08 April 2022

*विज्ञान : धातू व त्यांचे उपयोग, Science Fatcs

🔍 *विज्ञान : धातू व त्यांचे उपयोग*

1⃣ *तांबे :*

▪ भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.
▪ विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

2⃣ *लोखंड :*

▪ ओतीव लोखंडाच्या उपयोग नरम लोखंड तयार करण्याकरिता
▪ ओतीव लोखंडापासून पोलाद तयार करण्याकरिता

3⃣ *अॅल्युमिनीअम :*

▪ घरातील भांडी, विमानाचे भाग, फोटोफ्रेम तयार करण्याकरिता
▪ चॉकलेट, सिगारेट आदि वस्तूच्या आवरणाकरिता
▪ विद्युत वाहक तारा तयार करण्याकरिता.

4⃣ *जस्त :*

▪ लोखंड व पोलाद गंजू नये म्हणून त्यावर विलेपन करण्याकरिता.
▪ विद्युत घटामध्ये इलेक्ट्रोड म्हणून उपयोग केला जातो.
▪ धातूची संमिश्रे तयार करण्याकरिता.

5⃣ *चांदी :*

▪ दागिने तयार करण्याकरिता
▪ दातांमधील पोकळी बुजविण्याकरिता
▪ छायाचित्रण, औषधे आणि अंकनशाई तयार करण्याकरिता
▪ विद्युतविलेपन आणि रजत विलेपन तयार करण्याकरिता
_____________________________  




IMP Science Fatcs :-
Cryptophytes : बर्फावर आढळणारे शैवाल
Lithophytes : दगडांवर आढळणारे शैवाल
Macrocistus : सर्वांत लांब शैवाल
Chlorella : अंतरीक्ष यानात अन्न म्हणून वाढविण्यात येणारे शैवाल
Protoderma : कासवाच्या पाठीवर आढळणारे शैवाल
Cladophora : गोगलगायींच्या पाठीवर आढळणारे शैवाल
Zoocholorella : हायड्राच्या शरीरात आढळणारे शैवाल
Oscillatoria : मानव व प्राण्यांच्या शरीरात आढळणारे शैवाल

भारतातील सर्वांत मोठ्या गोष्टी ,राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे, महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग

● भारतातील सर्वांत मोठ्या गोष्टी

- भारतातील सर्वात मोठे राज्य (क्षेत्रफळ) : राजस्थान
- भारतातील सर्वात मोठे राज्य (लोकसंख्या) : उत्तर प्रदेश
- भारतातील सर्वात जास्त लोकसंख्येचे शहर : मुंबई
- भारतातील सर्वात मोठा जिल्हा : लडाख (काश्मीर)

- भारतातील सर्वात मोठा किल्ला : आग्रा
- सर्वात मोठा दरवाजा : बुलंद दजवजा (फत्तेपूर शिक्री)
- भारतातील सर्वात मोठे वाळवंट : थर (राजस्थान)
- भारतातील सर्वात मोठा नागरी सन्मान : भारतरत्न

- भारतातील सर्वात मोठा लष्करी सन्मान : परमवीर चक्र
- भारतातील सर्वात मोठे मंदिर ( क्षेत्रफळ ) : रामेश्वरम मंदिर (4000 फूट लांब) GB




राष्ट्रीय काँग्रेसची महत्वाची अधिवेशने व त्याचे वैशिष्टे :

1885 – मुंबई – ओमेशचंद्र बॅनर्जी – राष्ट्रीय काँग्रेसचे पहिले अधिवेशन

1886 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी

1887 – मद्रास – बद्रुद्दीन तय्यबजी – पहिले मुस्लिम अध्यक्ष

1888 – अलाहाबाद – सर जॉर्ज युल – पहिले स्काटिश अध्यक्ष

1889 – मुंबई – सर विल्यम वेडरबर्ग – पहिले इंग्रज अध्यक्ष

1896 – कलकत्ता – रहेमतुल्ला सयानी – या अधिवेशनात वंदेमातरम हे गीत प्रथम गायल्या गेले.

1905 – बनारस – गोपाल कृष्ण गोखले – हे अधिवेशन बंगालच्या फाळणीवरुण गाजले.

1906 – कलकत्ता – दादाभाई नौरोजी – या अधिवेशनात चतु:सूत्रीचा ठराव पास करण्यात आला.

1907 – सूरत – राशबिहारी बोस – राष्ट्रीय काँग्रेसमध्ये फुट पडली.

1915 – मुंबई – लॉर्ड सचिन्द्रनाथ सिन्हा – या अधिवेशनात टिळकांना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्याचा ठराव पास करण्यात आला.

1916 – लखनौ – अंबिकाचरण मुजूमदार – या अधिवेशनात टिळक व त्यांच्या सहकार्याना काँग्रेसमध्ये प्रवेश देण्यात आला व मुस्लिम लीग व काँग्रेस यांच्या लखनौ करार झाला.

1917 – कलकत्ता – डॉ. अॅनी बेझंट – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या महिला अध्यक्षा व महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांनी अश्पृश्यता निवारणाचा ठराव मांडला.

1920 – कलकत्ता(विशेष) – लाला लजपत रॉय – या अधिवेशनात महात्मा गांधीजींनी असहकार आंदोलनाचा ठराव मांडला.

1920 – नागपूर – सी. राघवाचारी – या अधिवेशनात महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली असहकार आंदोलन सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला.

1922 – गया – चित्तरंजन दास – कायदेमंडळाच्या प्रवेशावर हे अधिवेशन गाजले.

1924 – बेळगांव – महात्मा गांधी – महात्मा गांधी प्रथमच राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष बनले.

1925 – कानपूर – सरोजिनी नायडू – राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या भारतीय महिला अध्यक्षा.

1927 – मद्रास – एम.ए. अंसारी – सायमन कमिशनवर बहिष्कार टाकण्याचा ठराव पास करण्यात आला.

1928 – कलकत्ता – मोतीलाल नेहरू – नेहरू रिपोर्टला मान्यता देण्यात आली.

1929 – लाहो – पं. जवाहरलाल नेहरू – संपूर्ण स्वातंत्र्याचा ठराव व महात्मा गांधी यांच्या नेतृत्वाखाली संविनय कायदेभंग चळवळ सुरू करण्याची घोषणा करण्यात आली.

1931 – कराची – सरदार पटेल – मूलभूत हक्काचा ठराव पास करण्यात आला.

1936 – फैजपूर – जवाहरलाल नेहरू – ग्रामीण भागातील पहिले अधिवेशन आणि शेतकरी व कामगारांच्या हिताचे ठराव पक्के करण्यात आले.

1938 – हरिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1939 – त्रिपुरा – सुभाषचंद्र बोस –

1940 – रामगढ – अब्दुल कलाम आझाद – वैयक्तिक सत्याग्रहाची घोषणा करण्यात आली.

1940 – मुंबई – मौ. अब्दुल आझाद – चलेजाव आंदोलनाची घोषणा.

1946 – मिरत – जे. बी. कृपालानी –

1947 – दिल्ली – डॉ. राजेंद्रप्रसाद – भारत स्वतंत्र झाल्यानंतरचे पहिले अधिवेशन



महत्वाचे धातू आणि अधातु व त्याचे उपयोग :-

1. तांब्याचा उपयोग :

भांडी व विद्युत वाहक तार तयार करण्यासाठी.

विद्युत विलेपनासाठी व तांब्याचे क्षार तयार करण्याकरिता.

तांब्यापासून तयार करण्यात येणारी संमिश्रे :

संमिश्र –  पितळ

धातू व प्रमाण – तांबे (60 ते 90 %) व जस्त (40 ते 10%)

उपयोग – भांडी तयार करण्याकरिता

विषय : मराठी,काही महत्त्वाच्या म्हणी, समानार्थी शब्द


*💥 विषय : मराठी*

*1) अयोग्य जोडी निवडा. ?*

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

1) अ     
2) ब     
3) क     
4) *यापैकी नाही ☑*

*2) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा. ?*

1) *रीती भूतकाळ ☑*
2) रीती वर्तमानकाळ 
3) पूर्ण वर्तमानकाळ 
4) साधा वर्तमानकाळ

*3) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. ?*

1) कविता   
2) *कवयित्री ☑*
3) कवित्री
4) कवियित्री

*4) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते. ?*

अ) कागद   
ब) आज्ञा    
क) उंदीर     
ड) विद्या

1) ब, क, ड   
2) *अ, ब, क, ड ☑*
3) अ, क, ड   
4) अ, ब, ड

*5) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) मुला   
2) *मुलां ☑*
3) मुलींना   
4) मुलाला

*6) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?*

1) दाशी   
2) *दासी ☑*
3) माळीण   
4) मादी

*7) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.?*

अ) शहारे   
ब) हाल     
क) केळे     
ड) रताळे

1) *अ आणि ब ☑*
2) अ आणि ड   
3) अ, क आणि ड   
4) फक्त ड

*8) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) *कुत्र्या ☑*
2) कुत्री     
3) कुत्रे     
4) कुत्रि

*9) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?*

1) सात   
2) नऊ     
3) *आठ ☑*
4) दहा

*10) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा. ?*

1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल 
2) *पाऊस पडेल ☑*
3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते   
4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️

1) ‘नेआण’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) व्दंव्द समास      2) बहुव्रीही समास   
   3) समाहार समास    4) इतरेतर व्दंव्द समास

उत्तर :- 4

2) ‘खलबत्ता’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

   1) गुजराती    2) हिंदी     
   3) पोर्तुगीज    4) कानडी

उत्तर :- 4

3) ‘एकाक्ष’ – या शब्दास समानार्थी शब्द सांगा.

   1) कावळा    2) एकाग्र     
   3) कमळ    4) एकलक्ष

उत्तर :- 1

4) वृध्द – या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) म्हातारा    2) तरुण     
   3) बुध्दिमान    4) कपी

उत्तर :- 2

5) ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीला पर्यायी म्हण सुचवा.

   1) कोल्हा काकडीला राजी    2) चोराच्या मनात चांदणे
   3) बुडत्याचा पाय खोलात      4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................

    1) काळजी घेणे      2) फोडाला जपणे   
   3) चिंताग्रस्त होणे    4) चिंतातुर होणे

उत्तर :- 1

7) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) शकुनीमामा    2) शत्रू     
   3) आपशत्रू    4) हितशत्रू

उत्तर :- 1

8) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन ‍नियमांनुसार अचूक आहे ?

   1) ऊच्चै:श्रवा    2) उच्चे:श्रवा   
   3) उच्चैश्रवा    4) उच्चैश्रावा

उत्तर :- 2

9) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.

   1) 48      2) 12     
   3) 02      4) 34

उत्तर :- 1

10) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.

   1) निष् + पाप    2) नि: + पाप   
   3) निष + पाप    4) निष्प: + आप

उत्तर :- 2

______________________________

काही महत्त्वाच्या म्हणी

1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.
2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.
3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.
4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.
5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.
7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही
8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.
9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.
10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.
11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.
12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.
13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.
14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.
15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.
16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.
17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.
18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.
20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

__________________________

📍 ‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी __ ह्यांनी लिहिली आहे.

(A) धीरेन तिवारी ✅✅
(B) विक्रम सेठ
(C) किरण देसाई
(D) झुम्पा लहरी

📍 कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?

(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र✅✅
(C) केरळ
(D) तामिळनाडू

📍 ___ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

(A) कानपूर आणि लखनऊ
(B) मुंबई आणि अहमदाबाद
(C) जयपूर आणि कोटा
(D) मुंबई आणि पुणे✅✅

📍 कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?

(A) जर्मनी
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅
(D) जापान
  

__________________

समानार्थी शब्द

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना 
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व 
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन  
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव  
अन्न = आहार, खाद्य 
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा  
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा 
अश्रू = आसू 
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली 
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह 
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी 
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता  
आरोपी = गुन्हेगार, अपराधी 
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान  
आवाज = ध्वनी, रव 
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता 
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण 
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन 
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस  
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन 
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज 
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल 
ओझे = वजन, भार 
ओढा = झरा, नाला 
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे 
अंत = शेवट 
अंग = शरीर
अंघोळ = स्नान 
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश 
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत 
कठीण = अवघड 
कविता = काव्य, पद्य 
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत 
कंजूष = कृपण  
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी 
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग 
किमया = जादू 
कार्य = काम 
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती 
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज   
कुत्रा = श्वान  
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा  
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती 
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक 
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती  
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम  
खोड्या = चेष्टा, मस्करी 
गरज = आवश्यकता
गवत = तृण 
गर्व = अहंकार 
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान 
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक  
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य 
गोड = मधुर  
गोणी = पोते 
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान  
ग्राहक = गिऱ्हाईक 
घर = सदन, गृह, निकेतन, आलय 
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके  
घोडा = अश्व, हय, वारू 
_________________


1) ‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी   
   3) क्रियाविशेषण      4) शब्दयोगी
उत्तर :- 4
2) खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.
   1) शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस !    2) ओहो ! ती पहा सिध्दी आली !
   3) येणार असेल तर येईना बापडा !        4) अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय.
उत्तर :- 3
3) “मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.
   1) रीती भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ
   3) रीती भविष्यकाळ    4) अपूर्ण भूतकाळ
उत्तर :- 1
4) ‘हेला’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
   1) गाय      2) शेळी      3) म्हैस      4) कुत्री
उत्तर :- 3
5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
     ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’
   1) करण    2) संप्रदान    3) अपादान    4) अधिकारण
उत्तर :- 3

६५ वा फिल्मफेअर पुरस्कार २०२०:-

६५ वा फिल्मफेअर पुरस्कार २०२०:-
------------------------------------------
स्थळ :- गुवाहाटी (आसाम ) इंदिरा गांधी अॅथलेटिक स्टेडियम
दिनांक :- १५ फेब्रुवारी २०२०
गुवाहाटी येथे पार पडलेल्या ६५व्या ॲमेझॉन फिल्मफेअर पुरस्कार २०२० मध्ये 'गली बॉय' या चित्रपटाने दहा पुरस्कार पटकावले. तर सिनेविश्वातील अतुलनीय योगदानासाठी फिल्मफेअर जीवनगौरव पुरस्कार ज्येष्ठ दिग्दर्शक रमेश सिप्पी याना देण्यात आला. त्याचप्रमाणे अभिनेता गोविंदा यांना 'एक्सलन्स इन सिनेमा' हा विशेष पुरस्कार देऊन गौरवण्यात आले.
फिल्मफेअर पुरस्कार विजेते:-
• सर्वोत्कृष्ट चित्रपटः गली बॉय
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीः आलिया भट (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता: रणवीर सिंह, (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकः झाेया अख्तर, (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट चित्रपट (समीक्षक पसंती): आर्टीकल १५ आणि सोनचिरीया
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक पसंती): भूमी पेडणेकर आणि तापसी पन्नू, (सांड की आँख)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता (समीक्षक पसंती): आयुषमान खुराना, (आर्टीकल १५)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्रीः अमृता सुभाष, (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेताः सिद्धांत चतुर्वेदी, (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट पटकथा: रीमा कागती, जोया अख्तर, (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट संवादः विजय मौर्या, (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट ओरिजनल कथाः अनुभव सिन्हा, गौरव सोलंकी, (आर्टिकल १५)
• सर्वोत्कृष्ट अभिनेता (पदार्पण): अभिमन्नू दस्सानी (मर्द को दर्द नही होता)
• सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (पदार्पण): अनन्या पांडे (स्टुडंट ऑफ द इयर)
• सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक (पदार्पण): आदित्य धर, (उरी: दसर्जिकल स्ट्राइक)
• सर्वोत्कृष्ट अल्बमः गली बॉय आणि कबीर सिंह
• सर्वोत्कृष्ट गीतः डिव्हाइन अँड अंकुर तिवारी - अपना टाइम आयेगा (गली बॉय)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायकः अरिजीत सिंह - कलंक नही, (कलंक)
• सर्वोत्कृष्ट पार्श्वगायिकाः शिल्पा राव - घुंगरू (वॉर)
• जीवन गौरव पुरस्कार : रमेश सिप्पी
• एक्सलन्स इन सिनेमा : गोविंदा
• आरडी बर्मन अवॉर्ड फॉर अपकमिंग म्युझिक टॅलेंट : शाश्वत सचदेव (उरी)

चालू घडामोडी

*1). NCAER ने भारताचा चालू आर्थिक वर्षात विकास दर किती राहण्याचा अंदाज नुकताच व्यक्त केला आहे.. ?*

(National Council Of Applied Economic Research)
>>>  -7.3 %

*2). भारतातील पहिले अवयवदाता स्मारक नुकतेच कोणत्या राज्यात उभारण्यात येत आहे. ?*

>>> राजस्थान

*3). कोणत्या राज्याने फायर सेफ्टी कंपलायन्स नावाचे पोर्टल सुरु केले आहे. ?*

>>> गुजरात

*4). कोणत्या राज्यसरकारने विद्यार्थ्यांना 1.3 लाख स्मार्टफोन वितरित केले आहे. ?*
>>> पंजाब

*5). कोणत्या राज्यसरकारने महिलांसाठी 'BC सखी योजना' सुरु केली आहे. ?*
(Banking corresponding)

>>> उत्तरप्रदेश

*6). खेलो इंडिया युथ गेम्सची चौथी आवृत्ती कोठे आयोजित केली आहे. ?*

  4). हरियाणा   

1). दिल्ली
2). मुंबई
3). आसाम

*7). कोणत्या खेळाला प्रतिस्पर्धी खेळ म्हणून मान्यता दिली आहे. ?*

>>> योगासन

*8). बाँक्सीग वर्ल्ड कप 2020 मध्ये भारताने किती सुवर्णपदके मिळवली आहेत. ?*

>>> सुवर्ण - 3  रजत -2 कांस्य -4

अमित पंघाल - 52 KG
मनिषा मौन - 57 KG
सिमरनप्रीत कौर - 60 KG

आयोजन - जर्मनी (कोलोन)

*9).  भारतातील पहिली डायव्हरलेस मेट्रो ट्रेन कोणत्या शहरात चालू करणार आहे. ?*
>> दिल्ली

*10). महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये गाढवांसाठी पहिला पूर्ण वेळ दवाखाना उभारण्यात येत आहे. ?*

>>> नांदेड (बिलोली) - सगरोळी

BCCI ने नुकतीच भारतीय संघाच्या निवड समिती अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती करण्यात आली. ?*

>>> चेतन शर्मा

*12). सुगंधाकुमारी यांचे नुकतेच वयाच्या 86 व्या वर्षात निधन झाले आहे. त्या कोण होत्या..?*

>>> कवयित्री

*13). कोणता दिवस 'सुशासन दिन म्हणून साजरा करतात. ?*

>>> 25 डिसेंबर

*14). कोणता दिवस राष्ट्रीय हक्क दिन  म्हणून साजरा करतात. ?*

>>> 24 डिसेंबर

*15). आंतराष्ट्रीय गीता महोत्सव -2020 कोणत्या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे. ?*

>>> कुरुक्षेत्र

*16). ADB ने कोणत्या राज्यासाठी 2100 करोड रुपयांचे कर्ज म्हणून मंजूर केले आहे.. ?*

>>> त्रिपुरा

*17). कोणत्या बँकेने 'infinite India' नावाचे आँनलाईन पोर्टल लाँन्च केले आहे. ?*

>>> ICICI बँक

*18). धर्मेंंद्र प्रधान यांनी कोणत्या राज्याच्या पहिल्या " तेल व वायू रिझर्व" चे उद्घाटन केले आहे. ?*

>>> पश्चिम बंगाल

*19). अंदमान आणि निकोबार चे पोलिस महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे. ?*

>>> सत्येंद्र गर्ग

*20). कोणत्या बँकेने सुरक्षा दलांसोबत मिळून 'बडोदा मिलिट्री सँलरी पँकेज" समझौत्यावर स्वाक्षऱ्या केल्या आहेत. ?*

>>> बँक आँफ वडोदा

_____________________

★ *चालू घडामोडी*★

Q1) कोणत्या देशात भारताच्या ‘रुपे कार्ड’ प्रकल्पाच्या द्वितीय टप्प्याचे उद्घाटन केले गेले?
उत्तर :- भूतान

Q2) कोणत्या व्यक्तीची आंतर-संसदीय संघासाठी (IPU) बाह्य लेखा परीक्षक या पदासाठी निवड झाली?
उत्तर :- गिरीश चंद्र मुर्मू

Q3) कोणत्या राज्यात 'महा आवास योजना' याचे उद्घाटन झाले?
उत्तर :- महाराष्ट्र

Q4) कोणत्या विषयाच्या संदर्भात मोहंती समिती नेमण्यात आली आहे?
उत्तर :- मोठ्या कॉर्पोरेट उद्योगांना बँक परवाना देणे

Q5) कोणत्या तारखेला राष्ट्रीय विद्यार्थी सेना (NCC) यांनी 72 वा वर्धापनदिन साजरा केला?
उत्तर :- 22 नोव्हेंबर 2020

Q6) कोणत्या राज्यात भारतातले पहिले ‘शेवाळ उद्यान’ (मॉस गार्डन) उभारले जात आहे?
उत्तर :- उत्तराखंड

Q7) कोणत्या योजनेच्या स्मृतीप्रीत्यर्थ ‘आवास दिन' साजरा करतात?
उत्तर :- प्रधानमंत्री आवास योजना - ग्रामीण

Q8) कोणत्या व्यक्तीला 2020 साली बुकर पारितोषिक दिला गेला?
उत्तर :- स्‍टुअर्ट डग्लस

Q9) कोणत्या देशाच्या राजदूताच्या परिचय पत्राचा राष्ट्रपती कोविंद यांनी स्वीकार केला?
उत्तर :- ताजिकिस्तान

Q10) ‘राष्ट्रीय नवजात सप्ताह 2020’ याचा विषय काय आहे?
उत्तर :- प्रत्येक आरोग्य सुविधा केंद्रावर आणि प्रत्येक ठिकाणी प्रत्येक नवजात बालकासाठी गुणवत्ता, समता, गौरव


__________________

प्रश्न..1

चोळ कालखंडातील ग्रामप्रशासन बाबतचा अभ्यास करण्यास कोणता शिलालेख महत्वपूर्ण ठरतो?
A जतवाई
B हळमिदी
C उतरमेरू✅
D वरील सर्व

प्रश्न 2

पुष्टीमार्ग सिद्धांत कोणी मांडला?
A शंकराचार्य
B फराबी
C वल्लभचार्य✅
D मोईनुदिन चिस्ती
E यापैकी नाही