Ads

05 April 2022

महत्त्वाची माहिती

🌷🌷1. सत्व – अ  🌷🌷

शास्त्रीय नांव – रेटीनॉल  

उपयोग – डोळे व त्वचा यांच्या आरोग्याकरिता

अभावी होणारे आजार – त्वचा, रोग व रात आंधळेपणा

स्त्रोत – टमाटे, अंडी, यकृत, भाज्या फळे, आवळा, सोयाबीन, मांस

🌷🌷2. सत्व – ब1🌷🌷

शास्त्रीय नांव – थायमिन  

उपयोग – चेतासंस्थेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – बेरीबेरी

स्त्रोत – धन्य, यीस्ट, यकृत,

🌷🌷3. सत्व – ब2🌷🌷

शास्त्रीय नांव – रायबोफ्लेविन  

उपयोग – चयापचय क्रियेकरिता

अभावी होणारे आजार – पेलाग्रा

स्त्रोत – अंडी, यकृत, मांस, दूध व शेंगदाणे

🌷🌷4. सत्व – ब3🌷🌷

शास्त्रीय नांव – नायसीन

उपयोग – त्वचा व केस

अभावी होणारे आजार – त्वचारोग व केस पांढरे

स्त्रोत – दूध, टमाटे, उस, यीस्ट, अंडी

🌷🌷5. सत्व – ब6  🌷🌷

शास्त्रीय नांव – पिरीडॉक्सीन  

उपयोग – रक्त संवर्धनाकरिता

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत व पालेभाज्या

🌷🌷6. सत्व – ब10  🌷🌷

शास्त्रीय नांव – फॉलीक  

उपयोग – अॅसीडरक्ताचे आरोग्य राखणे

अभावी होणारे आजार – अॅनामिया

स्त्रोत – यकृत

🌷🌷7. सत्व – क 🌷🌷 

शास्त्रीय नांव – अॅस्कार्बिक, अॅसीड  

उपयोग –  दात व हिरड्यांच्या आरोग्याकरिता    

अभावी होणारे आजार – स्कव्हा, हिरड्या सुजणे, हिरड्यांमधून रक्त येणे   

स्त्रोत – लिंबुवगाय फळे, टोमॅटो, आवळा, संत्री, मोसंबी इत्यादि

🌷🌷8. सत्व – ड  🌷🌷

शास्त्रीय नांव – कॅल्सिफेरॉल  

उपयोग – दात, हिरड्या, हाडे व त्वचेचे आरोग्य

अभावी होणारे आजार – अस्थिचा मृदुपणा, दंतक्षय व त्वचा रोग

स्त्रोत – मासे, कोर्ड लिव्हर, ऑईल, अंडी सूर्याची कोवळी किरणे

🌷🌷9. सत्व – इ  🌷🌷

शास्त्रीय नांव – टोकोफेरॉल

उपयोग – योग्य प्रजननासाठी  

अभावी होणारे आजार – वांझपणा

स्त्रोत – अंकुरित कडधान्ये, हिरव्या पालेभाज्या

🌷🌷10. सत्व – के  🌷🌷

शास्त्रीय नांव – नॅप्थोक्विनान  

उपयोग – रक्त गोठण्यास मदत

अभावी होणारे आजार – रक्त गोठत नाही

स्त्रोत – पालेभाज्या व कोबी


🎯 विज्ञान आणि काही महत्वाचे प्रश्न :-

● व्हिटॅमिन बी च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : बेरी-बेरी

● दुधामध्ये कोणत्या व्हिटॅमिनचा समावेश नसतो?

उत्तर : व्हिटॅमिन सी

● कोणत्या व्हिटॅमिनच्या कमीमुळे रक्तामध्ये गाठी जमा होत नाही?

उत्तर : व्हिटॅमिन के

● व्हिटॅमिन ई च्या कमतरतेमुळे कोणता आजार होतो?

उत्तर : वंध्यत्व

● व्हिटॅमिन सी चे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  एस्कॉर्बिक अ‍ॅसिड

● मिठाचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  : NaCl

● हसणार्‍या वायूचे रासायनिक नाव काय आहे?

उत्तर  :  नायट्रस ऑक्साईड ( एन 2 ओ )

● ब्रास कोणत्या दोन धातूंचे मिश्रण आहे?

उत्तर  :  तांबे आणि जस्त


मराठी व्याकरण

१. मराठी व्याकरणाचे पहिले पुस्तक "द ग्रामर ऑफ मराठी लँग्वेज(१९०५) विल्यम कुरे या इंग्रज अधिकाऱ्यांनी        लिहिले.

२. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी १९३६ मध्ये (मराठी भाषेचे व्याकरण )हे पुस्तक लिहिले. म्हणून त्यांना (मराठी      भाषेचे पाणिनी) असे म्हणतात "

३. गोपाळ गणेश आगरकर ' वाक्यंमीमांसा (१९८८)' हे पुस्तक लिहिले.

४. १९११ मध्ये मोरोपंत केशव दामले यांनी ' शास्त्रीय मराठी व्याकरण 'यावर पुस्तक लिहिले.

५. मराठीतील पहिला पोवाडा आगिनदास यांनी लिहिला ('अफजलखानचा वध').

६. मराठीलातील पहिली सामाजिक कादंबरी बाबा पदमजी यांनी लिहिली - (यमुना पर्यटन).

७. आधुनिक नाट्यशृष्टीचे मराठी जनक म्हणून विष्णुदास भावे यांना ओळखले जाते .

८. आधुनिक मराठी कादंबरीकर म्हणून ग. ना. आपटे याना ओळखले जाते.

९. मराठीतील पहिले वृत्तपत्र (दर्पण - ६ जानेवारी १९३२) ला सुरु झाले.

१०. मराठीतील पहिले लावणीकार म्हणून मन्मनाथ स्वामी यांना ओळखले जाते.

११. मराठीतील पहिली ऐतिहासिक कादंबरी - मोचनगड.

१२.आधुनिक मराठी कवितेचे जनक म्हणून केशवसुत यांना ओळखले जाते.

१३. मराठी नवकाव्याचे पहिले कवी - बा. सी. मर्ढेकर हे होय.

१४. मराठीतील पहिले सामाजिक नाटक महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिले. (तृतीय रत्न)

१५. मराठी नवकथेचे जनक म्हणून गंगाधर गाडगीळ यांना ओळखले जाते.

१६. महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक मंडळाची स्थापना - १९६१

१७. मराठी विश्वकोश मंडळाची स्थापना - १९६० ला झाली. (अध्यक्ष लक्ष्मणशास्त्री जोशी)

१८. मराठी विश्वकोशाचे जनक तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी )

१९. ज्ञानकोषकार म्हणून व्यंकटेश केतकर हे होय.

२०. साहित्यसम्राट म्हणून न. चि. केळकर यांना ओळखले जाते.


१.मराठी भाषा

"भाषेची देवाण-घेवाण म्हणजे भाषिक व्यवहार व्यवस्थित रितीने चालावा यासाठी काही नियम देण्यात आलेले आहेत. त्या नियमांना व्याकरण म्हणतात."

भाषा म्हणजे विचारांची देवाण-घेवाण करण्याचे साधन." भाषेचे दोन प्रकार पडतात
(१)  स्वाभाविक / नैसर्गिक भाषा
(२) कृत्रिम भाषा / सांकेतिक भाषा

संस्कृत भाषा ही मराठी भाषेची जननी होय. भाष - बोलणे / बोलवायचा व्यवहार होय

मराठातील पहिला शिलालेख कर्नाटक श्रावण बेळगोळे येथीलगोमटेश्वर मूर्तीखाली सापडला.

इ. स. ९८३ च्या सुमारास.एक वाक्य कोरलेले होते ते म्हणजे

'श्री चावुण्डराये कारवियले'

भाषा हा शब्द 'भाष ' धातूपासून तयार होतो.

A) श्रीसंत ज्ञानेश्वरांनी (श्री ज्ञानेश्वरी व अमृतानुभव) ग्रंथ लिहिले

B) म्हाइंभट यांनी (लीळाचरित्र ) हा आद्य ग्रंथ लिहिला .

C) आद्यकवी मुकुंदराज यांनी ( विवेकसिंधु) हा ग्रंथ लिहिला.

D) मराठी हि देवनागरी लिपी आहे. (बाळबोध लिपी)






विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचा ‘यश’ नावाचा जनजागृती कार्यक्रम

- विज्ञान व तंत्रज्ञान विभागाच्या अंतर्गत कार्यरत असलेल्या नॅशनल कौन्सिल फॉर सायन्स अँड टेक्नोलॉजी कम्युनिकेशन (NCSTC) या संस्थेनी कोविड-19 वर लक्ष केंद्रित करुन आरोग्य आणि धोक्यासंदर्भात ‘इयर ऑफ अवेयरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (यश)’ नावाचा नवा कार्यक्रम आरंभ केला.

- ‘इयर ऑफ अवेयरनेस ऑन सायन्स अँड हेल्थ (यश / YASH)’ हा एक जनजागृती कार्यक्रम आहे, ज्याच्या माध्यमातून लोकांना कोविड-19 विषाणू आणि त्याचा प्रसार, प्रतिबंधात्मक उपाययोजना यांच्याबाबत अचूक आणि शास्त्रोक्त माहिती प्रदान केली जाणार.

- देशातल्या वैविध्यपूर्ण लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी या कार्यक्रमात आरोग्य, विज्ञान, जोखीम सांगणारे सॉफ्टवेअर, ध्वनी-दृष्य, डिजिटल व्यासपीठ, लोककला इत्यादी माध्यमांचा समावेश करण्यात येणार आहे.

- तसेच कार्यक्रमातल्या अडचणी सोडविण्यासाठी संशोधन, शैक्षणिक, प्रसार माध्यमे आणि स्वयंसेवी संस्थांचा सहभाग असणार. जोखीम स्पष्ट करण्यासाठी आणि जोखीम व्यवस्थापन सुलभ करण्यासाठी वैज्ञानिक आणि योग्य आरोग्यविषयक माहितीचा वापर केला जाणार.

प्रश्न मंजुषा


➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖
१) 'पॉलीटीक शॉक' हे पुस्तक कोणाचे आहे ?

१) मनमोहन सिंग
२) राजेन्द्रप्रसाद
३) मेघनाद ✅✅
४) नरेंद्र मोदी

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

२) ओझन वायुला  सर्वाधिक धोका कोणत्या वायू मुळे निर्माण झाला आहे ?

१) CFC (cloro fluro carbon)✅✅
२) CH4
३) NO2
४) CO2

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

३) युनेस्कोने कोणते वर्ष आंतरराष्ट्रीय भाषा वर्ष म्हणून घोषित केले होते ?

१) २००५
२) २००८✅✅
३) २०१३
४) २०१८

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

४) 19 वर्षाखालील क्रिकेट वर्ल्ड कप भारताने आतापर्यंत किती वेळा जिंकला आहे?

१) ३ वेळा
२) ४ वेळा ✅✅
३) २ वेळा
४) ५ वेळा

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

५) टाइम्स हायर एज्युकेशन २०२० अहवालानुसार   भारतातील कोणत्या विद्यापीठाला सोळावे स्थान मिळाले असून भारतात पहिल्या स्थानावर  आहे?

१)‍ IIT मुंबई
२) IIT बेंगलर✅✅
३) IIT खरगपुर
४) IIT दिल्ली

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

६) घटना समितीला पुढीलपैकी कोणत्या देशाने शुभेच्छा संदेश पाठवला नव्हता ?

१) अमेरिका
२) ऑस्ट्रेलिया
३) चीन
४) ब्रिटेन  ✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

७) आगरकर रिसर्च इन्स्टिट्यूट(ARI)पुणे या संस्थेच्या शास्त्रज्ञांनी जैविक दृष्ट्या संवर्धित आणि उच्च प्रथिने असलेल्या गव्हाचा कोणता वाण विकसित केला आहे ?

१) MACS 4028✅✅
२) MACS 2840
३) MACS 4042
४) MACS 4240

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

८) भारताचा पहिला व्हाईसरॉय लॉर्ड कॅनिंगने  १ नोव्हेंबर १८५८ रोजी कोणत्या शहरात  राणीचा जाहीरनामा प्रसिद्ध केला ?

१) मुंबई
२) दिल्ली
३) अलाहाबाद  ✅✅
४) कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

९) बिमस्टेक या संघटनेचे मुख्यालय कोठे आहे ?

१) नेपाळ
२) काठमांडू
३) ढाका ✅✅
४) दक्षिण आफ्रिका

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१०) कोणत्या  स्थानकादरम्यान 'पॅलेस क्वीन हमसफर एक्सप्रेस' सुरू करण्यात आली आहे ?

१) उदयपुर ते आग्रा
२) उदयपूर ते मैसूर  ✅✅
३) जयपूर ते दिल्ली
४) जयपूर ते कलकत्ता

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

११) खालीलपैकी कोणी राम मोहन रॉय यांना राजा ही पदवी दिली ?

१) अकबरशहा  दुसरा ✅✅
२) बहादुरशहा दुसरा
३) केशवचंद्र सेन
४) लॉर्ड बेटिंग

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१२) विधान परिषदेतुन मुख्यमंत्री निवडले जाणारे उद्धव ठाकरे हे कितीवे व्यक्ती ठरतील ?

१) ४ थे
२) ५ वे
३) ६ वे
४) ७ वे✅✅

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१३) महाराष्ट्राची बीजमाता म्हणून कोणाला ओळखले जाते ?

१) रंजना सोनवणे
२) प्रज्ञा पासून
३) राहीबाई पोपरे ✅✅
४) स्मिता कोल्हे

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१४) संविधान सभेला तात्पुरती संसद म्हणून दर्जा कधी प्राप्त झाला?

१) २४ जानेवारी १९५० ✅✅
२) २५ जानेवारी१९५०
३) १४ ऑगस्ट १९४७
४) १५ ऑगस्ट १९४७

➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖➖

१५) ९३ वे मराठी साहित्य संमेलन  १० ते १२ जाने २०२० उस्मानाबाद येथे पार पडली त्याचे अध्यक्ष कोण होते ? 

१) पुष्पा भावे
२) राम लक्ष्मण
३) फ्रान्सिस दिब्रिटो ✅✅
४) शरद पवार

जगातील सर्वात मोठे

* खंड - आशिया

* विस्तारित देश - रशिया

* लोकसंख्येचा देश - चीन

* द्विपसमूह - इंडोनेशिया

* त्रिभूज प्रदेश - सुंदरबन [ गंगा नदीच्या मुखाजवळ ]

* वाळवंट - सहारा

* महासागर - पॅसिफिक

* द्विपकल्प - अरेबिया

* बेट - ग्रीनलँड

* खंडद्वीप - ऑस्ट्रेलिया

* समुद्र - दक्षिण चिनी समुद्र

* उपसागर - हडसनचा उपसागर

* आखात - मेक्सिकोचे आखात

* नदी व खोरे - अमेझॉनचे खोरे

* पर्वतराजी - हिमालय

* मैदानी प्रदेश - पश्चिम सायबेरिया

* गोड्या पाण्याचे सरोवर - सुपीरिअर

* ज्वालामुखी - मौना लोआ, हवाई बेटे.

* समुद्रभरती - फुंडीचे आखात

* खाऱ्या पाण्याचे सरोवर - कास्पियन समुद्र

* नदी मुख - ऑब नदीचे मुख

* वाळूचे बेट - फ्रेझर आयर्लंड

* लॅगुन - लॅगोआ डॉस पॅटॉस, ब्राझील

* अरण्य - सूचिपर्णी वृक्षांचे अरण्य, रशिया

* सिमेंट क्रॉंक्रीटचे धरण - कोलंबिया नदीवरील ग्रॅन्ड कुली, अमेरिका

* बंदर - न्यूयॉर्क

* विस्तारित शहर - लंडन

* दिवस - २१ जून

२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल १० देशांत.

📌 २०२८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अव्वल १० देशांत स्थान मिळवणे नक्कीच शक्य आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.

📌 या ध्येयाच्या दिशेने शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

📌 ‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात.

📌 गेल्या काही वर्षांत भारताला अनेक युवा आणि कौशल्यवान क्रीडापटू गवसले असून २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये आपण नक्कीच अव्वल १० देशांत स्थान मिळवू शकतो, असे मला वाटते. त्यादृष्टीने क्रीडा खात्यासह शासनानेही आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत,’’ असे रिजिजू म्हणाले.

📌 ‘‘२०२८च्या ऑलिम्पिकसाठी अद्याप आमच्याकडे आठ वर्षांचा कालावधी असल्याने खेळाडूंच्या शोधमोहिमेची अंतिम रुपरेषा कशी असावी, याविषयी आम्ही सध्या चर्चा करत आहोत.

📌 त्याचप्रमाणे २०२१च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू कसे तयारी करत आहेत, याकडेही आमचे लक्ष आहे,’’ असे रिजिजू यांनी नमूद केले.

सामान्य ज्ञान

जीवशास्त्र : मानवी पचनसंस्था । एमपीएससी-२०२० । विज्ञान । MPSC EXAMS HUB
मानवी शरीरात अन्न पचनासाठी विविध अवयव मिळून पचनसंस्था तयार झालेली आहे. खालेल्या अन्नाचे रूपांतर विद्राव्य घटकात होणे आणि ते रक्तात मिसळणे या क्रियेला अन्नपचन असे म्हणतात.
पचन संस्थेमध्ये अन्ननलिका (Alimentary Canal) व पाचकग्रंथी (Digestive Glands) यांचा समावेश होतो.
अन्ननलिका एक लांब, स्नायुमय नलिका असून ती मुखापासून गुदद्वारापर्यंत असते.
अन्ननलिकेची लांबी 9 meter  असते.
मानवी शरीरात वेगवेगळ्या ठिकाणी अन्ननलिकेचा व्यास वेगवेगळा असतो.

अन्ननलिकेत प्रामुख्याने पुढील भागांचा समावेश होतो.

मुख/ तोंड (Mouth/ Buccal Cavity)
ग्रसनी (Pharynx)
ग्रसिका (Esophagus)
जठर/ आमाशय (Stomach)
लहान आतडे (Small Intestine)
मोठे आतडे (Large Intestine)
मलाशय (Rectum)
गुदद्वार (Anus) यांचा समावेश होतो.

जीवशास्त्रामध्ये मानवी पचनसंस्था फार महत्वाची संस्था आहे( एमपीएससी-२०२० । विज्ञान ) ज्यामध्ये पुढीलप्रमाणे घटक येतात.

लाळग्रंथी, यकृत, स्वादुपिंड या काही पाचकग्रंथी अन्ननलिकेशी ठराविक ठिकाणी जोडलेल्या असतात.

पचनसंस्थेतील वेगवेगळी इंद्रिये अन्नपचनाचे काम पद्धतशीरपणे करत असतात.

अन्नपचनाच्या क्रियांचे वेगवेगळे टप्पे आहेत. प्रत्येक टप्प्यावर काम करणारे पचनेंद्रिये वेगळे आहे आणि विशिष्ट टप्प्यावरील ती ती इंद्रिये त्यांचे काम सुरळीतपणे पार पाडतात.




पचनसंस्था :-

प्राण्याच्या शरीरातली पचनसंस्था ही त्याच्या शरीरातील अनेक अवयवांची बनलेली आहे. या संस्थेमुळे खाल्लेल्या अन्नाचे पोषकद्रव्यांमध्ये रूपांतर होते. या प्रक्रियेला पचन असे म्हणतात. ही पोषकद्रव्ये शरीराची वाढ व चलनवलन यांसाठी उपयोगी पडतात.

माणसाच्या पचनसंस्थेत पुढील अवयव असतात:

तोंड, घसा, अन्ननलिका, जठर, स्वादुपिंड, यकृत, पित्ताशय, लहान आतडे, मोठे आतडे, गुदाशय व गुदद्वार.

१) तोंड:-

तोंड हे पचनसंस्थेचे प्रवेशद्वार आहे. यात आपल्या ओठ,दात, जीभ, लाळग्रंथीचे छिद्र यांचा समावेश होतो.

आजार:-

तोंडाच्या आतील श्लेष्मल त्वचेला येणारी सूज म्हणजेच स्टोमॅटिटिस अर्थात ‘तोंड येणं.’ कारणांनुसार याची लक्षणं वेगवेगळ्या पद्धतीने दिसून येतात.

अतितीव्र आम्ल, अल्कली किवा औषधांचा संपर्क तोडांतील त्वचेशी आल्यास. व्हिटॅमिन ‘बी’ची कमतरतेमुळे.

२)घसा:-

घसा हा मानवी शरीराचा एक भाग आहे.

३) अन्ननलिका:-

अन्ननलिका ही एक स्नायुयुक्त नलिका असते जी घसा ते जठराचे वरचे मुख यांना जोडते. नलिकेतून अन्न स्नायुंच्या हलचालींच्या साहाय्याने पुढे ढकलले जाते.

तिची लांबी २०-२५ से.मी. पर्यंत असते. अन्ननलिकेची आतील बाजूस स्तरीकृत स्क्वैमस उपकला (Stetified Squamous Epithelium) असते.

४) जठर:-

जठर मानवी पचनसंस्थेतील एक अवयव आहे. जठरातून आम्लयुक्त (acidic) जाठररस स्त्रवतो. त्यामुळे अन्नाचे पचन होते. अन्नाचे पचन, शोषण व रोगजंतूंचा नायनाट करण्याचे महत्त्वपूर्ण काम हे अ‍ॅसिड करत असते.

जठर विकार:-

जाठररसाचे प्रमाणे वाढले की, मग मात्र त्याच्या उपयुक्ततेपेक्षा त्याच्या दाहकतेचा त्रास होतो. यालाच आम्लपित्त असेही म्हणतात.

या आम्लपात्ति छातीत पोटात जळजळ, पोटदुखी, अपचन, डोकेदुखी, उलट्या, पित्त उसळी मारून तोंडात येणे, आंबट करपट चव, तोंडास दुर्गंधी, अस्वस्थता अशा स्वरूपात आढळतात. कालांतराने या लक्षणांचे रूपांतर पोटात अल्सर रक्तस्राव यात होऊ शकते.




राज्य निवडणूक आयोगाबद्दल. आणि महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९ (१४ वी विधानसभा )

    १. भारतीय संविधानाच्या 73 व 74 दुरुस्तीनुसार प्रत्येक राज्यासाठी राज्य निवडणूक आयोगाची स्थापना करण्यात आली.

२.महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोगाची स्थापना दि.26 एप्रिल, 1994 रोजी करण्यात आली.

३. संविधानातील भाग -9 मधील अनुच्छेद 243 ट (243 K) नुसार ग्रामीण भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (जिल्हापरिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायत)

४. अनुच्छेद 243 यक (243 ZA) नुसार नागरी भागातील स्थानिक स्वराज्य संस्था (महानगरपालिका, नगरपरिषद व नगरपंचायत) यांच्या निवडणुका घेण्याची संविधानिक जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर सोपविण्यात आलेली आहे.

५). जबाबदारी राज्य निवडणूक आयोगावर:-
I). निवडणुकांसाठी मतदार याद्या तयार करण्याच्या कामाचे अधिक्षण

II). संचलन आणि नियंत्रण

III). निवडणुकांचे आयोजन


महाराष्ट्र विधानसभा निवडणूक, २०१९ (१४ वी विधानसभा )

मुख्मंत्री :- उध्दव बाळासाहेब ठाकरे (महाराष्ट्र राज्याचे 29 वे मुख्यमंत्री )
अध्यक्ष :- नाना पटोले, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस २०१९
विरोधी पक्षनेता :- देवेंद्र फडणवीस, भाजपा २०१९ 

बहुमतासाठी २८८ पैकी १४४ जागा आवश्यक आहेत

दिनांक : 28 नोव्हेंबर 2019 रोजी महाराष्ट्र राज्याचे 29 वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.
आरंभीच्या काळात उद्धव ठाकरे शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या वृत्तपत्राच्या कामकाजात सक्रिय होते
इ.स. २००२ साली बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकांत शिवसेनेला विजयश्री व त्यासह सत्ताही लाभली.

त्यांची पुस्तके खाली दिलेली आहेत.
१) ठाकरे विरुद्ध ठाकरे मूळ इंग्रजी लेखक -धवल कुलकर्णी, मराठी भा़षांतर - डॉ. सदानंद बोरसे, शिरीष सहस्रबुद्धे)

उद्धव ठाकरे यांची ग्रंथ संपदा

१) महाराष्ट्र देशा
२) पहावा विठ्ठल

राजकीय गट : महाराष्ट्र विधानसभा :-

महाराष्ट्र विधानसभा हे कनिष्ठ सभागृह आहे (महाराष्ट्र विधान परिषद हे वरिष्ठ सभागृह).
विधानसभेची विद्यमान सदस्य संख्या २८८ आहे.व महाराष्ट्रात शिवसेना कॉंग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेस प्रणीत महाराष्ट्र विकास आघाडी चे उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार अस्तित्वात आहे
भाजप (१०५) शिवसेना (५६) काँग्रेस (५४) राष्ट्रवादी (४४)
शेकाप (१) बविआ (३) एमआयएम (१) भारिपबम (१) मनसे (१) रासप (१)माकप (१) इतर (८)                                      



भारतीय राज्यघटनेतील प्रमुख कलमे


कलम २. – नवीन राज्यांची निर्मिती
कलम ३. – राज्यांचे भूभाग ,सीमा व नावे बदलणे
कलम १४. – कायद्यापुढे समानता
कलम १७. – अस्पृशता पाळणे गुन्हा कलम
१८. – पदव्या संबंधी
कलम २१-अ. – ६-१४ वर्षे वयोगटातील मोफत व सक्तीचे शिक्षण हा मुलभूत अधिकार
कलम २३. – मानवाच्या क्रय-विक्रयास बंदी
कलम ३२. – घटनात्मक उपायाचा अधिकार. कलम ४०. – ग्रामपंचायतीची स्थापना
कलम ४४. – समान नागरी कायदा कलम
४८. – पर्यावरणाचे सौरक्षण कलम
४९. – राष्ट्रीय स्मारकाचे जतन कलम
५०. – न्यायदान व शासन यंत्रणा अलग
कलम ५१. – आंतरराष्ट्रीय शांतता प्रस्थापित करणे कलम ५२. – राष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ५३. – राष्ट्रपती भारताचा पहिला नागरिक कलम ५८. – राष्ट्रपती पदाच्या पात्रता
कलम ५९. – राष्ट्रपतीस केंद्र व राज्य शासनाच्या कोणत्याही सदनाचा सभासद राहता येत नाही कलम ६०. – राष्ट्रपतीने घ्यावयाची शपथ
कलम ६१. – राष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ६३. – उपराष्ट्रपती पदाची निर्मिती
कलम ६६. – उप्रष्ट्रापतीची निवडणूक किवा पात्रता
कलम ६७. – उप्रष्ट्रापातीवरील महाभियोग
कलम ७१. – मंत्रिमंडळ व पंतप्रधानाचा सल्ला राष्ट्रपतीवर बंधनकारक
कलम ७२. – राष्ट्रपतीचा दयेचा अधिकार
कलम ७४. – पंतप्रधान व मंत्रिमंडळ
कलम ७५. – मंत्रिमंडळ लोकसभेला जबाबदार कलम ७६. – भारताचा महान्यायवादी
कलम ७७. – भारत सरकारचा कारभार राष्ट्रपतीच्या नावे चालेल
कलम ७८. – राष्ट्रपतीने वेळोवेळी मागविलेली माहिती पुरवणे पंतप्रधान यांचे कर्तव्य
कलम ७९ – संसद
कलम ८० – राज्यसभा
कलम ८१. – लोकसभा
कलम ८५. – संसदेचे अधिवेशन
कलम ९७. – लोकसभेच्या अध्यक्ष व उपाध्याक्षाचे वेतन व भत्ते
कलम १००. – राज्यसभेत एखाद्या विधेयकावर समान मते पडल्यास उपराष्ट्रपती निर्णायक मत देऊ शकतो
कलम १०१. – कोणत्याही व्यक्तीला एकाच वेळी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सभासद होता येत नाही
कलम १०८. – संसदेचे संयुक्त अधिवेशन राष्ट्रपती बोलावतो
कलम ११०. – अर्थविधेयाकाची व्याख्या
कलम ११२. – वार्षिक अंदाज पत्रक
कलम १२३. – राष्ट्रपतीला वटहुकुम काडण्याचा अधिकार
कलम १२४. – सर्वोच न्यायालय
कलम १२९. – सर्वोच न्यायालय हे अभिलेख न्यायालय असेल.
कलम १४३. – राष्ट्रपती सर्वोच न्यायालयाचा सल्ला घेऊ शकतात
कलम १४८. – नियंत्रक व महालेखा परीक्षक कलम १५३. – राज्यपालाची निवड
कलम १५४. – राज्यपालाच्या मदतीला मुख्यमंत्री व मंत्रिमंडळ
कलम १५७. – राज्यपालाची पात्रता
कलम १६५. – अडव्होकेत जनरल (महाधिवक्ता) कलम १६९. – विधान परिषद निर्मिती व बरखास्ती
कलम १७०. – विधानसभा
कलम १७९. – विधानसभेचा अध्यक्ष व उपाध्याक्षावरील महाभियोग
कलम २०२. – घटक राज्याचे अंदाजपत्रक
कलम २१३. – राज्यापालाचा वटहुकुम काढण्याचा अधिकार
कलम २१४. – उच्च न्यायालय
कलम २३३. – जिल्हा न्यायालय
कलम २४१. – केंद्रशाशित प्रदेशासाठी उच्च न्यायालये
कलम २४८. – संसदेचे शेशाधिकार
कलम २६२. – आंतरराज्यीय पानिवातपा संबंधी कलम २६३. – राज्यापालाचा स्वविवेकाधिकार कलम २८०. – वित्तआयोग
कलम ३१२. – अखिल भारतीय सेवा
कलम ३१५. – केंद्र व राज्य लोकसेवा आयोग कलम ३२४. – निवडणूक आयोग
कलम ३३०. – लोकसभेत अनुसूचित जाती-जमातीसाठी राखीव जागा
कलम ३४३. – केंद्राची कार्यालयीन भाषा
कलम ३५०. – अल्पसंख्यांक आयोगाची निर्मिती कलम ३५२. – राष्ट्रीय आणीबाणी
कलम ३५६. – राज्य आणीबाणी
कलम ३६०. – आर्थिक आणीबाणी
कलम ३६८. – घटनादुरुस्ती
कलम ३७०. – जम्मू-काश्मीर ला खास सवलती कलम ३७१. – वैधानिक विकास मंडळे
कलम ३७३. – प्रतिबंधात्मक स्थानबध.                

देशातील पहिला कचरा कॅफे

👉 अंबिकापूर (छत्तीसगड)

👉 हेतू-- शहर प्लॅस्टिकमुक्त करणे

👉 नागरीकांना 1kg प्लॅस्टिक कचऱ्याच्या बदल्यात अन्न पुरविणे

👉 घोषवाक्य-- "More the waste better the taste"

💐  राष्ट्रीय सागरी वारसा संग्रहालय 💐

👉 ठिकाण-- लोथल, गुजरात

👉 लिस्बन, पोर्तुगाल येथील नेव्ही म्युझियम च्या धर्तीवर अंमलबजावणी      

👉केंद्रीय नौकावहन मंत्रालय (सागरमाला  प्रकल्पांतर्गत)

👉 भारत आणि पोर्तुगाल यांच्या सहकार्याने उभारणी

👉मार्च 2019 पंतप्रधान मोदींच्या हस्ते पायाभरणी

👉लोथल-- प्राचीन हडप्पा संस्कृतीतील एक बंदर