26 March 2022

जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे

1) भगवान बुद्धांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

2) आर्य समाजाची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : स्वामी दयानंद सरस्वती

3) पंजाबी भाषेची लिपी कोणती आहे?
उत्तर : गुरुमुखी

4) भारताच्या मुख्य भूमीचा दक्षिण किनारा कोणता आहे?
उत्तर : कन्याकुमारी

5) भारतामध्ये सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात उगवतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

6) इन्सुलिन चा उपयोग कोणत्या आजाराच्या उपचारासाठी केला जातो?
उत्तर : मधुमेह

7) बिहू हा कोणत्या राज्याचा प्रसिद्ध सण आहे?
उत्तर : आसाम

8) भारताचे पहिले गव्हर्नर जनरल कोण होते?
उत्तर : विल्यम बेंटिक

9) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला?
उत्तर : चीन

10) गौतम बुद्धांचे लहानपणीचे नाव काय होते?
उत्तर : सिद्धार्थ

मराठी मध्ये फुल फॉर्म विषयी माहिती जाणून घेण्यासाठी येथे क्लिक करा.
11) भारतामध्ये सशस्त्र दलाचे सर्वोच्च सेनापती कोण असतात?
उत्तर : राष्ट्रपती

12) रातांधळेपणा कोणत्या विटामिन च्या कमतरतेमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

13) पोंगल कोणत्या देशाचा सण आहे?
उत्तर : तामिळनाडू

14) गिधा आणि भांगडा कोणत्या राज्याचे लोकनृत्य आहेत?
उत्तर : पंजाब

15) टेलिव्हिजनचा शोध कोणी लावला?
उत्तर : जॉन लोगी बेअर्ड

16) भारताची पहिली महिला शासिका कोण होती?
उत्तर : रजिया सुलताना

17) मासे कशाच्या सहाय्याने श्वास घेतात?
उत्तर : कल्ले

18) इन्कलाब जिंदाबाद ही घोषणा कोणी केली होती?
उत्तर : भगतसिंग

19) जालियनवाला बाग हत्याकांड केव्हा आणि कोठे झाला होता?
उत्तर : 13 एप्रिल 1919, अमृतसर

20) पारो विमानतळ कोणत्या देशात आहे ?
उत्तर : भुतान

जनरल नॉलेज प्रश्न आणि उत्तरे (general knowledge questions and answers in marathi)
21) भारतातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे?
उत्तर : जिम कार्बेट राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

22) जिम कार्बेटचे जुने नाव काय होते?
उत्तर : हेली नॅशनल पार्क

23) भारतामध्ये सर्वात जास्त राष्ट्रीय उद्याने कोठे आहेत?
उत्तर : मध्यप्रदेश

24) भारतातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोठे आहे?
उत्तर : हिमिस (3568 किलोमीटर, जम्मू आणि काश्मीर)

25) मेळघाट अभयारण्य ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1973

26) नागार्जुन सागर या वाघ अभयारण्याची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1982

27) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे पहिले विजेते कोण आहेत?
उत्तर : विश्वनाथन आनंद

28) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्कार याची पहिली महिला विजेती कोण आहे?
उत्तर : कर्णम मल्लेश्वरी

29) राजीव गांधी खेळ रत्न पुरस्काराचे स्वरूप काय आहे?
उत्तर : 25 लाख रुपये आणि प्रशस्तीपत्र

30) हरितक्रांती कशासाठी करण्यात आली होती?
उत्तर : अन्नधान्य उत्पादनात वाढ करण्यासाठी.

31) टीझर गनचा (Tasar Gun) वापर करणारे पहिले पोलीस राज्य कोणते?
उत्तर : गुजरात

32) वाचन यादीमध्ये (Reading List) व्हिडिओ गेम जोडणारा पहिला देश कोणता?
उत्तर : पोलंड

33) अरब देशातील पहिली अणुभट्टी कोणती?
उत्तर : संयुक्त अरब अमिरात

34) भारतातील पहिले ड्रॅगन हे रक्ताळणारे झाड (blood-oozing tree) कोणते?
उत्तर : आसाम

35) तीन राजधान्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : आंध्रप्रदेश

36) रेल्वेने थेट ओव्हरहेड लाइन उर्जा देण्यासाठी जगातील पहिला सौर उर्जा प्रकल्प तयार करणारा प्रकल्प कोणता?
उत्तर : भारत

37) वनविभागाचा पहिले लायकेन पार्क कोणते?
उत्तर : उत्तराखंड

38) मंगळ मोहीम आखणारा पहिला अरब देश कोणता?
उत्तर : संयुक्त अरब अमिराती

39) जगातील पहिले गोल्ड प्लेटेड (सोन्याचा मुलामा) हॉटेल कोणते?
उत्तर :- हनोई, व्हिएतनाम

40) आशियातील पहिले अखंड गॅल्वनाइज्ड रेबर उत्पादन सुविधा कोठे आहे?
उत्तर : गोविंदगड, भुतान

पोलिस भरतीसाठी जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (police bharti gk questions in marathi)
41) भारतात नोट बंदी केव्हा झाली?
उत्तर : 8 नोव्हेंबर 2016

42) पुलवामा हल्ला केव्हा झाला?
उत्तर : 14 फेब्रुवारी 2019

43) जम्मू काश्मीर मध्ये 370 हे कलम केव्हा हटवले?
उत्तर : 5-8-2019

44) राम मंदिर चा निर्णय केव्हा झाला?
उत्तर : 9 नोव्हेंबर 2019

45) जगातील सर्वात पहिला कोरोणा रुग्ण कोठे आढळला?
उत्तर : 17 नोव्हेंबर 2019 मध्ये चीन येथे

46) नोकरी हमी योजना (job guarantee scheme) सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

47) पहिला ऑनलाइन कचरा विनिमय कार्यक्रम (first online waste exchange programme) कोठे सुरू करण्यात आला होता?
उत्तर :आंध्रप्रदेश

48) हायपरलूपमधून प्रवास करणारा पहिला भारतीय कोण आहे?
उत्तर : तनय मांजरेकर

49) पहिले स्पायडर म्युझियम कोठे आहे?
उत्तर : मेळघाट व्याघ्र प्रकल्प

50) आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार ग्राम वर्गणीतून संपूर्ण गावाला रोग प्रतिबंधक होमिओपॅथी अर्सेनिक अल्बम ३० हे औषध वितरणाचा निर्णय घेणारी राज्यातील पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : सिंदखेड (जि.बुलडाणा)

51) एनआरसी, सीएएविरोधात ठराव मांडणारी देशातली पहिली ग्रामपंचायत कोणती?
उत्तर : इसळक (जि. अहमदनगर)

52) मिड डे मिल रेशन पुरवणारे पहिले राज्य कोणते? उत्तर : मध्यप्रदेश

53) प्रत्येक जिल्हयात व्हेंटिलेटरसह बेड सुविधा देणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :उत्तर प्रदेश

54) आफ्रिकन स्वाईन फ्ल्यूची भारतातील पहिली केस कोठे आढळली होती?
उत्तर : आसाम

55) एफआयआर आपके द्वार ही अभिनव योजना सुरु करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर :मध्य प्रदेश

56) भारतात पहिला कोरोना रुग्ण कोठे आढळला होता?
उत्तर : 30 जानेवारी 2020 लाख केरळ येथे.

57) भारतात सर्वात पहिल्यांदा जनता कर्फ्यू केव्हा लावला होता?
उत्तर : 22 मार्च 2020

58) भारत चीन वाद केव्हा झाला?
उत्तर : 17 जून 2020

59) राम मंदिर चे पूजन केव्हा झाले होते?
उत्तर : पाच ऑगस्ट 2020.

60) महात्मा गांधी यांना बापू ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सरोजिनी नायडू

61) महात्मा गांधी यांना राष्ट्रपिता ही उपाधी कोणी दिली?
उत्तर : सुभाषचंद्र बोस

62) महात्मा गांधी यांना मलंग बाबा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : खान अब्दुल गफार खान

63) महात्मा गांधी यांना महात्मा ही उपाधी कोणी दिली होती?
उत्तर : रवींद्रनाथ टागोर आणि श्रद्धानंद स्वामी

64) मध्यवर्ती वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : नागपूर

65) प्रादेशिक वस्तुसंग्रहालय कोठे आहे?
उत्तर : औरंगाबाद

66) माय स्पेस ची स्थापना केव्हा झाली होती?
उत्तर : 1 ऑगस्ट 2003

67) आरआयपी चा फुल फॉर्म (RIP full form in marathi) काय आहे?
उत्तर : rest in peace आत्म्याला शांती मिळो.

68) सीआरपीएफ चा फुल फॉर्म (CRPF Full form in marathi) काय आहे?
उत्तर : सेंट्रल रिझर्व पोलीस फोर्स (Central Reserve Police Force)

69) माय स्पेस ची स्थापना कोणी केली होती?
उत्तर : Tom Anderson आणि Chris DeWolfe.

70) नासा ही संस्था कोठे आहे?
उत्तर : वॉशिंग्टन

71) fbp म्हणजे काय?
उत्तर : Flexible Benefits Plan (FBP)

72) WHO चा फुल फॉर्म (WHO full form in marathi) काय आहे?
उत्तर : World Health Organization जागतिक आरोग्य संघटना.

73) समुदाय आधारित पोषण व्यवस्थापन लागू करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

74) घराघरात मध्यान्ह भोजन (Mid-Day Meal) पुरविणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : मध्य प्रदेश

75) महाराष्ट्रातील पहिल्या फायटर पायलट ठरलेल्या महिला कोण?
उत्तर : अंतरा मेहता

76) पाकिस्तान मध्ये आर्मीची पहिली लेफ्टनंट जनरल बनणारी महिला कोण?
उत्तर : निगार जोहर

77) पाकिस्तान हवाई दलात नेमण्यात आलेल्या पहिल्या हिंदू पायलटचे नाव काय होते?
उत्तर : राहुल देव

78) सामुदायिक स्वयंपाक गृहांना जिओ टॅग प्राप्त करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तर प्रदेश (यासाठी गुगलशी करार)

79) पहिले नंबरलेस कार्ड कोणते?
उत्तर : Fam Pay

80) सरकारी भूमींच्या रक्षणासाठी अवकाश तंत्रज्ञान आणि कृत्रिम बुद्धिमत्ता वापरणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिशा

2021 मधील जनरल नॉलेज प्रश्न उत्तरे (gk questions in marathi 2021)
81) ‘गुगल क्लासरूम’ सुविधांची अंमलबजावणी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : महाराष्ट्र

82) प्रत्येक घरात एलपीजी गॅस जोडणी असणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : हिमाचल प्रदेश

83) एथिकल कृत्रिम बुदिधमत्ता, ब्लॉकचेन आणि सायबर सुरक्षा धोरणांचे अनावरण करणारे भारतातील पहिले राज्य कोणते?
उत्तर : तमिळनाडू

84) भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली कंपनी कोणती?
उत्तर : फायझर

85) आयपीएलमध्ये खेळणारा पहिला अमेरिकन खेळाडू कोण होता?
उत्तर : अली खान

86) एकाच हंगामात २० गोल करणारा पहिला फुटबॉलपटू कोण होता?
उत्तर : लिओने मेस्सी

87) भारतात लसीकरणाची परवानगी मागणारी पहिली भारतीय कंपनी कोणती होती?
उत्तर : सिरम इन्स्टिट्यूट

88) नोकरीची सुरक्षा आणि कामगारांच्या कौशल्य विकासासाठी पॅनेल स्थापन करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : उत्तरप्रदेश

89) सूक्ष्म, लघु व मध्यम उपक्रमांसाठी उदयोग (सुलभता) कायदयात सुधारणा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : कर्नाटक

90) ड्रोनच्या साह्याने टोळघाडीवर नियंत्रण ठेवणारा पहिला देश कोणता?
उत्तर : भारत

91) आदिवासी वसतिगृहांसाठी ISO प्रमाणपत्र मिळवणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : ओडिसा

92) गुराख्याकडून गाईचे शेण खरेदी करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : छत्तीसगड (गोधन न्याय योजना)

93) भारतात सर्वात पहिल्यांदा सूर्य कोणत्या राज्यात दिसतो?
उत्तर : अरुणाचल प्रदेश

94) भारतातील सर्वोच्च पुरस्कार कोणता?
उत्तर : भारतरत्न

95) भारतरत्न पुरस्काराने सन्मानित पहिली भारतीय महिला कोण होती?
उत्तर : इंदिरा गांधी (1971)

96) भारताचा पहिला गव्हर्नर कोण होता?
उत्तर : लार्ड विलियम बैंटिक

97) चंद्रावर मानवाला पा पहिला देश कोणता होता?
उत्तर : संयुक्त राज्य अमेरिका (USA)

98) रातांधळेपणा कोणत्या व्हिटॅमिन च्या कमीमुळे होतो?
उत्तर : व्हिटॅमिन A

99) कागदाचा शोध कोणत्या देशाने लावला आहे?
उत्तर : चीन

100) सौर ऊर्जेचा शोध कोणत्या शास्त्रज्ञांनी लावला?
उत्तर : कोपर्निकस

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)
101) खाफीखान या मुघल इतिहासकाराने कोणाचे वर्णन बुद्धिमान व शहाणी केला आहे?
उत्तर : महाराणी ताराबाई

102) रोल करून ठेवता येण्याजोगा जगातील पहिला टीव्ही कोणता?
उत्तर : LG

103) कर भरण्यासाठी चेहऱ्याची ओळख (Facial Recognition) वापरणारा जगातील पहिला देश कोणता?
उत्तर : सिंगापूर

104) युद्ध सेवा पदक प्राप्त करणारी पहिली महिला कोण?
उत्तर : मिटी अग्रवाल

105) वृक्ष प्रत्यारोपण धोरण जाहीर करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : दिल्ली

106) प्रत्येक घरापर्यंत पेयजल कनेक्शन पुरवठा करणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : गोवा

107) टी 20 मध्ये 10,000 धावा करणारा आशियातील पहिला क्रिकेटपटू कोण होता?
उत्तर : शोएब मलिक

108) राज्यातील पहिले दिव्यांगांसाठीचे न्यायालय कोठे आहे?
उत्तर : शिवाजीनगर, पुणे

109) डिसेबल एअरक्राफ्ट रिकव्हरी इक्विपमेंट (DARE) मिळवणारे पहिले भारतीय विमानतळ कोणते आहे?
उत्तर : केम्पेगौडा आंतरराष्ट्रीय विमानतळ, बेंगळुरू

110) केंद्राच्या कृषी विधेयकांविरोधात ठराव मांडणारे पहिले राज्य कोणते?
उत्तर : पंजाब

111) संपूर्णपणे डिजिटल, हायटेक वर्गखोल्या असलेले पहिले राज्य कोणते?
उत्तर : केरळ

112) संपूर्ण ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरु करणारे पहिले विद्यापीठ कोणते?
उत्तर : दिल्ली विद्यापीठ

113) पहिले ट्रान्सजेंडर विदयापीठ कोठे आहे?
उत्तर : कुशीनगर (उत्तर प्रदेश)

114) पहिले ‘कासव पुनर्वसन केंद्र कोठे स्थापन केले आहे?
उत्तर : भागलपूर वनक्षेत्र (बिहार)

115) FSSAI चे ‘Eat Right Station’ प्रमाणपत्र मिळविणारे पहिले रेल्वे स्थानक कोणते?
उत्तर : छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबई

116) मानवी रक्ताची चव कशी असते?
उत्तर : खारट

117) मानवी शरीरातील सर्वात मोठी ग्रंथी कोणती ?
उत्तर : यकृत

118) पोलिओ लस वयाच्या कितव्या वर्षांपर्यंत देतात ?
उत्तर : 5  वर्षा पर्यंत

119) रक्तदान करतांना किती रक्त घेतलें जाते ?
उत्तर : 300  मि.ली.

120) शरीराच्या एकूण वजनाच्या किती टक्के वजन रक्ताचे असते?
उत्तर : 8%

सामान्य ज्ञान प्रश्न उत्तरे (GK questions in marathi)
121) मानवाच्या एकूण आयुष्यामध्ये एकूण किती दात येतात ?
उत्तर : 52

122) मानवी शरीराराचे सर्वसामान्य तापमान किती सेल्सिअस  असते?
उत्तर : 37° सेल्सियस

123) कावीळ हा आजार शरीरातील कोणत्या अवयवावर परिणाम करतो ?
उत्तर : यकृत

124) मानवी शरीरात जंत कोठे आढळतात?
उत्तर : लहान आतड्यात

125) रक्तदान वर्षातून किती वेळा करता येते?
उत्तर : चार वेळा

126) पोलिओ रोगामुळे शरीराच्या कोणत्या भागास इजा होते ?
उत्तर : मज्जासंस्था

127) चिकनगुनिया या भयानक रोगाची साथ पसरविणारा डास कोणता?
उत्तर : एडिस इजिप्ती

128) महाबळेश्वरचा माथा समुद्र सपाटीपासून किती उंचीवर आहे?
उत्तर : 1438 मी.

129) महाराष्ट्रात ‘कऱ्हांडला वाघ अभयारण्य’ कोणत्या जिल्ह्यात आहे?
उत्तर : नागपूर

130) भगवान बुद्ध यांना ज्ञानाची प्राप्ती कोठे झाली होती?
उत्तर : बोधगया

131) 8 ऑक्टोबर हा दिवस भारतामध्ये कोणता दिवस म्हणून साजरा केला जातो?
उत्तर : भारतीय वायुसेना दिवस

132) उज्जैन चे प्राचीन नाव काय होते?
उत्तर : अवंतिका

133) मानवी शरीरामध्ये किती गुणसूत्रे असतात?
उत्तर : 46

134) सर्वात मोठा ग्रह कोणता?
उत्तर : बृहस्पति

135) सर्वात लहान ग्रह कोणता?
उत्तर : बुध

136) आग्रा शहर कोणी बनवले आहेत?
उत्तर : सिकंदर लोदी

137) पंजाब केसरी म्हणून कोणाला ओळखले जाते?
उत्तर : लाला लजपतराय

138) महात्मा गांधी यांचा जन्म केव्हा झाला?
उत्तर : 2 ऑक्टोबर 1869

139) काझीरंगा राष्ट्रीय पार्क कोठे आहे?
उत्तर : आसाम

140) गायत्री मंत्र कोणत्या पुस्तकामध्ये लिहिलेला आहे?
उत्तर : ऋग्वेद

जनरल नॉलेज इन मराठी (janral nolej question in marathi):
141) राष्ट्रीय विज्ञान दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 28 फेब्रुवारी

142) राष्ट्रीय युवा दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 जानेवारी

143) राष्ट्रीय पक्षी दिवस केव्हा साजरा केला जातो?
उत्तर : 12 नोव्हेंबर

144) वातावरणात सर्वात जास्त प्रमाण कोणत्या वायूचे असते?
उत्तर : नायट्रोजन

145) ऊर्जेचा नैसर्गिक स्त्रोत कोणता?
उत्तर : सूर्य

146) गुरुत्वाकर्षण शक्तीचा शोध कोणी लावला?
उत्तर : न्यूटन

147) सूर्य किरण पृथ्वीवर पोहोचण्यास किती वेळ लागतो?
उत्तर : 8 मिनिटे 20 सेकंद

148) विजेच्या दिव्यात कोणत्या धातूची तार वापरतात?
उत्तर : टंगस्टन

149) डायलिसिस उपचार कोणत्या आजारामध्ये करतात?
उत्तर : मूत्रपिंडाचे आजार

150) मानवी शरीरातील कोणत्या पेशी रोगजंतूंचा प्रतिकार करू शकतात?
उत्तर : पांढऱ्या पेशी

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे

समाजशास्त्र (Sociology) म्हणजे माणसाचा समाजाशी असलेल्या आंतरसंबंधांचा अभ्यास होय. समाजशास्त्र हे समाजाचे विज्ञान आहे. यात सामाजिक घटक व सामाजिक घडामोडींचा समावेश असतो. समाजाचे मन, मनाचा एकूण कल व समाज पाळत असलेले रीतिरिवाज यांचा शोध या शास्त्रात घेतला जातो.[१] सामाजिक प्रश्नांची उकल करण्यासाठी समाजशास्त्र उपयुक्त असते. हे शास्त्र आंतरविद्याशाखीय स्वरूपाचे आहे. यामुळे याचा मानववंशशास्त्र, भाषाशास्त्र, राज्यशास्त्र, इतिहास व संख्याशास्त्र अशा अनेक शाखांशी संबंध येतो.[२] यामध्ये लोकांच्या जीवनाचे वास्तव चित्रणाचे रुप रेखाटले जाते. लोकांच्या सामाजिक प्रश्नांचे निवारण येथे केले जाते.

व्यवस्थाबद्द ज्ञान सम्मुचयास शास्त्र असे म्हणतात. अभ्यास विषयाच्या आधारे शास्त्राचे दोन प्रकार केले जातात. १) नैसर्गिक २) सामाजिक शास्त्र.

नैसर्गिक विज्ञानात समाजोत्तर घटनांचे अध्ययन केले जाते. यामध्ये रासायनिक प्रक्रिया, वनस्पती, उर्जा इ. विषयांचे अध्ययन करण्यात येते. या विषयांचे अध्ययन करण्यासाठी पदार्थ विज्ञान, वनस्पती शास्त्र, रसायनशास्त्र, इ. शास्त्रांचा समावेश केला जातो.

सामाजिक शास्त्रांचा अभ्यासविषय सामाजिक घटना असतात. उदा. सामाजिक संबंध, आर्थिक प्रयत्न, मानसिक वर्तन, राजकीय वर्तन इ. अभ्यास समाजशास्त्र, अर्थशास्त्र, मानसशास्त्र, राज्यशास्त्र, गुन्हेगारी शास्त्र, इ. शास्त्रामध्ये करण्यात येतो.

थोडक्यात म्हणजे सामाजिक घटनांच्या अभ्यासाषी निगडीत असणारे शास्त्र म्हणून समाजशास्त्राला सामाजिक शास्त्र असे म्हणतात.

शास्त्राच्या अभ्यास विषयाला केंद्रस्थानी मानले असताना शास्त्राचे आदर्षनिष्ठ शास्त्र, आणि विषुद्धशास्त्र असेही दोन प्रकार करता येतात.

आदर्श प्रमाणभूत मानुन अध्ययन करणारी शास्त्रे म्हणजे तर्कशास्त्र व नितीशास्त्र ही होय. याउलट समाजातील घटनांचा तटस्थ वृत्तीने अभ्यास करणारी शास्त्रे म्हणजे विशुद्ध शास्त्रे होय. समाजशास्त्रात तटस्थ वृत्तीने समाजातील घटनांचा अभ्यास केला जात असल्याने ते एक विशुद्ध शास्त्र आहे.

अर्थशास्त्र अर्थ :-

अर्थशास्त्र :- मानवाच्या अमर्यादित गरजा व त्या गरजा पूर्ण करणारी साधने मर्यादित, पण पर्यायी उपयोगाची साधने यांच्यात मेळ घालण्यासाठी मानव नेहमी प्रयत्न करीत असतो, यातून जो प्रश्न निर्माण होतो त्याला आर्थिक प्रश्न म्हणतात. मानवाच्या या आर्थिक वागणुकीचा अभ्यास अर्थशास्त्रात केला जातो.

सामाजिक शास्त्र अर्थ

समाजातील मानवी वागणुकीचा, वर्तनाचा, हालचालींचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.

समाजात एकत्रित राहत असताना मानव अनेक प्रकारची वागणूक, हालचाल करीत असतो.

उदा. आर्थिक, सामाजिक, राजकीय, मानसशास्त्रीय, आध्यात्मिक, सांस्कृतिक, क्रीडाविषयक इ. अनेक प्रकारच्या हालचाली, वागणूक मानव करीत असतो. या वेगवेगळ्या प्रकारच्या मानवी वागणुकीचा अभ्यास वेगवेगळ्या विषयांनी वाटून घेतलेला दिसतो. त्यानुसार समाजातील या वेगवेगळ्या मानवी वागणुकीचा अभ्यास करणाऱ्या सर्व विषयांना “सामाजिक शास्त्र” म्हणतात.

महाराष्ट्रातील एकूण पोलीस आयुक्तालये


१ नवी मुंबई बिपीनकुमार सिंग
२ ठाणे विवेक फणसाळकर
३ नाशिक दीपक पांडे
४ पुणे अमिताभ गुप्ता
५ सोलापूर अंकुश शिंदे
६ औरंगाबाद निखिल गुप्ता
७ अमरावती आरती सिंह
८ नागपूर अमितेश कुमार
९ मुंबई रेल्वे कैसर खलिद
१० पिंपरी चिंचवड कृष्णप्रकाश
११ मीरा भाईदर वसई विरार सदानंद दाते

अग्नि-प्राईम’ची यशस्वी चाचणी


‘डीआरडीओ’ने (संरक्षण संशोधन आणि विकास संस्था) शनिवारी आण्विक क्षमता असलेल्या अत्याधुनिक अग्नि-प्राईम या क्षेपणास्त्राची ओडिशा किनाऱ्यानजीकच्या एपीजे अब्दुल कलाम बेटावर यशस्वी चाचणी केली. या वर्षी जूननंतर दुसऱ्यांदा ही क्षेपणास्त्र चाचणी करण्यात आली आहे.
    केंद्र सरकारने प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, या क्षेपणास्त्राने अपेक्षित सर्व निकषांची पूर्तता करीत आपले लक्ष्य अत्यंत अचूकपणे साध्य केले. हे क्षेपणास्त्र दोन टप्पे असलेले आणि दुहेरी मार्ग आणि मार्गदर्शक प्रणालीने सज्ज आहे. या क्षेपणास्त्राच्या यंत्रणेतील सर्व अत्याधुनिक प्रणालींची द्वितीय उड्डाण चाचणी अपेक्षेनुसार यशस्वी ठरली आहे. हे क्षेपणास्त्र अग्नी वर्गातील क्षेपणास्त्राची सुधारित आवृत्ती आहे. एक हजार ते दोन हजार किलोमीटर इतका पल्ला गाठण्याची त्याची क्षमता आहे. अग्नी ५ हे भारताचे सर्वाधिक लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र असून ते पाच हजार किलोमीटरपर्यंत जाऊ शकते.
अग्नि-प्राईमच्या यशस्वी चाचणीबद्दल संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी डीआरडीओचे अभिनंदन केले आहे.

लक्षात ठेवा

🔸१) लोकसभेच्या अध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे गरजेचे आहे?
- लोकसभा उपाध्यक्ष

🔹२) लोकसभेच्या उपाध्यक्षांना राजीनामा द्यावयाचा झाल्यास त्यांनी तो कोणाकडे सादर करणे आवश्यक आहे?
- लोकसभा अध्यक्ष

🔸३) धन विधेयक ....च्या शिफारशीशिवाय विधानसभेत मांडता येत नाही.
- राज्यपाल

🔹४) घटक राज्याचे मंत्रिमंडळ सामुदायिकरीत्या .... ला जबाबदार असते.
- विधानसभा

🔸५) उपराष्ट्रपतीस आपल्या पदाचा राजीनामा द्यावयाचा असल्यास त्याने तो .... कडे सादर करावा लागतो.
- राष्ट्रपती

मणिपूरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री बिरेन सिंग

🔹नाव : नोंगथोम्बम बिरेन सिंग

🔸मणिपूरचे १२वे मुख्यमंत्री

🔹मणिपूरचे दुसऱ्यांदा मुख्यमंत्री

🔸राजकीय पक्ष : भारतीय जनता पार्टी

🔹लष्करी सेवा : ( सीमा सुरक्षा दल - १९७९-१९९३ )

🔸विशेषता : भारतीय राजकारणी, माजी फुटबॉलपटू आणि पत्रकार

🔹पुरस्कार : चॅम्पियन्स ऑफ चेंज (2018)

पहिल्यांदाच व्यापक स्तरावर


चिन्मय पाटणकर
पुणे : भारतीय द्वीपकल्पातील (पेनिन्शुला) गवताळ प्रदेशांत प्रदेशनिष्ठ वनस्पती नसण्याच्या समजाला खेद देणारे संशोधन पुढे आले आहे. भारतीय द्वीपकल्पातील गवताळ प्रदेशात २०६ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची नोंद करण्यात शास्त्रज्ञांना यश आले असून, द्वीपकल्पाच्या स्तरावर पहिल्यांदाच व्यापक अभ्यास करून गवताळ प्रदेशांतील प्रदेशनिष्ठ वनस्पतींची वाढ नोंदवण्यात आली आहे. या संशोधनामुळे आता जंगलांप्रमाणे गवताळ प्रदेशांच्याही संवर्धनाची गरज अधोरेखित झाली आहे.
भारतीय द्वीपकल्पातील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या संशोधनासंदर्भातील ‘एक्स्पोनेन्शिअल राइज इन डिस्कव्हरी ऑफ एंडेमिक प्लॅन्ट्स अंडरस्कोअर्स द नीड टू कॉन्झर्व द इंडियन सवानाज’ हा शोधनिबंध ‘बायोट्रॉपिका’ या संशोधनपत्रिकेमध्ये नुकताच प्रसिद्ध झाला आहे. संशोधनामध्ये आशिष नेर्लेकर, आलोक चोरघे, जगदीश दळवी, राजा कुलेस्वामी, सुबैया करुप्पुस्वामी, विघ्नेश कामत, रितेश पोकर, गणेसन रेंगय्यन, मिलिंद सरदेसाई, शरद कांबळे यांचा समावेश आहे. गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, केरळ, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तामिळनाडू, ओरिसा, तेलंगणा या राज्यांतील काही भागांमध्ये संशोधन करण्यात आले. साधारणपणे दोन वर्षे हा अभ्यास सुरू होता. संशोधन गटातील शास्त्रज्ञानी वैयक्तिक स्तरावर केलेले संशोधन आणि शोधनिबंधांचे मूल्यमापन अशा दोन्ही पद्धतींचा वापर करण्यात आला. त्यातून भारतीय द्वीपकल्पातील गवताळ प्रदेशात २०६ प्रदेशनिष्ठ वनस्पतींची नोंद झाली.   
 मुळचे पुणेकर आणि सध्या टेक्सास एम अँड एम विद्यापीठातील इकॉल़ॉजी अँड कॉन्झर्वेशन बायोलॉजी विभागात पीएच.डी.चे शिक्षण घेत असलेले आशिष नेर्लेकर यांचा या संशोधन गटात सहभाग आहे. त्यांनी या संशोधनाबाबत ‘लोकसत्ता’ला माहिती दिली. ‘ब्रिटिशांना त्यांच्या व्यापारासाठी जंगलातून मिळणारे लाकूड महत्त्वाचे असल्याने त्यांनी जंगलांच्या तुलनेत गवताळ प्रदेशांना कमी महत्त्व दिले. आजवर पश्चिम घाटातील जंगलांचा विविध प्रजातींचा, प्रदेशनिष्ठ प्रजातींचा बराच अभ्यास झाला आहे. मात्र त्या तुलनेत गवताळ प्रदेशांचा, वनस्पतींच्या प्रजातींचा अभ्यास झालेला नाही. या दृष्टीने हे संशोधन करण्यात आले,’ असे आशिष यांनी सांगितले. गवताळ प्रदेशाचे जतन-संवर्धन करताना त्या ठिकाणी अवैज्ञानिक पद्धतीने वृक्ष लागवड करणे टाळले पाहिजे, असे आशिष यांनी सांगितले.
भारतीय द्वीपकल्पातील शोधलेल्या प्रदेशनिष्ठ वनस्पतींपैकी ४३ टक्के वनस्पती या गेल्या दोन दशकांतच शोधलेल्या आहेत. येत्या काळात भारतातील गवताळ प्रदेशांचा अभ्यास वाढेल, तशी प्रदेशनिष्ठ वनस्पतींची संख्या आणखी वाढत जाईल, असेही आशिष यांनी नमूद केले.
भारतीय द्वीपकल्पातील गवताळ प्रदेशांतील प्रदेशनिष्ठ वनस्पतींच्या शोधाची दोन महत्त्वाची केंद्रे आहेत. त्यात नाशिक, पुणे, कोल्हापूर ते बंगळुरूपर्यंत पश्चिम घाटाचा पूर्व भाग, तर पूर्व घाटाचा दक्षिण भाग यांचा त्यात समावेश होतो, असेही आशिष यांनी स्पष्ट केले.

प्रदेशचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली ....

योगी आदित्यनाथ  यांनी  दुसऱ्यांदा  उत्तर प्रदेशच्या  मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली . 

🔸लखनौच्या अटलबिहारी वाजपेयी एकना स्टेडियमवर राज्यपाल आनंदीबेन पटेल यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह आणि इतर केंद्रीय मंत्र्यांच्या उपस्थितीत आदित्यनाथ यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली .

🔹केशव प्रसाद मौर्य आणि ब्रजेश पाठक यांनीही नवीन सरकारमध्ये उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. 

🔸भाजपच्या नेतृत्वाखालील NDA ने 403 पैकी 274 जागा मिळवल्या, राज्यात सलग दुसऱ्यांदा सरकार स्थापन करणारा तीन दशकांहून अधिक काळातील पहिला पक्ष ठरला.

आंतरराज्यीय जलविवाद न्यायाधिकरणे



▪️कृष्णा ( 1969) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️गोदावरी (1969):-  महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश, मध्यप्रधेश, ओरीसा

▪️नर्मदा (1969) :- राजस्थान, गुजरात, मध्यप्रदेश, महाराष्ट्र

▪️रावी व बियास ( 1986) :- पंजाब, हरियाणा, राजस्थान

▪️कावेरी (1990) :- कर्नाटक, केरळ, तामीळनाडू, पाँडेचरी

▪️कृष्णा - 2 (2004 ) :- महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश

▪️वसंधरा (2010) :- ओडीसा, आंध्रप्रदेश

▪️महादयी (2010):- गोवा, कर्नाटक, माहाराष्ट्र.

▪️महानदी (6 ऑगस्ट 2018 ) :- ओडीसा, छत्तीसगड.

जिल्हे निर्मिती

# 1 मे 1981 : रत्नागिरीपासून – सिंधुदुर्ग (27 वा जिल्हा)

# औरंगाबादपासून – जालना (28 वा जिल्हा)

# 16 ऑगस्ट 1982 : उस्मानाबादपासून – लातूर (29 वा जिल्हा),

# 26 ऑगस्ट 1982 : चंद्रपूरपासून – गडचिरोली (30 वा जिल्हा)

# 1990 : मुंबईपासून – मुंबई उपनगर (31 वा जिल्हा)

# 1 जुलै 1998 : धुळेपासून – नंदुरबार (32 वा जिल्हा)

# अकोल्यापासून – वाशिम (33 वा जिल्हा)

# 1 मे 1999 : परभणीपासून – हिंगोली (34 वा जिल्हा)

# भंडारा  – गोंदिया (35 वा जिल्हा)

# 1 ऑगस्ट 2014 : ठाण्यापासून – पालघर (36 वा जिल्हा)

महाराष्ट्रातील नद्या व त्यांच्या काठावरिल शहरे

• गोदावरी : नाशिक, कोपरगाव, पैठण, • गंगाखेड, नांदेड
• कृष्णा : कराड, सांगली, मिरज, वाई, औदुंबर
• भिमा : पंढरपुर
• मुळा–मुठा : पुणे
• इंद्रायणी : आळंदी, देहु
• प्रवरा : नेवासे, संगमनेर
• पाझरा : धुळे
• कयाधु : हिंगोली
• पंचगंगा : कोल्हापुर
• धाम : पवनार
• नाग : नागपुर
• गिरणा : भडगांव
• वशिष्ठ : चिपळूण
• वर्धा : पुलगाव
• सिंधफणा : माजलगांव
• वेण्णा : हिंगणघाट
• कऱ्हा : जेजूरी
• सीना : अहमदनगर
• बोरी : अंमळनेर
• ईरई : चंद्रपूर
• मिठी : मुंबई

मोजकेच पण महत्त्वाचे

🔹उत्तर भारतीय ( गंगेच्या ) मैदानाला विविध नावे व त्यांचा क्रम ( ट्रिक )🔹

🔹उत्तरेकडून दक्षिणेकडे मैदानांचा क्रम
1) भाबर
2) तराई
3) भांगर
4) खादर

वरील संकल्पनांचा अर्थ

1) भाबर - शिवालिक टेकड्यांच्या दक्षिण पायथ्याशी " दगड,गोटे,वाळू यांच्या संचयाने तयार झालेले मैदान."

2) तराई चे मैदान - भाबर च्या दक्षिणेकडील "बारीक गाळामुळे निर्माण झालेले दलदलीचे मैदान".
      - हा प्रदेश उत्तरप्रदेश व बिहार राज्यांत विस्तारला आहे.
       - हिमालयातून वाहत येणारी नदी भाबर मध्ये लुप्त होते व तराईमध्ये पुन्हा प्रकट होते.

3) भांगर - तराईच्या दक्षिणेस गंगेच्या उर्ध्व मैदानातील " जुन्या गाळाचे मैदान " .
   
4) खादर - भांगरच्या दक्षिणेस गंगेच्या उर्ध्व मैदानातील " नवीन गाळाचे मैदान."

वरील घटकावर विविध प्रकारे आतापर्यंत राज्यसेवा पूर्व - मुख्य ,तसेच ग्रुप b/c
तसेच इतर exam मध्ये अनेक प्रश्न विचारण्यात आलेले आहेत..
अजूनही येतच आहेत..
कधी
तराई म्हणजे काय?,जोड्या लावा,क्रम लावा.....आदी

==========================
ट्रिक ट्रिक ट्रिक
म्हणून वरून घेतलेला सार

भाबर - दगड,गोटे,वाळू यांच्यापासून झालेले मैदान
तराई - गाळामुळे झालेले दलदलीचे मैदान
भांगर - जुन्या गाळाचे मैदान
खादर - नवीन गाळाचे मैदान

क्रम लक्षात ठेवण्याची ट्रिक

( भात भांग खा )
भा   - भाबर
त     - तराई
भांग - भांगर
खा   - खादर

महाराष्ट्र खनिज संपत्ती

▪️बॉक्सईट:-21% उत्पादन

▪️क्रोमाईट:-10% साठा

▪️चुनखडी:-9% साठा

▪️मॅगनिज:-40% साठा

▪️कायनाईट:-15% साठा

▪️डोलोमाईट:-1% साठा

▪️लोहखनिज:-20% साठा

भारतातली जागतिक वारसा स्थळे


🔰 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) जागतिक वारसा स्थळे या यादीची 1972 साली स्थापना झाली.

🔰ती वारसा स्थळे UNESCO जागतिक वारसा परिषदेत वर्णन केल्याप्रमाणे सांस्कृतिक किंवा नैसर्गिक वारसा असलेली महत्त्वाची ठिकाणे असतात.

👉 आता भारतात एकूण 40 जागतिक वारसा स्थळे आहेत, त्यात 32 (तेलंगणा आणि गुजरात सहित) सांस्कृतिक स्थळे, 7 नैसर्गिक ठिकाणे आणि 1 मिश्रित ठिकाण आहे.

👉 सर्वाधिक जागतिक वारसा स्थळे असण्यामध्ये भारत हा जगात सहाव्या क्रमांकाचा देश आहे.

🏰💒🛕⛪️सांस्कृतिक🕌⛩🛤🏞
1) आग्र्‍याचा किल्ला, आग्रा, उत्तरप्रदेश

2) अजिंठा लेणी, महाराष्ट्र

3) नालंदा विद्यापीठ (महाविहार), बिहार

4) बौद्ध स्मारक, सांची, मध्यप्रदेश (1989)

5) चपानेर-पावागढ इतिहास संशोधन उद्यान,
    गुजरात

6) छत्रपती शिवाजी टर्मिनस, मुंबई, महाराष्ट्र

7) गोव्याचे चर्च आणि कॉन्व्हेंट

8) एलिफंटा लेणी/घारापुरीची लेणी, मुंबई,
    महाराष्ट्र

9) एलोरा / वेरूळ लेणी, महाराष्ट्र

10) फत्तेपूर सिक्री, उत्तरप्रदेश

11) चोला राजांची मंदिरे, तमिळनाडू

12) हपीमधील मंदिरे, कर्नाटक

13) महाबलीपुरममधील मंदिरे, तामिळनाडू

14) पट्टदकलमधील मंदिरे, कर्नाटक

15) राजस्थानामधील पर्वतीय किल्ले

16) अहमदाबाद हे ऐतिहासिक शहर

17) हमायूनची कबर, दिल्ली

18) खजुराहो, मध्यप्रदेश

19) महाबोधी मंदिर, बोध गया, बिहार

20) भारतातली पर्वतीय रेल्वे (दार्जिलिंग रेल्वे, कालका-शिमला रेल्वे व नीलगिरी पर्वतीय रेल्वे)

21) कतुब मिनार, दिल्ली

22) राणी की वाव, पटना, गुजरात

24) लाल किल्ला, दिल्ली

25) दगडी निवारे, भिमबेतका, मध्यप्रदेश

26) कोणार्क सूर्य मंदिर, कोणार्क, ओडिशा

27) ताज महाल, आग्रा, उत्तरप्रदेश

28) ल कोर्बुझियरचे वास्तू कलाकृती, चंदीगड

29) जतर मंतर, जयपूर

30) मुंबईची व्हिक्टोरियन गॉथिक अँड आर्ट
      डेको एन्सेम्बल ही इमारत
31) काकतीय रुद्रेश्वर (रामप्पा) मंदिर,
       तेलंगणा
32) धोलावीरा हडप्पाकालीन शहर, गुजरात

  🏞🌅🎑 नैसर्गिक ⛰🗻🏔
1) ग्रेट हिमालयन राष्ट्रीय उद्यान, कुल्लू, हिमाचल प्रदेश

2) काझीरंगा राष्ट्रीय उद्यान, आसाम

3) मानस राष्ट्रीय उद्यान, आसाम

4) कवलदेव राष्ट्रीय उद्यान, राजस्थान

5) सदरबन राष्ट्रीय उद्यान, पश्चिम बंगाल

6) नदादेवी राष्ट्रीय उद्यान व व्हॅली ऑफ फ्लॉवर्स राष्ट्रीय उद्यान, उत्तराखंड

7) पश्चिम घाट (सह्यांद्री पर्वतरांगा)

    🟥🟧 मिश्र 🟨🟩

1) खांगचेंडझोंगा राष्ट्रीय उद्यान, सिक्किम

✅ UNESCO :-

👉 संयुक्त राष्ट्रसंघ शैक्षणिक, वैज्ञानिक व सांस्कृतिक संघटना (UNESCO) ही फ्रांसची राजधानी पॅरिस शहरात असलेली संयुक्त राष्ट्रसंघाची शिक्षण, नैसर्गिक विज्ञान, सामाजिक/मानवशास्त्र, सांस्कृतिक आणि संचार/माहिती या पाच प्रमुख क्षेत्रांमध्ये कार्य करणारी एक विशेष संघटना आहे.

👉 स्थळांना ‘जागतिक वारसा’ हा दर्जा UNESCOकडून दिला जातो.

👉 या संघटनेची स्थापना दि. 16 नोव्हेंबर 1945 रोजी लंडन (ब्रिटन) येथे करण्यात आली.

👉 भारतासह 195 देश या संघटनेचे सदस्य आहेत आणि 10 सहकारी सदस्य आहेत.