Monday 4 April 2022

चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना.Defence

🏞 अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासा आणि जगातील आघाडीची मोबईल आणि नेटवर्क क्षेत्रातील कंपनी नोकिया यावर काम करीत आहेत.

🏞 चंद्रावर 4G नेटवर्क स्थापित करण्यासाठी ते एक एतिहासिक योजना आखत आहेत.

🏞 नोकियाची संशोधन शाखा असलेली ‘बेल लॅब्ज’ या कंपनीला नासाने चंद्रावर अॅडव्हान्स्ड टिपिंग पॉईंट तंत्रज्ञानाद्वारे मोबाईल नेटवर्क निर्माण करण्याच्या कामासाठी प्रमुख पार्टनर म्हणून निवडले आहे.

🏞 या प्रकल्पासाठी 14.1 मिलियन डॉलरचा निधी देखील मंजूर करण्यात आला आहे.

🏞 याद्वारे चंद्रावर पहिले वायरलेस नेटवर्क प्रस्थापित करण्यात येणार आहे. 4G/LTE तंत्रज्ञानापासून याला सुरुवात होणार असून ते 5G तंत्रज्ञानामध्ये देखील रुपांतरीत करण्यात येणार आहे.

🏞 आपल्या या महत्वाकांक्षी योजनेबाबत बोलताना नासाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की, “चंद्रावर 4G/5G नेटवर्क स्थापित करण्यासाठी आम्हाला टेरेस्ट्रियल टेक्नॉलॉजीने प्रेरित केले आहे.

🏞 यासाठी प्रथम नोकियाने LTE/4G संप्रेषण प्रणाली अंतराळात तैनात करण्याचा प्रस्ताव ठेवला.”

No comments:

Post a Comment

Latest post

आजचे खूप महत्वाचे करंट अफेअर्स - (प्रश्न & उत्तरे) 20 एप्रिल 2024

🔖 प्रश्न.1) अलीकडेच टाइम मासिकाने जगातील 100 सर्वात प्रभावशाली व्यक्तींमध्ये कोणत्या प्रसिद्ध भारतीय अभिनेत्रीचा समावेश केला ?  उत्तर – आलि...