा वाडा होता.

आळंदी – हे ठिकाण इंद्रायणीकाठी असू येथे श्री. ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे.

देहू – हे इंद्रायणी नदीच्या काठावर असून संत तुकाराम महाराजाचे जन्मस्थान म्हणून ओळखले जाते.

चाकण – येथील भुईकोट किल्ला प्रसिद्ध आहे. कांद्यांची बाजारपेठ म्हणूनही चाकण प्रसिद्ध आहे.

लोणावळा – हे थंड हवेचे ठिकाण आहे. येथून जवळच वळवण धरण, कार्ले-भाजे येथील कोरीव लेणी प्रेक्षणीय आहेत. नाविक प्रशिक्षण केंद्र व अनेक कारखाने येथे आहेत.

जेजूरी – महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबांचे देवस्थान आहे.

आर्वी – आर्वी हे जुन्नर तालुक्यात असून येथे ‘विक्रम’ हे उपग्रह दळणवळण केंद्र आहे.

राजगुरूनगर – हुताम्मा राजगुरूंचे हे गाव आहे.

भीमाशंकर – येथील शंकराचे मंदिर प्रसिद्ध आहे. येथे अभयारण्य आहे.

उरुळी कांचन – येथे निसर्गोपचार केंद्र आहे. येथून जवळच भुलेश्वर हे यात्रेचे ठिकाण आहे.

दौंड – दौंड हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रेल्वे जंक्शन असल्यामुळे येथून लोहमार्गाने वेगवेगळ्या ठिकाणी जाता येते.

वालचंदनगर – येथे साखर कारखान्यासाठी लागणारी यंत्रसामुग्री तयार केली जाते. तसेच प्लॅस्टिकचा व वनस्पती तुपाचा कारखानाही येथे आहे.

सासवड – हे पुरंदर तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे सोपानदेवीची समाधी आहे. जवळच पुरंदर किल्ला आहे. सासवडचा परिसर अंजीर, सीताफळ, डाळिंब, पेरु इत्यादींच्या बागांसाठी प्रसिद्ध आहे.

भोर – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथे रंग, मेणकापड इत्यादींचे कारखाने आहेत. येथून जवळच भाटघर धरण व बनेश्वर ही सहलीची ठिकाणी आहेत.

वेल्हे – हे तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळ राजगड व तोरणा हे किल्ले आहेत.

वढू – येथे संभाजी महाराजांची समाधी आहे.

पौंड – हे मुळशी तालुक्याचे मुख्य ठिकाण आहे. येथून जवळच मुळशी धरण आहे.

पुणे जिल्हयाची वैशिष्ट्ये

पुणे प्रशासकीय विभागास पश्चिम महाराष्ट्र म्हटले जाते.

1997 पासून पुणे येथे देशातील पहिली मुलींची सैनिक शाळा आहे.

ग्रामसेवक व ग्रामसेविका प्रशिक्षण प्रशिक्षण केंद्र पुणे जिल्ह्यातील मांजरी येथे चालविले जाते.

पुणे नागरी संकुल हे देशातील आठव्या व राज्यातील दुसर्‍या क्रमांकाचे नागरी संकुल आहे.

राष्ट्रीय एड्स संशोधन संस्था (NARI), भोसरी (पुणे)

महाराष्ट्र राज्य शेती महामंडळ मुख्यालय, पुणे

राष्ट्रीय विषाणू संस्था, पुणे

महाराष्ट्र राज्य वखार महामंडळ, पुणे

राष्ट्रीय रसायन प्रयोगशाळा (NCL), पुणे

भूगोल प्रश्नसंच

1) सिंचनासाठी पाण्याची उपलब्धता कमी असल्यास खालीलपैकी कशाचा अवलंब करावा ?
   1) जमीन एका हंगामात पडीक ठेवावी.    2) ठिबक आणि तुषार सिंचन पध्दतीचा अवलंब करावा.
   3) एका आड एक सरी भिजवावी.      4) वरीलपैकी एकही नाही.
उत्तर :- 2

2) भारत सरकारने पाणी वापराबाबत काही निर्देश ठरवून दिले आहेत ? महाराष्ट्रासाठी कोणती जोडी चुकीची आहे ?
   1) महापालिका क्षेत्र – 135 लिटर दर डोई दर दिवशी
   2) ‘अ’ गटातील नगरपालिका – 170 लिटर दर डोई दर दिवशी
   3) ‘ब’ गटातील नगरपालिका – 100 लिटर दर डोई दर दिवशी
   4) ग्रामीण विभाग – 40 लिटर दर डोई दर दिवशी
उत्तर :- 2

3) पाण्यामध्ये वायू विरघळणे ही क्रिया कोणता सिध्दांत वापरून काढतात ?
   1) डारसीज् सिध्दांत    2) हेनरीज् सिध्दांत
   3) ॲव्होगाड्रोज सिध्दांत     4) वरीलपैकी नाही
उत्तर :- 2

4) पिकांना ओलाव्याचा ताण पडलेल्या कालावधी संरक्षक पाणी देण्यासाठी जनसंचयनाची (वॉटर हार्वेस्टिंग) प्रामुख्याने जी आणखी
     केली जाते त्यास ...................... म्हणतात. 
   1) पावसावरची शेती    2) अपधाव शेती
   3) कोरडवाहू शेती    4) वरील सर्व
उत्तर :- 2

5) अ) समतल बांध पध्दत मुख्यत्वे कमी पावसाच्या प्रदेशात जल संधारणासाठी वापरली जाते.
    ब) ढाळीचे बांध पध्दत जास्त पावसाच्या प्रदेशात जास्त झालेले पाणी बाहेर काढून टाकण्यासाठी वापरली जाते.
         वरील विधानांबाबत खालीलपैकी कोणता पर्याय बरोबर आहे  ?
   1) अ बरोबर आणि ब चूक आहे.      2) दोन्ही अ आणि ब बरोबर आहेत.
   3) अ चूक आणि ब बरोबर आहे.      4) दोन्ही अ आणि ब चूक आहे.
उत्तर :- 2

1) योग्य जोडया लावा :
  वायू      वातावरणातील शुष्क प्रमाण भाग प्रती दशलक्ष
         अ) नायट्रोजन (N2)    i) 0.007ppm
         ब) हेलियम (He)    ii)0.5ppm
        क) ओझोन (O3)    iii) 780,840.0ppm
         ड) हायड्रोजन (H2)    iv) 5.2ppm
    अ  ब  क  ड
           1)  ii  i  iii  iv
           2)  iv  iii  ii  i
           3)  i  ii  iv  iii
           4)  iii  iv  i  ii
उत्तर :- 4

2) खालील विधानांचा विचार करा.
   अ) एल. निनो प्रवाहाच्या वेळी दक्षिण प्रशांत महासागरातील पृष्ठाभागावरील तापमानात वाढ होते.
   ब) वर्ष 2013-14 मध्ये भारतामध्ये भीषण दुष्काळ होता आणि त्यावेळी एल निनो प्रवाह प्रबळ होता.
         वरीलपैकी कोणते / ती विधान / ने बरोबर आहे / त ?
   1) फक्त अ    2) फक्त ब    3) अ आणि ब दोन्हीही    4) अ आणि ब दोन्हीही नाहीत
उत्तर :- 3

3) स्क्वेल / चंडवात (पाऊस व हिम वर्षाबरोबर येणारी वावटळ) ही महाराष्ट्रामध्ये दुर्मिळ आहे, परंतु कधी – कधी ...............
     प्रसंगी येते.
   1) किनारपट्टीवर मान्सून पूर्व काळात आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   2) मान्सून काळात किनारपट्टीवर आणि मान्सून पूर्व काळात अंतर्गत प्रदेशात.
   3) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि मान्सून काळादरम्यान अंतर्गत प्रदेशात.
   4) मान्सून नंतरच्या काळात किनारपट्टीवर आणि अंतर्गत प्रदेशात.
उत्तर :- 2

4) नॅशनल सेंटर फॉर मोडियम रेंज वेदर फोरकास्टींग (NCMRWF) याची स्थापना .................. साली नवी दिल्लीत झाली.
   1) 1985    2) 1988      3) 1992      4) 1994 
उत्तर :- 2

5) पाणलोट क्षेत्र आधारित जमीन व पाणी संवर्धन योजना मुख्यत: कशावर आधारित असते ?
   1) पाणलोट क्षेत्र व्यवस्थापन तंत्रज्ञान
   2) जमीन आणि माती संवर्धन
   3) पिकांचे नियोजन
   4) जमिनीच्या वापराच्या क्षमतेनुसार वर्गवारी करणे
उत्तर :- 1 

1) खालील वातावरणाच्या स्तरांची उंचीनुसार मांडणी करा :
   अ) तपांबर    ब) आयनांबर    क) स्थितांबर    ड) बाह्यांबर
   1) ड, क, ब, अ    2) अ, क, ब, ड    3) अ, ब, क, ड    4) क, ब, अ, ड
उत्तर :- 2

2) सर्वसाधरणपणे उत्सर्जीत सूर्यकिरणांपैकी ................. टक्के सूर्यकिरण पिकाच्या पृष्ठभागावरती शोषले जातात.
   1) 75      2) 79      3) 85      4) 73
उत्तर :- 1

3) जर्मन गव्हर्नमेंट डेव्हलपमेंट बँकेच्या अर्थसाहाय्याने ग्रामीण पाणी पुरवठा ‘आपलं पाणी’ प्रकल्प पुढील कोणत्या जिल्ह्यात राबविला
      जात आहे ?
   1) नागपूर-अमरावती-अकोला    2) धुळे-जळगाव-नंदूरबार
   3) सांगली-सातारा-कोल्हापूर    4) पुणे-अहमदनगर-औरंगाबाद
उत्तर :- 4

4) पावसाच्या थेंबामुळे जमिनीचे धुपीवर कोणता मुख्य परिणाम होतो ?
   1) जमिनीच्या कणांची अलिप्तता होऊन त्यामुळे जमिनीची घडण बिघडणे.
   2) पाणी साठयास सुरुवात होणे.
   3) जमिनीतील ओलावा कमी करणे.
   4) जोरात वाहणा-या पाण्यामुळे जमिनीच्या कणांची वाहतुक होते.
उत्तर :- 1

5) पाण्याची वाटप करण्यासंबंधी पाणी पंचायत मॉडेल, विलासराव साळुंखेच्या प्रयत्नाने पुणे जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यात सुरू
     करण्यात आले ?
   1) बारामती    2) खेड      3) पुरंदर      4) मावळ
उत्तर :- 3



महाराष्ट्रात असलेले अभयारण्य

अंधारी-----------------------चंद्रपुर

बोर---------------------------वर्धा

टिपेश्वर---------------------यवतमाळ

नागझिरा----------------------भंडारा

भामरागड--------------------गडचिरोली

चपराळ-----------------------गडचिरोली

मेळघाट-----------------------अमरावती

नर्नाळा--------------------------अकोला

वान---------------------------अमरावती

अंबाबरवा----------------------बुलढाणा

नांदूर मध्यमेश्वर---------------नाशिक

यावल----------------------------जळगाव

कळशुबाई हरिश्चंद्र गड--------अहमदनगर

गौताळा औटरमघाट------------औरंगाबाद, जळगाव

जायकवादी पक्षी अभयारण्य---------------औरंगाबाद, अहमदनगर

नायगव मयूर अभयारण्य------------------बीड

येडसी  रामलिंगघाट----------------उस्मानाबाद

अनेर डॅम------------------------------धुळे

काटेपूर्णा---------------------अकोला, वाशिम

पैनगंगा-------------------------यवतमाळ

ज्ञानगंगा-------------------------बुलढाणा

कारंजा-सोहळ------------------अकोला

लोणार अभयारण्य--------------------बुलढाणा

कर्नाळा पक्षी अभयारण्य---------------------ठाणे

तानसा------------------------------ठाणे

फनसाड-------------------------रायगड

भीमाशंकर--------------------------पुणे

माळढोक अभयारण्य----------------पुणे, सोलापूर, अहमदनगर

रेहकुरी अभयारण्य-----------------अहमदनगर

मयूरेश्वर-सुपे--------------------------पुणे

राधानगरी अभयारण्य---------------------कोल्हापूर

सागरेश्वर अभयारण्य----------------------सांगली

कोयना अभयारण्य-----------------------सातारा

चांदोली अभयारण्य------------------सातारा, सांगली, कोल्हापूर, रत्नागिरी

मालवण सागरी अभयारण्य-------------------सिंधुदुर्ग

तुंगरेश्वर अभयारण्य----------------------ठाणे

भारतीय नियोजन आयोगाची कार्य


१)भारतीय नियोजन आयोगदेशाच्या स्रोतांचे मूल्यांकन करणे .

२)या स्रोतांच्या प्रभावी वापरासाठी पंचवार्षिक योजना तयार करणे.

३) प्राधान्यक्रम ठरविणे आणि योजनांना संसाधनांचे वाटप करणे.

४)योजनांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा निश्चित करणे.

५)वेळोवेळी योजनांच्या प्रगतीचे मूल्यांकन करणे.

६) देशातील संसाधने सर्वात प्रभावी आणि संतुलित पद्धतीने वापरण्याची योजना आखणे.

७) आर्थिक वाढ रोखणारे घटक ओळखणे.

८) योजनेच्या प्रत्येक टप्प्याच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी आवश्यक यंत्रणा निश्चित करणे.

🌺2014 मध्ये तत्कालीन पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ते विघटन करण्याची घोषणा केली आणि जानेवारी  2015 मध्ये त्याच्या जागी एनआयटीआय आयोग स्थापन झाला .

शाश्वत विकासाची संकल्पना

आपल्या बुद्धीच्या जोरावर नैसर्गिक साधनसंपत्तीचा वापर करताना माणूस हा निसर्गचक्राचा एक घटक आहे याची जाणीव शाश्वत विकास या संकल्पनेत आहे. पृथ्वीवरील इतर कोणताही सजीव आपल्या गरजेपेक्षा जास्त संसाधनांचा वापर करत नाही. जीवो जीवस्य जीवनम हे निसर्गचक्र आहे. माणसाच्या सतत अधिक काही मिळवण्याच्या इच्छेमुळे तो सतत अधिकाधिक संसाधनांचा वापर करत असतो

🔳 शाश्वत विकास १७ ध्येये 🔳

१. सर्व प्रकारच्या गरिबीचे निर्मूलन करणे.

 २. भूक संपवणे, अन्न सुरक्षा व सुधारित पोषणआहार उपलब्ध करून देणे आणि शाश्वत शेतीला प्राधान्य देणे.

३. आरोग्यपूर्ण आयुष्य सुनिश्चित करणे व सर्व वयोगटातील नागरिकांचे कल्याण साधणे.

४. सर्वसमावेशक व गुणवत्तापूर्ण शिक्षण उपलब्ध करणे.

५. लिंगभावाधिष्ठित समानता व महिला आणि मुलींचे सक्षमीकरण साधणे.

६. पाण्याची व स्वच्छतेच्या संसाधनाची उपलब्धता सुनिश्चित करणे.

७. सर्वाना अल्पखर्चीक विश्वासार्ह, शाश्वत आणि आधुनिक ऊर्जा साधने उपलब्ध करून देणे.

८. शाश्वत, सर्वसमावेशक आर्थिक वाढ आणि उत्पादक रोजगार उपलब्ध करणे.

९.पायाभूत सोयीसुविधांची निर्मिती करणे, सर्वसमावेशक आणि शाश्वत औद्योगिकीकरण करणे आणि कल्पकतेला वाव देणे.

१०. विविध देशांमधील असमानता दूर करणे.

११. शहरे आणि मानवी वस्त्या, अधिक समावेशक, सुरक्षित, संवेदनशील आणि शाश्वत करणे.

१२. उत्पादन आणि उपभोगाच्या पद्धती शाश्वत रूपात आणणे.

१३. हवामान बदल आणि त्याच्या दुष्परिणामांना रोखण्यासाठी त्वरित उपाययोजना करणे.

१४. महासागर व समूहांचे संवर्धन करणे तसेच त्यांच्याशी संबंधित संसाधनांचा शाश्वतपणे वापर करणे.

१५.परिस्थितिकीय व्यवस्थांचा (Ecosystem) शाश्वत पद्धतीने वापर करणे. वनाचे शाश्वत व्यवस्थापन, वाळवंटीकरणाशी मुकाबला करणे, जमिनीचा कस कमी होण्याची प्रक्रिया आणि जैवविविधतेची हानी रोखणे.

१६. शांततापूर्ण आणि सर्वसमावेशक समाजव्यवस्थांना प्रोत्साहन देणे. त्यांची शाश्वत विकासाच्या दिशेने वाटचाल निश्चित करणे, सर्वाची न्यायापर्यंत पोहोच स्थापित करण्यासाठी विविध पातळ्यांवर परिणामकारक, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक संस्था उभ्या करणे.

१७. चिरस्थायी विकासासाठी वैश्विक भागीदारी निर्माण व्हावी यासाठी अंमलबजावणीची साधने विकसित करणे.

नाबार्डची भूमिका

१)ग्रामीण भागातील कर्ज देणार्‍या संस्थांना पुनर्वित्त प्रदान करणे

२)संस्थात्मक विकास किंवा पदोन्नतीग्राहकांच्या बँकांचे मूल्यांकन करणे.
 
३)ग्रामीण भागातील विकासात्मक कामांना चालना देण्यासाठी गुंतवणूक आणि उत्पादन पत पुरवणा provide्या विविध संस्थांना वित्तपुरवठा करण्यासाठी ही एक सर्वोच्च संस्था म्हणून काम करते.
      
  ४)पत वितरण प्रणालीच्या शोषण क्षमतेसाठी संस्था तयार करण्याच्या दृष्टीकोनातून देखरेख, पुनर्वसन योजनांची अंमलबजावणी, पत संस्थांची पुनर्रचना, कर्मचार्‍यांच्या प्रशिक्षणात सुधारणा   

५)सर्व संस्था ज्या प्रामुख्याने तळागाळातील विकासाच्या कामात गुंतलेल्या आहेत, त्यांच्या ग्रामीण वित्तपुरवठा कार्यात समन्वय ठेवतात आणि भारत सरकार, राज्य सरकारे, भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि इतर धोरण संबंधित बाबी. राष्ट्रीय स्तरावरील संस्थांशी समन्वय राखतो.
 
६)हे त्याच्या पुनर्वित्त प्रकल्पांचे परीक्षण आणि मूल्यांकन करते.

राज्य आणि त्यांनी सुरु केलेल्या योजना

👉"अमा घरे LED योजना" ➖उड़ीसा

👉"उज्जवल सेनीटरी नैपकिन" ➖उड़ीसा

👉"बीज़ू स्वास्थ्य योजना" ➖उड़ीसा

👉"युवा स्वाभिमान योजना" ➖मध्य प्रदेश

👉"जय किसान ऋण मुक्ती योजना" ➖मध्य प्रदेश

👉"अटल सोलर कृषि पंज योजना" ➖महाराष्ट्र

👉"महिला पुलिस स्वयंसेवक योजना" ➖हरियाणा

👉"गौ कल्याण सेस"➖उत्तर प्रदेश

👉"एक परिवार, एक नोकरी" ➖सिक्किम

👉"प्रवासी लाभांश पेंशन योजना" ➖ केरल

👉"रक्षक प्लस योजना" ➖ भारतीय सेना द्वारा, पीएनबी बैंक के साथ

👉"जीवन संपर्क परियोजना"➖उड़ीसा

👉"महाग्रिटेक परियोजना"➖ महाराष्ट्र

अर्थसंकल्प जाहीर होण्याची वेळ.

🅾सन 1999 पर्यंत केंद्रीय अर्थसंकल्प फेब्रुवारी महिन्याच्या शेवटच्या कार्यकारी दिवशी संध्याकाळी 5 वाजता जाहीर करण्यात आला. ही प्रथा वसाहतीच्या काळातली होती.

🅾 दुसरे कारण म्हणजे  1990  च्या दशकात, सर्व बजेट कर वाढविणे म्हणजे संध्याकाळी सादर केलेल्या सादरीकरणामुळे उत्पादकांना आणि कर वसूल करणार्‍या एजन्सीनांना रात्रीच्या किंमतीतील बदल लक्षात घेण्याची संधी मिळाली. 

🅾अटलबिहारी वाजपेयी यांच्या एनडीए सरकारमध्ये ( भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वात ) तत्कालीन अर्थमंत्री श्री. यशवंत सिन्हा हे होते.

🅾 त्यांनी सकाळी ११ वाजता 1999 च्या केंद्रीय अर्थसंकल्पात घोषणा करून विधी बदलला. ही परंपरा 2001 पासून सुरू झाली.

🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋🦋

चला पटापट गणित सोडवा

1) मुलांचे वय वडिलांच्या 1/4 पट असुन काकांच्या 1/3 पट आहे जर वडील व काका याच्या वयात 12 वर्षांचे फरक असेल तर मुलांचे 12 वर्षानंतर वय किती  ?

स्पष्टीकरण👇
मुलाचे वय = x  वर्षे

वडील = 4x वर्षे

काका = 3x = वर्षे

4x - 3x = 12

        = 12 

मुलाचे  वय =x =12 वर्षे

मुलाचे 12 वर्षानंतर वय 24 वर्ष✅

1) बहिणीचे वय आईच्या 1/3 असुन भावाचे वय 1/4 आहे जर त्यांच्या वयांची बेरीज 57 वर्षे असेल आईचे वय किती ?

स्पष्टीकरण👇
आई वय = X वर्षे

बहिणीचे वय = 1/8 × X/8

भावाचे वय = 1/4 × X = X/4  वर्षे

X + X/3 + X/4 = 57

12X + 4X + 3X = 57 ×12

19X = 57 × 12

X = 57 × 12/19

        &
X = 36 वर्षे

आईचे वय = X = 36 वर्ष✅

1) दोन भांवाच्या वयाची बेरीज 30 वर्षे असुन आणखी 7 वर्षे नंतर मोठया भावाचे वय 24 वर्षे होईल तर 5 वर्षापुर्वी लहान भावाचे वय किती  ?

स्पष्टीकरण👇
7 वर्षानंतर

मोठ्या भाऊ = 24 वर्षे

आज

मोठ्या भाऊ = 17 वर्षे

लहान भाऊ + मो.भाऊ = 30

लहान भाऊ + 17 = 30

लहान भाऊ = 13 वर्षे

5 वर्षा पुर्वी लहान भाऊ = 8 वर्षे✅

1) 5 वर्षापुर्वी आई वडील व मुलगा यांच्या वयांची बेरीज 65 वर्षे होती तर आणखी 4 वर्षानंतर त्यांच्या वयांची बेरीज ?

स्पष्टीकरण👇
5 पुर्वी

65

आजचे = 65 + 5 + 5 + 5 = 80

4 वर्षानंतर = 80 + 4 + 4 + 4 = 92 वर्षे✅

2 वर्षापुर्वी शाम व राम यांच्या वयाचे गुणोत्तर 1 : 4 होते आणखी 6 वर्षानंतर त्यांचेगुणोत्तर 1 : 2 होईल तर राम चे आजचे वय शोधा ?

स्पष्टीकरण👇
2 वर्षापुर्वी

राम : शाम = 1 : 4

राम = 1x = 4 वर्षे

शाम = 4x

6 वर्षानंतर

राम = ( x + 8 )

शाम = ( 4x + 8)

( x + 8)/(4x + 8) = 1/2

2x + 16 = 4x + 8

16 : 8 4x - 2x

8 = 2x

8/2 = 4

x = 4

2 वर्षा पुर्वी राम = 4 वर्षे आज राम चे वय 6 वर्षे✅

1) आजोबाचे वय नातवाच्या 9 पट असुन वडीलांच्या वयाच्या 2 पट आहे वडीलाचे 6 वर्षापुर्वी वय 30 वर्षे असेल तर नातवाचे आजचे वय किती  ?

स्पष्टीकरण👇
वडील 6 वर्ष पुर्वी = 30 वर्षे

आज वडीलांचे वय = 36 वर्षे

आजोबा = 2×36 = 72

नातवाचे वय = 1/9 × 72

         = 8 वर्षे✅

1) कृष्णाचे वय त्यांच्या वडीलांच्या वयाच्या 1/5 असुन त्यांच्या आईचे वय वडिलांच्या वयापेक्षा 5 वर्षानी कमी आहे जर 10 वर्षानंतर आईचे वय 40 वर्षे असेल तर कृष्णाचे आजचे वय किती ?

स्पष्टीकरण👇

10 वर्षानंतर आई = 40 वर्षे

आज आईचे = 30 वर्षे

वडीलांचे वय = 35

कृष्णाचे वय = 1/7×35

       7 वर्षे✅

1) एका मत्स्यटाकी काठोकाठ भरल्यावर तिच्या 45 लिटर पाणी मावते जर तिच्यातुन 2/5 इतके पाणी काढून टाकले तर ती 4/9 भरते ती पुन्हा काठोकाठ भरण्यासाठी तिच्यात किती पाणी घालावे लागेल ?

स्पष्टीकरण👇
45×4/9 = 20 लिटर

   20×2/5 = 8 लिटर
-------------------------
                    12 लिटर + 33 लिटर

     33 लिटर✅

1) A एक कामं 16 दिवसांत पुर्ण करतो तेच कामं B हा 24 दिवसांत पुर्ण करतो A व B ने सुरुवातील 8 दिवस एकत्र कामं केले व A कामं सोडून निघून गेला तर कामं संपण्यासांठी सुरुवातीपासून किती दिवस लागले असतील ?
A -- 16 दिवस

B -- 24 दिवस

लसावि = 48

एकून कामं = 48 कामं

प्रति दिवस A चे कामं = 3

प्रति दिवस B चे कामं = 2
-------------------------
एकत्रित = 05 प्रति दिवस

8 दिवस एकत्रित = 5×8 = 40 कामं

राहिलेले कामं = 48 - 40 = 08 कामं

प्रति दिवस = 02 कामं

8 कामं संपवण्यासाठी = 4 दिवस

एकून दिवस = 8 दिवस + 4 दिवस = 12 दिवस✅

1) A हा एक कामं 12 दिवसांत पुर्ण करतो B हा एक (तेच) कामं 24 दिवसांत पुर्ण करतात दोघांनी मिळून कामं केले तर किती दिवसात पुर्ण होईल  ?

*स्पष्टीकरण*👇
A === 12 दिवसांत काम करतो

B === दिवसांत काम करतो

12 व 24 चा लसावि = 24

समजा ते कामं = 24

A -- प्रति दिन = 2 कामं

B -- प्रति दिन = 1 कामं कामं

प्रति  दिन = ( A + B ) = ( 2 + 1) = 3  कामं

1 दिवसा = 03 कामं

8 दिवसांत = 24 कामं

8 दिवसांत पुर्ण होईल✅