Ads

21 February 2022

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

१).मसूरी हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे?

१.उत्तराखंड ✅
२.जम्मू काश्मीर
३.सिक्किम
४.उत्तर प्रदेश

२).भारताच्या मुख्य भूमीस खालीलपैकी काय म्हणतात?

१.बेट
२.त्रिभुजप्रदेश
३.द्वीपकल्प✅
४.मैदानी प्रदेश

३). केदारनाथ कोणत्या राज्यात आहे?

१. उत्तर प्रदेश
२. हिमाचल प्रदेश
३. उत्तराखंड ✅
४. जम्मू-काश्मीर

४). राज्यसभेच्या सदस्याचा कार्यकाळ किती वर्ष असतो?

१. २ वर्ष
२. ४ वर्ष
३. ५ वर्ष
४. ६ वर्ष✅

५). भारताची पहिली कृत्रिम बुद्धिमत्ता संस्था येथे स्थापित केली गेली ?

१. पुणे
२. हैदराबाद
३. चेन्नई
४. मुंबई✅

६) .मार्च २०१९ मध्ये खालील पैकी कोणत्या माझी आरबीआय गव्हर्नर ला यशवंतराव चव्हाण राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करण्यात आला?

१.  मनमोहनसिंग
२.  रघुराम राजन✅
३.  विमल जलान
४.  उर्जित पटेल

७) .चांद्रयान-१ हे भारताचे पहिले मिशन टु मुन...... रोजी यशस्वीपणे पाठवण्यात आले?

१. जानेवारी - २००७
२. ऑक्टोबर- २००८✅
३. सप्टेंबर-  २०११
४. ऑक्टोबर -२०१२

८) .ऑक्टोबर 2018 मध्ये वर रुबान नावाचे अत्यंत तीव्र चक्रीवादळ निर्माण झाले ?

१. अरबी समुद्र ✅
२. बंगालचा उपसागर
३. पॅसिफिक महासागर
४.  हिंदी महासागर

९) .लोरियस स्पोर्ट मॅन ऑफ द इयर २०१९ पुरस्कार कोणी जिंकला?

१. नोवाक जोकोविक✅
२.  रॉजर फेडरर
३. राफेल नदाल
४.टायगर वूड्स

१०) .मुलभूत कर्तव्य संदर्भात तरतुदी भारतीय घटनेच्या कोणत्या भागात करण्यात आली आहे?

१. भाग -२
२. भाग -३
३. भाग -४
४. भाग -४अ✅

११) .'सत्यार्थ प्रकाश' या ग्रंथांची रचना..... यांनी केली?

१. स्वामी दयानंद सरस्वती✅
२. स्वामी विवेकानंद
३. राजाराम मोहन राय 
४. स्वामी परमहंस

१२). आहारात लोह खनिजाचे प्रमाण कमी असल्यास कोणता आजार होतो?

१. क्षय
२.  डायरिया
३. ॲनिमिया✅
४. बेरीबेरी

१३) .बंगालच्या फाळणीस जबाबदार असणारा गव्हर्नर जनरल कोण होता?

१.  लॉर्ड मिंटो
२. लॉर्ड कर्झन✅
३. लॉर्ड रिपन
४. लॉर्ड डलहौसी

१४) .मुंबई प्रांतात देवदासी प्रथेविरुद्ध ........ यांनी आवाज उठविला?

१. महात्मा फुले
२. सावित्रीबाई फुले
३. लोकमान्य टिळक
४.वि.रा. शिंदे✅

प्रश्नसंच

 (०१)  राज्य स्तरावर राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?

उत्तर- मुख्यमंत्री.


(०२)  लक्षद्वीप कोणत्या महासागरात आहे ?

उत्तर- अरबी समुद्र.


(०३)  पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?

उत्तर- भूतान.


(०४) कर्नाळा अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- रायगड.


(०५)  रोजगार हमी योजना भारतात सर्वप्रथम कोंठे सुरू झाली ?

उत्तर- महाराष्ट्र.


(०६)  अग्नीपंख हे कोणाचे आत्मचरित्र आहे ?

उत्तर- ए. पी. जे. अब्दुल कलाम.


(०७)  रामकृष्ण मिशन या संस्थेची स्थापना कोणी केली ?

उत्तर- स्वामी विवेकानंद.


(०८)  जागतिक हास्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १० जानेवारी.


(०९)  रोमेश पठानिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- हाॅकी.


(१०)  भारतातील प्रथम महिला भारतरत्न कोण आहे ?

उत्तर- इंदीरा गांधी.

 

(११)  आमचा बाप आणि आम्ही हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- डाॅ. नरेंद्र जाधव.


(१२)  भारतातील लोकसंख्येच्या दृष्टीने सर्वांत लहान राज्य कोणते ?

उत्तर- सिक्किम.


(१३)  जागतिक सामाजिक न्याय दिन कधी साजरा केला जातो ?

उत्तर- २० फेब्रुवारी.


(१४)  अतनू दास हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- तिरंदाजी.


(१५)  भारतातील प्रथम महिला राज्यपाल कोण आहे ?

उत्तर- सरोजनी नायडू.


(१६)  चार नगरातले माझे विश्व हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- जयंत नारळीकर.


(१७)  महाबळेश्वर हे थंड हवेचे ठिकाणी कोणत्या जिल्ह्यात आहे ?

उत्तर- सातारा.


(१८)  जागतिक हवामान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २३ मार्च.


(१९)  नरेश कुमार हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- टेनिस.


(२०)  भारताची पहिली महिला लोकसभा अध्यक्ष कोण आहे ?

उत्तर- मीरा कुमार.


(२१)  उचल्या हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण गायकवाड.


(२२)  'जन-गण-मन' हे राष्ट्रगीत कोणी लिहिले आहे ?

उत्तर- रविंद्रनाथ टागोर.


(२३)  जागतिक आरोग्य दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- ७ एप्रिल.


(२४)  ओमप्रकाश दहिया हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- कुस्ती.


(२५)  भारतातील इंग्लिश खाडी पोहणारी पहिली महिला कोण आहे ?

उत्तर- आरती शहा.


(२६)  उपरा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- लक्ष्मण माने.


(२७)  भारताचे राष्ट्रपतीपद भूषविणारी पहिली महाराष्ट्रीयन महिला कोण ?

उत्तर- प्रतिभा पाटील.


(२८)  जागतिक दूरसंचार दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १७ मे.


(२९)  दीप्ती शर्मा हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- क्रिकेट.


(३०)  भारतातील प्रथम महिला राजदूत कोण आहे ?

उत्तर- विजयालक्ष्मी.


(३१)  मुसाफिर हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- अच्च्युत गोडबोले.


(३२)  कोणत्या तृणधान्यामध्ये सर्वांत जास्त तेल असते ?

उत्तर- मका.


(३३)  जागतिक रक्तदान दिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १४ जून.


(३४)  अदिती अशोक हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- गोल्फ.


(३५)  भारतातील पहिली महिला अंतराळवीर कोण आहे ?

उत्तर- कल्पना चावला.


(३६)  समिधा हे आत्मचरित्र कोणाचे आहे ?

उत्तर- साधना आमटे.


(३७)  भारतातील सर्वांत मोठे प्राणीसंग्रहालय कोठे आहे ?

उत्तर- कोलकाता.


(३८)  जागतिक व्याघ्रदिन कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- २९ जुलै.


(३९)  मनू भाकर हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- नेमबाजी.


(४०)  दिल्लीच्या तख्तावरील पहिली मुस्लिम राज्यकर्ती कोण आहे ?

उत्तर- रझिया सुलताना.


(४१)  नाशिक शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- गोदावरी.


(४२)  शिवसिंग हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बाॅक्सिंग.


(४३)  भारतातील सर्वांत लांब नदी कोणती आहे ?

उत्तर- गंगा.


(४४)  राष्ट्रीय सांख्यिकीय आयोगाचे पहिले अध्यक्ष कोण होते ?

उत्तर- प्रा. सुरेश तेंडुलकर.


(४५)  जागतिक वनमहोत्सव दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १ ऑगस्ट 


(४६)  सांगली शहर कोणत्या नदीकाठी वसलेले आहे ?

उत्तर- कृष्णा.


(४७)  चिराग चंद्रशेखर शेट्टी हे नाव कोणत्या खेळाशी संबंधित आहे ?

उत्तर- बॅडमिंटन.


(४८)  भारतातील सर्वांत लांब लेणी कोणती आहे ?

उत्तर- अजिंठा.


(४९)  काक्रापारा अणुविद्युत केंद्र कोणत्या राज्यात आहे ?

उत्तर- गुजरात.


(५०)  जागतिक ओझोन दिवस कधी साजरा करण्यात येतो ?

उत्तर- १६ सप्टेंबर

यशाचा राजमार्ग प्रश्नसंच

Q : ___ निश्चित आकार असतो ?
(अ) स्थायुला ✅✅
(ब) द्रवाला
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला 

Q :___निश्चित आकार नसतो व आकारमानही नसते ?
(अ) स्थायुला
(ब) द्रवाला ✅✅
(क) प्लाझ्माला
(ड) वायूला 

Q : पाणी  0 अंशसेल्सला____अवस्थेत असते?
(अ) स्थायू  ✅✅
(ब) वायू
(क) द्रव
(ड) पुनर्घटन

Q : पाण्याचा गोठणबिंदू _आहे?
(अ) 0 अंश F
(ब) 100  अंश F
(क) 10 अंश F
(ड) 32 अंश F ✅✅

Q : स्थायू पदार्थाचे सरळ वायू पदार्थात रूपांतर होण्याच्या प्रक्रियेला____ म्हणतात?
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन ✅✅
(ड) वितळणे

Q : वाफेपासून द्रवाचे थेंब तयार होण्याच्या प्रक्रियेला ___ म्हणतात?
(अ) संघनन ✅✅
(ब) बाष्पीभवन
(क) संप्लवन
(ड) वितळणे

Q : पाण्याचा  उत्कलनबिंदू _आहे?
(अ) 112 अंश F
(ब) 212  अंश F  ✅✅
(क) 102 अंश F
(ड) 202 अंश F

Q : ____ या पदार्थाला उष्णता दिली असता, त्याचे संप्लवन होत नाही?
(अ) कापूर
(ब) अमोनियम क्लोराइड 
(क) फॉस्फरस  ✅✅
(ड) आयोडीन

Q : उत्कलनबिंदूच्या खाली कोणत्याही तापमानाला द्रवरूप पदार्थाचे रूपांतर वायूरूप पदार्थात होण्याच्या प्रक्रियेला___ असे म्हणतात? 
(अ) संघनन
(ब) बाष्पीभवन ✅✅
(क) संप्लवन
(ड) वितळणे

Q : द्रव्याची ____ही पाचवी अवस्था आहे? 
(अ) प्लाझ्मा
(ब) बोस-आईन्स्टाईन कंडेनसेट  ✅✅
(क) वायू 
(ड) द्रव

Q : द्रव्याच्या चौथ्या अवस्थेला_म्हणतात?
(अ) द्रव
(ब) वायू
(क) प्लाझ्मा  ✅✅
(ड) स्थायू

Q : ___ रेणू एकमेकांपासून दूर असतात?
(अ) ऑक्सिजनमधील  ✅✅
(ब) अल्कोहलमधील
(क) लाकडामधील
(ड) आयोडिनमधील 

15 February 2022

काही सामान्य माहिती

०१. हिमालयाच्या रोहतांग खिंडीनजीक कोणत्या नदीचा उगम आहे?
>>> बियास

०२. भारताच्या कोणत्या राज्याची राजधानी सात वन्य टेकड्यांवर आहे?
>>>तिरुवनंतपुरम

०३. कोणत्या राज्यात देशातील पहिले गायींचे अभयारण्य (Cow's Sanctuary) स्थापन्यात येणार आहे?
>>>मध्य प्रदेश

०४. कोणत्या शहराला महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून ओळखतात.
>>>औरंगाबाद

०५. हुंडरू धबधबा भारताचा कोणत्या शहराजवळ आहे?
>>> रांची

०६. फेकरी हा औष्णिक विद्युतप्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे?
>>> जळगाव

०७. मिनिकॉय, कदमत व बित्रा कोणत्या केंद्रशासीत प्रदेशाचे प्रांत आहेत?
>>> लक्षद्वीप

०८. भारतीय पठारी प्रदेशाने किती क्षेत्र व्यापले आहे?
>>> १२ लाख चौ.कि.मी.

०९. नर्मदा नदीच्या दक्षिण भागात असलेले भारतातील सर्वात मोठे पठार कोणते?
>>> दख्खनचे पठार

१०. महाराष्ट्रास लागून कोणत्या राज्याची सीमा सर्वात जास्त लांब आहे?
>>> मध्य प्रदेश

११. महाराष्ट्राच्या कोणत्या दिशेला  सातपुडा पर्वतरांगा व गाविलगड टेकड्या आहेत?
>>> उत्तर

१२. परभणी व नांदेड जिल्ह्यातील डोंगरांच्या रांगेला कोणती रांग म्हणतात?
>>> निर्मळ रांग

१३. 'V' आकाराची दरी कशामुळे तयार होते?
>>> नदीचे अपघर्षण

१४. दगडी कोळशाचा निकृष्ठ दर्जाचा प्रकार कोणता आहे?
>>> Lignite

१५. बावन्न दरवाजांचे शहर म्हणून कोणते शहर ओळखले जाते?
>>> औरंगाबाद

१६. Table Land नावाने कोणता भाग ओळखला जातो?
>>> पाचगणी

१७. हाफलांग हे पर्वतीय पर्यटन स्थळ कोणत्या राज्यात आहे?
>>> आसाम

१८. पोलो खेळाचा उगम कोणत्या राज्यात झाला आहे?
>>> मणिपूर

१९. पृथ्वीच्या पृष्ठभागावरील सर्वांत खोल भाग कोणता?
>>> मरियाना गर्ता

२०. गोवरी' कोणत्या भारतीय राज्यातील नृत्य-नाटक आहे?
>>> राजस्थान

२१. घूमरा नृत्यात कोणत्या देवतेची पूजा केली जाते?
>>> दुर्गा

२२. ग्रेट बॅरियर रीफ' कोणत्या महासागरात आहे?
>>> प्रशांत महासागर

२३. या पैकी कोणत्या ग्रहाची कक्षा पृथ्वीच्या सर्वात जवळ आहे?
>>> शुक्र

२४. कोणत्या नदीचे गौतमी आणि वशिष्ठ हे दोन प्रकार आहेत?
>>> गोदावरी

२५.  भारतातील कोणत्या राज्यात ओजापाली नृत्य केले जाते?
>>> आसाम

२६. जगोई, चोलोम व थांग-ता कोणत्या शास्त्रीय नृत्याचे अंश आहेत?
>>> मणिपुरी

२७. भारतातील कोणत्या राज्यात ड्यूक्स नोज हे शिखर आहे?
>>> महाराष्ट्र

२८. इरुवका हा सण कोणत्या भारतीय राज्यातील शेतकर्यांद्वारे साजरा केला जातो?
>>> आंध्र प्रदेश

२९. पॉपीर आणि चालो नृत्य कोणत्या राज्यातील आहे?
>>> अरूणाचल प्रदेश

३०. वारली पेंटीग्ज मूळच्या कोणत्या राज्यातील आहेत?
>>> महाराष्ट्र

३१. लावी जत्रा भारतातील कोणत्या राज्यात भरते?
>>> हिमाचल प्रदेश

३२. फिग्रीन ऑफ गोरा देव' (tribal horse God) ही कोणत्या भारतीय प्रदेशातील कला आहे?
>>> गुजरात

३३. पनिहारी भारतातील कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहे?
>>> राजस्थान

३४. कांचनगंगा राष्ट्रीय उद्यान कोणत्या भारतीय राज्यात आहे?
>>> सिक्किम

३५. झाबुआ हा आदिवासी भाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३६. भारतात वनांखालील सर्वाधीक भूभाग कोणत्या राज्यात आहे?
>>> मध्य प्रदेश

३७. महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात साक्षरतेचे प्रमाण सर्वात कमी आहे?
>>> नंदुरबार

३८. कोणत्या राज्यात रबराची सर्वाधीक लागवड होते?
>>> केरळ

३९. महाराष्ट्रातील कोणता प्रदेश 'तलावाचा प्रदेश' म्हणून ओळखला जातो?
> >> पूर्व विदर्भ

४०. राज्यातील कोणत्या जिल्ह्यात पहिला सहकारी साखर कारखाना उभारण्यात आला ?
>>> अहमदनगर

४१. महाराष्ट्रात कोणत्या नदीची लांबी सर्वात कमी आहे ?
>>> नर्मदा

४२. 'श्रीशैल्यम जलविद्युत प्रकल्प' कोणत्या नदीवर बांधलेला आहे ?
>>> कृष्णा

४३. महाराष्ट्राने भारताचा किती टक्के भाग व्यापलेला आहे?
>>> ९%

४४. महाराष्ट्रातील कोणत्या सीमेला सातपुडा पर्वतांची रांग आहे?
>>> उत्तर सीमेला

४५. महाराष्ट्राला किती किमी चा समुद्रकिनारा लाभला आहे?
>>> ७२० किमी

४६. कोल्हापूर हे शहर कोणत्या नद्या च्या काठावर वसले आहे?
>>> पंचगंगा

४७. महाराष्ट्रात सह्य़ाद्री पर्वताची लांबी किती कि.मी. आहे?
>>> ४४० कि.मी.

४८. महाराष्ट्रातील राळेगणसिध्द हे गाव कोणत्या तालुक्यात आहे?
>>> पारनेर (अहमदनगर जिल्हा)

४९.महाराष्ट्राचे ह्दय कोणत्या जिल्ह्याला म्हणतात
→बीड

५०.महाराष्ट्राची भिंत कोणत्या जिल्ह्याला म्हणतात
→चंद्रपूर

पृथ्वीवरील अक्षांश व रेखांश बद्दल माहिती


पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चिती करण्याकरिता अक्षांश व रेखांश यांचा आधार घेतला जातो.

🔹उत्तर व दक्षिण ध्रुव – पृथ्वीच्या आसाची दोन टोके म्हणजेच उत्तर ध्रुव व दक्षिण ध्रुव होय. पृथ्वीचे जे टोक ध्रुव तार्‍याकडे आहे. त्याला उत्तर ध्रुव म्हणतात व खालच्या टोकाला असे दक्षिणध्रुव म्हणतात.

🔹उत्तर व दक्षिण गोलार्ध – पृथ्वीच्या आसाला काटकोनात छेद दिल्यास पृथ्वीचे दोन भाग तयार होतात. या दोन भागापैकी उत्तर ध्रुवाकडील भागास उत्तर गोलार्ध व दक्षिण ध्रुवाकडील भागास दक्षिण गोलार्ध असे म्हणतात.

🔹विषवृत्त – उत्तर व दक्षिण गोलार्ध जोडणार्‍या मध्यवर्ती काल्पनिक रेषेला विषुववृत्त असे म्हणतात विषुववृत्त हे पृथ्वीवरील सर्वात मोठे वर्तुळ होय. विषवृत्तालाच पृथ्वीचा परीघ असेसुद्धा म्हणतात.

🔹अक्षांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषववृत्ताला समांतर दर एका अंशावर काढलेल्या काल्पनिक वर्तुळाकार रेषांना अक्षवृत्ते म्हणतात. उत्तर गोलार्धातील रेषांना उत्तर अक्षांश व दक्षिण गोलार्धातील रेषांना दक्षिण अक्षांश असे म्हणतात. अक्षवृत्ताचे विषुववृत्तावरील स्थान 0° अक्षवृत्त मानले जाते, तर दक्षिण ध्रुवावरील स्थान 90° दक्षिण अक्षांश व उत्तर ध्रुवावरील स्थान 90° उत्तर अक्षांश असे मानले जाते.

🔹रेखांश – उत्तर ध्रुवापासून ते दक्षिण ध्रुवापर्यंत विषुववृत्ताला काटकोनात छेदून जाणार्‍या व एक अंश अंतरावर काढण्यात आलेल्या काल्पनिक अर्धवर्तुळाकार रेषेला रेखावृत्त म्हणतात. मूळ रेखावृत्त (0° रेखावृत्त) इंग्लंड जवळील ग्रीनवीच या बेटावरुन गेलेले आहे. मूळ रेखावृत्तापासून पूर्वेस व पश्चिमेस दर एक अंश अंतरावर याप्रमाणे 180° पश्चिम आणि 180° पूर्व अशी एकूण 360 रेखावृत्ते मानली गेलेली आहेत. ग्रीनवीचच्या पूर्वेकडील रेखावृत्तांना पूर्व रेखावृत्त व पश्चिमेकडील रेखावृत्तांना पश्चिम रेखावृत्त असे म्हणतात. विषुववृत्तावर दोन रेखावृत्तामधील अंतर 111 किलोमीटर असून ध्रुवाकडे जातांना हे अंतर कमी कमी होत जाते व ध्रुवावर शून्य होते. कारण सर्व रेखावृत्ते दोन्ही ध्रुवावर एकत्र येतात.

🔹स्थाननिश्चिती – पृथ्वीवरील अक्षवृत्ते व रेखावृत्ते या दोहोंच्याही सहाय्याने पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे स्थान निश्चित करता येते.

भारतातील प्रमुख आदिवासीजमाती

जमात                  राज्य

अबोर                  अरुणाचल प्रदेश
आपातनी             अरुणाचल प्रदेश
आओ                  नागाल्यांड
अंगामी                 नागाल्यांड
कोल                   छत्तीसगढ
कोटा                   तामिळनाडू
मुंडा                    झारखंड
कोलाम                आंध्र प्रदेश
छुतीया                आसाम
चेंचू                     आंध्र प्रदेश
गारो                    मेघालय, आसाम, नागाल्यांड
बैगा                     छत्तीसगढ,झारखंड
भिल्ल                    राजस्थान, छत्तीसगढ
बदगा                   निलगिरी पर्वत तामिळनाडू
भोट                    हिमाचल प्रदेश
लेपचा                  सिक्कीम
वारली                  महाराष्ट्र
चकमा                  त्रिपुरा
गड्डी                     हिमाचल प्रदेश
जयंती                  मेघालय
बोदो                    आसाम
खासी                  आसाम, मेघालय, नागाल्यांड
गोंड                     महाराष्ट्र, झारखंड, छत्तीसगढ
लुशिया                 त्रिपुरा
मोपला                  केरळ
भुतिया                  उत्तरांचल
जारवा                   छोटे अंदमान
कुकी                    मणिपूर
कुरुख                  झारखंड, ओरीसा
अका,मिश्मी,         अरुणाचल प्रदेश
डाफला                अरुणाचल प्रदेश
कोरबा                 छत्तीसगड, महारष्ट्र
हो                       छोटा नागपूर
मुरीया                  बस्तर छोटा नागपूर
संथाल                  वीरभूम,झारखंड
गुज्जर                  हिमाचल प्रदेश
खोंड                     ओरिसा
मिकिर                  आसाम
उरली                  केरळ
मीना                    राजस्थान
ओरेओन              पश्चिम बंगाल, झारखंड
तोडा                    निलगिरी पर्वत तामिळनाडू

महाराष्ट्राच्या प्राकृतीक विभाग

महाराष्ट्राचे प्राकृतिक दृष्ट्या तीन विभाग पडतात

पश्चिम किनारपट्टी (कोकण) :-

भारतीय प्राकृतिक विभाग किनारपट्टी मैदानी प्रदेशांपैकी एक असणारा पश्चिम किनारपट्टीच्या प्रदेशाचे तीन भागांत वर्गीकरण केले जाते. त्यातील सुरत ते गोवा इथपर्यंतची किनारपट्टी ही कोकण किनारपट्टी म्हणून ओळखली जाते. महाराष्ट्र दृष्टिकोनातून विचार करता कोकण किनारपट्टीचा विस्तार उत्तरेकडील बोर्डी तळासरी ते दक्षिणेकडील तेरेखोलच्या खाडीपर्यंत, तर पूर्व-पश्चिम विस्तार हा महाराष्ट्राच्या पश्चिमेस असलेल्या अरबी समुद्रापासून तर सह्याद्री पर्वतापर्यंत आहे.

निर्मिती :-

महाराष्ट्र पठाराचा पश्चिमेकडील भाग प्रस्तर भंगामुळे खाली खचल्यामुळे कोकणची अरुंद किनारपट्टी निर्माण झाली आहे. प्रस्तर खाली खचलेल्या भागाच्या पूर्वेकडे सह्याद्रीचा तीव्र उताराचा कड्यासारखा भाग उभारला व पश्चिमेकडील काही भाग समुद्रात तर काही भाग उंच सारखा कोकण म्हणून तयार झाला आहे.

विस्तार:-

उत्तरेस पालघर जिल्ह्यातील बोर्डी तळासरी खाडीपासून (दमणगंगा नदी खोरे) –  दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तेरेखोल नदी खाडीपर्यंत, दक्षिणोत्तर विस्तारलेला चिंचोळा निमुळता प्रदेश म्हणजे कोकण किनारपट्टी होय. उतार पूर्वेकडून पश्चिमेकडे खूप तीव्र स्वरूपाचा आहे.


लांबी, रुंदी,उंची व क्षेत्रफळ :-

पश्चिम किनारपट्टी ची दक्षिणोत्तर लांबी 560 किमी असून कोकण किनारपट्टीला लागून असणाऱ्या समुद्र किनारपट्टीची लांबी 720 किलोमीटर एवढी आहे. कोकण किनारपट्टी ही सरळ रेषेसारखी नसून ती ठिकठिकाणी वक्राकार आहे. त्यामुळे त्या कोकण किनारपट्टीस दंतुर असेही म्हटले जाते. कोकण किनारपट्टीची रुंदी 30 ते 60 किमी (सरासरी 44.7 किमी) असून उल्हास नदीच्या खोऱ्यात सर्वात जास्त म्हणजे 100 किमी पर्यंत (वसई ते हरिश्चंद्रगड) ती विस्तारलेली आहे.

कोकण किनारपट्टी ची सर्वात कमी रुंदी सिंधुदुर्ग जिल्ह्यात  कुडाळ येथील रांगणा किल्ला जवळ 40 किलोमीटर आहे. तर सर्वात जास्त ठाणे जिल्ह्यात पंच्याऐंशी ते 100 किलो एवढी आहे. तसेच समुद्रसपाटीपासून कोकण किनारपट्टी ची उंची 5 मीटरपासून 300 मीटर पर्यंत एवढी आहे. किनारपट्टीची रुंदी उत्तरेकडून दक्षिणेकडे कमी-कमी होत गेलेली आहे त्यामुळे किनारपट्टी उत्तरेकडून दक्षिणेकडे निमुळती होत गेली आहे कोकण किनारपट्टी चे एकूण क्षेत्रफळ 30,394 चौ किलोमीटर आहे.

कोकण किनारपट्टीत सर्वाधिक समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा रत्नागिरी आहे व सर्वात कमी समुद्रकिनारा लाभलेला जिल्हा ठाणे आहे


कोकण किनारपट्टीची रचना :-

कोकण किनारपट्टीची रचना मैदानी प्रदेशात प्रमाणे नसून नद्या व डोंगररांगांनी पिंजून काढलेला प्रदेश अशी आहे. सह्याद्रीत उगम पावणाऱ्या असंख्य नद्या या भागातून पूर्वेकडून पश्चिमेकडे वाहत जातात, तर याच नद्यांच्या दरम्यान सह्याद्रीच्या पश्चिमेकडे गेलेल्या उपरांगा देखील समुद्रापर्यंत विस्तारलेल्या आहेत व समुद्राच्या उपरांगांनी कोकणातील नद्यांची खोरी वेगळी केलेली आहे. कोकण किनारपट्टीवर समुद्राला येऊन मिळणाऱ्या असंख्य नद्यांमुळे येथील किनारपट्टी सलग न राहता खंडित झालेली आहे. त्यामुळे कोकण किनारपट्टी ही रिया प्रकारची आहे.

कोकण किनारपट्टीवर उत्तरेकडील भागाकडे तांबूस-तपकिरी मृदा आढळते तर दक्षिणेकडील सिंधुदुर्ग व रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लोहयुक्त जांभी मृदा आढळते

द्रव्याचे वर्गीकरण (Classification of Matter's)

   भौतिक                    रासायनिक
        👇                        👇
  1) स्थायू.            ‌      1) मूलद्रव्य
  2) द्रव.             ‌ ‌       2) संयुगे
  3) वायु.                    3) मिश्रण
  4) आयनायू plasma
  5) Bose Einstein
      Condensate BEC

1)  स्थायू.(Solid)

◆ यांना निश्चित आकार व आकारमान असते.

◆ स्थायू पदार्थांचे आकारमान हे बाह्य बलाने बदलत नाही म्हणून असंपिड्य  असतात.

◆ स्थायू हे अधिक दृढ असतात.

◆ स्थायू मधील कण हे अतिशय जवळजवळ असतात, म्हणजेच त्यांच्या दोन कणा मधील अंतर खूपच कमी असते.

◆ यांच्यामध्ये सर्वाधिक आकर्षण (Stong Intraction) असते.

◆ स्थायू हे लवचिक असतात (elastic).

◆ काही स्थायूंना बाह्यबल लावल्यास ते कायमचे स्वतःचा आकार बदलतात या गुणधर्माला अकार्यता (प्लास्टिसिटी) म्हणतात.

◆ म्हणजेच अकार्यता,स्थितिस्थापकता, दृढता, असंपीड्यता हे स्थायू चे प्रमुख गुणधर्म आहेत.

★ स्थायू चे प्रमुख दोन प्रकार

1) अस्फटिकी स्थायू ( amorphous solid ):-

◆ अनियमित आकाराचे कण मिळून हे स्थायू तयार होतात, यांनाच आभासी स्थायू म्हणतात.

उदा . काच रबर प्लास्टिक
    
2) स्फटिकी स्थायू ( crystalline solid ):-

◆ यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्फटिकी कणे असतात, यामधील कणाची मांडणी ही नियमित असते.

उदा. मिठ, हिरा, ग्राफाईट इ.
============================

2) द्रव (Liquid):-

◆ द्रव पदार्थांना निश्चित आकारमान असते परंतु निश्चित आकार नसतो.

◆ यात अंतररेणूय आकर्षित बल (Inter Molecular force of attraction) स्थायू पेक्षा कमी व वायू पेक्षा जास्त असते.

◆ यामध्ये दोन रेणू तील परस्परांत स्थायु पेक्षा जास्त व वायू पेक्षा कमी असते.

◆ द्रव्य कमी संपिड्य असतात
============================

3) वायु (Gases):-

◆वायूला निश्चित आकार व आकारमान  नसते.

◆ वायू मधील दोन रेणू मधील परस्पर अंतर हे सर्वाधिक असते.जॉईन करा टार्गेट एमपीएससी एम एच.

◆ परंतु दोन रेणू मधील आकर्षित बल सर्वात कमी असते.

◆ वायू सर्वात जास्त संपिड्य (Compressible) असतात.
============================

4). आयनायू (plasma )

◆ पदार्थांची ही अवस्था अतिशय जास्त तापमान व अतिशय जास्त ऊर्जेला अस्तित्वात असते.

◆ ही अवस्था आयनयुक्त वायूच्या स्वरूपात असते.

◆ निऑन बल्प यामध्ये निऑन वायू असतो.

◆ Fluorescent bulb - यामध्ये हेलियम वायू असतो.

◆ सूर्य आणि तारे हे याचा अवस्थेमुळे चमकतात.
============================

5) बोस आईन्स्टाईन कंडेनसेट ( BEC )

◆ 1920 मध्ये भारतीय भौतिक तज्ञ एस एन बोस यांनी या पाचव्या अवस्थेतीची संकल्पना मांडली.

◆ या संकल्पनेवर आधारित अल्बर्ट आईन्स्टाईन यांनी द्रव्याची पाचवी अवस्था म्हणजेच BEC शोधून काढली.

◆ खूपच कमी घनता असलेल्या वायूला थंड करुन की अवस्था प्राप्त होते.
============================

◆ बाॅइल्सचा नियम :- दाब आकारमान संबंध नियम
   
◆ तापमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या आकारमानाच्या व्यस्तानुपाती असतो
  
        p1V1 = p2V2
============================

Charles low. -  तापमान आकारमान संबंध नियम

◆ दाब स्थिर असताना दिलेल्या वायूच्या आकारमान हे नेहमी त्याच्या तापमानाच्या समानुपाती असते.

  V directly proportional to T
  
   V1 / T1 =  V2 / T2
============================

★ गे लुस्सेकस  चा नियम:- दाब -  तापमान संबंध

◆ आकारमान स्थिर असताना दिलेल्या वायूचा दाब हा नेहमी त्याच्या तापमानाशी समानुपाती असतो.

  P directly proportional to T

p1/T1.= p2 / T2
▂▂

विज्ञान मैत्री प्रश्नमंजूषा


१) हवेत जर आर्द्रतेचे प्रमाण अधिक असेल तर बाष्पोत्सर्जनाची क्रिया......
१) वाढते
२) मंदावते ✅✅
३) कमी होते
४) समान राहते
〰〰〰〰〰〰〰〰〰
२) शरीरास सर्वाधिक उर्जा पुरविण्याचे कार्य कोणता घटक करतो.......
१) साखर✅✅
२)जीवनसत्वे
३) प्रथिने
४) पाणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
३) सर्वच वनस्पतीमध्ये प्रकाश -संश्लेषणक्षमता ...........
१) नसते✅✅
२) असते
३) दोन्हीपैकी नाही
४) समान असते
〰〰〰〰〰〰〰〰〰
४) प्रकाश-संश्लेषण क्रियेत ऑक्सिजन .......तून दिला जातो.
१) पाणी✅✅
२) कार्बन डाय ऑक्साईड
३) हरित द्रव्य
४) नायट्रोजन
〰〰〰〰〰〰〰〰〰
५) निसर्गचक्रातील प्राथमिक उत्पादक कोणाला म्हणतात?
१) जीवाणू
२) मासा
३) हिरव्या वनस्पती✅✅
४) मानवी प्राणी
〰〰〰〰〰〰〰〰〰
६) खालीलपैकी कोणत्या वनस्पतीत हरितद्रव्य नसते ?
१) बुरशी✅✅
२) शैवाल
३) दगडफूल
४) नेचे
〰〰〰〰〰〰〰〰〰
७) क्लोराईड ऑफ लाइन यांचे व्यवहारीक नाव खालीलपैकी कोणते ?
१) तुरटी
२) विरंजक चुर्ण ✅✅
३) चुनखडी
४) धुण्याचा सोडा
〰〰〰〰〰〰〰〰〰
८) ज्या हायड्रोकार्बन मधील दोन कार्बन अणूच्या संयूजा बंधने संतृप्त नसतील तर अशा हायड्रोकार्बनला .........हायकार्बन असे म्हणतात.
१) संतृप्त
२) असंतृप्त✅✅
३) वलयांकित
४) वरील सर्व
〰〰〰〰〰〰〰〰〰
९) अन्न बिघाडातील महत्वपूर्ण घटक हा .........ची वाढ होय.
१) सुक्ष्मजीव ✅✅
२) किटक
३) विषाणू
४) कृमी
〰〰〰〰〰〰〰〰〰
१०) कुष्ठरोगाची प्राथमिक लक्षणे कोणत्या भागावर दिसतात?
१) डोळे
२) कान
३) त्वचा✅✅
४) नाक
〰〰〰〰〰〰〰〰〰
११) समान कार्य करणा-या पेशींच्या समुहाला ..........म्हणतात.
१) ऊती✅✅
२) केंद्रक
३) मूल
४) अभिसार
〰〰〰〰〰〰〰〰〰
१२) १८७३ मध्ये लुईस पाश्चरने .........हा नवा सिध्दांत मांडला
१) स्वयंप्रेरीत जीव निर्मिती
२) जंतूपासून रोगोद्भव✅✅
३) साथीचे रोगविषयक
४)  यापैकी नाही
〰〰〰〰〰〰〰〰〰

खनिजद्रव्य व त्याचे उपयोग

· शरीरातील प्रक्रियेचे नियंत्रण व संरक्षण करण्याकरिता शरीराला खनिजाची गरज असते. आपल्या शरीराची निगा राखण्यामध्ये खालील खनिजे महत्वाचे आहेत.

खनिज - फॉस्फरस

· उपयोग - हाडे व स्नायू यांच्या संवर्धनासाठी ए.टी.पीची निर्मितीकरण्याकरिता

· अभावी होणारे परिणाम - हाडे ठिसुळ होतात, चयापचय क्रियेत अडथळे निर्माण होतात

· स्त्रोत - अन्नधान्ये, दुग्धजन्यपदार्थ मेथी, हिरव्या पालेभाज्या

खनिज - पोटॅशियम

· उपयोग - चेतापेशीच्या पोषणाकरिता

· अभावी होणारे परिणाम - चेतापेशीवर परिणाम होतो

· स्त्रोत - सुकी फळे

खनिज - कॅल्शियम

· उपयोग - हाडे, दात, रक्त, मज्जातंतू व हृदय यांच्या पोषणाकरिता

· अभावी होणारे परिणाम - हाडे कामकूवत व नरम होतात. कॅल्शियमच्या अभावी ऑस्टीओमॅलेशिया हा विकार होतो.

· स्त्रोत - तीळ व पालेभाज्या

खनिज - लोह

· उपयोग - रक्त संवर्धन व हिमोग्लोबिनच्या पोषणाकरिता, ऑक्सीजन व हिमोग्लोबीन याचा संयोग घडवून आणते व प्रतिरोध संस्थेला मदत करते.

· अभावी होणारे परिणाम - लोहाच्या कमतरतेचा परिणाम हिमोग्लोबिनवर होतो. लोहाच्या अभावी रक्तक्षय व पंडूरोग होतो.

· स्त्रोत - हिरव्या पालेभाज्या व मेथीची भाजी