Friday 8 April 2022

विषय : मराठी,काही महत्त्वाच्या म्हणी, समानार्थी शब्द


*💥 विषय : मराठी*

*1) अयोग्य जोडी निवडा. ?*

   अ) विरोधीदर्शक    -  उंहू
   ब) शोकदर्शक    -  अगाई
   क) मौनदर्शक    -  गुपचित

1) अ     
2) ब     
3) क     
4) *यापैकी नाही ☑*

*2) ‘मी पुस्तक वाचत असे’ या वाक्यातील काळ ओळखा. ?*

1) *रीती भूतकाळ ☑*
2) रीती वर्तमानकाळ 
3) पूर्ण वर्तमानकाळ 
4) साधा वर्तमानकाळ

*3) ‘कवी’ या पुल्लिंगी नामाचे स्त्रीलिंगी रूप लिहा. ?*

1) कविता   
2) *कवयित्री ☑*
3) कवित्री
4) कवियित्री

*4) पुढीलपैकी कोणत्या शब्दाचे वचन हे एकवचनासारखेच राहते. ?*

अ) कागद   
ब) आज्ञा    
क) उंदीर     
ड) विद्या

1) ब, क, ड   
2) *अ, ब, क, ड ☑*
3) अ, क, ड   
4) अ, ब, ड

*5) ‘मुलांना’ या शब्दाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) मुला   
2) *मुलां ☑*
3) मुलींना   
4) मुलाला

*6) ‘दास’ या शब्दाचे स्त्रीलिंगी रूप ओळखा. ?*

1) दाशी   
2) *दासी ☑*
3) माळीण   
4) मादी

*7) पुढीलपैकी अनेकवचनी नाम ओळखा.?*

अ) शहारे   
ब) हाल     
क) केळे     
ड) रताळे

1) *अ आणि ब ☑*
2) अ आणि ड   
3) अ, क आणि ड   
4) फक्त ड

*8) ‘कुत्रा’ या नामाचे सामान्यरूप काय होईल ?*

1) *कुत्र्या ☑*
2) कुत्री     
3) कुत्रे     
4) कुत्रि

*9) मराठीत एकूण किती विभक्ती मानल्या आहेत ?*

1) सात   
2) नऊ     
3) *आठ ☑*
4) दहा

*10) विध्यर्थी वाक्य कोणते ते ओळखा. ?*

1) जर ढग दाटले तर पाऊस पडेल 
2) *पाऊस पडेल ☑*
3) पाऊस पडला असता तर बरे झाले असते   
4) पाऊस पडण्याची शक्यता आहे का ?

⭕️ संपूर्ण मराठी व्याकरण 10 प्रश्न ⭕️

1) ‘नेआण’ या शब्दाचा समास ओळखा.

   1) व्दंव्द समास      2) बहुव्रीही समास   
   3) समाहार समास    4) इतरेतर व्दंव्द समास

उत्तर :- 4

2) ‘खलबत्ता’ हा शब्द पुढीलपैकी कोणत्या भाषेतून मराठीत आला ?

   1) गुजराती    2) हिंदी     
   3) पोर्तुगीज    4) कानडी

उत्तर :- 4

3) ‘एकाक्ष’ – या शब्दास समानार्थी शब्द सांगा.

   1) कावळा    2) एकाग्र     
   3) कमळ    4) एकलक्ष

उत्तर :- 1

4) वृध्द – या शब्दाचा विरुध्दार्थी शब्द ओळखा.

   1) म्हातारा    2) तरुण     
   3) बुध्दिमान    4) कपी

उत्तर :- 2

5) ‘खाई त्याला खवखवे’ या म्हणीला पर्यायी म्हण सुचवा.

   1) कोल्हा काकडीला राजी    2) चोराच्या मनात चांदणे
   3) बुडत्याचा पाय खोलात      4) यापैकी कोणतेही नाही

उत्तर :- 2

6) ‘तळहातावरील फोडाप्रमाणे जपणे’ म्हणजे............................

    1) काळजी घेणे      2) फोडाला जपणे   
   3) चिंताग्रस्त होणे    4) चिंतातुर होणे

उत्तर :- 1

7) कपटी व कृष्णकारस्थाने करणारा मनुष्य – या शब्दसमुहासाठी दिलेला योग्य शब्द ओळखा.

   1) शकुनीमामा    2) शत्रू     
   3) आपशत्रू    4) हितशत्रू

उत्तर :- 1

8) खालीलपैकी कोणता शब्द शुध्दलेखन ‍नियमांनुसार अचूक आहे ?

   1) ऊच्चै:श्रवा    2) उच्चे:श्रवा   
   3) उच्चैश्रवा    4) उच्चैश्रावा

उत्तर :- 2

9) रिकाम्या जागी अचुक पर्याय लिहा. मराठी भाषेत एकूण ........................... वर्ण आहेत.

   1) 48      2) 12     
   3) 02      4) 34

उत्तर :- 1

10) ‘निष्पाप’ या शब्दाची संधी ओळखा.

   1) निष् + पाप    2) नि: + पाप   
   3) निष + पाप    4) निष्प: + आप

उत्तर :- 2

______________________________

काही महत्त्वाच्या म्हणी

1 कंबरेचं सोडलं, डोक्याला बांधलं.
अर्थ:
लाजलज्जा पार सोडून देणे.
2 कठीण समय येता कोण कामास येतो?
अर्थ:
आपल्या अडचणींच्या वेळी कोणीही उपयोगी पडत नाही.
3 कडू कारले तुपात तळले, साखरेत घोळले, तरी कडू ते कडूच.
अर्थ:
माणसाचा मुळ गुणधर्म कितीही प्रयत्न केला तरी बदलत नाही.
4 कधी खावे तुपाशी, कधी राहावे उपाशी.
अर्थ:
सांसारिक स्थिती नेहमीच सारखी नसते.
5 कर नाही त्याला डर कशाला?
अर्थ:
ज्याने वाईट कृत्य केले नाही त्याला भीती बाळगण्याचे कारण नाही.
6 कधी गाडीवर नाव, कधी नावेवर गाडी.
अर्थ:
सर्वांचे दिवस येतात, तीच ती स्थिती कधीच राहत नाही.
7 करंगळी सुजली म्हणजे डोंगरा एवढी हो‌ईल का?
अर्थ:
जी गोष्ट लहान असते, ती कितीही प्रयत्न केला तरी अमर्याद मोठी होऊ शकत नाही
8 करणी कसायची, बोलणी मानभावची.
अर्थ:
बोलणे गोड गोड, आचरण मात्र निष्ठूर.
9 करायला गेले गणपती अन् झाला मारुती.
अर्थ:
जे करायचे ते समजून उमजून नीटपणे करावे. नाहीतर त्यातून भलतेच घडते.
10 करायला गेलो एक अन् झाले एक.
अर्थ:
करायचे एक आणि झाले भलतेच.
11 करावे तसे भरावे.
अर्थ:
जसे चांगले वाईट करावे तसे त्याचे चांगले वाईट परिणाम भोगावे.
12 करीन ती पूर्व दिशा.
अर्थ:
एखादी अधिकारी व्यक्ती सांगेल ते सारे इतरांनी निमूटपणे मान्य करणे.
13 कर्कशेला कलह गोड, पद्मिनीला प्रीती गोड.
अर्थ:
दुष्ट स्त्रीला कलह करणे आवडते तर गुणवंतीला प्रेम आवडते.
14 कवडी कवडी माया जोडी.
अर्थ:
काटकसरीने वागून थोडी थोडी बचत केल्यास बरीच मोठी रक्कम शिल्लक पडते.
15 कवड्याचे दान वाटले, गावात नगारे वाजले.
अर्थ:
करणे थोडे पण गवगवाच फार.
16 कसायाला गाय धार्जिणी.
अर्थ:
भांडखोर व नीतिमत्ता नसलेल्या गुंड माणसापुढे गरीब माणसे नसतात.
17 काकडीची चोरी, फाशीची शिक्षा.
अर्थ:
अपराध खूप लहान पण शिक्षा मात्र फार मोठी.
18 काखेत कळसा अन् गावाला वळसा.
अर्थ:
भान नसल्याने जवळच असलेली वस्तू शोधण्यासाठी दूर जाणे.
19 काट्याचा नायटा करणे.
अर्थ:
एखाद्या क्षुल्लक गोष्टीचा भलताच विपर्यास करणे.
20 काठी मारल्याने पाणी दुभंगत नाही.
अर्थ:
खर्‍या मैत्रीचा भंग आगंतुक कारणांनी होऊ शकत नाही.

__________________________

📍 ‘द क्रॉसफायर ऑफ लव्ह’ ही कादंबरी __ ह्यांनी लिहिली आहे.

(A) धीरेन तिवारी ✅✅
(B) विक्रम सेठ
(C) किरण देसाई
(D) झुम्पा लहरी

📍 कोणत्या राज्य सरकारने सरकारी कर्मचाऱ्यांना पाच दिवसांचा आठवडा लागू करण्याची घोषणा केली?

(A) कर्नाटक
(B) महाराष्ट्र✅✅
(C) केरळ
(D) तामिळनाडू

📍 ___ या दोन शहरांच्या दरम्यान भारताची पहिली आंतर-शहरी इलेक्ट्रिक बस सेवा सुरू करण्यात आली आहे.

(A) कानपूर आणि लखनऊ
(B) मुंबई आणि अहमदाबाद
(C) जयपूर आणि कोटा
(D) मुंबई आणि पुणे✅✅

📍 कोणत्या देशाने त्यांच्या विकसनशील देशांच्या यादीतून भारताला वगळले?

(A) जर्मनी
(B) दक्षिण कोरिया
(C) संयुक्त राज्ये अमेरिका✅✅
(D) जापान
  

__________________

समानार्थी शब्द

अनाथ = पोरका
अनर्थ = संकट
अपघात = दुर्घटना 
अपेक्षाभंग = हिरमोड
अभिवादन = नमस्कार, वंदन, प्रणाम 
अभिनंदन = गौरव
अभिमान = गर्व 
अभिनेता = नट
अरण्य = वन, जंगल, कानन  
अवघड = कठीण
अवचित = एकदम
अवर्षण = दुष्काळ
अविरत = सतत, अखंड
अडचण = समस्या
अभ्यास = सराव  
अन्न = आहार, खाद्य 
अग्नी = आग
अचल = शांत, स्थिर
अचंबा = आश्चर्य, नवल
अतिथी = पाहुणा  
अत्याचार = अन्याय
अपराध = गुन्हा, दोष
अपमान = मानभंग
अपाय = इजा 
अश्रू = आसू 
अंबर = वस्त्र
अमृत = पीयूष
अहंकार = गर्व
अंक = आकडा
आई = माता, माय, जननी, माउली 
आकाश = आभाळ, गगन, नभ, अंबर 
आठवण = स्मरण, स्मृती, सय
आठवडा = सप्ताह 
आनंद = हर्ष
आजारी = पीडित, रोगी 
आयुष्य = जीवन, हयात
आतुरता = उत्सुकता  
आरोपी = गुन्हेगार, अपराधी 
आश्चर्य = नवल, अचंबा
आसन = बैठक
आदर = मान  
आवाज = ध्वनी, रव 
आज्ञा = आदेश, हुकूम
आपुलकी = जवळीकता 
आपत्ती = संकट
आरसा = दर्पण 
आरंभ = सुरवात
आशा = इच्छा
आस = मनीषा
आसक्ती = लोभ
आशीर्वाद = शुभचिंतन 
इलाज = उपाय
इशारा = सूचना
इंद्र = सुरेंद्र
इहलोक = मृत्युलोक
ईर्षा = चुरस  
उत्सव = समारंभ, सण, सोहळा
उक्ती = वचन 
उशीर = विलंब
उणीव = कमतरता
उपवन = बगीचा
उदर = पोट
उदास = खिन्न
उत्कर्ष = भरभराट
उपद्रव = त्रास
उपेक्षा = हेळसांड
ऊर्जा = शक्ती
ॠण = कर्ज 
ॠतू = मोसम
एकजूट = एकी, ऐक्य
ऐश्वर्य = वैभव
ऐट = रुबाब, डौल 
ओझे = वजन, भार 
ओढा = झरा, नाला 
ओळख = परिचय
औक्षण = ओवाळणे 
अंत = शेवट 
अंग = शरीर
अंघोळ = स्नान 
अंधार = काळोख, तिमिर
अंगण = आवार
अंगार = निखारा
अंतरिक्ष = अवकाश 
कथा = गोष्ट, कहाणी, हकिकत 
कठीण = अवघड 
कविता = काव्य, पद्य 
करमणूक = मनोरंजन
कठोर = निर्दय
कनक = सोने
कटी = कंबर
कमळ = पंकज
कपाळ = ललाट
कष्ट = श्रम, मेहनत 
कंजूष = कृपण  
काम = कार्य, काज
काठ = किनारा, तीर, तट
काळ = समय, वेळ, अवधी 
कान = श्रवण
कावळा = काक
काष्ठ = लाकूड
किल्ला = गड, दुर्ग 
किमया = जादू 
कार्य = काम 
कारागृह = कैदखाना, तुरुंग
कीर्ती = प्रसिद्धी, लौकिक, ख्याती 
कुतूहल = उत्सुकता
कुटुंब = परिवार
कुशल = हुशार, तरबेज   
कुत्रा = श्वान  
कुटी = झोपडी
कुचंबणा = घुसमट
कृपण = कंजूष
कृश = हडकुळा
कोवळीक = कोमलता
कोठार = भांडार
कोळिष्टक = जळमट
खण = कप्पा  
खडक = मोठा दगड, पाषाण
खटाटोप = प्रयत्न
खग = पक्षी
खड्ग = तलवार
खरेपणा = न्यायनीती 
ख्याती = कीर्ती, प्रसिद्धी, लौकिक 
खात्री = विश्वास
खाली जाणे = अधोगती  
खिडकी = गवाक्ष
खेडे = गाव, ग्राम  
खोड्या = चेष्टा, मस्करी 
गरज = आवश्यकता
गवत = तृण 
गर्व = अहंकार 
गाय = धेनू, गोमाता
गाणे = गीत, गान 
गंमत = मौज, मजा
गंध = वास, दरवळ
ग्रंथ = पुस्तक  
गाव = ग्राम, खेडे
गुन्हा = अपराध
गुलामी = दास्य 
गोड = मधुर  
गोणी = पोते 
गोष्ट = कहाणी, कथा
गौरव = सन्मान  
ग्राहक = गिऱ्हाईक 
घर = सदन, गृह, निकेतन, आलय 
घरटे = खोपा
घागर = घडा, मडके  
घोडा = अश्व, हय, वारू 
_________________


1) ‘चाकूमुळे’ यातील ‘मुळे’ हे कोणते अव्यय आहे?
   1) उभयान्वयी      2) केवलप्रयोगी   
   3) क्रियाविशेषण      4) शब्दयोगी
उत्तर :- 4
2) खालील वाक्यातून ‘व्यर्थ उद्गारावाची अव्यय’ असणारे वाक्य शोधा.
   1) शाब्बास ! आशुतोष, चांगले यश मिळविलेस !    2) ओहो ! ती पहा सिध्दी आली !
   3) येणार असेल तर येईना बापडा !        4) अरेच्या ! स्वरूप चांगलाच बोलू लागलाय.
उत्तर :- 3
3) “मी निबंध लिहित असे.” या वाक्यातील काळ ओळखा.
   1) रीती भूतकाळ    2) रीती वर्तमानकाळ
   3) रीती भविष्यकाळ    4) अपूर्ण भूतकाळ
उत्तर :- 1
4) ‘हेला’ या शब्दाचे स्त्रीलिंग रूप कोणते ?
   1) गाय      2) शेळी      3) म्हैस      4) कुत्री
उत्तर :- 3
5) खालील वाक्यातील अधोरेखित शब्दाची कारक – विभक्ती कोणती आहे ?
     ‘मी शाळेतून आत्ताच घरी आलो.’
   1) करण    2) संप्रदान    3) अपादान    4) अधिकारण
उत्तर :- 3

No comments:

Post a Comment

Latest post

सहकार

   11th सहकार  :- Click Here 12th सहकार  :- Click Here