२०२८च्या ऑलिम्पिकमध्ये भारत अव्वल १० देशांत.

📌 २०२८च्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेत भारताला अव्वल १० देशांत स्थान मिळवणे नक्कीच शक्य आहे, अशी प्रतिक्रिया क्रीडा मंत्री किरेन रिजिजू यांनी बुधवारी व्यक्त केली.

📌 या ध्येयाच्या दिशेने शासनाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे, असेही त्यांनी सांगितले.

📌 ‘‘ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा कोणत्याही खेळाडूच्या आयुष्यात फार महत्त्वाच्या असतात.

📌 गेल्या काही वर्षांत भारताला अनेक युवा आणि कौशल्यवान क्रीडापटू गवसले असून २०२८च्या ऑलिम्पिकमध्ये आपण नक्कीच अव्वल १० देशांत स्थान मिळवू शकतो, असे मला वाटते. त्यादृष्टीने क्रीडा खात्यासह शासनानेही आतापासूनच प्रयत्न सुरू केले आहेत,’’ असे रिजिजू म्हणाले.

📌 ‘‘२०२८च्या ऑलिम्पिकसाठी अद्याप आमच्याकडे आठ वर्षांचा कालावधी असल्याने खेळाडूंच्या शोधमोहिमेची अंतिम रुपरेषा कशी असावी, याविषयी आम्ही सध्या चर्चा करत आहोत.

📌 त्याचप्रमाणे २०२१च्या ऑलिम्पिकसाठी खेळाडू कसे तयारी करत आहेत, याकडेही आमचे लक्ष आहे,’’ असे रिजिजू यांनी नमूद केले.

No comments:

Post a Comment

Latest post

स्पर्धा परीक्षा चालू घडामोडी

Q.1) प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेते विजय थलापती यांनी कोणत्या नावाने स्वतःचा राजकीय पक्ष सुरू केला? उत्तर - तमिझगा वेत्री कळघम (TVK) Q.2) नुकत...