Ads

06 April 2022

संसर्गाच्या प्रसारावर देखरेख ठेवण्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान विभागाचे नवे तंत्रज्ञान ‘मॉडेल'. आणि तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील

⚡️ भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभागाने भविष्यात उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगांवर देखरेख ठेवण्यासाठी तसेच आरोग्य यंत्रणेची सज्जता आणि इतर उपाययोजनांबाबत निर्णय घेण्यासाठी मदत म्हणून ‘कोविड-19 इंडियन नॅशनल सुपर मॉडेल’ उपक्रम राबवत आहे.

⚡️सरकार संसर्ग क्षमता आणि जीवितहानीवर बारीक लक्ष ठेवून आहे, परंतु रोगावरील देखरेख वाढवण्यासाठी तसेच प्रसाराचा अंदाज वर्तवण्यासाठी एक मजबूत पूर्वसूचना प्रणाली तयार करणे अत्यावश्यक आहे. कोविड-19 संबंधी अंदाज आणि देखरेखीसाठी  असंख्य गणितीय मॉडेलची DST-SERB (विज्ञान व अभियांत्रिकी संशोधन मंडळ) आणि अन्य संस्थांद्वारे प्रायोजित विश्लेषकांकडून चाचपणी केली जात आहे.

☄ ठळक बाबी.. ☄

⚡️ हवामानविषयक घटनांच्या आपत्ती व्यवस्थापन नियोजनासाठी गणितीय मॉडेल्सचा वापर भारत पूर्वीपासून करीत आहे. त्यातून प्रेरणा घेत विभागाने या क्षेत्रातल्या तज्ज्ञांचा शोध घेण्यासाठी आणि संपूर्ण देशासाठी एक मॉडेल तयार करण्यासाठी अभ्यास सुरु केला आहे, जो पुरावा-आधारित अंदाजासाठी आवश्यक





तेजस FOC विमान भारतीय हवाई दलात सामील 🛩

👉 कोयंबटूर (तामिळनाडू) या शहराजवळ भारतीय हवाई दलाच्या (IAF) सुलूर हवाई तळावर ‘तेजस एमके-1’ या विमानांचा भारताच्या लढाऊ विमानांच्या ताफ्यामध्ये 27 मे 2020 रोजी समावेश करण्यात आला. अशा पद्धतीच्या लढाऊ विमानांचा समावेश ताफ्यामध्ये करणारे भारतीय हवाई दलाचे हे पहिले स्क्वाड्रन आहे.

👉 सुलूर हवाई तळामधल्या ‘फ्लाईंग बुलेट’ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या ‘नंबर 18 स्क्वाड्रन’चे पुनरुज्जीवन करण्यात आले आहे.

👉 तेजसच्या समावेशामुळे भारतीय हवाई दलाने परिचालन क्षमता वृद्धीच्या दिशेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. तेजस एमके-1 मुळे देशाच्या स्वदेशी लढावू विमान बांधणी कार्यक्रमाला चालना मिळणार आहे. तसेच ‘मेक इन इंडिया’ उपक्रमालाही प्रोत्साहन मिळणार आहे.

👉 ‘तेजस एमके-1 FOC’ हे चौथ्या पिढीचे ‘तेजस’ विमान आहे. यामध्ये एकच इंजिन आहे. तसेच ते वजनानी हलके, अतिशय चपळाईने कार्यरत राहू शकते. तसेच सर्वप्रकारच्या हवामान परिस्थितीत बहुविध भूमिका पार पाडणारे हे लढाऊ विमान आहे. तेजसमध्ये हवेतल्या हवेमध्येच इंधन भरण्याची सुविधा-क्षमता आहे.

महाराष्ट्रातील पंचायत राज

🎯- महत्त्वपूर्ण माहिती 🎯

🅾आधूनिक महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतराव नाईक यांच्या अथक , लोककल्याणकारी व पारदर्शक विचारकृतीमधुन जन्मास आलेले पंचायत राज........सध्या संपूर्ण राज्यात चर्चेस आहे.

1. कोणत्या संस्थांना ‘लोकशाहीचा पाळणा’ म्हणून ओळखतात ?
🅾 स्थानिक स्वराज्य संस्था

2. राष्ट्रीय विस्तार कार्यक्रमाची (National Extension Programme) सुरुवात कधी झाली होती ?
🅾 2 ऑक्टोबर 1953

3. बलवंतराय मेहता समितीची केंद्र शासनाने नेमणूक कधी केली ?
🅾16 जानेवारी 1957

4. बलवंतराय मेहता समितीच्या शिफारशीवर विचार करून त्यावर अहवाल सादर करण्यासाठी राज्य सरकारने कोणत्या समितीची नियुक्ती केली होती ?
🅾 वसंतराव नाईक समिती

5. वसंतराव नाईक समिती कधी नेमली गेली होती ?
🅾27 जून 1960

6. वसंतराव नाईक त्याकाळी कोणत्या पदावर कार्यरत होते ?
🅾महसूल मंत्री

🔘
7. वसंतराव नाईक समितीने एकूण किती शिफारसी केल्या होत्या ?
🅾226

8. वसंतराव नाईक समितीने कोणत्या स्तराला सर्वाधिक महत्त्व देण्याची शिफारस केली होती. त्याचा परिपाक म्हणून महाराष्ट्रातील पंचायतराज व्यवस्था वेगळ्या धाटणीची ठरली ?
🅾 जिल्हा परिषद

9. पंचायत राज व्यवस्थेत एकूण किती स्तर आहेत ?
🅾तीन (ग्रामपंचायत-पंचायत समिती-जिल्हा परिषद)

10. महाराष्ट्रात पंचायत राजव्यवस्थेचा प्रारंभ कधी झाला ?
🅾 1 मे 1962

11. ‘महसुली खेड्या’ची व्याख्या कोणत्या कायद्यान्वये करण्यात आली आहे ?
🅾महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम,1966

12. महाराष्ट्रात ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असते ?
🅾 7 ते 17

13. ग्रामपंचायतींची सदस्य संख्या किती असावी हे राज्यशासनाच्या वतीने कोण ठरविते ?
🅾जिल्हाधिकारी

14. ग्रामपंचायतींचे आरक्षण ठरविण्याचा अधिकार कोणाला आहे ?
🅾 जिल्हाधिकारी

15. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ किती असतो ?
🅾 5 वर्षे

16. ग्रामपंचायतीचा कार्यकाळ कधी पासून मोजला जातो ?
🅾 पहिल्या सभेपासून

17. ग्रामपंचायतीच्या पहिल्या बैठकीचे अध्यक्ष/पीठासन अधिकारी कोण असतात?
🅾 तहसीलदार

18. सरपंच/उपसरपंच यांच्या निवडणूकीबाबतच्या वादावर अंतिम निर्णय कोण घेते ?
🅾 विभागीय आयुक्त

🅾19. उपसरपंच आणि इतर ग्रामपंचायत सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾सरपंच

20. सरपंच आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾पंचायत समिती सभापती

21. पुरुष सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
🅾दोन तृतीयांश (2/3)

22. महिला सरपंच/उप-सरपंच यांच्यावरील अविश्वास ठराव पारित होण्यासाठी किती बहुमताची आवश्यकता असते ?
🅾 तीन चतुर्थांश (3/4)

23. पंचायत समिती उप-सभापती आणि इतर पंचायत समिती सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾पंचायत समिती सभापती

24. पंचायत समिती सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

25. जिल्हा परिषद सदस्य आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 संबंधित विषय समिती सभापती

26. जिल्हा परिषद उपाध्यक्ष आणि विषय समितींचे सभापती आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

27. जिल्हा परिषद अध्यक्ष आपला राजीनामा कोणाकडे देतात ?
🅾विभागीय आयुक्त

28. कोण ग्रामपंचायतीचा सचिव असतो मात्र ग्रामपंचायतीचा नोकर नसतो ?
🅾 ग्रामसेवक

29. ग्रामसेवक कोणाचा नोकर असतो ?
🅾जिल्हा परिषदेचा

30. ग्रामसेवकाचे वेतन कशातून दिले जाते ?
🅾जिल्हा परिषदेच्या जिल्हानिधी तून

31. ग्रामीण भागात ‘बालविवाह प्रतिबंधक अधिकारी’ म्हणून कोण कार्य पाहतो ?
🅾ग्रामसेवक

32. ग्रामसेवक प्रशिक्षण केंद्र कोठे आहेत ?
🅾शिंदेवाही (चंद्रपूर) आणि मांजरी (पुणे)

33. ग्रामपंचायतीचे कर निश्चित करण्याचा अधिकार कोणाला आहे ?
🅾 राज्यशासनाला

34. सरपंच समितीचा पदसिध्द सचिव म्हणून कोण काम पाहते ?
🅾 विस्तार अधिकारी

35. गटविकास अधिकारी कोणत्या खात्याचा अधिकारी आहे ?
🅾 ग्रामविकास खाते

36. जिल्हा नियोजन मंडळाचे अध्यक्ष कोण असतात ?
🅾जिल्ह्याचे पालकमंत्री

37. जिल्हा नियोजन मंडळाचे सचिव कोण असतात ?
🅾जिल्हाधिकारी

38. जिल्हा परिषदेच्या एकूण किती समित्या असतात ?
🅾दहा (स्थायी+9 विषय समित्या)

39. जिल्हा परिषदेच्या समित्या कोणत्या आहेत ?
🅾 स्थायी, कृषी,समाजकल्याण, शिक्षण, बांधकाम, वित्त, आरोग्य, पशुसंवर्धन व दुग्धविकास, महिला व बालकल्याण, जलसंधारण व पेयजल पुरवठा

40. जिल्हा परिषदेच्या स्थायी समितेचे पदसिध्द अध्यक्ष कोण असतात ?
🅾 जिल्हा परिषद अध्यक्ष

41.महाराष्ट्र पंचायत राजचे जनक कोण आहे.?
🅾वसंतराव नाईक

वाचा :- महत्त्वाच्या चालू घडामोडी

▪ कोरोना व्हायरस संक्रमित सर्वाधिक रुग्णसंख्या असलेल्या पहिल्या 10 देशांमध्ये भारताचा समावेश

▪ देशांतर्गत विमान सेवेतील प्रवाशांसाठी आरोग्यविषयक मार्गदर्शिका जारी; प्रवाशांना 14 दिवस घरीच राहणे बंधनकारक

▪ कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आंतरराष्ट्रीय विमानांमध्ये मधली सीट ही रिकामी ठेवण्यात यावी; सुप्रीम कोर्टाचे आदेश

▪ कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता हिमाचल प्रदेश सरकारने दोन जिल्ह्यांतील कर्फ्यू 30 जूनपर्यंत वाढवला

▪ राज्यातील कोरोनाबाधित रुग्णांची एकूण संख्या ५२ हजार ६६७ झाली आहे. आज २४३६ नवीन रुग्णांचे निदान झाले

▪ महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करण्याची भाजप नेते नारायण राणे यांची राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांच्याकडे मागणी

▪ सरकार राज्यभरातील शाळा टप्प्याटप्प्याने सुरू करण्याचे विचाराधीन; निर्जंतुकीकरण, सुरक्षिततेच्या पर्यायांची घेणार काळजी

▪ श्रीलंकेच्या पोलिसांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटर शेहान मदुशनकाला हेरॉइन हा मादक पदार्थ बाळगल्याच्या आरोपाखाली ताब्यात घेतले

▪ रिअलमीचा अँड्रॉइड स्मार्ट टिव्ही बाजरात लॉन्च; किंमत फक्त 12,999 रुपयांपासून सुरु

▪ बॉलिवूड चित्रपट निर्माता करण जौहर यांच्या घरात कोरोनाचा शिरकाव; संपूर्ण कुटूंब क्वारंटाईन





♦️ देशातील घडलेल्या महत्वपूर्ण प्रथम घटना

♦️देशातील पहिला सायबर डिफेन्स रिसर्च सेन्टर -झारखंड

♦️देशातील पहिले ई - गव्हर्नन्स धोरण राबविणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिले प्लॅस्टिक मतदान ओळखपत्र मतदाराना वाटप करणारे राज्य - त्रिपूरा

♦️देशातील पहिले सीसीटीव्हीच्या निगरानीत आलेले शहर - सुरत

♦️देशात प्रथम ई कॅबीनेटचा वापर करणारे राज्य -आंध्रप्रदेश

♦️देशातील पहिले रॅकिंग विरोधात कायदा करणारे राज्य - तामिळनाडू

♦️देशातील पहिले वाय-फाय सुविधा देणारे रेल्वे स्थानक - बंगळूर

♦️देशातील पहिले जन सुरक्षा कायदा करणारे राज्य - आंध्रप्रदेश

♦️देशातील पहिले फुलपाखराला राज्य फुलपाखराचा दर्जा देणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिला विशेष आर्थिक क्षेत्र (SEZ) प्रकल्प - कांडला (गुजरात)

♦️देशातील पहिले मानवाधिकार न्यायालय सुरु करणारे राज्य - प.बंगाल

♦️देशातील पहिले राईट इ सव्हिसेस अक्ट (RTS) पास करणारे राज्य - मध्यप्रदेश

♦️देशातील पहिले होमीओपॅथिक विद्यापीठ -राज्यस्थान

♦️देशातील पहिले बायोटेक विशेष आर्थिक क्षेत्र -हडपसर  (पुणे)

♦️देशातील पहिले आपल्या तक्रारी ऑनलाईन दाखल करण्याची सुविधा जनतेला उपलब्ध करून देणारे राज्य - हरीयाणा

♦️देशातील पहिले स्त्री बटालियन - हडी राणी (राजस्थान)

♦️देशातील पहिले ग्रामपंचायतीमध्ये ई - बँकीग सेवा देणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिले ई - पंचायत सुरु करणारे राज्य -महाराष्ट्र

♦️देशातील पहिले केरोसिनमुक्त राज्य - दिल्ली

♦️देशातील पहिले हागनदारी मुक्त जिल्हा - नदिया (प.बंगाल)

♦️देशातील पहिले सिकलसेलग्रस्तांना मोफत एस.टी. प्रवास सुविधा देणारे राज्य - महाराष्ट्र

♦️देशातील पहिला खासगी विमानतळ - दुर्गापूर (प.बंगाल)

♦️देशातील पहिले अधिकृत ई-रिक्षा या राज्यात सुरु झाले -  दिल्ली

♦️देशाीतील पहिले प्लॅस्टिक विद्यापीठ - वापी (गुजरात)

♦️देशातील लोकायुक्त पास करणारे पहिले राज्य-उत्तराखंड

♦️देशातील पहिले जैव - सांस्कृतिक पार्क -भुवनेश्‍वर

♦️देशातील प्रत्येक राज्यात महिला न्यायालय स्थापन करणारे पहिले राज्य - आंध्रप्रदेश

♦️देशातील पहिला सौर पवनउर्जा प्रकल्प - आळंदी

♦️देशातील पहिले सॅटेलाईट शहर - पिलखूआ (उत्तरप्रदेश)

♦️देशातील पहिले पर्यावरण ग्राम इको व्हिलेज -काटेवाडी




सामान्य ज्ञान

⭐️पेशींच्या अभ्यासाच्या शास्त्राला पेशीशास्त्र (Cytology) असे म्हणतात.

⭐️ रॉबर्ट हुक यांनी पेशी हे नाव दिले.

⭐️ पेशीतील विविध घटकांच्या संशोधनानंतर काही जर्मन शास्त्रज्ञानीं विविध सजीवांचे निरीक्षण करून पेशी विषयी आपले विचार मांडले त्यांनाच पेशीसिद्धांत असे म्हणतात.

१) एम. जे. शिल्डेन (1938) २) थिओडोर श्वान यांनी पेशी सिद्धांत मांडला.

☀️पेशींचा आकार अतिशय लहान आहे व उघड्या डोळ्यांनी पेशींचे निरीक्षण करता येत नाही.

⭐️ पेशींचा आकार मोजण्याचे एकक (μm) आहे.

⭐️ पेशींचा आकार 0.1 μm ते 18 cm असू शकते.

अ. क्र.  सजीव पेशी  पेशींचा आकार
१) अमीबा अनियमित (Irregular)
२) स्पायरोगायरा आयताकृती (Rectangular)
३) जिवाणू दंडाकृती (Cylindrical)
४) अंडपेशी गोलाकार (Rounded)
५) शुक्रपेशी सर्पिलाकृती (Sprial)
६) तांबड्या पेशी द्विअंतर्वक्री (Bi-Concave)
७) चेतापेशी शाखीय (Branched)
८)  मेदपेशी अंडाकृती (Oval)
९) त्वचेतील पेशी स्तंभाकृती (Columnar)
१०) स्नायूपेशी विटाकृती (Bricks Shapes).




🍀1) केंद्रक (Nucleus):

🌷केंद्रक हा पेशीतील मोठयात मोठा मध्यवर्ती घटक आहे.  केंद्रक गोल आकाराचे असते.
केंद्रकाभोवती असणारे केंद्रपटल सच्छिद्र असते.

🌷केंद्रकात डीएनए पासून बनलेली गुणसूत्रे असतात.
डीएनए च्या ठराविक लांबीच्या धाग्यास जनुक म्हणतात.
केंद्रक पेशींच्या सर्व कार्यावर नियंत्रण ठेवते.

🌷पेशी विभाजनात भाग घेते.
केंद्रकातील गुणसूत्रांवरील जनुकांनुसार आनुवंशिक गुण पुढील पिढ्यांमध्ये संक्रमित होतात.

🌺2) आंतर्द्रव्य जालिका (Endoplasmic Reticulum):

ही पेशीतील परिवहन संस्था आहे.
पेशीद्रव्याच्या आंतर्भागात सूक्ष्म नाभिकांची एक जालिका पसरलेली असते, त्या नलिकापटलाने सीमित असतात.

🌷या जालीकेला आंतर्द्रव्य जालिका असे म्हणतात.
आंतरजालीकेच्या बाह्यांगावर बारीक सूक्ष्म रायबोझोम्स असतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌺3) रायबोझोम्स (Ribosomes):

आंतर्द्रव्य जालीकेवर असतात.

ह्या रायबोनल आरएनए आणि प्रथिनांपासून बनलेल्या असतात.

प्रथिने संश्लेषणाचे कार्य असते.

🌺4)  हरित लवके (Chloroplasts):

हरित लवके फक्त वनस्पती पेशींमध्ये असतात.

हरित लवके प्रकाश संश्लेषणाचे कार्य करतात.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷


🌺5) तंतूकणिका (Mitochondria):

तंतूकणिका वेगवेगळ्या आकारांचे असतात.
प्रामुख्याने ते लांबट गोल आकाराचे आढळतात.
प्रत्येक तंतूकणिकेस (Mitochondria) दुहेरी भित्तिका असून आतील भित्तिकेला घड्या पडलेल्या असतात.
पेशीतील अन्नापासून ऊर्जा निर्माण करण्याचे काम मायटोकाँड्रिया करते.
पेशीला जरूर असेल तेव्हा ऊर्जा पुरवते, म्हणून याला पेशींचे ऊर्जाकेंद्र म्हणतात.

🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌿🌿🌷

6) गोल्गीकाय/ गॉल्जीपिंड (Golgi Body) :

पेशिरसातील चपटे पटल  असणाऱ्या पिशव्यांना गोल्जीपिंड म्हणतात.
यामध्ये विकर साठवले जातात.
गोल्गीसंकुलाला पेशीतील स्त्रावी अंगक असे म्हणतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷

गोल्गीकाय/ गॉल्जीपिंड (Golgi Body) :

7) तारक-काय (Centrosomes):

फक्त प्राणी पेशींमध्ये असतात.
पेशीविभाजनामध्ये महत्वपूर्ण कार्य करतात.

🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀🌷🍀

🌺8) लयकारिका (Lysosomes):

🌷लयकारिका साध्या एका आवरणाने बनलेली पिशवी असते त्यांना कोश असेही म्हटले जाते.
लयकारिका या गॉल्जीपिंड मार्फत तयार केल्या जातात. यांच्यामध्ये विविध पाचक विकरे (Digestive Enzymes) असतात.

🌷वनस्पती पेशीत लयकारिका कमी प्रमाणात असतात.
पेशींमध्ये घडत असलेल्या विविध चयापचय क्रियानंतर जटील टाकाऊ कार्बनी पदार्थ तयार होतात. त्या पदार्थांचे पचन लयकारिका करत असतात म्हणून त्यांना पेशीतील टाकाऊ पदार्थाची विल्हेवाट लावणारी संस्था असे म्हणतात.

🌷पेशींवर हल्ला करणाऱ्या जिवाणू आणि विषाणूंसारख्या रोगजंतूंना लयकारिका नष्ट करतात म्हणून तिला पचन पिशव्या (Digestive Bags) असेही म्हणतात.

🌷पेशींमध्ये बिघाड झाल्यास तेव्हा त्या पेशीतील लयकारिका फुटतात व त्यातील विकरे पेशींचे पचन करतात; म्हणून लायकारिकांना आत्मघाती पिशव्या (Suicidal -Bags) म्हणतात.

🌷सजीवांना अन्न न मिळाल्यास लयकारिका पेशीत साठविलेल्या प्रथिने आणि मेद यांचा उपयोग करून शरीरात आवश्यक ऊर्जा पुरविण्याचे कार्य करतात.
🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷🌿🌷

🌺9) रिक्तिका (Vacuole):

पेशीत नुकतेच आलेले व पेशीतून बाहेर पडण्याच्या मार्गावर असणारे पदार्थ रिक्तिकेत असतात.
त्याचप्रमाणे पेशीतील टाकाऊ पदार्थ ही रिक्तिकेत असतात. म्हणून त्यांना Waste Deposite Bags असेही म्हणतात.
रिक्तिकांना ठराविक आकार नसतो. रिक्तिका एकेरी आवरणाने बनलेल्या असतात.
प्राणी पेशींमध्ये आकाराने लहान आणि एकपेक्षा अधिक तर वनस्पती पेशींमध्ये मोठ्या आकाराच्या एक किंवा अधिक रिक्तिका असतात. रिक्तिकांना स्थायू तसेच द्रव पदार्थाची साठवणूक करणाऱ्या पिशव्या असे म्हणतात.


महाराष्ट्रातील जिल्हावार धरणे आणि महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग


●अमरावती जिल्हा: ऊर्ध्व वर्धा धरण

●अहमदनगर जिल्हा : आढळा प्रकल्प,ढोकी धरण, तिरखोल धरण, निळवंडे धरण, पळशी धरण, भंडारदरा धरण,मांडओहळ धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण, रुई छत्रपती धरण,लोणीमावळा धरण, विसापूर तलाव,सीना धरण, हंगा धरण, ज्ञानेश्वरसागर तलाव(मुळा धरण)

●औरंगाबाद जिल्हा : गराडा तळे,गौताळा तलाव, जायकवाडी धरण,नागद तलाव, निर्भोर तळे

●उस्मानाबाद जिल्हा : तेरणा धरण

●कोल्हापूर जिल्हा : रंकाळा तलाव

●गडचिरोली जिल्हा : दिना

●गोंदिया जिल्हा : इटियाडोह

●चंद्रपूर जिल्हा : पेंच आसोलामेंढा

●जळगाव जिल्हा : अग्नावती धरण,अंजनी धरण, अभोरा धरण,काळा बंधारा, कृष्णपुरी बंधारा, गाळण पाझर तलाव, गिरणा धरण,जामदा बंधारा, तोंडापुरा धरण,दहीगाव बंधारा, धामणगाव बंधारा,पांझण उजवा कालवा,पिंपरी बंधारा,बहुळा धरण, बळाड बंधारा, बुधगाव बंधारा, बोरी धरण,भोकरबारी प्रकल्प, मंगरूळ धरण,मन्याड धरण, महरून तलाव, मोर धरण,म्हसवा बंधारा, वडगाव बंधारा, वाघूर धरण, वाडी पाझर तलाव, सातगाव डोंगरी, सार्वेपिंप्री बंधारा,सुकी धरण, हतनूर धरण, हिवरा धरण, होळ बंधारा (एकूण ३२)

●ठाणे जिल्हा : भातसा धरण, बरवी,सूर्या धामणी, सूर्या कवडासे

●धुळे जिल्हा : अक्कलपाडा धरण,अंचोळे, कानोली, गोंदूर तलाव,डेडरगाव तलाव, देवभाने, नकाणे तलाव,पुरमेपाडा, मांडळ, राक्षी, हरणमाळ तलाव

●नंदुरबार जिल्हा : यशवंत तलाव,

●नागपूर जिल्हा : उमरी कान्होजी,कामठी खैरी , कोलार, निम्न वेणा (वाडेगाव), निम्न वेणा (नांद) ,पेंच तोतलाडोह , पेंच रामटेक ,पेंढारी धरण, मनोरी धरण,रोढोरी धरण, साईकी धरण.

●नांदेड जिल्हा : इसापूर धरण, निम्न दुधना धरण, विष्णुपुरी धरण

● नाशिक जिल्हा : अर्जुनसागर,केल्झार धरण, गंगापूर धरण,गिरणा धरण, चणकापूर धरण,,लोहशिंगवे धरण, हरणबारी धरण, पुणे गाव, कारजवन, तिसगाव, ओझरखेड,वाघाड, पालखेड, भावली धरण, मुकणे धरण, कडवा, दारणा धरण

●परभणी जिल्हा : कर्परा धरण, लोअर दुधना धरण, पूर्णा येलावारी,पूर्णासिद्धेश्वर, येलदरी धरण

●पुणे जिल्हा : आंध्रा धरण, उरवडे बंधारा, खडकवासला धरण, घोड धरण,चपेटधरण, चासकमान धरण, चंचवड बंधारा, टेमघर धरण, डिंभे धरण,तुंगार्ली धरण, देवघर धरण,पवना प्रकल्प, पानशेत धरण,पिंपळगावधरण, पिंपोळी बंधारा, भाटघर धरण,भुशी धरण, भूगाव बंधारा, माणिकडोह धरण, मारणेव्बाडी बंधारा,मुळशी धरण, येडगाव धरण, रिहे बंधारा,लवळे बंधारा, लोणावळा तलाव, वडज धरण, वरसगाव धरण, वळवण धरण, वाळेण बंधारा, वीर धरण, शिरवटा धरण,आयएनएस शिवाजी तलाव, हाडशी बंधारा १, हाडशी बंधारा २ (एकूण ३४)

●बुलढाणा जिल्हा :खडकपूर्णा धरणनळगंगा धरण वाण,पेंटाळी

●बीड जिल्हा : माजलगाव धरण,मांजरा धरण

●भंडारा जिल्हा : इंदिरासागरप्रकलप, कऱ्हाडा तलाव प्रकलप, खांब तलाव प्रकलप, चांदपूर तलाव प्रकलप,बहुळा धरणप्रकलप, बालसमुद्र प्रकलप,इतीयाडोह प्रकलप , बाघ शिरपूरप्रकलप, बाघ पुजारीटोला प्रकलप,बाघ कालीसरार प्रकलप , गोसीखुर्दप्रकलप

●मुंबई जिल्हा : मोडक सागर, तानसा,विहार, तुळशी

●यवतमाळ जिल्हा: पूस ,अरुणावती ,बेंबळा

●वर्धा जिल्हा : ऊर्ध्व वर्धा धरण,डोंगरगाव प्रकल्प, धाम धरण(महाकालीजलाशय), नांद प्रकल्प,निम्न वर्धा धरण, पंचधारा प्रकल्प,पोथरा प्रकल्प, बेंबळा प्रकल्प, बोरप्रकल्प, मदन उन्न,ई प्रकल्प, लाल नाला प्रकल्प, वडगाव प्रकल्प,वर्धा कार नदी प्रकल्प, सुकळी लघुप्रकल्प (एकूण १४)

●सातारा जिल्हा : उरमोडी धरण,कण्हेर धरण, कास तलाव,कोयना धरण(शिवसागर), जांभळी जंगल तलाव,तापोळा तलाव, तारळी धरण, धोम धरण, बलकवडी धरण, बामणोली तलाव,मोती तलाव, मोरणा धरण, वेण्णा तलाव (एकूण १२)

●सिंधुदुर्ग जिल्हा : तिलारी धरण,देवधर धरण

●सोलापूर जिल्हा : आष्टी तलाव,उजनी धरण , एकरुख तलाव, कंबर तलाव,गिरणीतलाव,पाथरी तलाव, भीमा-सीना नद्यांना जोडणारा भूमिगत कालवा , बुद्धिहाळ तलाव,यशवंतसागर (उजनी) तलाव,संभाजी तलाव,सिद्धेश्वर तलाव, हिप्परगी तलाव,एकरुखे तलाव, होटगी तलाव (एकूण ११)

● हिंगोली जिल्हा : येलदरी धरण,सिद्धेश्वर धरण

🌐 महाराष्ट्रातील प्रशासकीय विभाग

👉1. प्रशासकीय विभाग - विभागातील जिल्हे

👉2. कोकण - मुंबई, उपनगर मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग

👉3. नाशिक - नाशिक, अहमदनगर, धुळे, जळगाव व नंदुरबार

👉4. औरंगाबाद - औरंगाबाद, लातूर, उस्मानाबाद, नांदेड, परभणी, बीड, जालना व हिंगोली

👉5. पुणे विभाग - कोल्हापूर, पुणे, सोलापूर, सातारा व सांगली

👉6. नागपूर विभाग - भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर, वर्धा व गोंदिया

👉 7.  अमरावती विभाग - अमरावती, बुलढाणा, अकोला, यवतमाळ व वाशिम

घटनेतील मूलभूत कर्तव्य

💥💥 घटनेतील मूलभूत कर्तव्य 💥💥
#IndianPolitics

1.घटनेचे पालन करणे आणि तिचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज व राष्ट्रगीत यांचा आदर करणे.  

2.ज्यामुळे आपल्या राष्ट्रीय स्वातंत्र्य लढयास स्फूर्ति मिळाली त्या उदात्त आदर्शाची जोपासना करून त्यांचे अनुसरण करने. 

3.भारतात सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत ठेऊन त्यांचे संरक्षण करणे. 

4.देशाचे संरक्षण करणे व आवाहन केले जाईल तेव्हा राष्ट्रीय सेवा बजावणे. 

5. धार्मिक, भाषिक व प्रादेशिक किंवा वर्गीय भेदांच्या पलीकडे जाऊन भारतातील सर्व जनतेमध्ये सामंजस्य व बंधुभाव वाढीस लावणे. स्त्रियांच्या प्रतिष्ठेला उणेपणा आणणार्‍या प्रथांचा त्याग करणे. 

6. आपल्या समिश्र संस्कृतीचे समृद्ध वारशांचे मोल जाणून त्यांचे जतन करणे. 

7. वने, सरोवरे, नद्या व वन्यजीवसृष्टी यांसह नैसर्गिक पर्यावरणाचे रक्षण करून त्यात सुधारणा करणे, आणि प्राणीमात्रा बद्दल दया भाव बाळगणे. 

8. विज्ञान वादी दृष्टीकोण, मानवतावाद आणि शोधकबुद्धी व सुधारणा यांचा विकास करणे. 

9. सार्वजनिक मालमत्तेचे रक्षण करणे व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणे. 

10. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशाप्रकारे व्यक्तीगत व सामुदायिक कार्याचे सर्व क्षेत्रा मध्ये उत्तमता संपादन करण्यासाठी झटणे. 

11. जो जन्मदाता असेल किंवा पालक असेल त्याने, आपल्या आपत्यास  अथवा पल्यास त्याच्या वयाच्या 6व्या वर्षापासून ते चौदाव्या वर्षापर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणे.   



राज्य लोकसेवा आयोग

घटना कलम क्र. 315 नुसार प्रत्येक घटना राज्यासाठी एक राज्य लोकसेवा आयोग असेल. परंतु दोन राज्यांसाठी संयुक्त लोकसेवा आयोग निर्माण करण्याचा अधिकार राज्यसरकारला आहे.

राज्यसेवा आयोगाचा उद्देश : अपात्र लोकांना सेवेच्या बाहेर ठेऊन पात्र लोकांना सेवेत घेणे.

रचना : राज्य लोकसेवा आयोगामध्ये एक अध्यक्ष व राज्यपाल ठरवितील इतके सदस्य असतात.

नेमणूक : भारताचे राज्यपाल करतात (मुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळ यांच्या सल्ल्याने)

शपथ : राज्यपाल देतात.

राजीनामा : राज्यपालाकडे 

कार्यकाल : अध्यक्ष आणि सदस्यांचा कार्यकाल वयाची 62 वर्ष किंवा नेमणुकीस सहा वर्ष यापैकी कोणतीही एक बाब अगोदर होईल तोपर्यंत ते पदावर रहातात.